वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 १२/१ पृ. २९
  • तुम्हाला आठवते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला आठवते का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • वरिष्ठ अधिकाऱ्‍यांबद्दल ख्रिश्‍चनांचा दृष्टीकोण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • तुम्ही कोणाच्या अधिकाराला ओळखले पाहिजे?
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • ‘न्यायनिवाडा करण्याची घटिका’ आली आहे
    जागृत राहा!
  • यहोवाच्या न्यायदंडाबद्दल त्याची स्तुती करा!
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 १२/१ पृ. २९

तुम्हाला आठवते का?

तुम्ही अलिकडील टेहळणी बुरुज मासिकाचे अंक वाचलेत का? तर मग, तुम्हाला पुढील प्रश्‍नांची उत्तरे देता येतात का ते पहाः

◻ मत्तय २५:३४ मध्ये, “जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले ते वतन करून घ्या,” असे येशूने मेंढरांना उद्देशून म्हटले, त्यामागील अर्थ काय असावा?

येशूच्या म्हणण्यामागील असा अर्थ नव्हता की, हे मेंढरासमान लोक त्याच्याबरोबर स्वर्गात राज्य करतील. त्याऐवजी, ही मेंढरे, त्यांच्यासाठी “जगाच्या स्थापनेपासून” जे राज्य सिद्ध केले त्याच्या भूतलप्रदेशात, परत उद्धारलेली प्रजा या नात्याने वस्तीस असतील. या मार्गी ते त्यांचा “सनातन पिता” व राजा ख्रिस्त येशू याची पार्थिव मुले बनतील. (यशया ९:६, ७)—५/१, पृष्ठ १७.

◻ इ. स. ३३ पूर्वी जे विश्‍वासू जन मेले त्यांच्या पुनरुत्थान समयी त्यांचे स्वागत करण्यासाठी काही अभिषिक्‍त शेषांनी या पृथ्वीवर हयात राहण्याची गरज आहे का?

नाही, त्याची तितकी गरज नाही. कारण मोठ्या संकटातून बचावणाऱ्‍या मोठ्या लोकसमुदायातील अनेकांस आज संस्थेच्या जबाबदाऱ्‍या सांभाळण्याची तालीम दिली जात आहे. यास्तव ते परिस्थितीला सहज हाताळू शकतील व पुनरुत्थितांस “नवे आकाश” याखालील ‘नव्या पृथ्वी’च्या व्यवस्थेची ओळख करून देतील. (२ पेत्र ३:१३)—५/१, पृष्ठे १७, १८.

◻ जगभर द्वेष व विरोध असताही यहोवाचे साक्षीदार निराश व उदासीन का होत नाहीत?

येशूने हे भाकित केले होते की विरोध व द्वेष या गोष्टी खऱ्‍या उपासकांची ओळखचिन्हे ठरतील. (योहान १५:२०, २१; २ तीमथ्य ३:१२) अशाप्रकारे सुवार्ता घोषकांना ही हमी दिलेली आहे की, त्यांना ईश्‍वरी मर्जी आहे. याशिवाय, यहोवाच्या साक्षीदारांनी हे ओळखले आहे की, त्यांना सर्वोच्च देव यहोवा याचा पाठिंबा आहे.—६/१, पृष्ठ २१.

◻ विवाह सोबती हे एकाच जोडीचे असल्यास कोणते फायदे होत असतात?

पती व पत्नी त्यांच्या देवाच्या भक्‍तीत एकमेकांना उत्तेजन देण्याच्या भूमिकेत असतात. तसेच आपसातील समस्या सोडविण्यात ते शास्त्रवचनांचे मार्गदर्शन संगतीत पाहू शकतात.—६/१, पृष्ठ १२.

◻ यहोवाने पुरविलेल्या अंर्तदृष्टीकरवी फायदे मिळविणे आहेत तर आम्ही कोणत्या तीन गोष्टींना आपल्यापरिने करण्याची गरज आहे?

आम्हाठायी यहोवाच्या संस्थेची आवड असण्याची गरज आहे; आम्ही नियमितपणे देववचनांचा अभ्यास व शिवाय ज्यांच्याकरवी त्यांची अधिक चांगली समज होते त्या साहित्याच्या साहाय्याने तो करण्याची आवश्‍यकता आहे; आम्ही जे शिकतो त्यावर मनन केले पहिजे व ते आमच्या नित्याच्या जीवनास कसे लागू करता येईल ते पहावे.—७/१, पृष्ठ २६.

◻ प्राचीन काळचे इस्राएल लोक इतक्या भयानक अंतर्दृष्टीहीनपणे का वागले?

यहोवाने त्यांच्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींचे आवडीने मनन करण्यात ते मागे पडले. (स्तोत्रसंहिता १०६:७, १३)—८/१, पृष्ठ ७.

◻ “ईश्‍वरी भक्‍ती” म्हणजे काय? (१ तीमथ्य ३:१६)

ईश्‍वरी भक्‍ती म्हणजे देवास दाखविलेला पूज्यभाव, उपासना व सेवा आणि त्याच्या विश्‍वव्याप्त सार्वभौमत्वास निष्ठावंतपणा.”—८/१, पृष्ठ १५.

◻ पौलाने २ थेस्सलनीकाकर २:३ मध्ये ज्याचा उल्लेख केला आहे तो “धर्मत्यागी पुरुष” कोण?

पौल कोणा वैयक्‍तिकाविषयी भाष्य करीत नव्हता, कारण तो म्हणतो की हा “पुरुष” पौलाच्या काळी दृश्‍यमान होता व तो आपले अस्तित्व यहोवा त्याला या व्यवस्थेच्या शेवटी नष्ट करीपर्यंत टिकवणार होता. या कारणास्तव, “धर्मत्यागी पुरुष” ही लाक्षणिक संज्ञा आहे. पुरावा हे स्पष्ट करतो की, हा ख्रिस्ती धर्मजगताच्या गर्विष्ठ व महत्त्वाकांक्षी धर्मगुरुंचा वर्ग आहे व याने स्वतःला शतकानुशतके एक कायदा म्हणून स्वतःच वागविले आहे.—९/१, पृष्ठ १३.

◻ पवित्र शास्त्र लिखाणात जरी हजारो बदल घडले तरी पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे हा दावा दुर्बळ बनला का?

नाही. शास्त्र प्रामाण्य आम्हास सांगतात की, हे फरक मूळ शास्त्रवचनाच्या दृष्टीने अगदीच गौण आहेत. ते सर्वसाधारणपणे वचनांच्या खरेपणास अधिक बळकट करण्याचे काम करतात. (स्तोत्र. ११९:१०५; १ पेत्र १:२५)—१०/१, पृष्ठे ३०, ३१.

◻ येशूने दिलेल्या तलांताच्या दाखल्यात तलांताना कामी लावणे याचा अर्थ काय होत होता? (मत्तय २५:१९-२३)

तलांताना कामी लावणे याचा अर्थ देवाकडील राजदूत या नात्याने विश्‍वासूपणे सेवा करणे, शिष्य बनविणे व जे सर्व देवाच्या घरचे आहेत अशांना आध्यात्मिक सत्याची भरवणूक करणे. (मत्तय २४:४५; २८:१९, २०; २ करिंथकर ५:२०)—१०/१, पृष्ठ १३.

◻ इतर सर्व सल्लागार, उपदेशकांच्या उगमाशी तुलना करताना पवित्र शास्त्र हे कोणत्या तीन गोष्टीत सर्वश्रेष्ठ ठरते?

पहिलीः त्यातील उपदेश नेहमीच उपयोगी, हितकारक ठरलेला आहे. (स्तोत्र. ९३:५) दुसरीः पवित्र शास्त्र हे काळाच्या सत्वपरिक्षणात टिकून राहिले. (यशया ४०:८; १ पेत्र १:२५) तिसरीः पवित्र शास्त्रातील उपदेशाचा विस्तार अतुलनीय आहे. आम्ही कोणाही प्रकारच्या समस्येला वा निर्णयाला तोंड देऊन असू; पवित्र शास्त्रात त्याचे असे सूज्ञ उत्तर सापडेल, जे आमचे साहाय्यक ठरेल.—११/१, पृष्ठ २०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा