वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 ७/१ पृ. १०-११
  • यहुदाचे अरण्य उजाड पण मनोहर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहुदाचे अरण्य उजाड पण मनोहर
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • वाग्दत्त देशातून शिकण्यासारखे व्यवहार्य धडे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 ७/१ पृ. १०-११

वचनयुक्‍त देशाचे देखावे

यहुदाचे अरण्य उजाड पण मनोहर

वचनयुक्‍त देशातील अरण्य कशासारखे असावे असा तुम्ही विचार करता? काहींना ते विस्तीर्ण घनदाट अरण्य वाटते. तर काहींना ते सहाराचे वाळवंट वाटते, जेथे अक्षय वाळूमय प्रदेश दिसतो.

यापैकीची कोणतीच तुलना या अरण्याशी जुळत नाही हे वर दाखविलेल्या चित्रावरुन समजू शकते. या चित्रात दिसणारा अरण्याचा असा भाग आहे ज्याचा येशूसोबत संबंध आला. सांप्रदाय सांगतो की येथे अरण्याच्या कोपऱ्‍यावर एका शिखरावरुन, जेथून पलिकडे खजुरीच्या झाडांनी बहरलेले यरीहो शहर दिसू शकते, तेथून सैतानाने येशूला “जगातील सर्व राज्ये” दाखविली.—मत्तय ३:१; ४:१-११.

या आग्नेय दिशेकडून हे यहुदाचे अरण्य मृत समुद्राच्या पश्‍चिम दिशेकडे पसरलेले आहे. तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या १९८९ च्या कॅलेंडरमधील मुखपृष्ठाचा नकाशा पाहिल्यास हा भाग तुमच्या लक्षात येऊ शकेल. (कॅलेंडरमध्ये वरील चित्र मोठ्या आकारात दिलेले आहे.) हे अरण्य (१० ते १५ मैल विस्तीर्ण असे) यहुदी पर्वतांच्या उतारावरुन मृत समुद्र किनाऱ्‍यापर्यंत आहे.

हे पर्वत भूमध्य समुद्राकडून येणाऱ्‍या आर्द्रतेस बांध घालतात. या कारणास्तव, पर्वताच्या पूर्वभागाकडे नोव्हेंबर व डिसेंबर हे हिवाळ्याचे महिने वगळता खूपच कमी पाऊस मिळतो. यावेळी गवत फुलते, मेंढरांना चरण्यास मिळते. यामुळेच, १ शमुवेल २४:३ मध्ये म्हटलेला “[दगडाचा] मेंढवाडा” या प्रदेशाला सार्थपणे लागू होतो.

येथे वाढणारे गवत ज्यादा काळ टिकत नाही. अरण्याच्या पूर्व दिशेकडून वाहणारे वारे हिरवळीस कोमेजून टाकतात. हे या भविष्यवादित विवेचनासोबत केवढे सुसंगत आहेः “गवत सुकते, फूल कोमेजते; पण आमच्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते.”—यशया ४०:८; १ पेत्र १:२४, २५.

येशूने ४० दिवस व ४० रात्र या अरण्यात घालवताना या वचनाविषयी विचार केला असावा. वृक्षहीन खडकावर तसेच दरीत सूर्याचे तळपते उन पडलेले पाहून येशूला कसे वाटले असेल याचा जरा विचार करा. (यशया ३२:२) तर मग, नंतर “दूत येऊन त्याची सेवा करू लागले” हे किती वाजवी व समजण्याजोगे आहे!—मत्तय ४:१-११.

उजाडपणा व लोकवस्ती नसल्यामुळे या यहुदी अरण्याचा उपयोग बहुदा आश्रयासाठी करीत असत. क्रोधाविष्ठ राजा शौल याजपुढून पळून गेल्यावर दाविदाला येथेच सुरक्षित वाटले असावे, ज्याविषयीचे वर्णन त्याने “शुष्क व निर्जन भूमि” असे केले आहे. (स्तोत्रसंहिता ६३:१ व मथळा; १ शमुवेल २३:२९) काही काळ तो, वाडी खैरतनमधील उम्म कताफा यासारख्या गुहेत (बेथलहेमच्या पूर्वेकडून मृत समुद्राकडे जाणारी दरी) दडून राहिला असावा. (इब्रीयांस ११:३२, ३८) या गुहेकडून उजवीकडे खाली पाहिल्यास काही काळी मेंढरे लांब लांब असणाऱ्‍या चाऱ्‍यास खाण्यास पुढे जात असल्याचे दिसू शकतील.

दावीद एन-गेदीच्या रानात गुहेत होता त्यावेळी शौल राजा तेथे बहिर्दिशेस गेला. अशावेळी दावीदाने शौलाच्या झग्याचा काठ हळूच कापून घेतला पण त्याने या “यहोवाच्या अभिषिक्‍तावर” हात टाकून त्याला इजा केली नाही. नंतर दावीदाने जेव्हा शौलास हाक मारली तोपर्यंत शौल राजा खाली झाडाझुडुपांमध्ये आला असावा. (१ शमुवेल २४:१-२२) ‘येथे, अन्‌ झाडेझुडुपे?’ तुम्हाला नवल वाटायला लागेल.

होय, जेथे पाणी मुबलक आहे तेथे वाळवंटही बहरु शकते. एन-गेदी हे याचे उदाहरण आहे. खडकातून पाणी झिरपत जाऊन त्याचे आहोळात रुपांतर होऊन पुढे दरीत त्याचा धबधबा तयार होऊन तो मृत समुद्राच्या पश्‍चिम किनाऱ्‍यास जाऊन मिळतो. या कारणास्तव एन-गेदी हे वनस्पतींनी समृद्ध असे वास्तविक अरण्य बनते. येथे भेट दिल्यावर तुम्हाला विविध प्रकारची फुले व फळे दिसून येतील. शिवाय वन्यजीवन देखील तुम्हाला पहायला मिळेल. काळवीट व रानशेळ्‌या येथे दिसतील, आणि या विभागात चित्तेही वावरताना दिसतील!—१ शमुवेल २४:२; गीतरत्न १:१४.

यहुदाचे हे निर्जन अरण्य इतके बहरु शकते हे यहेज्केलने यरुशलेमातील मंदिरातून वाहणाऱ्‍या झऱ्‍याचा जो दृष्टांत बघितला त्याची समज मोठ्या समृद्धपणे जाणून घेण्यात आमची मदत करते. त्याचा ओघ पूर्वेकडे वाहत जाऊन यहुदाच्या अरण्यातून ओहोळात रुपांतरित होतो. पण यापासून कसला परिणाम घडतो? यहेज्केलने लिहिलेः “पहा, नदीच्या तीरावर बहुत झाडे होती . . . त्या वृक्षांची फळे खाण्यासारखी व त्यांची पाने औषधी शाबीत होतील.” मृत समुद्राकडे वाहत जाणारे पाणी तेथील निर्जिव पाण्यासही बरे करते.—यहेज्केल ४७:१-१२; यशया ३५:१, ६, ७.

अशा प्रकारे यहुदाचे अरण्य हे काही अंशी शुष्क व निर्जन असले तरी ते पवित्र शास्त्राच्या बऱ्‍याच वृत्तांतात वर्णिण्यात आलेल्या अरण्यामध्ये मोहक प्रदेश या अर्थी आहे.—लूक १०:२९-३७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा