वेळ निघून गेल्यावर त्यांनी विचार केला!
इ. स. पू. ६०९ हे वर्ष आहे. यरुशलेम हे स्थान आहे. वक्ता आहे यिर्मया संदेष्टा. त्याच्या प्रिय, पवित्र शहराचा नाश त्याने पूर्वीच भाकित केला होता, त्या यहूद्यांनी यहोवाकडे पाठ फिरविल्यामुळे, आणि खोट्या दैवतांच्या भक्तीत स्वतःला पूर्णपणे समर्पित केल्यामुळे एक विनाश येणार होता. उच्च स्थानी त्यांनी कामुक, लैंगिक भक्तीत गुरफटून घेतले. अधर्मी लोकांच्या दैवतांना पेयार्पणे वाहिली; सूर्य, चंद्र व तारे यांची भक्ती केली; बालास धूप वाहिला; आणि मोलेख दैवतास त्यांच्या मुलांचे बळी अर्पिले.—१ राजे १४:२३, २४; यिर्मया ६:१५; ७:३१; ८:२; ३२:२९, ३४, ३५; यहेज्केल ८:७-१७.
त्यांच्या दृष्टीने यिर्मया विपत्तीचा आक्रोश करणारा, एक धर्मवेडा आणि प्रत्येक बाबतीत व प्रत्येकासाठी असंतुष्ट असा होता. ३८ वर्षे यरुशलेम निवासी त्याची थट्टा करीत होते. ह्या घटकेपर्यंत लोकांनी यहोवाला भक्तीतून वगळले होते, ज्याच्याविषयी काळजी बाळगावी असा तो सामर्थ्यवान नाही, असे ते म्हणत होते. त्यांनी म्हटले की, “यहोवा चांगले करणार नाही आणि तो वाईटही करणार नाही, आणि यहोवाने या शहराचा त्याग केला आहे, यहोवा काही पाहत नाही.”—सफन्या १:१२; यहेज्केल ९:९.
संदेष्टे यिर्मया व यहेज्केल यरुशलेमाच्या नाशाची घोषणा करीत होते, परंतु काहीच घडून आले नाही. म्हणूनच अशा एखाद्या दृष्टांताची परिपूर्णता त्यांच्या दिवसात होईल, ही गोष्ट त्यांनी फेटाळून लावताना त्यांनी म्हटलेः “दिवस लांबत चालले आहेत, प्रत्येक दृष्टांत निष्फळ होत आहे.” परंतु याकरिता यहोवाचे उत्तर होते की, “दिवस जवळ आले आहेत, . . . मी बोलत आहे, व मी बोलतो ते वचन सिद्धीस जाईलच. त्याला इतःपर विलंब लागणार नाही. हे फितुरी घराण्या, मी तुमच्या काळी वचन बोलेन व ते पूर्ण करीन.”—यहेज्केल १२:२२-२५.
इ. स. पू. ६०९ मध्ये, यहोवाला त्याच्या वचनाची पूर्णता करण्याची वेळ आली होती. जवळ जवळ चार दशके, यिर्मयाने सूचना देऊन झाल्यानंतर बाबेलच्या लष्कराकरवी यरुशलेमेस वेढा पडला. अठरा महिन्यानंतर कोट पाडले गेले, मंदिर जाळले गेले, आणि बहुसंख्य लोकांना देशाबाहेर, बाबेलास घेऊन गेले. पूर्वभाकितानुसार, तरवार, दुष्काळ, व मरी यांच्याकरवी शहराचा नाश झाला.—२ राजे २५:५-१७; २ इतिहास ३६:१७-२०; यिर्मया ३२:३६; ५३:१२-२०.
यिर्मयाचे बरोबर होते. परंतु लोक चुकले होते. त्यांनी विचार केला तेव्हा वेळ निघून गेली होती. तो दृष्टांत फार दूरच्या वर्षांकरता नव्हता. तो त्यांच्या दिवसासाठी होता.
हा केवळ इतिहास नाही. यरुशलेमाच्या बाबत जे घडले ते भविष्यवादित होते. काहीतरी जे घडणार त्याची ते पूर्वछाया होते. सध्याचे ख्रिस्ती धर्मजगत ख्रिस्ताचे नाव घेते, व देवासोबतच्या करारासंबंधी नातेसंबंध असल्याचा दावा करते, तरी सुद्धा ते पुरातन यरुशलेमच्या निवासांच्या पावलांस अनुसरते. ख्रिस्ती धर्मराज्याची चर्चेस मोठ्या प्रमाणात मूर्तिपूजक तत्त्वांची शिकवण देतात, जी लैंगिक अनैतिकतेने कलुषित झालेली आहेत; ते राजकीय योजनांचे पाठीराखे आहेत; जागतिक युद्धानां पाठिंबा देतात; निर्माणकर्ता या नाते देवाला बाजूस सारून उत्क्रांतीस कवटाळतात, त्यांना सोयीस्कर असलेल्या अशा वेदीवर लक्षावधी अजन्म बालकांच्या दिल्या जाणाऱ्या अर्पणाकडे कानाडोळा करतात, आणि मानवी तत्त्वज्ञानाचा स्वीकार करून, दावा करतात की, बायबल दंतकथा व परिकथा असे आहे.
यरुशलेमाचे लोक ज्या प्रकारे यिर्मयाचा उपहास करीत होते तद्वत, ख्रिस्ती धर्मजगत आज यहोवाच्या साक्षीदारांचा उपहास करते. हर्मगिदोनात येणाऱ्या नाशाची, साक्षीदार देत असलेल्या सूचनेला कवडीमोल मानून दुर्लक्षिली जाते. ख्रिस्ती धर्मजगत म्हणते की, ‘पृथ्वीबाबत देव आस्थेवाईक नाही. त्याने स्वर्ग चालवावा, आम्ही पृथ्वी चालवू. आणि मग, हर्मगिदोन येणार असेल तर ते आमच्या पिढीत नाही. ही कथा आम्ही पूर्वीच ऐकलेली आहे. त्याचा आमच्यावर परिणाम होणार नाही.’
इतिहासाची ही पुनरावृत्ती आहे का? हे पुन्हा दुसऱ्यांदा घडणार का, की जेव्हा लक्षावधींना आढळून येईल की, त्यांनी वेळ निघून गेली तेव्हा कोठे विचार केला?