वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ६/१ पृ. २१-२६
  • वरिष्ठ अधिकाऱ्‍यांना आमची सापेक्ष अधीनता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वरिष्ठ अधिकाऱ्‍यांना आमची सापेक्ष अधीनता
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “या कारणास्तव तुम्ही करही देता”
  • “ज्यांचे देणे त्या सर्वांना भरून द्या”
  • “भय” व “सन्मान”
  • सापेक्ष अधीनता
  • “देवास आपला शासक मानून आज्ञा पाळणे”
  • “सौम्यतेने व भिडेने”
  • अधिकाराविषयी ख्रिस्ती दृष्टिकोन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • वरिष्ठ अधिकाऱ्‍यांबद्दल ख्रिश्‍चनांचा दृष्टीकोण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • अधिकाऱ्‍यांचा हक्क स्वीकारणे—का महत्त्वाचे आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • तुम्ही कोणाच्या अधिकाराला ओळखले पाहिजे?
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ६/१ पृ. २१-२६

वरिष्ठ अधिकाऱ्‍यांना आमची सापेक्ष अधीनता

“आज्ञेत राहणे अगत्याचे आहे.” —रोमकर १३:५.

१. नाझी वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या हातून यहोवाच्या साक्षीदारांना कोणता कठीण अनुभव सहन करावा लागला, आणि हे त्यांनी “वाईट केल्यामुळे” घडले का?

जानेवारी ७, १९४० रोजी फ्रांझ रेटर आणि पाच तरुण आस्ट्रीयनांचा शिरच्छेद करण्यात आला. ते बायबलफोरशर, यहोवाचे साक्षीदार होते व त्यांनी हिटलरच्या साम्राज्यात आपल्या विवेकास अनुसरून शस्त्रे स्वीकारण्याचे नाकारले म्हणून त्यांना मृत्यु आला. दुसऱ्‍या जागतिक महायुद्धात ज्या हजारोंनी आपल्या विश्‍वासास्तव मरण पत्करले त्यापैकी रेटर हा एक होता. आणखी पुष्कळांनी बंद्यांच्या छावणीत कित्येक वर्षे काढली. या सर्वांनी “वाईट ते केले” होते म्हणून यांना नाझी वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या ‘तरवारी’चा त्रास सहन करावा लागला का? (रोमकर १३:४) निश्‍चितच नाही! या ख्रिश्‍चनांना अधिकाऱ्‍याच्या हातून शिक्षा सहन करावी लागली तरी त्यांनी देवाची आज्ञा मान्य केली होती हे पौलाने रोमकरांना लिहिलेल्या १३ व्या अध्यायाच्या पुढील शब्दांवरुन स्पष्ट होते.

२. वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन राहण्याचे अगत्याचे कारण कोणते आहे?

२ रोमकरांस पत्र १३:५ मध्ये प्रेषिताने लिहिलेः “यास्तव क्रोधामुळे नाही, तर मनाच्या विवेकामुळे आज्ञेत राहणे अगत्य आहे.” आधी पौलाने म्हटले होते की, अधिकारी “तरवार धारण करणारा” आहे म्हणून त्याच्या आज्ञेत राहणे हे चांगले आहे. तरी आता, तो आणखी एक बळकट कारण देतो व ते म्हणजेः विवेक. आम्ही देवाची सेवा “शुद्ध विवेकाने” करण्याचा प्रयत्न करतो. (२ तीमथ्य १:३) पवित्र शास्त्र आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन राहायला सांगते व ते आम्ही मानतो, कारण देवाला संतुष्ट करण्याची आमची इच्छा असते. (इब्रीयांस ५:१४) होय, पवित्र शास्त्राची तालीम लाभलेला आमचा विवेक आम्हाला, कोणी मानव आमच्यावर देखरेख करीत नसतानाही अधिकाऱ्‍यांची आज्ञा मानण्यास प्रवृत्त करीत असतो.—पडताळा उपदेशक १०:२०.

“या कारणास्तव तुम्ही करही देता”

३, ४. यहोवाच्या साक्षीदारांनी कोणती प्रसिद्धी मिळविली आहे, आणि ख्रिश्‍चनांनी कर का भरावेत?

३ काही वर्षांआधी नायजेरियामध्ये कर भरण्याच्या प्रकरणावरुन मोठी दंगल उसळली. पुष्कळ जीवित हानी झाली, आणि अधिकाऱ्‍यांना लष्कराला पाचारण करावे लागले. एका राज्य सभागृहात सभा चालली होती, तेथे सैनिक घुसले व त्यांना तेथे लोक कशासाठी जमले आहेत ते जाणून घ्यायचे होते. ती यहोवाच्या साक्षीदारांकरवी चालविली जाणारी पवित्र शास्त्राभ्यासाची सभा आहे हे कळल्यावर सैनिकप्रमुखाने शिपायांना निघण्यास सांगितले व म्हटलेः “यहोवाचे साक्षीदार कराविषयी प्रक्षोभकता निर्माण करीत नाहीत.”

४ त्या नायजेरिन साक्षीदारांची, पौलाने जे म्हटले होते त्यानुरुप राहण्याची ख्याति होती. तो म्हणाला होताः “या कारणास्तव तुम्ही करही देता; कारण ते देवाची सेवा करणारे लोकसेवक आहेत, व याच सेवेत तत्पर असतात.” (रोमकर १३:६) “कैसराचे ते कैसराला द्या,” असे येशूने म्हटले तेव्हा तो कर भरण्याबद्दल सांगत होता. (मत्तय २२:२१) प्रापंचिक अधिकारी रस्ते, संरक्षण, ग्रंथालये, वाहतूक व्यवस्था, शाळा, टपालकचेऱ्‍या इत्यादि गोष्टीची सेवा पुरवितात. आम्हाला या सर्वांचा वापर करता येतो. या कारणास्तव आम्ही करामार्फत त्यांना या संबंधाने मोबदला देणे उचित आहे.

“ज्यांचे देणे त्या सर्वांना भरून द्या”

५. “ज्यांचे देणे त्या सर्वांना भरून द्या,” याचा काय अर्थ होतो?

५ पौल पुढे म्हणतोः “ज्यांचे देणे त्या सर्वांना भरून द्या. ज्याला कर त्याला कर, ज्याला जकात त्याला जकात, ज्याला भय त्याला भय, ज्याला सन्मान त्याला सन्मान द्या.” (रोमकर १३:७) “सर्व” या शब्दात देवाचे लोकसेवक असणाऱ्‍या प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्‍याचा समावेश आहे. यामधून कोणाचाही अपवाद नाही. आम्हाला व्यक्‍तीशः न आवडणाऱ्‍या राजकीय व्यवस्थेखाली जरी आम्ही राहात असलो तरी आम्ही कर देत असतो. आम्ही वसाहतीस आहोत तेथे धर्म करमुक्‍त आहेत तर आम्ही याचा लाभ घेऊ शकतो. तसेच, जेथे कर भरण्याबद्दल काही सूट आहे तेथे इतर नागरिकांप्रमाणे ख्रिश्‍चनही अशा कायदेशीर तरतुदींचा अवलंब करू शकतात.—पडताळा मत्तय ५:४१; १७:२४-२७.

६, ७. आम्हाला मान्य नसणाऱ्‍या गोष्टींसाठी कराचा पैसा वापरण्यात येत असला किंवा अधिकारी आमचा छळ करीत असतील तरीही आम्ही कर का भरले पाहिजेत?

६ तथापि, समजा की, कर अन्यायाने लादलेला आहे. किंवा जर कर म्हणून देण्यात आलेल्या पैशांपैकी काहींचा वापर, ज्याबद्दल आम्ही मान्यता देत नाही अशा गोष्टींसाठी म्हणजे मोफत गर्भपात, रक्‍तपेढ्या किंवा आमच्या तटस्थतेच्या दृष्टीकोणाशी विरोध दर्शविणाऱ्‍या कार्यक्रमांवर राबवला जात आहे, तर काय? तरीही आम्ही कर भरतो. कराचा पैसा कसा वापरावा याविषयीची जबाबदारी अधिकाऱ्‍यांवर राहते. आम्हाला अधिकाऱ्‍यांचा न्याय करण्याची नियुक्‍ती देवाकडून मिळालेली नाही. देव हा “पृथ्वीचा न्यायाधीश” आहे व तो आपल्या नियुक्‍त वेळी सरकारांनी आपणाठायीचा अधिकार कोणत्या पद्धतीने वापरला याबद्दल त्यांच्याकडून जाब घेईल. (स्तोत्रसंहिता ९४:२; यिर्मया २५:३१) तोपर्यंत आम्ही कर देत राहू.

७ अधिकारी आमचा छळ करताहेत तर काय? तरीही आम्हाला, दरदिवशी त्यांच्या सेवेचा लाभ घडतो म्हणून कर दिले पाहिजेत. एका आफ्रिकन देशात छळ सहन करणाऱ्‍या साक्षीदारांविषयी सॅन फ्रांसिस्कोच्या एक्झामिनरने म्हटलेः “तुम्हाला त्यांना नमुनेदार नागरिक असे मानता येईल. ते जाणीवपूर्वक कर देतात, आजाऱ्‍यांची काळजी घेतात, अशिक्षितपणावर लढा देतात.” होय, त्या छळग्रस्त साक्षीदारांनी आपले कर भरले होते.

“भय” व “सन्मान”

८. आम्ही अधिकाराला जे “भय” दाखवतो, ते काय आहे?

८ रोमकर १३:७ मध्ये सांगण्यात आलेले “भय” हे गर्भगळीत करणारे नाही, तर प्रापंचिक अधिकाऱ्‍यांविषयीचा आदर, त्यांचे नियम मोडू नयेत ही भीती सुचविते. हा आदर, कोणी त्या पदावर आहे म्हणून नव्हे तर त्या पदासाठी दिला जातो. एक रोमी सम्राट तिबिर्य याबद्दल भविष्यवादितपणे बोलताना पवित्र शास्त्र त्याला “एक हलका मनुष्य” असे म्हणते. (दानीएल ११:२१) पण तो तर सम्राट होता व यामुळेच ख्रिश्‍चनांनी त्याला भय व आदर दाखवावयाचा होता.

९. मानवी अधिकाऱ्‍यांना सन्मान देण्याचे काही मार्ग कोणते आहेत?

९ सन्मानाच्या बाबतीत, धार्मिक पदाला अनुलक्षून असणाऱ्‍या पदव्यांनी संबोधू नये ही येशूची आज्ञा आम्ही मानतो. (मत्तय २३:८-१०) पण प्रापंचिक अधिकाऱ्‍यांविषयी बघता, त्यांच्या सन्मानार्थ ज्या पदव्या आहेत त्यांनी त्यांना संबोधण्याचे आम्ही पसंद करतो. पौलाने रोमी सुभेदाराला संबोधिताना “महाराज” असे म्हटले. (प्रे. कृत्ये २६:२५) दानिएलने नबुखद्‌नेस्सरला “माझ्या स्वामी” म्हटले. (दानीएल ४:१९) आज ख्रिश्‍चन “महाराज,” “सरकार” अशा पदव्यांचा वापर करतात. न्यायधीश दालनात प्रवेश करताना ते उभे राहतात आणि कोणा देशात प्रघात आहे तर अधिपतीपुढे प्रणिपात करतात.

सापेक्ष अधीनता

१०. मानवी अधिकारी ख्रिश्‍चनांकडून ज्याची मागणी करतात त्याला काही मर्यादा आहेत हे येशूने कसे दाखवून दिले?

१० यहोवाचे साक्षीदार मानवी अधिकाराच्या अधीन आहेत तर मग, फ्रांझ रेटर तसेच इतरांनी त्रास का ओढवून घेतला? कारण आमचे अधीनत्व हे सापेक्ष आहे. अधिकारी ज्याची मागणी करतात त्याला काही पवित्र शास्त्राच्या मर्यादा आहेत हे ते अधिकारी जाणत नाहीत. कोणी अधिकारी, प्रशिक्षित ख्रिस्ती विवेकाचा भंग करणाऱ्‍या गोष्टीची मागणी करतो तेव्हा तो आपल्या देव-प्रणीत मर्यादेबाहेर जात असतो. हे येशूने असे म्हणण्याद्वारे सूचित केले होते की, “कैसराचे ते कैसराला, पण देवाचे ते देवाला भरून द्या.” (मत्तय २२:२१) देवाच्या हक्काच्या गोष्टींची कैसर मागणी करतो तेव्हा देवाचा दावा श्रेष्ठ स्वरुपाचा आहे हे आम्ही कबूल केले पाहिजे.

११. मानवी अधिकार ज्याची मागणी करतो त्यालाही काही मर्यादा आहेत याची स्पष्टता करणाऱ्‍या कोणत्या तत्त्वप्रणालीचा व्याप्तरुपात स्वीकार झालेला आहे?

११ आमची ही भूमिका आक्रमक किंवा द्रोही आहे का? मुळीच नाही. ती, खरे पाहता, बहुतेक मुलकी राष्ट्रांनी ओळखलेल्या तत्त्वाचा पुढचा टप्पा आहे. १५ व्या शतकात पीटर वॉन हेगनबाक याजवर, त्याच्या अधिकाराखाली असलेल्या युरोपियन क्षेत्रात भीतीचे साम्राज्य पसरविल्याचा खटला चालविला गेला. आपण बुरगुंडीचे महाराज ड्युक यांच्या आज्ञेचे पालन करीत आहोत हा त्याचा दावा फेटाळला गेला. कोणा वरिष्ठांच्या आज्ञेनुसार अघोरी कृत्य केल्याचा दावा यानंतर बऱ्‍याच वेळा केला गेला—खासपणे न्युरेम्बर्गच्या आंतरराष्ट्रीय न्यायसभेपुढे नाझीच्या युद्ध गुन्हेगारांनी केला. पण हा दावा साधारणपणे फेटाळला गेला. आंतरराष्ट्रीय न्यायसभेने हा निर्वाळा दिलाः “अमूक एका राज्याने लादलेल्या आज्ञापालनेच्या राष्ट्रीय कर्तव्याच्याही पुढे जाणारी आंतरराष्ट्रीय स्वरुपाची कर्तव्ये विशिष्ठांनी पाळावयाची असतात.”

१२. अधिकाऱ्‍यांनी केलेल्या असमंजस मागणीला आज्ञाधारकपणा दाखवण्याचे नाकारल्याची देवाच्या सेवकांची कोणती शास्त्रवचनीय उदाहरणे आहेत?

१२ वरिष्ठ अधिकाऱ्‍यांना जाणीवपूर्वक दाखवीत असलेल्या अधीनतेला काही मर्यादा आहेत हे देवाच्या सेवकांनीही ओळखले आहे. मोशे मिसरात जन्मला त्यावेळी फारोने दोन इब्री सुईणींना नव्याने जन्मणाऱ्‍या सर्व इब्री मुलांची हत्त्या करण्याची आज्ञा केली. तथापि, या सुईणींनी सर्व मुलांना जिवंत ठेवले. मग, फारोची आज्ञा न मानण्यामध्ये त्या चूक करीत होत्या का? नाही, ते आपल्या देव-प्रणीत विवेकाचा मागोवा घेत होते आणि देवाने त्यांना याबद्दल आशीर्वादित केले. (निर्गम १:१५-२०) इस्राएल लोक बाबेलात बंदिवान होते तेव्हा नबुखद्‌नेस्सराने आपल्या सर्व अधिकाऱ्‍यांना, ज्यात शद्रख, मेशख व अबेद्‌नगो हे इब्री होते त्यांनाही, दूरा नामक मैदानात त्याने उभारलेल्या मूर्तिपुढे नमन करण्याची आज्ञा केली. तीन इब्र्यांनी ते नाकारले. ते चूक करीत होते का? नाही. कारण राजाची आज्ञा पाळली असती तर देवाच्या आज्ञेचा भंग झाला असता.—निर्गम २०:४, ५; दानीएल ३:१-१८.

“देवास आपला शासक मानून आज्ञा पाळणे”

१३. वरिष्ठ अधिकाऱ्‍यांना दाखविलेल्या सापेक्ष अधीनतेविषयी आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी कोणते उदाहरण पुरविले?

१३ याचप्रमाणे यहुदी अधिकाऱ्‍यांनी पेत्र व योहान यांना येशूच्या नावाने प्रचार करू नका अशी आज्ञा केली तेव्हा त्यांनी म्हटलेः “देवापेक्षा तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य याचा तुम्हीच विचार करा.” (प्रे. कृत्ये ४:१९; ५:२९) ते स्तब्ध राहू शकत नव्हते. द ख्रिश्‍चन सेंच्युरी हे मासिक, आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी आणखी जो जाणीवपूर्वक पवित्रा घेतला होता त्याबद्दल सांगताना म्हणतेः “सुरवातीचे ख्रिश्‍चन सैन्यबळात सेवा करीत नव्हते. रोनाल्ड बेंटन यांचे परिक्षण आहे की, ‘नव्या कराराच्या काळाची समाप्ती ते इ. स. १७०-१८० दशकापर्यंत कोणी ख्रिश्‍चन सैन्यात होता असा कोणताच पुरावा दिसत नाही.’ (ख्रिश्‍चन ॲटीट्युड टुवर्ड वॉर ॲण्ड पीस्‌ [ॲबींग्डन, १९६०], पृ. ६७-८) . . . स्वीफ्ट म्हणतात की, ‘ख्रिश्‍चनांनी सर्व हिंसाचारी कारवायांपासून दूर राहिले पाहिजे’ असे जस्टीन मार्टरचे ठाम मत होते.’”

१४, १५. आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी मानवी अधिकाऱ्‍यांना सापेक्ष अधीनता ज्या पवित्र शास्त्रीय तत्त्वांच्या आधारावर दाखवली होती ती कोणती होती?

१४ आरंभीचे ख्रिश्‍चन सैन्यात का भरती झाले नाहीत? हे निश्‍चये की, प्रत्येकाने देवाच्या वचनाचा तसेच कायद्यांचा काळजीपूर्वक अभ्यास केला होता आणि पवित्र शास्त्राद्वारे प्रशिक्षित झालेल्या आपल्या विवेकानुरुप याबद्दलचा व्यक्‍तीगत निर्णय घेतला होता. ते तटस्थ, “जगाचे भाग” नव्हते आणि त्यांच्या तटस्थतेने त्यांना जगाच्या झगड्यात सामील होण्यापासून मज्जाव केला. (योहान १७:१६; १८:३६) याशिवाय, ते देवाच्या मालकीचे होते. (२ तीमथ्य २:१९) राष्ट्रासाठी आपले जीवन अर्पण करणे याचा अर्थ जे देवाच्या हक्काचे आहे ते कैसराला देऊ करणे असा होत होता. याखेरीज, ते एका आंतरराष्ट्रीय बंधुत्वाचे भाग होते जे प्रेमाने अनुबंधित होते. (योहान १३:३४, ३५; कलस्सैकर ३:१४; १ पेत्र ४:८; ५:९) आपल्या सह ख्रिश्‍चनांना वध होण्याची शक्यता निर्माण होईल या हेतूने हाती शस्त्र घेण्यास त्यांचा विवेक त्यांना मुभा देत नव्हता.

१५ तसेच, ख्रिश्‍चन त्या काळी प्रचलित असणारी सम्राटाची भक्‍ती या प्रसिद्ध धार्मिक आचरणात सहभागी होत नव्हते. या कारणामुळे त्यांच्याकडे “विशिष्ट तसेच धोकादायक लोक” या दृष्टीने पाहिले जाई आणि “बाकीचे लोक त्यांच्याबद्दल नेहमी संशय धरीत.” (स्टील द बायबल स्पीक्स्‌, लेखक डब्ल्यु. ए. स्मार्ट) ‘ज्याला भय त्याला भय द्यावे,’ असे पौलाने ख्रिश्‍चनांना लिहिले होते तरी ते यहोवाला आपले मोठे भय वा आदर दाखविण्याचे विसरले नव्हते. (रोमकर १३:७; स्तोत्रसंहिता ८६:११) येशूनेही स्वतः म्हटले होतेः “जे शरीराला वधितात, पण आत्म्याला वधावयास समर्थ नाहीत त्यांस भिऊ नका; तर आत्मा व शरीर या दोहोंचा गेहन्‍नात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या.”—मत्तय १०:२८.

१६. (अ) ख्रिश्‍चनांनी कोणकोणत्या क्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्‍यांना दाखविलेली अधीनता काळजीपूर्वक तपासून पाहिली पाहिजे? (ब) पृष्ठ २५ वर देण्यात आलेल्या चौकटीतील मजकूर काय चित्रित करतो?

१६ आम्हालाही ख्रिश्‍चन या नात्याने आज याच गोष्टींचा सामना करावा लागत आहे. मूर्तिपूजेच्या कोणाही आधुनिक प्रकारात आम्हाला सहभागी होता येणार नाही, मग तो कोणा मूर्ती वा चिन्हाला पूज्यभाव दाखविणे असो, की कोणा व्यक्‍तीला वा संस्थेला आपल्या तारणाचे श्रेय देणे असो. (१ करिंथकर १०:१४; १ योहान ५:२१) तसेच आरंभीच्या ख्रिश्‍चनांप्रमाणेच आम्हालाही आमच्या ख्रिस्ती तटस्थतेची हातमिळवणी करता येत नाही.—पडताळा २ करिंथकर १०:४.

“सौम्यतेने व भिडेने”

१७. आपल्या विवेकामुळे ज्यांना छळ सहन करावा लागत आहे त्यांना पेत्राने कोणती सूचना दिली?

१७ आमच्या विवेकी भूमिकेविषयी प्रेषित पेत्राने लिहिले व म्हटलेः “कोणी ईश्‍वरचिंतन करून अन्यायाने आलेली दुःखे सोशितो तर हा चांगुलपणा आहे.” (१ पेत्र २:१९) होय, छळामध्ये दृढपणे टिकून राहणे हे देवाच्या दृष्टीने चांगले आहे, शिवाय यामुळे विश्‍वासाची बळकटी व शुद्धी ही होण्याचा लाभ मिळतो. (याकोब १:२-४; १ पेत्र १:६, ७; ५:८-१०) पेत्राने असेही लिहिलेः “जरी तुम्हाला धार्मिकतेमुळे दुःख सोसावे लागले, तरी तुम्ही धन्य. त्यांच्या भयाने भिऊ नका व घाबरू नका. तर ख्रिस्त प्रभु याला आपल्या अंतःकरणात पवित्र माना; आणि तुम्हामध्ये जी आशा आहे तिची विचारपूस करणाऱ्‍या प्रत्येक इसमाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भिडेने द्या.” (१ पेत्र ३:१४, १५) खरेच, किती उपयुक्‍त सूचना!

१८, १९. आमच्या भक्‍ती स्वातंत्र्याच्या बाबतीत अधिकाऱ्‍यांनी जर काही मर्यादा घातल्या तर भिडस्तपणा व व्यवहार्यता आमची कशी मदत करू शकतात?

१८ ख्रिश्‍चनांच्या भूमिकेमुळे गैरसमज झाल्यामुळे किंवा ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मपुढाऱ्‍यांनी अधिकाऱ्‍यांना साक्षीदारांविषयी चुकीचे काही सांगितल्यामुळे जेव्हा छळ उद्‌भवतो तेव्हा अधिकाऱ्‍यांपुढे वस्तुस्थिती कथन करणे हे दबावाला हलके करू शकते. सौम्यता व भिडस्तपणा राखल्यामुळे ख्रिश्‍चन आपल्या छळकर्त्याविरुद्ध अस्त्र उगारीत नाही. तरीपण आपल्या विश्‍वासाचे समर्थन करता येण्यासाठी तो उपलब्ध असणाऱ्‍या सर्व कायदेशीर मार्गाचा अवलंब करतो. यानंतर तो ते प्रकरण यहोवाच्या हाती सोपवितो.—फिलिप्पैकर १:७; कलस्सैकर ४:५, ६.

१९ भिडस्तपणा हा ख्रिश्‍चनास आपल्या विवेकाचा भंग होऊ न देता शक्य आहे तोपर्यंत अधिकाऱ्‍याचे आज्ञापालन करण्यास चालना देईल. जर समजा, मंडळीच्या सभांवर बंदी आणली तर यहोवाच्या मेजावरून सेवन करता यावे यासाठी ख्रिश्‍चन इतर काही कमी अडथळ्याचा मार्ग शोधून काढील. यहोवा देव हा सर्वोच्च अधिकारी पौलाद्वारे हे सांगतोः “प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष द्यावे. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे सोडू नये.” (इब्रीयांस १०:२४, २५) पण असे हे एकत्र मिळणे मोठे चाणाक्षपणे करण्यास हवे. जरी तेथे थोडे उपस्थित राहिले तरी यहोवा अशा व्यवस्थेला आशीर्वाद देईल ही खात्री आम्ही बाळगू शकू.—पडताळा मत्तय १८:२०.

२०. सुवार्तेच्या जाहीर प्रचारावर बंदी आल्यास या परिस्थितीचा ख्रिश्‍चनाला कसा सामना करता येईल?

२० याचप्रमाणे, काही अधिकाऱ्‍यांनी सुवार्तेचा जाहीरपणे प्रचार करण्यास देखील बंदी घातली आहे. अशा ठिकाणी राहणारे ख्रिस्तीजन हे जाणतात की, येशूद्वारे सर्वोच्च अधिकाऱ्‍याने असे म्हटले आहे की, “प्रथम सर्व राष्ट्रात सुवार्ता गाजविली पाहिजे.” (मार्क १३:१०) यासाठीच, ते काहीही झाले तरी सर्वोच्च अधिकाऱ्‍याची आज्ञा मानतात. जेथे शक्य होते तेथे प्रेषितांनी घरोघरी जाहीरपणे प्रचार केला. पण अनौपचारिक साक्षीने लोकांप्रत पोहंचण्याचे आणखी मार्ग आहेत. (योहान ४:७-१५; प्रे. कृत्ये ५:४२; २०:२०) केवळ पवित्र शास्त्राचा वापर केला तर बहुधा अधिकारी अडथळा करणार नाहीत—याद्वारे सर्व साक्षीदारांनी स्वतःला शास्त्रवचनाकरवी विवाद करण्यासाठी केवढे प्रशिक्षित केले पाहिजे त्याची गरज ठळकपणे दिसते. (पडताळा प्रे. कृत्ये १७:२, १७.) धैर्यवान तसेच आदरयुक्‍त राहिल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्‍याचा क्रोध न आणता यहोवाची आज्ञा मानण्याचे ख्रिश्‍चनाला जमू शकेल.—तीत ३:१, २.

२१. कैसर जर छळ करण्यात थांबत नाही तर ख्रिश्‍चनाने कोणते मार्गाक्रमण निवडावे?

२१ कधी कधी अधिकारी ख्रिश्‍चनांचा अविश्रांत छळ करतात. तेव्हा शुद्ध विवेकाने आपण जे चांगले ते करण्यात सहनता दाखवावी. तरुण फ्रांझ रेटरला निवड करावी लागलीः आपल्या विश्‍वासाची हातमिळवणी, किंवा मरण. तो देवाला आपली भक्‍ती देण्याचे थांबवू इच्छित नसल्यामुळे त्याने निर्भिडपणे मरण पत्करले. मरणाच्या आदल्या रात्री फ्रांझने आपल्या आईला लिहिलेः “माझी उद्या सकाळी हत्या घडेल. मी आपल्या देवाकडून बळ मिळवीत आहे. हेच गतकाळात सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांनाही मिळाले. . . . तू जर मरेपर्यंत विश्‍वासू राहिलीस तर मग, आपण पुनरुत्थानात परत भेटू.”

२२. आम्हापाशी कोणती आशा आहे, व मध्यंतरात आपण कसे राहावे?

२२ एक दिवस असा येईल जेव्हा सर्व मानवजात एकाच कायद्याखाली, यहोवा देवाच्या कायद्याखाली राहील. तोपर्यंत, आपण चांगल्या विवेकभावाने देवाच्या व्यवस्थेला पाळून चालले पाहिजे आणि वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या संबंधाने सापेक्ष अधीनता दाखविली पाहिजे; पण याच वेळी आमचा सेनाधीश प्रभु यहोवा याला सर्व बाबतीत आज्ञांकित राहिले पाहिजे.—फिलिप्पैकर ४:५-७.

तुम्हाला आठवते का?

◻ वरिष्ठ अधिकाऱ्‍यांना अधीन राहण्याचे अगत्याचे कोणते कारण आहे?

◻ कैसराने लादलेले कर भरण्याची आपण का हयगय करू नये?

◻ आम्ही अधिकाऱ्‍यांना कशाप्रकारचा सन्मान द्यावा?

◻ कैसराला दाखविण्यात येणारी अधीनता ही केवळ सापेक्ष का आहे?

◻ देवाच्या मालकीच्या गोष्टींची मागणी कैसराने केल्यामुळे आमचा छळ झाला तर आम्ही कसा प्रतिसाद दाखवावा?

[२५ पानावरील चौकट]

भक्‍ती नव्हे, सन्मान

एके दिवशी सकाळी, टेरा या यहोवाच्या साक्षीदारांच्या कॅनडातील एका तरुणीने एका विद्यार्थिनीला शिक्षक वर्गाबाहेर घेऊन जात असताना पाहिले. काही वेळातच ते शिक्षक परत आले व त्यांनी टेराला मुकाट्याने मुख्याध्यापकांच्या दप्तरी येण्यास सांगितले.

तेथे आल्यावर टेराला दिसले की, त्यांच्या टेबलावर कॅनडाचा एक ध्वज आहे. शिक्षकाने तिला त्या ध्वजावर थुंकण्यास सांगितले! त्यांनी म्हटले की, टेरा राष्ट्रगीत गात नाही किंवा ध्वजवंदन करीत नाही, तर तिला हेही करायला काहीही हरकत नाही. पण टेराने ते करायला नकार दिला. तिने म्हटले की, यहोवाचे साक्षीदार ध्वजाची भक्‍ती करीत नाही तरी ते त्याचा आदर करतात.

वर्गात परत आल्यावर, शिक्षकाने म्हटले की त्यांनी नुकतीच एक चाचणी घेतली होती. त्यांनी दोघा विद्यार्थिनींना मुख्याध्यापकांच्या दप्तरी नेले होते व तेथे असलेल्या ध्वजावर थुंकण्यास सांगितले होते. पहिली विद्यार्थिनी राष्ट्रीय समारंभात भाग घेत होती, पण जेव्हा तिला म्हटले गेले की तिने थुंकावे तेव्हा तिने ते केले. पण टेरा राष्ट्रगीत म्हणत नव्हती की ध्वजवंदन करीत नव्हती, पण तिने ध्वजाचा असा अपमान करण्याचे नाकारले. शिक्षकांनी स्पष्ट केले की, टेराने योग्य तो आदर दाखविला होता.—यहोवाच्या साक्षीदारांचे १९९० चे वार्षिक अहवाल पुस्तक.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा