वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ६/१ पृ. ८-९
  • येशू खरोखरी कोण आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशू खरोखरी कोण आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • मिळती जुळती माहिती
  • येशू खरोखर कोण आहे?
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • परीक्षाप्रसंगांतही त्यानं एकनिष्ठा सोडली नाही
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • आपल्या गुरूकडून तो क्षमा करण्यास शिकला
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • तो आपल्या धन्याकडून क्षमा करण्याचा धडा शिकतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ६/१ पृ. ८-९

येशूचे जीवन व उपाध्यपण

येशू खरोखरी कोण आहे?

येशू व त्याच्या शिष्यांना घेऊन जाणारा मचवा जेव्हा बेथसैदा येथे येतो, तेव्हा लोक एका अंध माणसाला आणतात आणि त्याला विनवतात की, त्याने त्यास स्पर्श करावा व त्यास बरे करावे. येशू त्या माणसाचा हात धरून त्याला गावाबाहेर नेतो, आणि त्याच्या डोळ्यात थुंकून त्यास विचारतोः “तुला काही दिसते का?”

तो माणूस म्हणतोः “मला माणसे दिसतात, कारण झाडे चालत आहेत तशी ती मला दिसतात.” येशू त्याच्या डोळ्यांवर हात ठेवून त्याला दृष्टी देतो व तो स्पष्ट बघू लागतो. मग, येशू त्याला माणसाला, गावात जाऊ नको अशी सूचना देऊन घरी पाठवतो.

येशू आता आपल्या शिष्यांसह पॅलेस्टाईनच्या अगदी उत्तरेकडील फिलिपैच्या कैसरिया गावाकडे जाण्यास निघतो. समुद्रसपाटीपासून साधारण १,१५० फूट उंचीवर असलेले फिलिपैचे कैसरिया हे रमणीय स्थान आहे व त्यासाठी ३० मैल पल्ल्याचा चढ आहे. या प्रवासाला बहुधा दोन दिवस लागतात.

मार्गावर असतानाच येशू स्वतः प्रार्थना करण्यासाठी दूर जातो. त्याच्या मृत्युपूर्वी केवळ नऊ ते दहा महिने राहिलेले आहेत, आणि त्याला शिष्यांविषयीची चिंता वाटत असते. पुष्कळ जण तर त्याला अनुसरण्याचे सोडून गेले आहेत. इतर लोक, त्याला राजा करण्याचे लोकांचे प्रयत्न येशूने धुडकावून लावले, आपले राज्यपद सिद्ध करण्यासाठी स्वर्गातून चिन्ह देण्याचे त्याच्या शत्रूंनी दिलेले आव्हान त्याने नाकारले म्हणून गोंधळात पडले आहेत. त्याच्या प्रेषितांनी तो कोण आहे म्हणून समजावयाचे होते? येशू जेथे प्रार्थना करीत आहे तेथे शिष्य आल्यावर तो त्यांना विचारतोः “मी कोण आहे असे लोक मला म्हणतात?”

“काही म्हणतात, बाप्तिस्मा करणारा योहान.” असे ते म्हणतात, “दुसरे म्हणतात, एलिया; तर आणखी काही यिर्मया किंवा संदेष्ट्यांपैकी एक असे म्हणतात.” होय, त्यांना वाटते की, येशू हा ह्‍यांच्यापैकीच कोणीतरी मृतातून उठविलेला आहे!

“पण, तुम्ही मला कोण समजता?” असे येशू विचारतो.

पेत्र चटकन उत्तर देतोः “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात.”

पेत्राच्या उत्तरास सहमत प्रदर्शित करून येशू म्हणतोः “मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस, आणि या खडकावर मी आपली मंडळी स्थापीन व अधोलोकांच्या वेशी तिच्यावर प्रबळ होणार नाहीत.” येशू प्रथमतःच मंडळीची स्थापना करील, आणि मृत्युही तिच्या सदस्यांना पृथ्वीवरील त्यांचे जीवनाक्रमण संपल्यावर जखडवून ठेवू शकणार नाही अशी घोषणा करतो. यानंतर, तो पेत्राला म्हणतो, “मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन.”

अशाप्रकारे येशू प्रकट करतो की, पेत्राला विशेष हक्क दिला जाणार आहे. पण हा हक्क प्रेषितातील पहिले स्थान तसेच मंडळीचा कोनशिला याला अनुलक्षून नाही. वस्तुतः जी मंडळी येशू स्थापणार आहे तिचा खडक तो स्वतःच आहे. पण पेत्राला काही उघडण्यासाठी तीन किल्ल्या मिळणार होत्या; ते स्वर्गीय राज्यात प्रवेश मिळविण्यासाठी लोकांना संधीचे दार तो उघडे करून देणार होता.

यापैकीच्या पहिल्या किल्लीचा वापर पेत्राने इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्टच्या दिवशी केला. यावेळी त्याने पश्‍चातापी यहुद्यांना बचावाकरता काय केले पाहिजे हे दाखवून दिले. यानंतर काही काळातच त्याने दुसऱ्‍या किल्लीचा वापर शोमरोनी लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळवून देण्याची संधी उघडी करण्यासाठी केला. मग, इ. स. ३६ मध्ये त्याने बेसुंती विदेशी कर्नेल्य व त्याच्या मित्रांना तीच संधि उपलब्ध करून देण्यासाठी तिसऱ्‍या किल्लीचा वापर केला.

येशू आपल्या प्रेषितांसोबत त्याची चर्चा चालू ठेवतो. यरुशलेममध्ये लवकरच जो त्रास व मरण याला तो तोंड देणार होता ते सांगून तो त्यांना दुःखित करतो. येशूचे स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थान होणार याची समज न झाल्यामुळे पेत्र येशूला बाजूला नेतो. “हे प्रभू आपणावर दया असो,” असे तो येशूला सांगतो. “तुम्हावर हे कधीच येणार नाही.” मागे वळून येशू त्याला म्हणतोः “अरे सैताना, माझ्या मागे हो. तू मला अडखळण आहेस. कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहीस तर माणसांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस.”

आता प्रेषितांखेरीज इतर लोकही येशूसोबत जात आहेत हे स्पष्ट आहे, म्हणून तो त्यांना संबोधून हे स्पष्ट करतो की, त्याचे अनुयायी बनणे हे सोपे नाही. “जर कोणी माझ्यामागे येण्याचे इच्छितो,” तो म्हणतो, “तर त्याने माझा वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवावयास पाहतो तो त्याला गमावील आणि जो कोणी माझ्याकरता व सुवार्तेकरता आपला जीव गमावील तो त्याला मिळवील.”

होय, येशूची कृपा मिळवावयाची आहे तर त्याच्या अनुयायांना निर्भिड व स्वत्यागी बनलेच पाहिजे. यासाठीच तो म्हणतोः “या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये जो कोणी माझ्या विषयीची व माझ्या वचनाविषयीची लाज धरील त्याच्याविषयीची लाज मनुष्याचा पुत्रही, जेव्हा तो पवित्र दूतांसुद्धा आपल्या बापाच्या गौरवात येईल तेव्हा धरील.” मार्क ८:२२-३८; मत्तय १६:१३-२८; लूक ९:१८-२७.

◆ येशू त्याच्या शिष्यांविषयी का चिंतातुर आहे?

◆ येशूच्या ओळखीविषयी लोकांचे दृष्टीकोण काय आहेत?

◆ पेत्राला कोणत्या किल्ल्या दिल्या गेल्या, व त्यांचा उपयोग कसा करण्यात आला?

◆ पेत्राला कोणती सुधारणा देण्यात येते व का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा