जागतिक साम्राज्यांची दीर्घ वाटचाल आता संपण्याच्या बेतात आहे
पवित्र शास्त्र सात बलाढ्य जागतिक साम्राज्यांबद्दल बोलते. ही अशी शक्तीशाली साम्राज्ये झाली, जी जागतिक इतिहासाच्या हजारो वर्षांच्या कालावधीत एकामागून एक अशा क्रमाने सामोरी आली. या लेखमालिकेतील आधीच्या लेखांत हे दाखविण्यात आले की, आम्ही यांच्यातील शेवटल्या सत्तेच्या कारकिर्दीत जगत आहोत, व ते आहे आमच्या काळातील अँग्लो-अमेरिकन जागतिक साम्राज्य.a—प्रकटीकरण १७:९, १०.
याच अँग्लो-अमेरिकन संयुक्त सत्तेला प्रकटीकरणाच्या पुस्तकात आधी “दोन शिंगे असणारे श्वापद” या अर्थाने चितारण्यात आले आहे. ही संयुक्त सत्ता, सात साम्राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय “श्वापदासाठी मूर्ति करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना . . . सांगते.”—प्रकटीकरण १३:११, १४.
या भविष्यवादांची पूर्णता कशी झाली व आज त्यांचा आमच्यासाठी काय अर्थ होतो? याचे लक्षवेधक उत्तर हाच या लेखाचा विषय आहे.
पहिल्या जागतिक महायुद्धाच्या चार वर्षांच्या भयानक कालावाधीचा शेवट होत असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष वुडरो विल्सन आणि ब्रिटीश पंतप्रधान डेव्हीड लॉयड जॉर्ज यांनी लिग ऑफ नेशन्सचा ठराव मांडला. “आंतरराष्ट्रीय शांती व सुरक्षितता साध्य करणे” हेच या संघटनेचे ध्येय होते, आणि अशाप्रकारच्या भयानक युद्धाचे परिणाम पुन्हा उद्भवू नयेत अशी अपेक्षा धरली गेली.
यात पुढाकार कोणी घेतला हे लक्षात घेणे लक्षवेधक ठरेल. हे दोघेही नेते त्या अविभाज्य इंग्रजी भाषिक अँग्लो-अमेरिकन जागतिक साम्राज्याचे राष्ट्रप्र्मुख होते, ज्याचा पवित्र शास्त्र इतिहासात सातवा क्रमांक आहे. आंतरराष्ट्रीय शांती-सुरक्षेच्या संघटनेविषयीची ही गोष्ट तसेच आणखी काही गोष्टी पवित्र शास्त्रातील प्रकटीकरण पुस्तकात, ज्याला “आठवा राजा” असे संबोधिले आहे, ज्याचा उद्भव आमच्या काळात होऊन तो अल्पकाळ टिकणार होता व मग लयास जाणार होता, त्याच्यासोबत तंतोतंत जुळणाऱ्या आहेत. तेव्हा काही लक्षवेधक समांतरता कोणत्या दिसून येतात?—प्रकटीकरण १७:११.
प्रकटीकरणातील भविष्यवादाने हे उघड केले की, “कोकऱ्यासारखी दोन शिंगे” असलेले हे “श्वापद”, “पृथ्वीवरील राहणाऱ्या जनांस” पहिल्या श्वापदासाठी एक “मूर्ति करावयास” सांगेल. ते पहिले श्वापद म्हणजे पवित्र शास्त्र इतिहासातील सात बलाढ्य जागतिक साम्राज्याचे चित्र होय.
अँग्लो-अमेरिकन या संयुक्त जागतिक साम्राज्याने अगदी असेच काही घडवून आणले. याने “पृथ्वीवरील राहणाऱ्या जनांस” एक अशी लिग स्थापित करण्यास प्रेरित केले जिचे स्वरुप व कार्यव्यवस्था एखाद्या बलाढ्य सरकारासमानच असेल. पण खरे पाहता ही “श्वापदाची मूर्ति” किंवा प्रतिमा होती. हिला स्वतःचे अधिकार नव्हते, तर ते त्यातील सदस्य राष्ट्रांनी बहाल केले होते. जशा इतर जागतिक सत्ता लष्करी बळाच्या जोरावर पुढे आल्या त्याप्रमाणे हिचेही घडले असे तिच्याविषयी वर्णन देण्यात आले नाही. याउलट, ती सात जागतिक साम्राज्यातून उदय पावलेली किंवा पुढे आलेली आहे. ती आपल्या अस्तित्वाचे श्रेय केवळ सातव्यालाच नव्हे तर गतकाळातील त्या सहा लुप्त सत्तांच्या शेष सदस्यांनाही देऊन आहे. तर मग, ही राजकीय प्रतिमा, तिच्या संस्थापकांनी तिजविषयी ज्या उच्च ध्येयांची अपेक्षा धरली त्या पुऱ्या करू शकेल का?—प्रकटीकरण १७:११, १४.
लिगचा अधःपात
लिग ऑफ नेशन्सने समाज कल्याण क्षेत्रात मोठमोठी कामे पार पाडलेली आहेत. तरीपण, तिचे अधिकृत सूत्र, “लिग ऑफ नेशन्स करार” यामध्ये असणाऱ्या मूळ ध्येयाच्या बाबतीत म्हणजे, “आंतरराष्ट्रीय बंधुप्रेम व आंतरराष्ट्रीय शांती व सुरक्षितता साध्य करणे” याविषयी ती असमर्थ ठरली.
याच लिगला १९३१ मध्ये जपानला मांचुरियात घुसण्यापासून थोपविता आले नाही. १९३३ मध्ये तिला बोलेव्हिया व पराग्वे यांना युद्धापासून परावृत्त करता आले नाही. याशिवाय, १९३६ मध्ये मुसोलिनीला इथोपिया पादाक्रांत करण्यापासून रोखू शकली नाही. उलटपक्षी, लिगलाच सप्टेंबर १, १९३९ रोजी दुसरे महायुद्ध भडकले तेव्हा मरणप्राय टोला बसला. प्रचंड नाश व हानी टाळण्याचा उद्देशाने लिगची प्रस्थापना झाली होती खरी; पण तिजवरच या गोष्टी उलटल्या. दुसऱ्या महायुद्धात केवढी हानी झाली? १ कोटी ६० लाख सैन्य तसेच ३ कोटी ९० लाख मुलकी लोक, म्हणजेच ५ कोटी ५० लाख लोकांची प्राणहानी झाली; आणि ही संख्या पहिल्या महायुद्धाच्या चौपट होती!
तथापि, लिगचा करार प्रत्यक्षात कार्यक्षम होण्याच्या काही काळ आधीच १९१९ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांनी (त्या काळी पवित्र शास्त्र विद्यार्थी असे ओळखले जाणारे) जाहीरपणे घोषित केले होते की, लिगचा अधःपात होणार; कारण कोणा मानवी प्रयत्नांनी शांतीची स्थापना होऊ शकणार नाही. नंतर १९२६ मध्ये लंडन, इंग्लंडमधील आपल्या अधिवेशनात साक्षीदारांनी ही स्पष्टता पुरविली की, प्रकटीकरण १७ अध्यायानुसार “आठवा राजा” हा जागतिक सत्तांच्या शेवटला असणार. “प्रभूने त्याचा उद्भव, त्याचे अल्पकालीन अस्तित्व आणि कायमचा नाश याविषयी भाकित दिले आहे” असे त्यावेळी वक्त्याने प्रतिपादित केले.
त्याचे परतणे
या आठव्या राजाबद्दल, प्रेरित भविष्यवाद म्हणतोः “जे श्वापद तू पाहिले ते होते आणि नाही, ते अगाधकुपातून वर येणार आहे व नाशात जाणार आहे.”—प्रकटीकरण १७:८.
१९४२ च्या युद्धकाळाच्या मध्यावधीपासून यहोवाच्या साक्षीदारांना ही जाणीव झाली की, त्या काळात शांती व सुरक्षिततेची हमी देणारी निस्तब्ध संस्था निष्क्रियतेच्या अथांग डोहातून परत बाहेर येणार आहे. त्या वर्षी वॉचटावर संस्थेच्या अध्यक्षांनी ५२ शहरातील श्रोत्यांना स्पष्ट सांगितले की, “जरी चाळीस सदस्य अद्याप लिगला निष्ठावंत आहेत तरी लिग ही अचेतनावस्थेत आहे. . . . ती (क्रियाशील) “नाही.” पण मग, ती या “अथांग डोहातून वर येणार आहे” का? वक्त्यांनी विचाराधीन असलेल्या पवित्र शास्त्रीय भविष्यवादावर आपले विचार केंद्रित ठेऊन हे घोषित केलेः “जागतिक राष्ट्रांच्या सहयोगाने उभारलेली ही संघटना परत उदयास येईल.”
भविष्यवादात म्हटल्याप्रमाणे हा आठवा राजा १९२० पासून १९३९ पर्यंत ‘होता.’ मग, १९३९ पासून ते दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा १९४५ पर्यंत अंत होईपर्यंत ‘नव्हता.’ यानंतर तो “अथांग डोहातून वर” आला आणि लिगचा वारसा, संयुक्त राष्ट्र संघ म्हणून सक्रिय बनला.
मोठ्या आशा निष्फळ ठरल्या
जून २६, १९४५ रोजी सॅन फ्रँसिस्को येथे सुमारे ५० राष्ट्रांच्या सदस्यांनी संयुक्त राष्ट्र सभेच्या सनदेवर स्वाक्षऱ्या केल्या. या सनदेच्या प्रस्तावाची सुरवात अशी आहेः “आम्ही संयुक्त राष्ट्र सभेचे लोक हा निर्धार करतो की, भावी पिढींना अशा युद्धांच्या पीडांपासून बचावून ठेवू ज्यांनी असंख्य आघातांनी आमच्या जीवनात दोन वेळा मानवजातीस पिडिले आहे. . . . ”
संयुक्त राष्ट्रसभेविषयी उंचावलेल्या आशा अतिशयोक्तियुक्त ठरल्या. अमेरिकेचे माजी पंतसचिव कॉरडेल हल यांनी त्याविषयी म्हटलेः “ती, आमच्या सुसंस्कृत जगताच्या बचावाची” किल्ली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती हॅरी ट्रुमन म्हणालेः “देवाच्या मार्गदर्शनाखाली हिजद्वारा चिरकालिक शांती उत्पादित करण्याची हीच एक सर्वश्रेष्ठ संधि आहे.” युनोच्या सनदेसः “मनुष्याकरवी एवढ्या अपूर्वतेत इतके महत्त्वाचे कागदपत्र कधीच तयार झाले नव्हते,” आणि “मानवी संस्कृतीच्या इतिहासाला लाभलेले वळण” असे म्हणण्यात आले. चाळीस वर्षांनंतर अमेरिकेच्या गृहखात्याच्या जॉर्ज जे. नीवेल या प्रवक्त्यांनी म्हटलेः “जो उद्देश होता त्याची अतिशयोक्ती झाली; निराशा ही नक्की होती.”
लिगप्रमाणेच संयुक्त राष्ट्र सभेने देखील समाज कल्याण क्षेत्रात मोठमोठी कामे केली. पण तिला शांतीची हमी देता आली नाही की, युद्ध थांबविता आले नाही. ब्रिटनचे माजी पंतप्रधान हेरॉल्ड मॅकमिलन यांनी १९६२ मध्ये ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये म्हटलेः “ज्याच्यावर संयुक्त राष्ट्र सभा उभारली गेली त्या पायाची पायमल्ली झाली आहे.”
आरंभाला पुष्कळ लोकांनी या संस्थेकडे मोठ्या भाविकपणे पाहिले होते. त्यांना वाटले की ही “मूर्ति”, जे काही करण्याचे श्रेय पवित्र शास्त्र देवाच्या राज्यास देते तेच, म्हणजे शांती, न्याय व खऱ्या अर्थाने संयुक्त जग साकार करणार आहे. मानवी प्रयत्न खऱ्या शांतीचा उगम ठरु शकणार नाहीत या भविष्यवादाशी ते आपले सहमत दाखवीत नाहीत. तथापि, संयुक्त राष्ट्रसभेने आपली चाळीशी गाठताच इतिहासकार थॉमस एम. फ्रँक म्हणालेः “मागे १९४५ मध्ये आम्ही जे अपेक्षिले होते त्यापेक्षाही ती आज फारच कमी प्रभावी आहे.” अमेरिकेचे राष्ट्रसचिव जॉर्ज पी. शुल्स म्हणालेः “संयुक्त राष्ट्रसभेच्या जन्माने जगास नंदनवनात रुपांतरित केले नाही.”
संयुक्त राष्ट्र सभेला यश न लाभण्याचे कारण हे की, मानवी सरकारांनी राष्ट्राभिमान, जडवादीय लोभ, गरीबी, वंशभेद, जुलूमशाही आणि जगावरील दुरात्मिक प्रभाव ही अडखळणे दूर केलेली नाहीत. लोक या सरकारांना जडून राहतात, ते केवळ उज्वल भवितव्याच्या प्राप्तीसाठी नव्हे तर त्यांच्यापाशी कोणतीच अधिक चांगली आशा नाही.—प्रकटीकरण १२:१२.
संयुक्त राष्ट्रसभेचे अस्तित्व आणि तिला टिकविण्यासाठी लोकांनी केलेले प्रयत्न यावरुन हे सुव्यक्त होते की, लोकांस बदल यावा हे केवढ्या अंतर्यामापासून वाटते. तो बदल येणार पण वेगळ्या व अधिक प्रभावी मार्गाने येणार. कोणत्या मार्गाने?
कायम टिकणारे अधिपत्य
पवित्र शास्त्राने, केवळ सात “राजे” किंवा जागतिक साम्राज्ये लागोपाठ असतील असे म्हटले आहे ते आठवा. त्याच्यानंतर कोणाही मोठ्या जागतिक साम्राज्याचा उल्लेख नाही. पवित्र शास्त्र असेही म्हणते की, तत्कालिक “आठवा राजा आहे . . . आणि तो नाशात जाणार आहे.”—प्रकटीकरण १७:१०, ११.
पण, पवित्र शास्त्र असेही म्हणते की, एक अधिक चांगली आशा बाळगता येईल. लोक जे एवढ्या साहसाने प्राप्त करण्याच्या मागे लागून आहेत ती शांती, न्याय आणि संयुक्त जग हे कोणीतरी दुसरेच आणून दाखवील असे ते भाकित करते. ते म्हणतेः “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील; त्याचा कधी भंग होणार नाही, . . . तर ते या सर्व [अधःपाती मानवी] राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानीएल २:४४.
हेच ते अधिपत्य आहे ज्याच्याविषयीची बोलणी येशूने केली आणि याच्यासाठीच त्याच्या अनुयायांनी फार काळापासून ही प्रार्थना म्हटली आहेः “तुझे राज्य येवो.” (मत्तय ६:१०) हे राज्य म्हणजे माणसाच्या अंतर्यामीची चांगुलपणाची भावना नव्हे. तर ती प्रत्यक्षात एक स्वर्गीय राज्यसत्ता आहे जी आत्मिक राज्यक्षेत्रातून पृथ्वीवर चालविली जाईल. ते अधिपत्य पृथ्वीवरील आमच्या जीवनात मोठे बदल घडवील.—प्रकटीकरण २१:१-४.
त्या नव्या थरारक अधिपत्याविषयी पवित्र शास्त्र जे म्हणते, ते कसे चालविण्यात येईल, आणि ते शांती, न्याय व संयुक्त जगाची निर्मिती कशी साध्य करील हाच विषय आमच्या पुढील अंकातील शेवटल्या लेखात असेल.
[तळटीपा]
a या मासिकाच्या आधीच्या लेखांमध्ये या जागतिक सत्तांविषयी चर्चा झाली आहेः (१) मिसर, मार्च १, १९८९; (२) अश्शूर, ऑगस्ट १, १९८९; (३) बाबेलोन, सप्टेंबर १, १९८९; (४) मेद-पारस, ऑक्टोबर १, १९८९; (५) ग्रीस, नोव्हेंबर १, १९८९; (६) रोम, डिसेंबर १, १९८९; (७) अँग्लो-अमेरिकन जागतिक साम्राज्य, जानेवारी १, १९९०.
[३० पानावरील चौकट]
युद्धाचा व्याप
दुसऱ्या जागतिक महायुद्धाने लिग ऑफ नेशन्स बरखास्त केली. या युद्धाने मोठी जीवितहानी केली. एन्सायक्लोपिडिआ ब्रिटेनिकाने (१९५४ ची आवृत्ती) सैन्याचा जो मृत्यु घडला त्याचे प्रमाण १९४० मध्ये विविध राष्ट्रात जी लोकसंख्या होती त्याच्याशी दिले. यापैकीची काही आकडेवारी अशीः अमेरिकेने दर ५०० लोकांच्या मागे एक सैनिक गमावला; चीन २०० मागे एक; संयुक्त राज्य १५० मागे एक; फ्रान्स २०० मागे एक; जपान ४६ मागे एक; जर्मनी २५ मागे एक; आणि यु.एस.एस.आर दर २२ मागे एक. लष्कराच्या हानीपेक्षा मुलकी हानी अधिक प्रमाणात झाली हे विचारात घेतल्यावर आपल्याला लगेच हे दिसून येईल की, खरी शांती आणि सुरक्षितता आणण्याचे मानवी प्रयत्न खरेच कसे अपयशी ठरले आहेत.
[३१ पानांवरील संक्षिप्त आशय]
‘युनोच्या स्थापनेपासून युद्धात दोन कोटी लोक मारले गेले आहेत; त्यामुळे तो केवढा अपयशी ठरला त्याची ही दुःखदायक पुष्टी आहे.’ —“नेशन अगेन्स्ट नेशन,” लेखक, थॉमस एम. फ्रँक