वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 २/१ पृ. ३१
  • बुरुंडीमध्ये अजूनही छळ चालू आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बुरुंडीमध्ये अजूनही छळ चालू आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 २/१ पृ. ३१

बुरुंडीमध्ये अजूनही छळ चालू आहे

१९८९च्या आरंभाला बुरुंडी या मध्य आफ्रिकेतील देशाच्या अधिकाऱ्‍यांनी यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध छळाची लाट उसळविली. टेहळणी बुरुज मासिकाच्या ऑक्टोबर १९८९ च्या अंकात कळविल्याप्रमाणे अधिकाऱ्‍यांनी जाच, धरपकडी, मारहाण आणि इतर भयंकर मार्गाचा अवलंब करुन साक्षीदारांना त्यांचा विश्‍वास त्यागण्याची जबरदस्ती केली होती. तेव्हापासून आता कशी परिस्थिती आहे?

बुरुंडीमधून मिळालेला आणखी अहवाल सांगतो की, किनियंका व गिटेगा येथे प्रांतिय देखरेख्याने भेट दिली तेव्हा सभा चालू असताना अधिकाऱ्‍यांनी तेथे बंधूजनांना धरपकड केली. प्रांतिय व विभागीय देखरेखे कसेतरी निभावले पण पकडण्यात आलेल्या लोकांमध्ये दोन माध्यमिक शाळेतील विद्यार्थी व प्राथमिक शाळेतील एक विद्यार्थिनी होती. सर्वांना मारहाण करण्यात आली. दुसऱ्‍या दिवशी पकडण्यात आलेल्या सर्व साक्षीदारांना राज्यपालापुढे उभे केले गेले. येथे साक्षीदारांनी, आपण राजकारणी पक्षाचे सदस्य का होऊ शकत नाही याचे स्पष्टीकरण दिले. तेव्हा त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. हाती मिळालेले दुसरे अहवाल देखील अशीच माहिती देतात.

बुरुंडीमधील एक जबाबदार ख्रिस्ती वडील लिहितातः “चोरी, खून किंवा उलथापालथ करण्याच्या प्रकारामुळे कोणाही साक्षीदाराला पकडण्यात आलेले नाही. साक्षीदारांना शिक्षा करण्याचे खरे कारण अधिकाऱ्‍यांपाशी आहे तर त्यांनी ते शांतीप्रिय नागरिकांना छळून, त्यांच्या मालकीच्या वस्तु काढून घेऊन आणि त्यांना वनपशूंसारखे हाकलीत न करता न्यायालयाकरवी सार्वजनिकपणे करावे. देशातील आतील भागात राहणाऱ्‍या बऱ्‍याच बांधवांना आपली घरेदारे सोडून पळ काढावा लागत आहे आणि निर्वासितांसारखे भटकावे लागत आहे. तुरुंगात असलेल्या आपल्या पतीची भेट घेण्यासाठी एका भगिनीला पुष्कळ अधिकाऱ्‍यांना विनंति करावी लागली. पण तिला त्यांच्याकडून उत्तर मिळालेः ‘आम्ही तुझ्या नवऱ्‍याला, जोपर्यंत तुम्हाला परदेशातून आमच्या देशाचे उच्चाटन करण्यासाठी पैसा मिळत आहे तोवर सोडणारच नाही.’ केवढी ही निंदा!”

तथापि, बुरुंडीत आनंदाचे वर्तमान आहे. तेथे असणारे साक्षीदार भ्याले नाहीत किंवा गांगरुन गेले नाहीत. सावधानपणे पण खात्रीने सुवार्तेचा प्रसार होत आहे आणि बांधवांची खात्री आहे की, यहोवावर पूर्ण भाव ठेवून त्यांना धीर धरुन राहता येईल. संताप व्यक्‍त करणारी बरीचशी पत्रे बुरुंडीत आली आहेत आणि जेव्हा जगाला हे कळून येईल की, बुरुंडी अद्याप यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध निर्दयीपणे आपल्या छळाच्या मोहिमा राबवीत आहेत तेव्हा आणखी पत्रे जातच राहतील.

[३१ पानावरील चौकट]

बुरुंडीच्या अध्यक्षांचा पत्ता खालीलप्रमाणेः

His Excellency Major Pierre Buyoya

President of the Republic of Burundi

Bujumbura

REPUBLIC OF BURUNDI

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा