तुम्ही त्रैक्य मानावे का?
जमैका, वेस्ट इंडिज येथील द संडे ग्लिनर याकरता धार्मिक लिखाण करणारे इयान बॉयन यांनी, यहोवाच्या साक्षीदारांनी नुकत्याच प्रकाशित केलेल्या एका माहितीपत्रकाविषयी चर्चा केली. त्यातील काही भाग पुढीलप्रमाणेः
“ह्या माहितीपत्रकासाठी यहोवाचे साक्षीदार ‘अ’ श्रेणीच्या योग्यतेचे आहेत, ते इतके साधेपणात लिहिले आहे की, कोणी नवयौवनातील मुलगा किंवा मुलगी देखील समजू शकतो. त्यात अतिशयोक्तीचा अभाव असून नामांकित तज्ञ व उगम यांच्या संदर्भासह त्याची रचना केलेली आहे. . . . तुम्ही त्र्यैक्य मानावे का? हे प्रकाशन म्हणजे साक्षीदारांचा एक जोरदार प्रहार आहे, आणि आता कोणताही त्र्यैकवादी किंवा द्वैक्यत्ववादी सुरक्षित नाही. त्रैक्याचे तत्त्व पवित्र शास्त्रातून आलेले नाही हे दाखविण्यासाठी ऐतिहासिक व वेदांतीय अवतरणांचा ढीग हे लिखाण सादर करते. ते एन्सायक्लोपिडिआ ऑफ रिलिजन या अधिकारयुक्त संदर्भग्रंथातून अवतरण घेते, ज्यात म्हणण्यात आले आहे की, ‘नवीन करारातसुद्धा त्रैक्याचा साधेपणात समावेश नाही या गोष्टीस वेदांतीय मान्यता देतात.’”
बॉयन यांचे आणखी निरिक्षण असे आहेः “येशू हा देव आहे या दृष्टीकोणास साक्षीदारांनी जे अगत्याचे व अधिकारयुक्त प्रतिपादन मांडले आहे ते साधारण काय किंवा त्यापेक्षा अधिक अशा सर्वसाधारण चर्च सभासदाला सहजपणे व्यक्त करता येऊ शकते हे आता धार्मिक लिखाण करणाऱ्या लेखकांना बरेच कठीण वाटत आहे.”
या माहितीपत्रकाची एक प्रत आपणाला हवी असल्यास कृपया सोबतचे कूपन भरुन आम्हाला पाठवा.
कृपया मला तुम्ही त्रैक्य मानावे का? हे ३२ पानी माहितीपत्रक टपालाने पाठवावे. मी याची किंमत रु. ३ मनिऑर्डरने पाठवीत आहे.
तुम्ही त्रैक्य मानावे का?
येशू ख्रिस्त हा सर्वसमर्थू देव आहे का?