वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 ७/१ पृ. २९-३२
  • भारतातील कापणीच्या हंगामात आनंद करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भारतातील कापणीच्या हंगामात आनंद करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मी भारतात कसा आलो
  • जीवनाचा मार्ग ठरविणे
  • एक प्रचंड नवे क्षेत्र
  • दुसऱ्‍या महायुद्ध काळात
  • आनंदाची कारणे
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 ७/१ पृ. २९-३२

भारतातील कापणीच्या हंगामात आनंद करणे

एफ. ई. स्कीनर यांच्याकरवी निवेदीत

मजकरिता तर हे विश्‍वास ठेवण्यापलिकडचे आहे—दहा भाषेतील २१ अधिवेशने, १५,००० पेक्षाही अधिक लोक, ईश्‍वरी न्यायदंडाचा अर्थ समजावून घेण्यास उपस्थित होते व एकूण ५४५ लोकांनी सर्व थोर नियंता, यहोवा देवावरील आपले प्रेम व्यक्‍त करण्याचे समर्पणात स्वतःचा बाप्तिस्मा करवून घेतला. भारतातील ९,००० पेक्षा अधिक यहोवाचे साक्षीदारातील १९८९ मधील हालचालीचा हा आनंदविणारा आढावा आहे. पण मजकरिता म्हटल्यास ही खरोखरी आनंदविणारी गोष्ट आहे. का बरे? कारण जुलै १९२६ मध्ये मी जेव्हा प्रथमच भारताच्या भूमीवर पाऊल ठेविले तेव्हा असे काही घडेल याची मी कल्पनाही करू शकलो नव्हतो. त्या काळी सबंध देशभरात सुमारे ७० राज्य संदेशाचे प्रचारक होते. होय, ६४ वर्षापूर्वी केवढी चांगली ही नेमणूक मला व माझ्या सोबत्याला मिळाली होती!

मी भारतात कसा आलो

मे १९२६ मध्ये लंडन, इंग्लंड मधील एका मोठ्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यास गेलो होतो व ते संपवून मी शेफील्डमधील माझ्या घरी परतलो. काही दिवसानंतर क्षेत्र कार्याहून परतल्यावर घरी मजसाठी तार आल्याचे कळले. ती उघडून वाचलीः “जज्ज रुदरफोर्ड तुम्हास भेटू इच्छितात.”

वॉचटावर संस्थेचे द्वितीय अध्यक्ष बंधू रुदरफोर्ड अलिकडील अधिवेशनासाठी न्यूयॉर्कहून आले होते व अद्याप लंडनलाच होते. दुसऱ्‍या दिवशी लंडनला परत जात असता माझ्या मनात हा विचार येत राहिला की या तारेचा काय अर्थ असू शकेल. शाखादप्तरी मला बंधू रुदरफोर्ड यांच्याकडे नेण्यात आले व त्यांनी मला विचारलेः “जगातील कोणाही भागात काम करण्यास तुमचा आक्षेप असेल का?”

“नाही,” मी उत्तरलो.

“मग, भारतात जाण्यास तुम्हास आवडेल का?”

“मी कधी जावे अशी आपली इच्छा आहे?” असे मी काहीही का कू न करता उत्तर दिले. अशाप्रकारे तीन आठवड्यानंतर, जॉर्ज राईट व मी असे आम्ही दोघे बोटीने भारताच्या प्रवासास निघालो. मी त्यावेळी ३१ वर्षांचा होतो व पुढे माझ्या जीवनाबद्दल मी काय करावे याबद्दलचा कोणताही विचार माझ्या मनात किंवा हृदयातही आला नाही.

जीवनाचा मार्ग ठरविणे

१९१८ मध्ये पहिल्या जागतिक महायुद्धाचा शेवट झाला आणि ब्रिटनच्या लष्करी सेवेची माझी चार वर्षे पुरी झाली होती. मला फोटोग्राफी व रेडिओ तंत्रज्ञानाचा छंद होता, त्यामुळे व्यापारी क्षेत्रात फायदेशीर संध्या समोर होत्या. शिवाय विवाहबद्ध होण्याचे विचारही मनात घोळत होते. तरीही, त्याच काळात, मला अशा काही विचारांची समज होऊ लागली होती जिने जीवनावरील माझ्या दृष्टीकोनात आमुलाग्र बदल घडवून आणण्यास सुरवात केली.

माझ्या वडीलांनी स्टडीज इन स्क्रिपचर्स या पुस्तकांचा संच स्वीकारला आणि ज्यांना सध्या पायनियर म्हणतात त्या, त्याकाळच्या एका महिला कोलपोर्टीयरने आमच्या कुटुंबासोबत अभ्यास करण्यास सुरवात केली. ती महिला शाळेतील शिक्षिका होती. काही दिवसांनी, माझ्या वयाची अनेक मुले मिळून तिच्या घरी दर शनिवारी चहापानास व बायबल अभ्यास करण्यास जमा होत असत. ती वेळोवेळी आम्हास सांगे की, यहोवासाठी स्वतःला उपलब्ध करा. ती म्हणेः “कोणाही नेमणूकीस नकार देऊ नका.” तिनेच मला सडे राहण्याचे उत्तेजन दिले.

काही काळासाठी, मी काय करावे याबद्दल मन बरेच चलबिचल झाले. मग, मत्तय १९:२१ मध्ये येशूने त्या तरुण श्रीमंत महंतास जे काही म्हटले त्याने माझे साहाय्य केलेः “पूर्ण होऊ पाहतोस तर जा, आपली मालमत्ता विकून दरिद्‌य्रांस दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि चल माझ्यामागे ये.” मी ज्या कंपनीत काम करीत होतो, तेथे राजीनामा दिला व तीन महिन्यात कोलपोर्टीयर बनलो. यामुळे तसेच सडे राहण्याचा जो निर्णय घेतला होता त्यानेच मला चार वर्षांच्या कालावधीत भारतास जाण्याच्या अमूल्य नेमणूकीस स्वीकारण्यास पात्रतेचे केले.

एक प्रचंड नवे क्षेत्र

जॉर्ज राईट व मला केवळ भारतातीलच नव्हे तर बर्मा (आता म्यानमार) व सिलोन (आता श्रीलंका) येथेही चाललेल्या राज्य प्रचार कार्यावर देखरेख करण्याची नेमणूक दिली गेली. पुढे याला पर्शिया (आता इराण) तसेच अफगाणिस्तान यांनाही जोडण्यात आले. तसे पाहता भारताचे क्षेत्रफळ अमेरिकेपेक्षा कमी असले तरी याची लोकसंख्या कितीतरी पटीने अधिक आहे. हा एक असा देश आहे ज्यात विविध प्रकारची खाद्ये, चालीरिती व भाषा यांच्या सोबत धर्मविश्‍वासाचेही अनेक प्रकार आहेत; जसे की, हिंदू, मुस्लीम, पारशी, जैन, शीख आणि बौद्ध. तसेच कॅथोलिक व प्रॉटेस्टंटही आहेत.

भारतात प्रचार कार्यास १९०५ मध्ये सुरवात झाली होती, पण जेव्हा वॉचटावर सोसायटीचे पहिले अध्यक्ष चार्ल्स टी. रसेल यांनी १९१२ मध्ये भेट दिली त्यावेळी त्याला मान्यता प्राप्त झाली. त्या भेटीत रसेल यांनी ए. जे. जोसेफ या तरुण शास्त्र विद्यार्थ्याची मुलाखत घेतली व प्रचारकार्य हालचालींची कायम स्वरुपाची योजना केली. जोसेफ हे शास्त्रवचनांवर आधारीत असलेल्या साहित्याचे त्यांच्या मल्याळम भाषेत अनुवाद करीत, शिवाय दक्षिण भारतभर बराचसा प्रवास करून ठिकठिकाणी जाहीर भाषणे देत. आज, भारतातील प्रचारक संख्येपैकी अर्धेअधिक, जेथे भारताच्या लोकसंख्येपैकी केवळ ३ टक्के लोक वस्तीस आहेत अशा मल्याळी भाषिकांपैकीचे आहेत. या भागास, ज्याला पूर्वी त्रावणकोर व कोचीन म्हणत, १९५६ पासून केरळ म्हणून ओळखले जाते.

जॉर्ज राईट व मी आळीपाळीने मुंबईचे शाखादप्तर सांभाळून दूरदूरच्या प्रचार मोहिमेवर जात असू. आम्ही भारतातील रेल्वे मार्गाचा, घोड्यांचा व बैलगाड्यांचाही आमच्या प्रवासात खूप उपयोग करून घेतला. नंतर आम्ही मोटार उपयोगात आणू लागलो. त्या काळी या कार्यामागील कल्पना ही होती की, प्रकाशने द्यावयाची व लोकांना, जेथे अभ्यास गट जमतो तेथे येण्याचे आमंत्रण द्यावयाचे. आम्ही, इंग्रजी बोलणारे जे नामधारी ख्रिश्‍चन होते, अशांकडे अधिक लक्ष दिले.

सुरवातीला मला वॉचटावर मासिकाचे जेवढे वर्गणीदार होते त्यांची नावे व पत्ते देण्यात आले. हे सर्व बहुतेक रेल्वे व टेलिग्राफ कामगार होते. कोठे खरीच आस्था आहे हे पाहण्यास मी त्यांच्यातील प्रत्येकाची भेट घेतली. अनेक वर्षे मी जानेवारी महिन्यात पंजाब, तसेच उत्तर भारतातील लाहोर ते कराची अशी फेरी करीत असे. सर्वसामान्य लोकांचा पवित्र शास्त्राला जरी विरोध असे तरी, खेड्यात इतःस्तता विखुरलेले थोडके व विरळ नामधारी ख्रिश्‍चन भेटत असत.

एक बंधू मजबरोबर माझा अनुवादक म्हणून प्रवास करी आणि आम्ही लोकांबरोबर राहात असू व खातपीतही असू. खेडेगावी लोक मातीच्या व गवताच्या छपरांच्या घरात राहात. ते खाटेवर झोपत, जी रशीने ताणलेली चारपायांची खाट असे. वेळोवेळी एखादा शेतकरी भेटला की तो आपल्या या खाटेवर पवित्र शास्त्र घेऊन बसे व सोबत तीन चार फूट लांबीच्या नळीचा हुक्का पीत असे. आम्ही त्यांना शास्त्रवचने दाखवून देवाकडील सत्ये स्पष्ट करीत होतो. वर्षभरात त्या भागातील पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे खुल्या भागात सभा घेणे अधिक व्यवहारी ठरे. जरी अशा सभांना उपस्थित राहणे अनेक युरोपियनांना संकोचित वाटत होते, तरी भारतीय लोक कोठेही जमा होत.

शक्य तितक्या भाषेत प्रकाशने प्रकाशित करण्याचा आमचा प्रयत्न असे. वर्ल्ड डिस्ट्रेस ही कन्‍नड भाषेत अनुवादित करण्यात आलेली पुस्तिका बरीच गाजली. तिने एका कन्‍नड भाषेतील धार्मिक मासिकाच्या संपादकास, त्याच्या पाक्षिकाकरता लेख पुरवावेत असे आमंत्रण देण्यास उत्सुक केले; आणि काही काळ आम्ही डिलिव्हरन्स पुस्तकातून काही भाग पंधरवड्यास एक लेखमाला म्हणून पाठवू लागलो.

१९२६ ते १९३८ दरम्यान उत्सुक पायनियरांनी प्रचाराचे प्रचंड कार्य केले. आम्ही हजारो मैलांचा प्रवास केला, मोठ्या संख्येतील प्रकाशने वाटली, पण जी वाढ ती अगदी मोजकीच होती. १९३८ पर्यंत भारतभर केवळ १८ पायनियर्स, २७३ प्रचारक व सर्वत्र पसरलेल्या २४ मंडळ्या होत्या.

दुसऱ्‍या महायुद्ध काळात

१९३९ मध्ये दुसऱ्‍या जागतिक महायुद्धास सुरवात झाली तरीही आम्ही आमचे प्रचारकार्य नेटाने पुढे चालू ठेविले. प्रत्यक्षात १९४० मध्ये रस्त्यावरील साक्षीकार्यास सुरवात झाली. यात आमच्या भारतीय भगिनींनीही भाग घेतला, जे स्थानिक रीतीरिवाजाचे दृष्टीकोनातून एक आश्‍चर्य होते. काही वर्षानंतर एका साक्षीदाराने एका शास्त्र विद्यार्थीनीस अशा कामात सहभागी होण्याचे विचारले असता, तिने तिला उत्तर दिलेः “मी एक भारतीय स्त्री आहे; मला जर रस्त्यावर कोणा परपुरुषासोबत बोलताना पाहिले तर सबंध शेजाऱ्‍यात माझी निर्भर्त्सना करतील. रस्त्यावर एखाद्या नातेवाईक पुरुषाशी देखील आम्ही बोलू शकत नाही.” असे जरी असले तरी, भारतातील आमच्या ख्रिश्‍चन भगिनी आज अत्यंत उत्साहीतपणे जाहीर सेवा करणाऱ्‍या आहेत.

सुरवातीच्या वर्षातही अधिवेशने भरविली जात. सकाळचा वेळ क्षेत्र सेवेत अर्पिलेला असे; ज्यात कैक मैलांची वाटचाल करून भेटणाऱ्‍या शेजाऱ्‍यांना तसेच वाटसरूंना जाहीर सभेला येण्याचे निमंत्रण देणे समाविष्ठ असे. ३०० पेक्षा अधिक उपस्थिती असे. या सभा काही वेळा तात्पुरत्या उभारलेल्या बांबुच्या छपराखालीही होत. पण सुरवात करण्याच्या वेळेकडे क्वचित लक्ष दिले जाई. कारण फारच थोडक्यांजवळ घड्याळे होती. त्यांना वाटे तेव्हा ते येत व पुरेसे श्रोते जमा झाल्यावर सभेला सुरवात होई, पण आस्तेकदम. सभा चालू असतानाही लोक येत असत.

कार्यक्रम सर्वसाधारणपणे रात्री दहा वाजेपर्यंत चाले. यानंतर लोक कैक मैल चालत घरी पोहंचत. जर चंद्रप्रकाश असला, तर फार बरे शिवाय वातावरण थंड व सुखकारक वाटे. जर चंद्रप्रकाश नसला तर लोक नारळाची डहाळी घेऊन तिला पीळ देऊन मशालीसारखी पेटवून वाट चालत. त्याचा तांबूस प्रकाश रस्त्यावर पडे. जर अधिक प्रकाश हवा असला तर लोक तिला वाऱ्‍यात भिरभिरवीत व अधिक पेट घेईपर्यंत फिरवीत. मग, पुढील ओबडधोबड वाटेकरता थोडा अधिक प्रकाश पडू लागे.

याच काळात सरकारने भारत व सिलोनमध्ये संस्थेची प्रकाशने आयात करण्यावर बंदी घातली. त्रावणकोरमधील आमचा छोटासा छापखाना जप्त करण्यात आला; शिवाय केंद्र सरकारने आमचे कोणतेही प्रकाशन छापण्यावर बंदी घातली. मग, १९४४ मध्ये, आमचा एक बंधु जो फिझिओथेरपीची शेकमालीश पद्धतीने बरे करण्याची पद्धत अनुसरीत होता तो सर श्रीवास्तव, जे व्हॉईसरॉय कॅबिनेटमध्ये मंत्री होते, त्यांचा इलाज करीत होता. यांच्यापाशी आमच्या बंधूने बंदीविषयीची चर्चा केली.

आमच्या बंधूला ते म्हणालेः “बरे, काळजी करू नका.” सर श्रीवास्तव त्याला म्हणाले की, लवकरच मि. जेनकीन्स, (आमच्या कार्याच्या विरुध्द असणारे मंत्री) यांची लवकरच सेवानिवृत्ती होणार आहे त्यांच्या जागी सर श्रीवास्तव यांचे चांगले मित्र येणार आहेत. “मिस्टर स्कीनर यांना मला येऊन भेटण्यास सांगा, म्हणजे मी जेनकीन्स यांच्या जागेवर येणाऱ्‍या सर फ्रान्सीस मुडी यांची ओळख करून देईन.” असे उत्तेजन श्रीवास्तव यांनी दिले. मला बोलावणे आले. मी मिस्टर मुडी यांच्यासोबत बोलणी केली व डिसेंबर ९, १९४४ रोजी अधिकृतपणे बंदी उठविण्यात आली.

आनंदाची कारणे

आनंदी होण्याचे एक मोठे कारण १९४७ मध्ये घडले जेव्हा की प्रथमच गिलीयड शाळेत शिकलेले मिशनरी भारतात आले. त्यांचे आगमन, भारतीय इतिहासातील अत्यंत कठीण अशा काळात झाले जेव्हा की, ऑगस्ट १५ला ब्रिटीश अधिपत्यापासून स्वातंत्र्य मिळाले. त्याचवेळी राष्ट्राचे दोन भागात, हिंदू भारतात तर मुस्लीम पाकिस्तानमध्ये असे विभाजन झाले. मोठे रक्‍तपाती हत्याकांड घडले. दोन गिलियड पदवीधरांना पाकिस्तानला पाठविले गेले, जे ऑगस्ट १४ रोजी एक स्वतंत्र राष्ट्र बनले होते. लवकरच दहा अधिक मिशनरी भारतात काम करू लागले. तसेच पुढील काही वर्षात अधिक आले.

जसजशी संघटनात्मक रचनेची घडी व्यवस्थित होऊ लागली तसतसा मला अधिक आनंद वाटू लागला. १९५५ मध्ये प्रथमच गिलीयड पदवीधर बंधू डीक कॉट्रील यांची जेव्हा विभागीय देखरेखे म्हणून नेमणूक झाली तेव्हापासून विभागीय देखरेखीच्या कामास सुरवात झाली. त्यांनी विश्‍वासूपणे ही सेवा १९८८ मध्ये त्यांच्या मरणापर्यंत केली. तसेच १९६० मध्ये प्रथमच आम्हासाठी कायम स्वरुपातील प्रांतिय देखरेखा योजना प्राप्त झाली. १९६६ नंतर कोणाही विदेशी मिशनऱ्‍यांना देशात येण्याचा परवाना मिळणे बंद झाले. पण लवकरच, खास पायनियर सेवेचे पर्व उघडण्यात आले आणि भारतातील अनेक पात्रित पायनियरांना भारतातील अनेक भागात पाठविण्यात आले. आज सुमारे ३०० जन हे काम करीत आहेत.

१९५८ पर्यंत आम्हाला जी १,००० राज्य प्रचारकांची मिमांसा गाठता आली नव्हती ती गाठली गेली. पण मग, वेग वाढू लागला व आज आम्हासोबत ९,००० पेक्षा अधिक आहेत. शिवाय १९८९ मध्ये झालेल्या स्मृती भोजनास एकूण २४,१४४ उपस्थित होते, ज्यावरुन हे दिसते की, ज्यांना मदतीची गरज आहे असे अनेक आहेत. श्रीलंकेमध्ये आज वेगळे शाखा दप्तर आहे. तेथेही आज हे पाहून केवढा हर्ष होतो की, १९४४ मध्ये जेथे केवळ दोन प्रचारक होते तेथे आज जरी वंशिक युद्धाची धुमश्‍चक्री माजलेली असताही १,००० प्रचारक आहेत.

प्रचारकात वाढ होणे म्हणजेच आमच्या शाखा दप्तरातही वाढ होणे. ५२ वर्षे मुंबईच्या घाईगर्दीच्या शहरात काढल्यावर आमचे मुख्यालय १९७८ मध्ये जवळपासच्याच लोणावळा शहरी हलविण्यात आले. मला कधी वाटलेही नव्हते की मेप्ससारख्या कॉम्प्युटर नियंत्रित संगणक यंत्रसामुग्रीसह आणि दोन रंगी काम करणारी छपाई यंत्रे अनेक भारतीय भाषेतील प्रकाशने छापण्यास बसविली जातील. आज आम्ही आपले द वॉचटावर हे मासिक ९ भाषेत व इतर प्रकाशने २० वेगवेगळ्या भाषेत निर्माण करीत आहोत.

हे सांगणेच नको की, आमच्या दोन माणसांच्या शाखा दप्तराचे दिवस कधीच संपुष्टात आले. आता, बेथेल कुटुंबात ६० सदस्य आहेत. मी माझ्या वयाच्या ९६ व्या वर्षीही शाखा दप्तरात पूर्ण वेळेचे काम व भारताच्या शाखा कमिटीत सदस्य म्हणून सेवा करीत आहेत. खासकरुन मला या शेवटल्या दिवसातील हंगामाच्या कापणीचे पीक पाहून शिरशिरी भरते. खरोखरी हे सर्व केवढे आनंदविणारे आहे!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा