देवाची सेवा करणारे तरुण
आपला वेळ देऊ करणारे व मोबदला म्हणून काही न स्वीकारणारे तरुण तुमच्या दारी येऊन तुम्हासोबत देवाविषयी बोलतात हे तुम्हाला असामान्य वाटते का? सध्याच्या अविश्वासाच्या काळी मुले आपल्या पालकां सोबत मिळून पवित्र शास्त्रात देण्यात आलेल्या आनंदी भविष्याच्या अभिवचनांची ग्वाही देत आहेत ही गोष्ट आश्चर्यकारक वाटते का?a
यहोवाच्या साक्षीदारांच्या जगभर पसरलेल्या ६२ हजारांपेक्षा अधिक मंडळ्यातून तुम्हाला तरुण आढळतील. ते रविवारच्या शब्बाथ शाळेला किंवा धार्मिक शिक्षणाच्या वर्गाला जात नाहीत. उलटपक्षी, हेच तरुण मंडळीच्या सभांमध्ये सहभागी होऊन त्याकडून लाभ मिळवतात. लहान मुले साधी विवेचने मांडू शकतील. दहा ते बारा वर्षांची मुले ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेत भाग घेतात. कितीतरी तरुण आपल्या शाळेतील मोठ्या सुट्टयांचा वापर, देव तसेच त्याने भविष्यासंबंधाने दिलेल्या त्याच्या अद्भूत वचनांविषयी इतर लोकांना शिकण्याची मदत देण्यात करतात.
अशा या तरुण लोकांच्या हालचालीविषयी नवीन असे काही नाही. देवाची सेवा करण्यामध्ये उल्लेखनीय उदाहरण राखणाऱ्या युवक व युवती तसेच लहान मुले व बालके यांजविषयी पवित्र शास्त्र माहिती देते.
पवित्र शास्त्रातील स्तोत्रसंहितेचे पुस्तक “तरुण” हे देवाच्या सेवेत जणू ताज्या व असंख्य “दहिवरां”प्रमाणे असल्याचे भाकित करते. ते “कुमार” व “कुमारी” देवाच्या नावाची स्तुती करण्याविषयीही सांगते. (स्तोत्रसंहिता ११०:३; १४८:१२, १३) इ. स. ३३च्या पेंटेकॉस्टच्या दिवशी विश्वासधारकांवर देवाचा पवित्र आत्मा आला तेव्हा त्यात तरुण देखील असावेत. त्या दिवशी ३,००० लोकांनी वचन ग्रहण केले व त्यांचा बाप्तिस्मा झाला. ती अद्भूत घटना ही योएलने दिलेल्या भविष्यवादानुरुपची पूर्णता होती असे प्रेषित पेत्र म्हणाला. त्यात म्हटले आहेः “तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील; तुमच्या तरुणांस दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धांस स्वप्ने पडतील.”—प्रे. कृत्ये २:४-८, १६, १७, ४१.
ज्यांनी आपल्या तारुण्यात यहोवा देवाची सेवा केली त्याबद्दलच्या इतर पवित्र शास्त्रीय उदाहरणात शमुवेल, धार्मिक राजा दावीद, यिर्मया व दानीएल यासारखे प्रसिद्ध भविष्यवादी आणि विश्वासू तीमथ्य यांचाही समावेश येतो. या पवित्र शास्त्रीय उदाहरणांपैकी काहींची चर्चा या अंकातील लेखात करण्यात आली आहे. याद्वारे तरुण इतकेच काय पण वयस्कर देखील देवाची सेवा करण्याचे इतके का गंभीर घेत आहेत आणि ते हेच काम इतरांना करण्याची का मदत देत आहेत ते तुम्हाला दिसेल.
[तळटीपा]
a १९८५ मध्ये घेतल्या गेलेल्या गॅलप निरिक्षणामध्ये १९४६ पासून जन्मलेल्या अमेरिकन लोकांमध्ये केवळ १२ टक्के लोकांनीच आपल्याला वयाच्या १६ व्या वर्षी “मोठा विश्वास” होता असे म्हटले.