खरी प्रीती लाभदायक ठरते
“तुमचे कार्य आणि तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा यावरुन जी प्रीती तुम्ही त्याच्या नामावर दाखवली तीही देवाने विसरावी असा तो अन्यायी नाही.”—इब्रीयांस ६:१०.
१, २. खरी प्रीती ही आम्हाला व्यक्तीशः का लाभदायक ठरते?
निःस्वार्थी प्रीती ही खरीच श्रेष्ठ, उमद्या स्वभावाची, व अत्यंत बहुमोल असा गुण आहे, जो आम्हाला व्यक्त करता येतो. हे प्रेम (ग्रीक, अ․गाʹपे) आम्हाकडून सतत अधिक गोष्टींची मागणी करीत असते. तथापि, आमची निर्मिती न्यायी व प्रेमी देवाने केलेली असल्यामुळे आम्हाला निःस्वार्थ प्रेम खरेच लाभदायक असल्याचे आढळून येते. हे कसे काय?
२ खरी प्रीती लाभदायक ठरते यामागील एक कारण हे की, त्यात मानसशास्त्रीय तत्त्व गोवलेले आहे, म्हणजे आमच्या शरीरावर विचार व भावना यांचा होणारा परिणाम त्यामध्ये समाविष्ट आहे. मानसिक त्रास यावरील एक प्रामाण्य म्हणतातः “‘शेजाऱ्यावर प्रीती कर’ हा कधी काळी देण्यात आलेला सूज्ञ वैद्यकीय सल्ला होय.” खरेच, “दयाळू मनुष्य आपल्या जिवाच हित करतो.” (नीतीसूत्रे ११:१७) हाच विचार दर्शविणारे आणखी एक वचन असे आहेः “उदार मनाचा समृद्ध होतो. जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल.”—नीतीसूत्रे ११:२५; पडताळा लूक ६:३८.
३. खरे प्रेम लाभदायक व्हावे यासाठी देव कशी कृती करतो?
३ देव निःस्वार्थीपणाचे बक्षिस देत असल्यामुळे प्रीती लाभदायक ठरते. आम्ही वाचतोः “जो दरिद्य्रावर दया करतो तो परमेश्वराला [यहोवा, न्यू.व.] उसने देतो. त्याच्या सत्कृत्याची फेड [देव] करील.” (नीतीसूत्रे १९:१७) यहोवाचे साक्षीदार देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करतात तेव्हा या शब्दांनुरुप वागतात. त्यांना माहीत आहे की, ‘त्यांचे कार्य आणि त्यांनी पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा यावरुन जी प्रीती त्यांनी त्याच्या नामावर दाखवली तीही देवाने विसरावी असा तो अन्यायी नाही.’—इब्रीयांस ६:१०.
आम्हापुढील सर्वोत्तम उदाहरण
४. खरी प्रीती लाभदायक ठरु शकते याबद्दलचे सर्वोत्तम उदाहरण कोण देतो, आणि हे त्याने कसे केले?
४ खरी प्रीती लाभदायक ठरु शकते याबद्दलचे सर्वोत्तम उदाहरण कोण देतो बरे? ते तर देवापेक्षा इतर कोणाचेही नाही! देवाने “[मानवजातीच्या] जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला.” (योहान ३:१६) खंडणी यज्ञार्पणावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवनाची प्राप्ती साध्य होऊ शकण्यासाठी स्वतःच्या पुत्राला देऊ करण्यामध्ये यहोवाला खरीच मोठी किंमत द्यावी लागली; पण यामुळे त्याच्याठायी असणारे प्रेम व समभावना हे गुण दिसले. याची प्रचिती आणखी एका प्रसंगाद्वारे दिसली की, “मिसरमधील इस्राएलांना झालेल्या सर्व दुःखाने तो दुःखी झाला” होता. (यशया ६३:९) तर मग, वधस्तंभावरील आपल्या पुत्राला बघताना व “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा का त्याग केलास?” अशी त्याची आर्त आरोळी ऐकताना त्याला किती दुःख झाले असावे त्याची कल्पना करा.—मत्तय २७:४६.
५. देवाने मानवजातीच्या जगावर आपली प्रीती दाखवून स्वतःचा पुत्र यज्ञार्पण म्हणून दिल्यामुळे काय साध्य होऊ शकले?
५ खरी प्रीती लाभदायक ठरते हे यहोवाला प्रत्यक्षात आढळले का? होय, ते त्याला निश्चितपणे आढळले. सैतानाने आणलेल्या सर्व दबावामध्ये येशूने पूर्ण रुपाने आपली विश्वसनीयता दाखवल्यामुळे देवाला सैतानाच्या तोंडावर केवढे चांगले उत्तर देता आले! (नीतीसूत्रे २७:११) खरे म्हणजे, देवाचे राज्य यहोवाच्या नामावरील कलंक दूर करण्यात, पृथ्वीवर नंदनवनाची प्रस्थापना करण्यात आणि लाखो लोकांना चिरकालिक जीवन देण्यात जे काही करणार आहे ते, देवाने मानवजातीवर आपली इतकी प्रीती दाखवून स्वतःचा अत्यंत प्रिय पुत्र बलिदानासाठी बहाल केल्यामुळेच घडू शकले.
येशूचे सुंदर उदाहरण
६. प्रीतीने येशूला काय करण्यास चालना दिली?
६ खरी प्रीती लाभदायक ठरते याबद्दलचे सुंदर उदाहरण देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याजमध्ये दिसते. त्याची आपल्या स्वर्गीय पित्यावर प्रीती आहे व याच प्रेमाने भारावून येशू यहोवाच्या इच्छेप्रमाणे सर्वदा करीत राहण्यासाठी पुढे सरसावला. (योहान १४:३१; फिलिप्पैकर २:५-८) येशूला कधी कधी “मोठ्या आक्रोशाने व अश्रु गाळीत” आपल्या पित्याला याचना करावी लागली तरी त्याने देवावरील आपली प्रीती नित्याने जोपासली.—इब्रीयांस ५:७.
७. खरी प्रीती लाभदायक ठरते हे येशूला कसे आढळले?
७ अशा या निःस्वार्थ प्रीतीमुळे येशूला काही प्रतिफळ मिळाले का? होय, निश्चितपणे! त्याने आपल्या साडे तीन वर्षांच्या कालवधीत ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यापासून त्याला जो आनंद मिळू शकला तो विचारात घ्या. त्याने लोकांची शारीरिकदृष्ट्या व आध्यात्मिकदृष्ट्या केवढी मदत केली! याखेरीज, सैतानाने आपणावर आणलेल्या सर्व गोष्टीत विश्वासू राहून त्याने हे दाखविले की, परिपूर्ण माणसाला देवाला आपली पूर्ण सचोटी राखता येते. यामुळे दियाबलाला लबाड ठरविण्यात आले याचे येशूला पूर्ण समाधान लाभले. त्याचप्रमाणे, देवाचा विश्वासू सेवक राहिल्यामुळे येशूला त्याच्या पुनरुत्थानानंतर स्वर्गातील अमर जीवनाचे मोठे प्रतिफळ मिळाले. (रोमकर ६:९; फिलिप्पैकर २:९-११; १ तीमथ्य ६:१५, १६; इब्रीयांस १:३, ४) शिवाय जेव्हा नंदनवनाची पुनर्स्थापना होईल व तेथे लाखो लोकांचे मृतातून पुनरुत्थान करण्यात येईल त्या हजार वर्षांच्या कालावधीमध्ये तसेच त्यापूर्वी हर्मगिदोनात येशूपुढे किती विलोभनीय हक्क ठेवलेले आहेत! (लूक २३:४३) यास्तव, खरी प्रीती लाभदायक ठरते हे येशूला आढळू शकले यात काही संशय नाही.
पौलाचे उदाहरण
८. पौलाठायी देव व सहमानव यांच्याबद्दल खरे प्रेम असल्यामुळे त्याला कोणता अनुभव आला?
८ प्रेषित पेत्राने एकदा येशूला विचारलेः “पाहा, आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहो, तर आम्हास काय मिळणार आहे?” येशूने थोडक्यात असे उत्तर दिलेः “ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नामाकरिता सोडली आहेत, त्याला शंभरपट मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल.” (मत्तय १९:२७-२९) या बाबतीत आपणापुढे प्रषित पौलाचे उल्लेखनीय उदाहरण आहे. त्याला पुष्कळ आशीर्वाद मिळाले. त्यांचे लिखाण लूकने प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात केले आहे. पौलाठायी देव आणि सहमानवाबद्दल खरी प्रीती होती, व त्यामुळेच त्याने सन्माननीय परुशी या नात्याने असलेले ध्येय सोडून टाकले. शिवाय पौलाला ज्या ज्या गोष्टी सहन कराव्या लागल्या त्या म्हणजे, मारहाण, मरेपर्यंत नेणारा त्रास, धोके, उपासमार, या सर्वांबद्दल विचार करा. हे त्याने देव व त्याची पवित्र सेवा यावरील खऱ्या प्रेमामुळे केले.—२ करिंथकर ११:२३-२७.
९. खऱ्या प्रीतीचे प्रदर्शन केल्यामुळे पौलाला कसे बहुमानित करण्यात आले?
९ खऱ्या प्रेमाचे असे प्रदर्शन केल्यामुळे यहोवाने पौलाला काही प्रतिफळ दिले का? पौलाचे सेवकपण केवढे फलदायी ठरले ते जरा विचारात घ्या. त्याला एकामागोमाग ख्रिस्ती मंडळ्यांची प्रस्थापना करता आली. शिवाय देवाने त्याला किती अद्भुत चमत्कार करण्यासाठी समर्थ केले! (प्रे. कृत्ये १९:११, १२) पौलाला अतिमानवी दृष्टांत प्राप्त होण्याचा व आता ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनाचा भाग बनलेली १४ पत्रे लिहिण्याचा हक्क मिळाला. या सर्वांचा कळस म्हणजे स्वर्गातील अमर जीवनाचे बक्षिस त्याला देण्यात आले. (१ करिंथकर १५:५३, ५४; २ करिंथकर १२:१-७; २ तीमथ्य ४:७, ८) देव, खरी प्रीती लाभदायक बनवतो हे पौलाला निश्चितपणे आढळले.
आमच्या काळात खरी प्रीती लाभदायक ठरते
१०. येशूचे शिष्य बनण्यात व यहोवावर आपले प्रेम प्रदर्शित करण्यामध्ये काय किंमत मोजावी लागेल?
१० खरी प्रीती लाभदायक ठरते हे आज यहोवाच्या साक्षीदारांनाही आढळले आहे. यहोवाच्या बाजूला आपली भूमिका ग्रहण करुन त्याच्यावर आपली प्रीती व्यक्त करणे व येशूचे शिष्य बनणे यामुळे सचोटी रक्षक या अर्थाने आपले जीवनही द्यावे लागेल. (पडताळा प्रकटीकरण २:१०.) या कारणामुळे, आपण आधी किंमत मोजावी असे येशूने म्हटले. पण ही किंमत आम्ही, शिष्य बनणे हे लाभदायक आहे की नाही हे बघण्यासाठी मोजीत नसतो. उलटपक्षी, शिष्यत्वामुळे जे जे द्यावे लागणार आहे त्याची तयारी करण्यासाठी ही किंमत मोजत असतो.—लूक १४:२८.
११. काही जण स्वतःचे देवास समर्पण करण्यात का मागे ठेवतात?
११ यहोवाचे साक्षीदार देवाच्या वचनाद्वारे जो संदेश देत असतात त्याजवर पुष्कळांचा, लाखोंचा विश्वास आहे हे खरे. पण ते देवास आपले समर्पण करण्यात व बाप्तिस्मा घेण्यात स्वतःला मागे ठेवतात. याचा अर्थ, त्यांच्याठायी, इतरांना वाटणाऱ्या देवाच्या प्रीतीची उणीव आहे असा असू शकेल का? पुष्कळांना खरा विश्वास ग्रहण न करणाऱ्या आपल्या वैवाहिक सोबत्याच्या मर्जीत रहावे असे वाटत असल्यामुळे ते समर्पण व बाप्तिस्मा ही पावले उचलत नाहीत. इतरांना, एका उद्योगपतीला वाटते तशीच प्रवृत्ती असल्यामुळे ते देवाजवळ येत नाही. तो माणूस एकदा साक्षीदाराला असे म्हणाला होताः “मला पाप आवडते.” तर मग, अशा लोकांना देव व ख्रिस्ताने त्यांच्यासाठी केलेल्या गोष्टींबद्दलची रसिकता नाही हे उघड आहे.
१२. खऱ्या प्रीतीमध्ये देवाच्या समीप नेणाऱ्या ज्ञानाच्या प्रतिफळाबद्दल या मासिकाने कोणती ठळक माहिती दाखविली?
१२ पण आम्हाठायी, यहोवा देव व येशू ख्रिस्ताने केलेल्या गोष्टींबद्दल आवड वाटते तर मग, आमच्या स्वर्गीय पित्याची सेवा करण्यात आणि येशूचे शिष्य होण्यात जे काही द्यावे लागते ते सर्व देण्याची आमची तयारी आम्ही दाखवू. देवावरील खऱ्या प्रेमामुळेच जीवनाच्या हरप्रकारातील स्त्री-पुरुषांनी—यशस्वी उद्योगपती, नावाजलेले क्रिडापटु इत्यादि लोकांनी—ख्रिस्ती सेवकपणासाठी स्वहेतुसाधक ध्येये सोडून दिली व पौलाचे अनुकरण केले. देवास जाणून त्याची सेवा करण्यामुळे मिळणाऱ्या मोबदल्यात त्यांनी कशाचाही स्वीकार केलेला नाही. याबद्दल द वॉचटावर मासिकाने एकदा असे म्हटले होतेः “आम्ही असे विचारले होते की, सत्याच्या मोबदल्यात हजारो डॉलर्स प्राप्त करण्यासाठी किती बांधव तयार होतील. एकानेही हात उंचावला नाही! लाख डॉलर्स कोण मिळवू इच्छिल? कोणीही नाही! कोणाला दहा लाख डॉलर्स घ्यावेसे वाटतील? ईश्वरी गुणवत्ता व ईश्वरी योजना यांच्या मोबदल्यात कोणाला हे सबंध जग प्राप्त करुन घ्यावेसे वाटेल? कोणालाही नाही! मग, आम्ही म्हटलेः मित्रहो, तुम्ही असमाधानी नाहीत. तुम्हाला समृद्ध आहोत असे जे वाटते की, ज्यामुळे देवाच्या ज्ञानाच्या मोबदल्यात काहीही मिळवण्याची तुमची इच्छा नाही, तर आम्हाला वाटते तसेच तुम्हालाही समृद्ध असल्याचे वाटते आहे.” (डिसेंबर १५, १९१४, पृष्ठ ३७७) होय, देवाबद्दल व त्याच्या उद्देशाबद्दलचे अचूक ज्ञान आपल्याला त्याच्या अधिक समीप आणते आणि खरी प्रीती लाभदायक ठरते याचा अनुभव आपल्याला देते.
१३. तुम्हाला व्यक्तीगत अभ्यास कसा वाटला पाहिजे?
१३ आमची देवावर प्रीती आहे तर आपण त्याची इच्छा जाणून घेऊन त्याप्रमाणे करीत राहू. (१ योहान ५:३) आपण व्यक्तीगत अभ्यास, प्रार्थना आणि ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे या गोष्टींबद्दल गंभीरपणे विचार करु. यामध्ये स्वार्थत्यागाची जरुरी आहे, कारण यामध्ये वेळ, शक्ती व इतर गोष्टी खर्च होत असतात. दूरदर्शनवरील कार्यक्रम बघावा की, आपल्या व्यक्तीगत पवित्र शास्त्राभ्यासात सहभागी व्हावे ही निवड आपल्याला करावी लागेल. जेव्हा आम्ही अभ्यासाला गंभीरपणे महत्त्व देतो व तो करण्यासाठी पुरेसा वेळ बाजूला काढतो तेव्हा आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या केवढे सबळ होतो, दुसऱ्यांना साक्ष देण्यात केवढे प्रभावी बनतो आणि ख्रिस्ती सभांमधून केवढा लाभ मिळवीत असतो!—स्तोत्रसंहिता १:१-३.
१४. प्रार्थना व यहोवा देवासोबतचे चांगले नातेसंबंध या गोष्टी केवढ्या महत्त्वपूर्ण आहेत?
१४ “प्रार्थनेत तत्पर” राहून आपण आपल्या स्वर्गीय पित्यासोबत बोलणी करण्याचा आनंद नित्याने मिळवतो का? (रोमकर १२:१२) किंवा या मोलवान हक्काबद्दल काही करता येऊ शकणार नाही इतके कामात असतो? यहोवा देवासोबतचे नातेसंबंध बळकट करण्यासाठी “निरंतर प्रार्थना” करणे जरुरीचे आहे. (१ थेस्सलनीकाकर ५:१७) आम्ही मोहपाशाला सामोरे जात असताना यहोवासोबतच्या चांगल्या नातेसंबंधाशिवाय इतर काहीही कामी येऊ शकणार नाही. पोटीफरच्या बायकोने योसेफाला गळ घातली तेव्हा तिचा प्रतिकार करण्यासाठी तो कशामुळे समर्थ झाला? मेद व पारसाच्या कायद्याने यहोवाला प्रार्थना न करण्याची बंदी घातली असताना सुद्धा कशामुळे दानीएलाने प्रार्थना करण्याचे सोडले नाही? (उत्पत्ती ३९:७-१६; दानीएल ६:४-११) या लोकांना तर देवासोबतच्या चांगल्या नातेसंबंधामुळेच विजयी होता आले, आणि हीच गोष्ट आपल्याला देखील साहाय्यक ठरत आहे!
१५. आम्हाला ख्रिस्ती सभांबद्दल काय वाटावयास हवे व का?
१५ आता, मंडळीच्या पाच साप्ताहिक सभांबद्दल आपण केवढा गंभीर विचार ठेवून आहोत बरे? आमच्या समविश्वासू बांधवांसोबत एकत्रित होण्याचे सोडू नये हे कर्तव्य पूर्ण करण्यामध्ये थकवा, थोडीशी शारीरिक अस्वस्थता किंवा थोडेसे वाईट हवामान अडखळण बनू देतो का? (इब्रीयांस १०:२४, २५) चांगला पगार असणाऱ्या एका अमेरिकन कामगाराला त्याची नोकरी त्याच्या ख्रिस्ती सभामधील उपस्थितीच्या बाबतीत अडखळण बनत आहे हे दिसले. त्यामुळे त्याने आपली नोकरी बदलली, आर्थिक नुकसान पत्करले पण मंडळीच्या सर्व सभांना नियमितपणे उपस्थित राहू लागला. आमच्या सभा एकमेकांना उत्तेजन देण्यात आणि एकमेकांचा विश्वास वाढविण्यामध्ये मदत देत असतात. (रोमकर १:११, १२) या सर्व गोष्टीत आपल्याला, “जो सढळ हाताने पेरितो, तो त्याच हाताने त्याची कापणी करील,” हे तत्त्व खरे असल्याचे आढळले नाही का? (२ करिंथकर ९:६) होय, अशा पद्धतीने खरी प्रीती दाखवीत राहणे खराच लाभ मिळवून देते.
खरी प्रीती व आमचे सेवकपण
१६. लोकांना अनौपचारिक साक्ष देण्यासाठी प्रेम आम्हाला उद्युक्त करते तेव्हा काय घडू शकते?
१६ खरी प्रीती आम्हाला देवाचे लोक या नात्याने सुवार्तेचा प्रचार करण्याची चालना देते. उदाहरणार्थ, ती आम्हाला अनौपचारिक साक्षीकार्य करण्यास लावते. आम्हाला कदाचित अनौपचारिक बोलणे करण्यासाठी कुचंबणा वाटेल, पण प्रीती आम्हाला बोलण्यासाठी उद्युक्त करील. खरे म्हणजे, संभाषण कसे सुरु करावे व ते राज्याकडे कसे निरवावे याचे मार्ग शोधून काढण्यास प्रीतीच भाग पाडील. याचे एक उदाहरण असे आहेः एका विमान प्रवासात एका ख्रिस्ती वडीलांना आपल्या शेजारी रोमन कॅथोलिक पाळक बसल्याचे आढळले. वडीलांनी सुरवातीला पाळकासोबत साध्या प्रश्नांबद्दल चर्चा केली. पण, प्रवास संपला व पाळक विमानातून खाली आले तेव्हापर्यंत त्यांची आस्था खूप वाढली होती व त्यांनी आमची दोन पुस्तके देखील घेतली होती. अनौपचारिक साक्ष देण्याचा हा केवढा उत्तम परिणाम!
१७, १८. ख्रिस्ती सेवकपणाच्या बाबतीत प्रीती आम्हाला काय करण्यास चालना देईल?
१७ खरी प्रीती आम्हाला घरोघरच्या कार्यात तसेच ख्रिस्ती सेवेच्या इतर प्रकारात नियमित रुपात सहभागी होण्यासाठी चालना देते. जितक्या अधिक प्रमाणात आपण पवित्र शास्त्रीय चर्चेत सहभागी होतो तितक्या अधिकपणे आपण यहोवा देवाच्या नावाला सन्मान आणतो व मेंढरासमान लोकांना जीवनाच्या मार्गावर येण्याची मदत देतो. (पडताळा मत्तय ७:१३, १४.) आम्हाला पवित्र शास्त्रीय चर्चा करता आली नाही तरी आमचे श्रम व्यर्थ जाणार नाही. आमचे लोकांच्या घरी उपस्थित असणे हीच गोष्ट एक साक्ष देते आणि आम्हाला सेवकपणाकडून लाभ मिळतो, कारण आमचा विश्वास दृढ केल्याशिवाय आपल्याला इतरांना पवित्र शास्त्रीय सत्याची घोषणा करता येणार नाही. हे खरे की, घरोघर जाण्यास नम्रता लागते, ‘आम्ही सर्व काही सुवार्तेकरिता करतो, यासाठी की, आम्ही इतरांबरोबर तिचा अंशभागी व्हावे.’ (१ करिंथकर ९:१९-२३) पण देव व सहमानव यांजविषयी आम्हास वाटणाऱ्या प्रीतीमुळे आपण नम्रपणे प्रयत्न करतो व आम्हाला समृद्ध आशीर्वाद मिळतात.—नीतीसूत्रे १०:२२.
१८ याचप्रमाणे पवित्र शास्त्रीय सत्याबद्दल आस्था दाखविणाऱ्या लोकांची भेट घेण्यासंबंधाने जाणीवपूर्वक राहण्यात खरी प्रीतीच यहोवाच्या लोकांना साहाय्यक ठरते. पवित्र शास्त्राचा अभ्यास आठवड्यामागून आठवडे व महिन्यांमागून महिने करीत राहणे हे देव व शेजारी यांच्यावरील प्रेमाचे प्रतिक आहे, कारण यात वेळ, प्रयत्न आणि भौतिक गोष्टींचा व्यय समाविष्ट असतो. (मार्क १२:२८-३१) आणि मग, जेव्हा आपले पवित्र शास्त्र अभ्यास घेणारे विद्यार्थी बाप्तिस्मा घेतात व पुढे पूर्ण वेळेच्या सेवकपणात समाविष्ट होतात त्यावेळी खरी प्रीती लाभदायक ठरणारी आहे याची खात्री आपणाला होत नाही का?—पडताळा २ करिंथकर ३:१-३.
१९. प्रीती व पूर्ण वेळेची सेवा यात कोणता संबंध आहे?
१९ पूर्ण वेळेच्या कार्यात सहभागी होण्याची शक्यता आपल्याला आहे तर त्यासाठी भौतिक सुखविलासाचा त्याग करण्यास निस्वार्थ प्रेम आपल्याला चालना देईल. अशा प्रकारे व्यक्त केलेले प्रेम खरेच लाभदायक आहे याची आज हजारोहजार साक्षीदार साक्ष देऊ शकतील. पूर्ण वेळेच्या सेवेत सहभागी होण्याची तुमची परिस्थिती आहे, पण तुम्ही त्याचा लाभ घेत नसल्यास तुम्हाला किती आशीर्वादांना मुकावे लागत आहे याची तुम्हाला कल्पना येणार नाही.—पडताळा मार्क १०:२९, ३०.
इतर मार्गांची लाभदायकता
२०. प्रेम आम्हाला क्षमाशील होण्यात कशी मदत देते?
२० खरी प्रीती लाभदायक ठरण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे ती आम्हाला क्षमाशील बनण्यात मदत देते. होय, प्रीती “अपकार स्मरत नाही.” खरे म्हणजे “प्रीती पापांची रास झाकते.” (१ करिंथकर १३:५; १ पेत्र ४:८) “रास” म्हणजे अनेक पापे, होय ना? शिवाय क्षमाशील असणे किती लाभदायक आहे! तुम्ही क्षमा करता तेव्हा तुम्हाला व ज्याने तुमच्या विरुद्ध पाप केले आहे त्याला अधिक बरे करते. पण अधिक महत्त्वाचे ते हे की, आम्ही आमच्या अपराध्यांना आधी क्षमा करीत नाही तर यहोवा आम्हाला क्षमा करील अशी अपेक्षा धरता येणार नाही.—मत्तय ६:१२; १८:२३-३५.
२१. खरे प्रेम आपल्याला अधीन होण्यात कसे साहाय्य करते?
२१ तसेच, खरे प्रेम आम्हाला अधिक नम्र बनण्यात साहाय्य करुन लाभदायी ठरते. आपली यहोवावर प्रीती आहे तर आम्ही त्याच्या सामर्थ्यशाली हाताखाली नम्र होऊ. (१ पेत्र ५:६) त्याजवरील प्रेम हे त्याने निवडलेले साधन, “विश्वासू व बुद्धिमान दास” याला देखील अधीन राहण्यास आम्हाला उद्युक्त करील. यामध्ये, जे मंडळीत पुढाकार घेतात अशांच्या देखील अधीन राहणे समाविष्ट आहे. हे लाभदायक आहे, कारण ते न केल्यास आम्हास ‘हितकारक ठरणार नाही.’ (मत्तय २४:४५-४७; इब्रीयांस १३:१७) अर्थातच, हे अधीन असण्याचे तत्त्व कौटुंबिक वर्तुळात देखील लागू होते. यामुळे कुटुंबातील आनंद, शांती, व सुसंगतपणा वाढीस लागत असल्यामुळे ते मार्गाक्रमण लाभदायक ठरते आणि यासोबत आम्ही देवाला संतुष्ट करतो ही जाणीव झाल्यामुळे आम्हाला समाधान लाभते.—इफिसकर ५:२२; ६:१-३.
२२. आम्ही खरे आनंदी कसे होऊ शकतो?
२२ यास्तव, अ․गाʹपे, निःस्वार्थ व तत्त्वबद्ध प्रेम हा असा सर्वश्रेष्ठ गुण आहे ज्याची जोपासना झाली पाहिजे. खरी प्रीती लाभदायक ठरते यात कोणताही संशय नाही. हाच गुण आम्ही अधिकाधिक आमचा प्रेमळ देव यहोवा याचे गौरव करण्यासाठी जोपासल्यास आम्ही खरेच आनंदी होऊ शकू.
तुमची प्रतिक्रिया काय आहे?
◻ यहोवा देवाने खरे प्रेम कोणकोणत्या मार्गांनी दाखविले आहे?
◻ येशू ख्रिस्ताने आपले प्रेम कसे दाखविले?
◻ खरे प्रेम प्रदर्शित करण्यामध्ये प्रेषित पौलाने आपले कोणते उदाहरण राखले?
◻ यहोवाची साक्षीदार कशी प्रीती दाखवीत आहेत?
◻ खरी प्रीती लाभदायक ठरते असे तुम्ही का म्हणू शकता?
[१६ पानांवरील चित्रं]
मानवजातीबद्दल यहोवाला वाटणाऱ्या प्रीतीमुळेच त्याने आपला पुत्र देऊ केला की ज्यामुळे लोकांना चिरकालिक जीवन मिळवता येईल. या खऱ्या प्रेमाबद्दल तुम्हाला खरी कदर वाटते का?
[१८ पानांवरील चित्रं]
यहोवाबद्दल आम्हाला वाटणारे खरे प्रेम “प्रार्थनेत तत्पर” राहण्याची चालना देईल