आनंदी राष्ट्र
आनंदी राष्ट्र! हे वर्णन आज मानवजातीतील राष्ट्रांमध्ये कोणाला जुळणारे आहे का? कोणाही राष्ट्राला मोठ्या आनंदाने हा दावा करता येईल का की, त्यांनी आपणामधून हिंसा, गुन्हेगारी, गरीबी, प्रदुषण, गर्भगळीत करणारे आजार, राजकीय भ्रष्टाचार व धर्मद्वेष ही निपटून काढली आहेत? ही ध्येये गाठण्याविषयीची खरी आशा एखादे राष्ट्र देऊ शकते का? तसे काहीच नाही!
जागतिक दृश्याविषयी काय? संयुक्त सोवियत रशियाचे राष्ट्राध्यक्ष मिखाएल गर्बाचेव्ह यांनी जुलै १६, १९९० रोजी म्हटलेः “आम्ही आंतरराष्ट्रीय नातेसंबंधाच्या एका युगाची समाप्ती करून, माझ्या मते एक भक्कम, दीर्घकालीन शांतीच्या काळात प्रवेश करीत आहोत.” तथापि, त्याच तारखेच्या टाईम मासिकाच्या अहवालात म्हटले होते की, मास्कोवर चढाई करू शकणारी १२० महाशक्तीची क्षेपणास्त्रे आजही अमेरिका राखून आहे, ज्यापैकीचे एकही सहजपणे त्या शहराचा विध्वंस करू शकते. तसेच, रशिया देखील प्रत्त्युतर देण्याच्या समान तयारीत आहे यात काहीच संशय नाही. आता, अणूशस्त्र निर्मितीची पूर्ण माहिती असलेल्या संयुक्त राष्ट्र सभेच्या अनेक सदस्यांनाही या गोष्टीबद्दल हलकीशी हर्षसंवेदना आहे की, कोणास प्रथम चाप दाबण्याची संधी मिळेल.
खरोखरीचे आनंदी राष्ट्र
साधारण ३,५०० वर्षापूर्वी इतिहासात एके काळी एक खरोखरीचे आनंदी राष्ट्र होते. ते प्राचीन काळातील इस्राएल राष्ट्र होते. जेव्हा देवाने त्या लोकांची मिसराचे दास्यातून सुटका केली होती, त्यावेळी ते मोशेबरोबर मिळून जयोस्तवाचे गीत गाऊ लागले, व हा आनंद त्यांनी, जोवर ते त्यांचा देव व मुक्तीदाता, याच्या आज्ञापालनात राहिले तोवर अनुभविला.—निर्गम १५:१-२१; अनुवाद २८:१, २, १५, ४७.
शलमोनाच्या कारकिर्दीत “यहुदा व इस्राएल हे समुद्र किनाऱ्याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत; ते खाऊन पिऊन चैनीत असत.” हाच असा मोठा आनंदाचा काळ होता, ज्या वेळी इतिहासात तेव्हापर्यंत उभारण्यात आले नव्हते इतके वैभवशाली मंदिर यरुशलेमात यहोवा देवाच्या भक्तीसाठी उभारले गेले.—१ राजे ४:२०; ६:११-१४.
आधुनिक काळातील आनंदी राष्ट्र
प्राचीन काळच्या इस्राएल राष्ट्राने आधुनिक काळच्या एका राष्ट्राची पडछाया दिली. कोणत्या राष्ट्राची? मध्यपूर्वेतील राजकीय इस्राएल का? बातम्यांच्या अहवालावरून हे सूचित होते की, ते धडपडणारे राष्ट्र कोणाही प्रकारे आनंदात नाही. जिला संयुक्त राष्ट्र संघ असे संबोधितात त्याने आपल्या सदस्य राष्ट्रांना खरा आनंद मिळवून दिलेला आहे का? नाही. आजच्या कोणाही राजकीय राष्ट्रांत खरा आनंद नांदत असल्याचे आढळत नाही. हाव, भ्रष्टाचार आणि अप्रामाणिकता ही कित्येक देशात वाढत असता सर्वसाधारण लोकांना जगण्याची निकराची धडपड करावी लागत आहे.—नीतीसूत्रे २८:१५; २९:२.
तथापि, आज एक असे असामान्य राष्ट्र आहे जे सर्वश्रेष्ठ आनंदात आहे. ते राजकीय नाही, कारण त्या राष्ट्राचा मस्तक, खिस्त येशू याने आपल्या प्रजेबद्दल असे म्हटले होतेः “तुम्ही जगाचे नाही.” (योहान १५:१९) जेथे संयुक्त राष्ट्र संघाला आपल्या सदस्यांना संयुक्त करण्यात अपयश आले, तेथे हे राष्ट्र त्याची प्रजाः “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा,” यातून मिळवीत आहे. (प्रकटीकरण ७:४, ९) आता, या राष्ट्राची संख्या ४० लाखांपर्यंत पोहंचली आहे व ती संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य असणाऱ्या १५९ राष्ट्रांपैकी ६० राष्ट्रांच्या लोकसंख्येपक्षा अधिक आहे. या ४० लाख लोकांची बोली-भाषांची संख्या २०० पर्यंत आहे; तरीपण ते सर्व एकमताची “शुद्ध वाणी” बोलतात.—सफन्या ३:९.
इतक्या विविध संस्कृतीचे लोक एक भाषा बोलणारे आहेत ते नवलाईचे वाटत नाही का? तसे वाटेल, पण खरे पाहता, ऐक्यता घडवून आणणारी ही भाषा किंवा वाणी आपणामध्ये देवाच्या जवळ आलेल्या राज्याचा संदेश सामावून आहे. हे आनंदी राष्ट्र “पृथ्वीच्या दिगंतापासून” आलेले असून यांना सबंध जगभरात ‘यहोवाचे साक्षीदार’ असे ओळखण्यात येते. (यशया ४३:५-७, १०; जखर्या ८:२३) जगभरात कोणाही दिशेला आपण प्रवास करा, तुम्हाला हे लोक आढळतील.
यशया २:२-४ मध्ये सर्व राष्ट्रांमधून सामोऱ्या आलेल्या लोकांविषयीचे वर्णन करण्यात आले आहे. ते म्हणतातः “चला, आपण यहोवाच्या पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” हेच इतरांनाही, मोठ्या आवेशाने, यहोवाकडून म्हणजेच त्याच्या पवित्र शास्त्रातून शिकण्यास आमंत्रित करीत आहेत; की ज्यायोगे तेही त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यास शिकू शकतील. हेच असे एकमेव राष्ट्र आहे ज्याने शांतीचा खरा मार्ग अनुसरला आहे व त्याच्या लोकांनी सांप्रतकाळीच ‘तरवारी मोडून त्याचे फाळ केले, आपल्या भाल्यांच्या कोयत्या केल्या आहेत व ते इतःपर युद्धकला शिकत नाहीत.’ खरेच हे आनंदी राष्ट्र आहे.
या आनंदात आपणही सहभागी होऊ शकता. तुम्हीही, त्या जलद गतीने येत असलेल्या दिवसाबद्दल शिकू शकता, ज्यात राजा ख्रिस्त येशू, हानीकारक माणसे व सरकारे यांचा समूळ नाश करून या पृथ्वीवर नंदनवनाची पुनर्स्थापना करील. (दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०) आता देखील खरोखरीचे ऐक्यातील राष्ट्र या नात्याने यहोवाचे साक्षीदार त्यांच्या त्या महान कार्यात मोठा आनंद मिळवीत आहेत, जे खऱ्या शांतीच्या त्या गौरवी काळाचे पूर्वतयारीत केले जात आहे. याचीच माहिती पुढील पानांवर मिळेल.