वचनयुक्त देशाचे देखावे
तुम्हाला ऋतुंपासून काही शिकता येईल का?
यहोवाने एकदा म्हटलेः ‘पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, उन्हाळा व हिंवाळा व्हावयाची राहणार नाहीत.’ (उत्पत्ती ८:२२) येथे तो शेतकीच्या ऋतुंविषयी सांगत होता.
ऋतु व त्यांचा शेतीसोबत असणारा संबंध याविषयी तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही शहरात राहणारे असाल आणि शेती करणारे नसाल तरीही तुम्ही इस्राएलातील ऋतु व शेतीविषयीच्या हालचाली जाणून घेण्यास हव्या. ते का? कारण याचा जितका अधिक परिचय असेल तितक्या अधिकपणे तुम्हाला देवाच्या वचनाची समज घडले.
शेतकरी जमीन नांगरतात, पेरणी करतात, कापणी करतात व मळणी करतात हे आपल्याला ठाऊक आहे. तरीही पवित्र शास्त्र जे म्हणते त्याची स्पष्ट समज मिळण्यासाठी आम्हाला ती कार्ये केव्हा होत याबद्दल अधिक जाणण्याची गरज आहे. उदाहरणादाखल, आपण वर चित्रात, पुरातन यहुदीयामध्ये माळवदीच्या जागी जी पेरणी होत असल्याचे दाखवले आहे तिचा विचार करा.a हे चित्र कोणत्या महिन्यात घेण्यात आले आहे असे तुम्हला वाटते? तुमच्या देशात पेरणी केव्हा होते ते पाहिले तर कदाचित घोटाळा होऊ शकतो. उत्तर गोलार्धात व दक्षिण गोलार्धात पेरणी होण्याचा काळ वेगवेगळा आहे. ते भूप्रदेशाची उंची तसेच पावसाळा ऋतु याच्या काळावरही अवलंबून असते.
यामुळे तुम्ही पवित्र शास्त्रातील एखाद्या घटनेविषयी जो ग्रह धरून आहात त्याजवरही परिणाम होऊ शकतो. तुम्ही कदाचित एलियाच्या वारसदाराविषयी वाचले असेलः “त्यास शाफाटाचा पुत्र अलीशा . . . बैलांची बारा जोते चालवून शेत नांगरीत” असताना आढळला. (१ राजे १९:१९) हे कोणत्या महिन्यात घडले व त्यावेळी जमीन कशी असावी असे तुम्हास वाटते? येशूने योहान ४:३५ मध्ये म्हटलेः “अजून चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल असे तुम्ही म्हणता की नाही? .. आपली नजर वर टाकून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत.” येथे जरी त्याने वेळ दर्शविला होता तरी तो कोणता होता ते तुम्हाला सांगता येईल का?
सोबत असणारा तक्ता वचनयुक्त देशातील ऋतु तसेच शेतीकामाच्या हालचालींविषयी उत्तम सारांश देतो. बाहेरील परिघावर यहुद्यांच्या पवित्र पंचांगातील महिने दाखविण्यात आले आहेत.b याची आमच्या पंचांगातील महिन्यांनुरुपची वर्गवारी ही त्यावर दाखविली आहे. जसे की, निसान (किंवा अबीब) महिन्यावर मार्च महिन्याचा उत्तरार्ध व एप्रिलचा आरंभ आच्छादलेला आहे. याच्या आतील भाग पीक केव्हा पिकली आहेत ते दाखवितो. यामुळे कापणी व मळणी या शेतीच्या हालचाली केव्हा होत ते कळायला मदत होते. केंद्रभागी असणारा तक्ता वर्षभरात ऋतु केव्हा बदलत होता त्याची तुलना देतो.
पवित्र शास्त्रातील अहवालाची अधिक खोल समज व त्याविषयीची आस्था वाढविण्यासाठी या तक्त्याचा वापर करा. उदाहरणार्थ, वर नमूद केलेले दोन प्रसंग यासोबत पडताळून पहा.
अलिशाला संदेष्टा म्हणून बोलावण्यात आले तेव्हा तो शेत नांगरीत होता. ही नांगरणी साधारणपणे तिश्री (सप्टेंबर-ऑक्टोबर) दरम्यान होते. यावेळी उन्हाळ्यातील उष्मा साधारणतः निघून गेलेली असते. सुरवातीचा पाऊस झालेला असतो व यामुळे जमीन मऊ होऊन नांगरण्यास व त्यानंतर बियाणे पेरण्यास उपयुक्त झालेली असते.
आता येशूने योहान ४:३५ मधील शब्द केव्हा उद्गारिले असावेत? हंगाम अजून चार महिने लांब होता. जवाचा हंगाम निसान (मार्च-एप्रिल) मध्ये साधारण वल्हांडणाच्या वेळी सुरु होतो हे लक्षात घ्या. येथून चार महिने मागे मोजा. ते तुम्हाला चिसलेव (नोव्हेंबर-डिसेंबर) कडे आणते. यावेळी पाऊस वाढता व जोरदार असतो तसेच हवा थंड राहते. यामुळे येशू त्यावेळी लाक्षणिक हंगामाविषयी बोलत होता हे स्पष्ट आहे, कारण तो म्हणालाः “आपले डोळे वर करून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत.”
आता काही प्रश्न खाली दिले आहेत, जे तुम्ही तुमच्या व्यक्तीगत अभ्यासात किंवा तुमच्या कुटुंबासमवेत अभ्यासात मनोरंजक वेळ घालविता तेव्हा पडताळून पाहता येतीलः
◼ यरीहोमध्ये जवसाचा हंगाम अदार महिन्यात येतो, तेव्हा यहोशवा २:६ आणि ३:१५ मधील माहिती पवित्र शास्त्राच्या अचूकतेस कशी पुष्टी देते?—यहोशवा ४:१९; ५:११.
◼ पिकाच्या हंगामानंतर मळणी येते, तर मग, लेवीय २६:५ मध्ये दिलेले अभिवचन मुबलक समृद्धतेचे कसे वर्णन करते?
◼ देवाच्या लोकांवरील रक्तपात दूर करण्यासाठी ज्या पुत्रांचा संहार करण्याची अनुमती देण्यात आली होती त्यामध्ये रिस्पा या स्त्रीच्या दोन पुत्रांच्या शवावर तिने स्वतः कितपत नजर ठेवल्याचे २ शमुवेल २१:१० सांगते?
◼ १ शमुवेल १२:१७ मध्ये ज्या मेघगर्जनेचा व पर्जन्यवृष्टीचा उल्लेख आहे तो ईश्वरी प्रतिसाद होता असे का गृहीत धरण्यात आले?—नीतीसूत्रे २६:१.
◼ बवाजाने आपल्याला जी वागणूक दिली ती क्षणापुरती प्रतिक्रिया नव्हती हे रूथने कशावरून गृहीत धरले?—रूथ १:२२; २:२३.
आपले पवित्र शास्त्र वाचन करता तेव्हा हा तक्ता का जवळ ठेवू नये?
चिसलेव निसान
२५ समर्पणाचा मेळा १४ वल्हांडण
१५-२१ बेखमीर भाकरी
१६ प्रथमफळाचे अर्पण
आयर अदार
१४ उशीरा पाळण्यात येणारा वल्हांडण १४, १५ पुरीम
सीवान तिश्री
६ सप्तकांचा सण १ कर्ण्याचा नाद
(पेंटेकॉस्ट) १० प्रायश्चिताचा दिवस
१५-२१ मंडपाचा सण
२२ मेळावा
[तळटीपा]
a यहोवाच्या साक्षीदारांचे १९९०चे कॅलेण्डर देखील पहा.
b १९ वर्षांच्या फेरीदरम्यान सात वेळा (वेदार) हा अधिक मास जोडण्यात येत असे.
[१९ पानांवरील चित्रं]
(For fully formatted text, see publication)
निसान (अबीब)
मार्च-एप्रिल
जव
आयर (जिव)
एप्रिल-मे
गहू
सीवान
मे-जून
सुरवातीचे अंजिर
तामुझ
जून-जुलै
पहिली द्राक्षे
आब
जुलै-ऑगस्ट
उन्हाळी फळे
एलूल
ऑगस्ट-सप्टेंबर
खजूर, द्राक्षे, अंजिर
तिश्री (एथानिम)
सप्टेंबर-ऑक्टोबर
नांगरणी
हेशवान (बुल)
ऑक्टोबर-नोव्हेंबर
जैतून
चिसलेव
नोव्हेंबर-डिसेंबर
थंडीत कळपाची निगा
तेबेथ
डिसेंबर-जानेवारी
भाजीपाल्याची वाढ
शेबत
जानेवारी-फेब्रुवारी
बदाम फुलतो
अदार
फेब्रुवारी-मार्च
वेदार
मार्च
फळे