जागतिक शांती हे स्वप्न एक क्षीण दृष्टांत बनला आहे
जागतिक शांतीचे लोण आज सर्वत्र पसरलेले आहे. द टोरंटो स्टार पत्रकातील आपल्या स्तंभलेखात कॅरोल गोअर म्हणतातः “शांतीचा करार अफगाणिस्तान ते अंगोलापर्यंत समृद्ध होत आहेत. प्रांतिय झगडे, जे काही महिन्यापूर्वी आटोक्यात येणे कठीण वाटत होते, त्यांत घट होत आहे. शिवाय संयुक्त राष्ट्र सभा, उल्हासित करणारा पुनर्जन्म पावत आहे.” यामुळे “गोलार्धिक शांती स्थापन होण्याच्या आशेला” दुजोरा मिळत असल्याचे मत फैलावत आहे असे गोअरचे म्हणणे आहे. युएसए टुडे पाक्षिकात असेच काही विचार घोषित आहेत की, “सबंध जगात शांतीचा स्फोट होत आहे.”
खासकरुन, अलिकडील काळात जे काही युएन क्रॉनिकल पत्रकातून वर्णिलेले आहे की, “रशिया व अमेरिका यांच्या दरम्यान समझोता होण्याच्या घडामोडी चालू आहेत,” ते लक्षात घेण्याजोगे आहे. सैन्य काढून घेणे, पूर्व युरोपातील आश्चर्यकारक घटना, लष्कर तसेच शस्त्रसंधीची बोलणी—या सारख्या घडामोडींनी या आशेला उंचावले आहे की, लवकरच, कदाचित महाशक्ती शस्त्रस्पर्धांवर निर्बंध घालतील. ज्या जगावर आज ८५० अब्ज डॉलर्स लष्करी खर्चाचा आर्थिक बोजा आहे त्यासाठी ही एक मोठी स्वागताहार्य गोष्ट आहे.
तरीसुद्धा, जागतिक शांतीचे हे स्वप्न कितपत साकार होऊ शकेल? जरी असे दिसत असले तरी, अत्यंत बारकाईने निरिक्षण करणारे आशावादी ही कबुली देतात की, शस्त्रसंधी ते शस्त्रे काढून टाकणे ही महान झेप आहे. अणुशस्त्र कपात करण्यास अपूर्व पातळीवरील परस्परातील विश्वास बाळगण्याची गरज आहे. तरीसुद्धा, ही दुःखद गोष्ट आहे की, परस्परातील साशंकपणाच महाशक्तींच्या सबंध इतिहासातील अधिक काळचा आढळेल. पवित्र शास्त्र भविष्यवादात म्हटलेच आहे की, हा काळच असा आहे की, ज्यात मनुष्ये “शांतताद्वेषी” [“तह मोडणारे,” किंग जेम्स व्हर्शन] असल्याचे शाबीत होईल.—२ तीमथ्य ३:३.
याशिवाय, अणूशस्त्रांचे निर्मूलन हे खरेच शांतीच्या काळास आणील ही सर्वांचीच खात्री झालेली नाही. जरी राष्ट्रांना त्यांच्याजवळील अणुशस्त्र साठे काढण्यास सांगितले तरी नित्याच्या उपयोगातील शस्त्रे सहज वध करू शकतील. पहिले व दुसरे जागतिक महायुद्धे सत्य गोष्टींची अत्यंत कठोर साक्ष आहेत. याखेरीज, अणुशस्त्रांचे पुनरुत्पादन करण्यास जे तंत्रज्ञान लागेल ते तर हाताशीच—राजकीय तणावाचा पहिला इशारा मिळताच—परत तयारीस लागण्यास वाट पाहात असतो. काही तर, राजकीय शास्त्रज्ञ रिचर्ड नेट लिबोव्हप्रमाणे अशीही बाजू मांडतातः “मोजकीच अणुशस्त्रे सभोवताली राखून ठेवली तर लोकांठायी भय असेल.”
पण जोवर अणुशस्त्रे असतील, अणुशक्तीच्या नाशाचे दारुण चित्र, शांती प्रस्थापित करण्याच्या कोणाही दाव्यास विडंबन बनवील. तसेच, मग ज्यांच्याकरवी करोडोंच्या नित्य जीवनातील शांततेचा भंग होत आहे, बिनलष्करी समस्याही तशाच पुढे चालू दिल्यास, होईल. संयुक्त राष्ट्र सभेचे मुख्य सचिव झावेयर पेरेज डी क्वेअर म्हणतातः “आम्हा सोबतीतील त्या करोडो प्रजाजनांची अवस्था अशी आहे की, कित्येकांस घरे नाहीत, काहींना अपुरेच छत आहे. ही समस्या सतत अधिकाधिक वाईट होत आहे.” युएन क्रॉनिकल पुढे म्हणते की, आर्थिक अप्रगती, “मानवजातीपैकी दोन तृतीयांश भागावर परिणाम करून आहे, त्यात काही दरिद्री आणि कंगाल रेषेवर असल्याने युद्धाच्या परिणामात ओळखू पडत नाहीत.” शिवाय परिस्थितीमुळे सबंध जगातून गणलेले १२० लक्ष निर्वासितांबद्दल काय आहे? शस्त्रसंधी किंवा संपूर्ण निशस्त्रीकरण त्यांच्या जीवनात शांतता आणील का?
हे स्पष्ट आहे की, जागतिक शांतीचे मानवी स्वप्न हा एक क्षीण दृष्टांत आहे; तो लघुदृष्टीचा, अरुंद व मर्यादित आहे. शांतीसाठी अधिक चांगल्या भवितव्याची आशा आहे का? होय, निश्चित आहे. या मासिकाच्या आधीच्या अंकातa आम्ही पाहिले की, पवित्र शास्त्र शांतीबद्दल निश्चित आशा देते. लवकरच देवाच्या राज्याचा राजा म्हणून, येशू ख्रिस्त, अशी शांती प्रस्थापित करील, जी मनुष्याच्या विचारापलिकडील असेल. पण या शांतीचा मनुष्यजातीकरता काय अर्थ होईल बरे? पुढील लेखात आपण याची चर्चा करू.
[तळटीपा]
a आमच्या ऑगस्ट १, १९९१ अंकामधील “मानवाला शांतीकडे कोण नेऊ शकेल?” हा लेख पहा.