वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 १/१ पृ. १७
  • प्रेम कुटुंबाचे ऐक्य घडवते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रेम कुटुंबाचे ऐक्य घडवते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हाँगकाँग
  • ब्रिटन
  • दक्षिण पॅसिफिक
  • अतिशय प्रिय असलेली पत्नी
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • “देव पक्षपाती नाही”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • यहोवाकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनापासून लाभ मिळवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • तुमचं कुटुंब सुखी होऊ शकतं!
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 १/१ पृ. १७

राज्य घोषकांचा वृत्तांत

प्रेम कुटुंबाचे ऐक्य घडवते

वैवाहिक जीवन हे प्रेमावर आणि निस्वार्थ वृत्तीने मार्गदर्शित होत असले तरच कुटुंबात ऐक्य नांदू शकते. असे प्रेम यहोवा देवाकडून येते; तो स्वतःच प्रीतीचा देव आहे व हे प्रेम त्याच्या आत्म्याची फलप्राप्ती आहे. (गलतीकर ५:२२, २३; १ योहान ४:८) पवित्र शास्त्राच्या ज्ञानावर आधारीत असणारे प्रेम कुटुंबात कसे ऐक्य घडवते त्याविषयीची प्रचिती पुढील अनुभव देतात.

हाँगकाँग

◻ हाँगकाँगमध्ये एका पायनियरने एक गृहिणी व तिच्या दोन मुलींसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास आरंभिला. पतीला काळजी वाटली व त्याने पत्नीला बोलून दाखविले की, ती सुधारणावादी धार्मिक गटाशी संबंध राखीत आहे म्हणून खबरदारी घ्यावी. पायनियरने गृहिणीला सुचविले की, तिने आपल्या पतीला अभ्यासाला बसण्याचे निमंत्रण द्यावे व स्वतःच बघावे की एकंदरीत काय प्रकार आहे. पती अभ्यासाला बसू लागला. दरम्यान पत्नीने सभांना उपस्थित राहण्याची सुरवात केली, पण तिला आपल्या मुलांना वळण लावण्याची समस्या होती. ती नेहमीच थोरल्या मुलीस रागावीत असे व धाकटीला देखील दम देत असे. मग, असे दिसले की, पती व पत्नीमध्ये देखील धुसफूस आहे. त्यांचे भांडण उग्र रुप घेत असे व कधी कधी तर पोलिसांना देखील पाचारण करावे लागे. तेव्हा पायनियरने देवाच्या प्रबळ वचनाचा वापर करून त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनात ईश्‍वरी प्रेम कसे दाखवावे ते शिकविले. लवकरच जोडप्यामध्ये सुधारणा दिसू लागली; त्यांची वागण्याची पद्धत तसेच सवया बदलल्या. दोघेही सभांना नियमित येऊ लागले, व त्यांच्या घरात आनंदी वातावरण नांदू लागले. पतीने धुम्रपान करण्याचे सोडून दिले व त्याने आपले नाव ईश्‍वरशासित उपाध्यपणाच्या शाळेत दाखल केले. पत्नी आता बाप्तिस्मा झालेली प्रचारक आहे.

या कुटुंबात देवाच्या आत्म्याचे फळ, प्रीती जोपासल्यामुळे ऐक्य घडवण्यात आले.

ब्रिटन

◻ ब्रिटनचा हा अनुभव दाखवतो की, पतीने आपल्या पत्नीसोबत प्रेम, सहनशीलता व धीर राखला तर यहोवा त्याच्यावर केवढे आशीर्वाद पाठवितो. पतीने १२ वर्षांआधी सत्य शिकण्यास सुरुवात केली तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला खूप विरोध केला आणि कायदेशीर फारकत देखील मिळवून घेतली. तथापि, पतीने तिला दयाळूपणे वागविणे चालू ठेवले; तिला आर्थिक मदत मिळते आहे याकडे त्याने लक्ष दिले व तिच्यासाठी लहानसहान कामे नियमित रुपाने केली. चार वर्षांनी अद्याप तिचा विरोध असताना त्याने तिला पुन्हा एकदा सत्याविषयी सांगण्याचे ठरविले. त्याने तिला म्हटले की, तिने कोणा भगिनीकरवी पवित्र शास्त्र अभ्यास घ्यावा व खरेच तो तिने स्वीकारला. ओघाओघाने तिने सत्याविषयी आपली भूमिका ग्रहण केली व तिचा बाप्तिस्मा झाला. पतीने तिच्याविषयीचे आपले प्रेम कधीच कमी होऊ दिले नव्हते. तिने सत्य आपलेसे केले आहे हे बघितल्यावर त्याने तिला पुन्हा विवाहबद्ध होण्याचा प्रस्ताव मांडला. तिला हे ऐकून खूपच शहारल्यासारखे झाले कारण आपल्या वाईट वागणूकीमुळे त्याच्याकडून असे काही होण्याची तिने अपेक्षाच धरली नव्हती. आता त्यांचा पुनर्विवाह होऊन जवळजवळ आठ वर्षे लोटली आहेत व दोघेही सत्यामध्ये चांगली प्रगति करीत आहेत.

दक्षिण पॅसिफिक

◻ साधारण २० वर्षांआधी दक्षिण पॅसिफिकमधील तुलावू बेटावरील एका माणसाने वॉचटावर संस्थेला काही प्रकाशने पाठविण्याची मागणी केली होती. त्या वेळेला त्या बेटावर कोणीही साक्षीदार नव्हता. तरीसुद्धा या माणसाने स्वतःच प्रकाशने वाचून काढली व हे सत्य आहे असे त्याने ओळखले. तथापि, त्याच्या बायकोने त्याच्या या नव्या विश्‍वासाला कट्टर विरोध दर्शविला; त्यामुळे त्याने सत्य सोडून दिले.

अलिकडेच जेव्हा तुवालुवन भाषेत संस्थेची प्रकाशने निघून लागली व काही या बायकोला मिळाली तेव्हा तिने स्वतः त्यांचे वाचन सुरु केले आणि तिला हे सत्य आहे असे कळून आले. तेव्हा तिने आपल्या पतीला तक्रार मांडलीः “इतकी वर्षे तुमच्याजवळ प्रकाश होता पण तुम्ही तो वर उचलून धरला नाही. साक्षीदार खरे आहेत हे मागे तुम्ही मला का विवेचीत केले नाही?” आता पवित्र शास्त्रीय सत्यामध्ये एकवटल्यामुळे या जोडप्यांनी साक्षीदारांचा सहवास आरंभिला.

त्यांच्या दोन मुली फिजी येथे शालेय शिक्षण घेत होत्या. त्या सुटीला घरी आल्यावर पालकांनी यहोवाचे साक्षीदार होण्याचा त्यांचा निर्णय जाहीर केला. त्यांनी मुलींना म्हटले की त्यांनीही पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु करावा; पण आश्‍चर्य हे की, या मुली देखील फिजीमध्ये सभांना जात होत्या. या कुटुंबाने आनंदाने एकत्रपणे सत्य स्वीकारले. बाप, आई व एक मुलगी राज्याचे प्रचारक बनले आहेत.

प्रेम तसेच पवित्र शास्त्राचे सत्य सबंध जगभर कुटुंबामध्ये ऐक्य घडवून आणीत आहे हे पाहणे केवढ्या आनंदाचे आहे!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा