वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ५/१ पृ. ५-७
  • शांती—एक वास्तवता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शांती—एक वास्तवता
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यशयाचा संदेश
  • ईश्‍वरी सूचना
  • खरी उपासना
  • निर्णयाची वेळ
  • शांतता व निर्भयता—देवाच्या राज्याकडून
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • खऱ्‍या शांतीच्या प्राप्तीसाठी झटा व तिचा मार्ग धरा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • आपण परमेश्‍वराच्या पर्वतावर जाऊ
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • युद्धाला अखेरचा प्रणाम
    सावध राहा!—१९९९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ५/१ पृ. ५-७

शांती—एक वास्तवता

शांतीच्या प्राप्तीसाठी संयुक्‍त राष्ट्रसंघाने जी प्रणाली आचरली आहे तिजबद्दल थोडेच लोक टीका करतील. “जागतिक शांतीसाठी संयुक्‍त राष्ट्रसंघाचे हे ब्रीद आहेः ‘आपण तलवारी मोडून त्यांचे फाळ करू,’” असे “द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ” म्हणते. ते आणखी सांगतेः “शांती आणि मानवी प्रतिष्ठा ही संयुक्‍त राष्ट्रसंघाची दोन प्रमुख ध्येये आहेत.”

येथे दाखविलेल्या पुतळ्याच्या खाली कोरलेले शब्द पवित्र शास्त्रातील यशयाच्या दुसऱ्‍या अध्यायातील चवथ्या वचनातील भविष्यवाद सूचित करतात. आधुनिक भाषांतरानुसार ते शब्द असे आहेतः

“ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील; आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील.”

या उदात्त शब्दांनीच संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या राष्ट्र-सदस्यांना चिरकालिक शांती व निःशस्त्रीकरण आणण्यास प्रेरित केले असावे. तथापि, याच्या प्रस्थापनेपासून ते १९४५ मध्ये झालेल्या दुसऱ्‍या महायुद्ध काळापर्यंत संयुक्‍त राष्ट्रसंघाचा वेगळाच इतिहास दिसून येतो हे खेदाने म्हणावे लागते. ते का? कारण वर नमूद करण्यात आलेले यशयाचे शब्द हे, प्रत्यक्षात मानवी सरकारांनी केले, त्याप्रमाणे केवळ वेगळेपणाने लागू केले जाऊ शकत नाही. त्या शब्दांचा संदर्भही महत्त्वपूर्ण आहे. का ते विचारात घ्या.

यशयाचा संदेश

यशया एक संदेष्टा होता. जगातील सर्व वंशाच्या लोकात नांदणारी एकता व शांती याविषयीच्या वैभवी दृष्टांताविषयी तो बोलत आहे. हा दृष्टांत खरा व्हावयाचा आहे तर लोकांनी काही तरी केलेच पाहिजे. ते काय? २ऱ्‍या व ३ऱ्‍या वचनाचा अर्थबोध लक्षात घ्या, ज्याचा संबंध ४थ्या वचनाशी आहेः

“[२] शेवटल्या दिवसात असे होईल की यहोवाच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल; त्याकडे सर्व राष्ट्रातील लोक लोटतील. [३] देशोदेशांतील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतीलः ‘चला, आपण यहोवाच्या पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू. कारण सियोनातून धर्मशास्त्र व यरुशलेमातून यहोवाचे वचन निघेल. [४] तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील, देशोदेशींच्या बहुत लोकांचा इन्साफ करील, तेव्हा ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.”

प्रथमतः आम्ही ओळखण्यास हवे की, आमचा निर्माता यहोवा याला “त्याचे मार्ग,” जे यशया नंतर म्हणतो की, ‘आमच्या मार्गाहून उंच आहेत,’ ते आम्हाला सांगण्याचा पूर्ण हक्क आहे. (यशया ५५:९) ही गोष्ट, पुष्कळ लोकांना व खासपणे स्व-केंद्रित जागतिक नेत्यांना जाणून घेणे अवघड वाटते. त्यांच्या दृष्टीने त्यांचे स्वतःचेच मार्ग योग्य आहेत. तथापि, त्यांच्या मार्गांनी जागतिक शांती व निःशस्त्रीकरण याकडे न निरवल्यामुळे त्या मार्गांचा पाठलाग करीत राहणे व्यर्थ आहे हे निश्‍चितपणे सुचविते.

दुसरी गोष्ट म्हणजे, देवाच्या नियमांशी संलग्न राहण्याची वैयक्‍तीकांच्या प्रबळ इच्छेची गरजः “आम्ही त्याच्या पथांनी चालू.” केवळ ह्‍याच मूलभूत आधाराद्वारे जागतिक पातळीवर तरवारीचे फाळ व भाल्यांच्या कोयत्या होऊ शकतील. मग, या दीर्घकालीन इच्छित असणाऱ्‍या ध्येयाची पूर्तता कशी होऊ शकेल?

ईश्‍वरी सूचना

पुष्कळ लोकांपाशी पवित्र शास्त्र, ज्यामध्ये यहोवा देवाच्या सूचना दिलेल्या आहेत ते, आहे. पण ते निव्वळ आपणापाशी असण्यापेक्षा अधिक काही करण्याची गरज आहे. यशया म्हणतो की, “यरुशलेमातून” यहोवाचे वचन व मार्गदर्शन निघेल. याचा काय अर्थ होतो बरे? यशयाच्या काळी राज्याधिकाराचा उगम असलेले वास्तविक शहर या अर्थाने यहुदी त्या खऱ्‍या शहराकडे पाहात होते. (यशया ६०:१४) नंतर, येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांच्या काळीही यरुशलेम अद्याप त्या शहरातील ख्रिस्ती नियमन मंडळातर्फे मिळणाऱ्‍या सूचनांचे केंद्र म्हणून होते.—प्रे. कृत्ये १५:२; १६:४.

पण, आजच्याबद्दल काय? यशया आपल्या प्रस्तावनेत काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या. तो म्हणतो “शेवटल्या दिवसात असे होईल की.” इतर भाषांतरे म्हणतातः “शेवटल्या काळी असे होईल.” (न्यू इंटरनॅशनल व्हर्शन) आपण १९१४ पासून या सद्य व्यवस्थीकरणाच्या अंतिम दिवसात जगत आहोत ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी या मासिकाने सातत्याने वेगवेगळे पुरावे सादर केले आहेत. मग, ३ व ४थ्या वचनानुसार काय होण्याची आम्ही अपेक्षा धरली पाहिजे?

लोकांचा एक मोठा समुदाय, जो युद्धकला शिकत नाही, त्याने आधीच ‘आपल्या तरवारींचे फाळ केले आहेत’ असे आपल्याला दिसत आहे. पहा, ते २१२ देशात ४० लक्षापेक्षा अधिक आहेत! ते वेगवेगळ्या वंशातील असले तरी एकाच समान भावनेने आपसात शांतीने राहण्यास एकत्रित झालेले व आपल्या शेजाऱ्‍यांना पवित्र शास्त्रातील शांतीचा संदेश सांगत आहेत. संपूर्ण जगभरात त्यांना यहोवाचे साक्षीदार असे ओळखण्यात येते.

यांच्यामध्ये एक नियमन मंडळ आहे, जे पृथ्वीवरून वेगवेगळ्या भागातून आलेल्या वयोवृद्ध ख्रिश्‍चनांचे बनले असून ते देवाच्या लोकांना जागतिक कार्यासाठी आवश्‍यक असणारी देखरेख पुरवितात. हे लोक, पहिल्या शतकातील प्रेषितांप्रमाणे व यरुशलेमातील वडीलजनांप्रमाणे असून ते, येशू ख्रिस्ताने पृथ्वीवरील आपल्या राज्य आस्थेची काळजी घेण्यासाठी नियुक्‍त केलेल्या विश्‍वासू व बुद्धिमान दासामधील अभिषिक्‍त सदस्य आहेत. पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन अनुसरण्यात ते विश्‍वासपात्र आहेत व ते देवाच्या कळपाला खऱ्‍या शांतीविषयीच्या मार्गाचे शिक्षण देताना मानवी ज्ञानास अनुसरीत नसल्याचे इतिहासाने सिद्ध केले आहे.—मत्तय २४:४५-४७; १ पेत्र ५:१-४.

खरी उपासना

शांतीने रहावयाचे असेल तर स्वतःचे बौद्धिक ज्ञान किंवा ईश्‍वरी सूचनांनुरुप जगण्याची नुसती इच्छा यापेक्षा अधिक काहीतरी अपेक्षित आहे. आमचा निर्माता यहोवा देव याविषयीची अंतःकरणपूर्वक निष्ठा आणि भक्‍ती ही जरुरीची आहेत व हेच यशया देखील स्पष्ट करतो.

संदेष्टा नमूद करतो की, “यहोवाच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगराहून तो उंच होईल.” प्राचीन काळी काही पर्वत व टेकड्या यांच्याकडे मूर्तिपूजक उपासनेची स्थळे किंवा खोट्या दैवतांची पवित्र स्थळे म्हणून पाहिले जात असे. दाविदाने समुद्रसपाटीपासून २,५०० फूट उंचीवर असलेल्या सीयोन डोंगरावर (यरुशलेम) निवासमंडपात कराराचा पवित्र कोश आणला तेव्हा ते त्याने ईश्‍वरी मार्गदर्शनानुरुप केले होते. नंतर जेव्हा मोरीया डोंगरावर यहोवाचे भव्य मंदिर उभारले गेले तेव्हा “सीयोन” ही संज्ञा मंदिराच्या जागेला सुद्धा अनुलक्षून वापरण्यात येऊ लागली. या कारणामुळे ते मंदिर सभोवतालच्या सर्व मूर्तिपूजक स्थानांपेक्षा उंच जागेवर दिसत होते. यरुशलेमास वस्तुतः “पवित्र डोंगर” असे म्हणू लागले; अशाप्रकारे यहोवाची उपासना ही उच्च स्थानावरच राहिली.—यशया ८:१८; ६६:२०.

याचप्रमाणे आज यहोवा देवाची उपासना लाक्षणिक पर्वताप्रमाणे उंचावलेली आहे. तिचा महिमा सर्वांना कळू शकतो, कारण इतर कोणताच धर्म करू शकत नाही असे तिने करून दाखविले आहे. ते काय? तिने यहोवाच्या सर्व उपासकांना एकत्रित केले आहे; यांनी आनंदाने आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ केले आहे, आपल्या भाल्यांच्या कोयत्या केल्या आहेत, आणि ते इतःपर युद्धकला शिकत नाहीत. यांना राष्ट्रीय किंवा वंशीय अडथळे विभक्‍त करू शकत नाहीत. ते, जगाच्या वेगवेगळ्या राष्ट्रात विखुरलेले असले तरी संघटित लोक आहेत व बंधुभावाने राहात आहेत.—स्तोत्रसंहिता ३३:१२.

निर्णयाची वेळ

या सर्व गोष्टींचा तुम्हावर कसा परिणाम होत आहे? येथे दुसऱ्‍या इब्री संदेष्ट्याचे शब्द अगदी उचित आहेत. ते म्हणतातः “लोकांच्या झुंडी, निर्णयाच्या खोऱ्‍यात लोकांच्या झुंडी आहे, कारण निर्णयाच्या खोऱ्‍यात यहोवाचा दिवस येऊन ठेपला आहे.” (योएल ३:१४) हीच, सर्व मानवजातीने निर्णय घेण्याची तातडीची वेळ आहे. तो निर्णय म्हणजे, एकतर देवाकडून येणाऱ्‍या खऱ्‍या शांतीच्या मार्गाचे शिक्षण घेणे किंवा जे लवकरच नाहीसे होईल त्या शस्त्रास्त्रांनी वेढलेल्या जीवनाला आपला पाठिंबा देणे.

आमच्या काळी प्रचाराचे मोठे कार्य जगभर उरकण्यात येईल असे येशूने भाकित केले होते. या प्रचारात ती “सुवार्ता” संलग्न आहे की, युद्धाने हवालदिल झालेल्या पृथ्वीवर देवाचे राज्य शांती आणेल. (मत्तय २४:१४) गेल्या वर्षी जगभर यहोवाच्या साक्षीदारांकरवी ३६ लक्ष नियमित रुपाचे पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्यात आले. यापैकीचे काही साप्ताहिक अभ्यास विशिष्टांसोबत पण इतर बहुतेक कुटुंबासोबत होते. यामुळे लक्षावधी मुलांना त्यांच्या भविष्याविषयीची खात्रीदायक आशा पुरविली गेली आहे; तसेच त्यांच्या पालकांनाही दिलासा मिळालेला आहे की, युद्धे—जी त्यांनी स्वतः पाहिली किंवा ज्यात बहुधा भागही घेतला असेल—ती यहोवा देवाच्या नव्या जगात मुळीच असणार नाहीत.

ते परस्परांवरील विश्‍वास आणि शांतीचे कसे जग असेल! त्यावेळी निःशस्त्रीकरणाचा प्रश्‍नच उद्‌भवणार नाही कारण शस्त्रे ही भूतकाळातच नष्ट झालेली असणार. याबद्दल, आमचा “शांतीदाता देव,” यहोवा याचे आम्ही आभार मानतो, कारण तोच आम्हाला प्रेमळपणे त्याच्या नीतीमत्तेच्या राज्यामध्ये जीवन जगण्याच्या तयारीस कसे लागावे याचे शिक्षण देत आहे.—रोमकर १५:३३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा