लाखो जात आहेत, तुम्ही?
कोठे? येशू ख्रिस्ताच्या मृत्युच्या वार्षिक स्मृतिदिनासाठी.
हे लोक का जात आहेत? कारण ख्रिस्ताच्या मृत्युचा मानवजातीसाठी काय अर्थ होतो हे त्यांना माहीत आहे.
त्याचा अर्थ आजार, त्रास व मृत्यु यापासून लवकरच सुटका होणार आहे.
तसेच नंदनवनाची पुनर्स्थापना झालेल्या पृथ्वीवर मृत झालेल्या प्रियजनांना देखील पुनरुत्थित करण्यात येणार आहे.
येशूचा मृत्यु हे सर्व आशीर्वाद कसे मिळवून देणार आहे? ते तुम्ही बघावे याचे आम्ही तुम्हाला निमंत्रण देतो.
या महत्त्वाच्या प्रसंगी तुम्ही उपस्थित राहावे असे यहोवाचे साक्षीदार तुम्हाला हे आमंत्रण देत आहेत.
तुमच्या घराजवळ असणाऱ्या राज्य सभागृहात या प्रसंगासाठी उपस्थित राहा.
या वर्षी ती तारीख शुक्रवार, एप्रिल १७, सूर्यास्तानंतर येते.
निश्चित वेळेबाबत यहोवाच्या साक्षीदारांकडून खात्री करून घ्या.