वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ३/१ पृ. ४-७
  • पुनरुत्थान—कोणाचे व केव्हा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पुनरुत्थान—कोणाचे व केव्हा?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • लोकांना का मरावे लागते?
  • मृतांची स्थिती कशी असते?
  • पृथ्वीवरील पुनरुत्थान
  • पुनरुत्थान—सांत्वनाचा एक उगम
  • पुनरुत्थान—केव्हा?
  • मरण पावलेल्या तुमच्या प्रिय जनांसाठी खरी आशा
    बायबल नेमके काय शिकवते?
  • मृत लोक पुन्हा जिवंत होतील!
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • मृत लोकांसाठी आशा—पुनरुत्थान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • आज मृत असणारे लक्षावधी लोक पुन्हा जिवंत होतील
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ३/१ पृ. ४-७

पुनरुत्थान—कोणाचे व केव्हा?

लाजर, आपल्या दोन बहिणी मार्था व मरीया यांच्याबरोबर बेथानी येथे राहात होता तेव्हा ती घटना इ. स. ३२ च्या सुमाराला घडली. त्या बहिणींनी येशूला निरोप पाठवला होता की, लाजर आजारी होता. येशूची लाजर तसेच त्याच्या बहिणींवर प्रीती होती; त्यामुळेच तो बेथानीस जायला निघाला. वाटेवर येशूने आपल्या शिष्यांना कळवले की, “आपला मित्र लाजर झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवावयास जातो.” शिष्यांना वाटले की येशू खरोखरच्या झोपेविषयी सांगत आहे. पण येशूने स्पष्टपणे म्हटलेः “लाजर मेला आहे.”—योहान ११:१-१५.

लाजरचा मृत्यु होऊन चार दिवसांनी हे पाहुणे तेथे पोहंचले. येशूने मरीया व इतर लोकांना रडताना पाहिले तेव्हा तो रडला. याद्वारे त्याने आपला कळवळा व गाढ प्रीती व्यक्‍त केली. (योहान ११:१७, ३५) लाजराचा मृत देह एका गुहेत कबरेमध्ये ठेवला होता. या गुहेच्या प्रवेशद्वारावर एक धोंड ठेवली होती ती येशूने काढण्यास सांगितले. त्याने स्वर्गीय पित्याला प्रार्थना म्हटली व मोठ्याने म्हटलेः “लाजरा, बाहेर ये!” लाजर बाहेर आला. त्यावेळी त्याच्या बहिणींना केवढा आनंद झाला असावा!—योहान ११:३८-४५.

ही घटना पुनरुत्थानाची खरी आशा देते. तथापि, सर्वसाधारणपणे पाहिल्यास मृत्यु हा आमचा भयंकर शत्रू असून तो आमच्या प्रियजनांना आम्हापासून दूर नेतो आणि अशांना येशूने त्वरित पुन्हा उठवण्याची संभाव्यता नाही. आम्हाला माहीत आहेत ते आमचे सर्व प्रियजन चांगले व दयाळू असतात तेव्हा हा प्रश्‍न साहजिक येतो की . . .

लोकांना का मरावे लागते?

आम्हाला याचे अचूक व व्यवहार्य उत्तर हवे आहे तर मग, आपण एदेन बागेत मानवजातीची जी सुरवात घडली तेथे मागे गेले पाहिजे. आदामाच्या आज्ञाधारकपणाची परिक्षा व्हावी यासाठी देवाने तेथे त्याला ही आज्ञा दिली की, त्याने एका विशिष्ट झाडावरील फळ खाऊ नये. त्याने व त्याची बायको हव्वा हिने ते फळ खाल्ले तर मग, देवाने म्हटले की, ते ‘खास मरतील.’ (उत्पत्ती २:१७) सैतानाने मोह घातला तेव्हा त्यांनी देवाची आज्ञा मोडली व त्या खडतर परिक्षेत अपयशी झाले. याचा परिणाम मृत्यु ओढावला.

इतक्या छोट्या गुन्ह्‌यासाठी ही शिक्षा का? त्यांची कृती लहान होती हे खरे, पण गुन्हा मात्र मोठा घातक होता—आदाम व हव्वा या परिपूर्ण लोकांद्वारे त्यांच्या निर्माणकर्त्याविरूद्ध केलेली बंडखोरी. ते मग परिपूर्ण राहिले नाहीत आणि देवाने त्यांजवर मरणाची शिक्षा घोषित केली. पण देवाने आदामाच्या संतानांवरील ही न्यायी शिक्षा उलटविण्याचीही व्यवस्था केली. ती कशी? पौलाने लिहिले की, “ख्रिस्त येशूने . . . सर्वांसाठी मुक्‍तीचे जुळणारे मोल म्हणून स्वतःला दिले.”—१ तीमथ्य २:५, ६; रोमकर ५:१७.

मृतांची स्थिती कशी असते?

लाजर चार दिवस मृत होता. समजा, तुम्हीच वारला व चार दिवसासाठी आत्मिक क्षेत्रात गेला आणि नंतर तुमचे पुनरुत्थान झाले तर मग, तुम्ही इतरांना त्याविषयी सांगणार नाही का? नक्कीच. परंतु, लाजराने तर स्वतःबाबतीत, दुसऱ्‍या कोणा आसमंतात राहिलो होतो की काय याविषयी काहीही म्हटले नाही. पवित्र शास्त्र म्हणतेः “मृतांस तर काहीच कळत नाही.”—उपदेशक ९:५; स्तोत्रसंहिता १४६:३, ४.

याचा काय अर्थ होतो ते लक्षात घ्या. पवित्र शास्त्रात परगेटरी हा शब्द आढळत नाही तरी लाखो लोक मानतात की परगेटरी आहे. शिवाय अग्निनरक आहे असेही पुष्कळ जण मानतात. तथापि, कोणा वैऱ्‍यालाही तुम्ही आगीत सतत जाळू शकणार नाही. एवढे क्रूर कृत्य करायला तुम्ही स्वतः जर पुढे होणार नाहीत तर मग, आमचा प्रेमळ निर्माणकर्ता कोणा विशिष्टांना नरकाग्नीत यातना देत राहील हे म्हणणे पटते का? उलटपक्षी, पवित्र शास्त्राचे जे सांत्वनदायक विचार आहेत ते कृपया लक्षात घ्या की, मृतांस तर “काहीच कळत नाही.”

शास्त्रवचनांच्या मते, ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करणाऱ्‍यांची संख्या खूपच अल्प आहे. येशूने यांना “लहान कळप” असे संबोधिले. (लूक १२:३२) प्रेषित योहानाने पाहिले की, “कोकरा [येशू ख्रिस्त] [स्वर्गीय] सीयोन डोंगरावर उभा (होता); व त्याच्याबरोबर . . . एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम होते. . . . ते पृथ्वीवरून विकत घेतलेले” होते. (प्रकटीकरण १४:१-३) याचा अर्थ हा होतो की हे पूर्वी मानव होते, ते मेले व नंतर यांचे ख्रिस्तासोबत स्वर्गात राहण्यासाठी पुनरुत्थान झाले.

तुम्हाला आता कळू लागेल की, या पवित्र शास्त्रीय सत्याच्या आधारावर लोकांना याची समज मिळवण्यात मदत देण्यात आली की, परगेटरी तसेच जळणारा नरक नाही. मृतांना स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थान होऊ शकते. तथापि, ज्यांचे स्वर्गात जाण्यासाठी पुनरुत्थान होणार ते फारच थोडे आहेत तर मग, इतरांसाठी कोणती आशा आहे?

पृथ्वीवरील पुनरुत्थान

स्वर्गातील जीवनासाठी पुनरुत्थित होण्याचा मार्ग येशू ख्रिस्ताने सुरु केला वा उघडला. (इब्रीयांस ९:२४; १०:१९, २०) या कारणास्तव, बाप्तिस्मा करणारा योहान याला, त्याचा शिरच्छेद, येशूचे मरण व त्याने स्वर्गीय जीवनाचा मार्ग उघडण्याआधी घडल्यामुळे, स्वर्गीय पुनरुत्थानात सहभाग मिळणार नाही. येशूने म्हटलेः “बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा कोणी . . . नाही; तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे.” (मत्तय ११:११) तर मग, या विश्‍वासू माणसासाठी तसेच इतर जे वारले आहेत अशांसाठी देवाने कोणते प्रतिफळ राखले आहे?

कृपया आपले पवित्र शास्त्र उघडून लूक याचा २३ अध्याय काढा व ३९ ते ४३ वचने वाचा. येशूच्या शेजारी वधस्तंभी दिलेल्या एका अपराध्याने म्हटलेः “हे येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” येशूने त्याला ही खात्री दिली की तो नंदनवनात असेल. ते स्वर्गात नसेल, तर या पृथ्वीवरच असेल, कारण येथेच पहिले नंदनवन अस्तित्वात होते.

पुनरुत्थान—सांत्वनाचा एक उगम

पवित्र शास्त्राने सादर केलेली ही संभाव्यता खूप सांत्वनदायक ठरली पाहिजे असे आम्ही अपेक्षिण्यास हवे. ते का? कारण यहोवा हा प्रीतीचा देव आहे. (१ योहान ४:८) देवाने आपल्या पुत्राला लज्जास्पद मरणाचा अनुभव येऊ दिला तेव्हा तो वस्तुतः आपणाठायीच्या प्रेम या अद्‌भुत गुणाचे प्रदर्शन घडवीत होता. याचसंबंधाने येशूने काही काळाआधी असे म्हटले होतेः “देवाने [मानवजातीच्या] जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१६.

विश्‍वास ठेवणाऱ्‍या मानवजातीसाठी आपल्या जीवनाची खंडणी देऊन येशूनेही अप्रतिम प्रीती दाखवली. त्याने स्वतः म्हटले होतेः “मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला जीव देण्यासाठी आला आहे.”—मत्तय २०:२८.

आपण मागील लेखात हे पाहिले होते की, अपघाताचे वृत्त ऐकून कुटुंबाची एक नातेवाईक स्त्री एकदमच बधिर झाली होती. पण तिला हे जाणून सांत्वन मिळाले की तिचे मृत नातेवाईक आता त्रासात नाहीत. शिवाय आणखी असे काय होते ज्यामुळे तिला अधिक बळ मिळाले? तिचे आध्यात्मिक बांधव, यहोवाचे साक्षीदार यांनी तिला जे प्रेम व अस्सल मायाळूपणा दाखविला तो तिला खूपच साहाय्यक ठरला.—स्तोत्रसंहिता ३४:१८.

यहोवाला केलेल्या प्रार्थनांमुळेही तिला साहाय्य मिळू शकले. कित्येक रात्रीला ती दचकून उठत असे व मग विचार करी की ती सर्व वाईट स्वप्ने होती; पण मग वास्तवता तिला सतावीत असे. यावेळी यहोवाला केलेली विनंती तिला शांत करीत असे आणि तिला पौलाच्या या शब्दांची अधिक रसिकता वाटायला लागलीः “कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलिकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखील.”—फिलिप्पैकर ४:६, ७.

पुनरुत्थानाची आशा किती सांत्वनदायक असते याचे आणखी एक उदाहरण शर्ले या स्त्रीचे आहे. तिच्या लहान मुलाच्या अंगावर सिमेंट क्राँक्रीटचा एक मोठा भाग छातीवर पडून तो जागीच ठार झाला. ही दुर्घटना जानेवारी १९८६ मध्ये घडल्यानंतर शर्लेने आपल्या मित्रांना म्हटले की, “ते एक भयानक स्वप्न होते.” कॅथोलिक चर्चमध्ये तिला हे शब्द ऐकायला मिळालेः “देव जिवंतांचा व मृतांचा न्याय करील.” ती विचार करू लागलीः ‘देव जर जिवंतांचा व मृतांचा न्याय करणार आहे तर, लोक मेल्यावर कोठे जातात हे आपल्याला कसे कळू शकेल? ते आधीच स्वर्गात आहेत तर न्याय होण्यासाठी त्यांचे नंतर पुनरुत्थान होण्याची आवश्‍यकता आहे का? तसेच, ते स्वर्गात आहेत तर त्यांचे पुनरुत्थान तरी कसे होऊ शकेल?’ पवित्र शास्त्र जिवंतांचे पुनरुत्थान होईल असे कोठेही सांगत नाही. ते केवळ मृतांच्या पुनरुत्थानाची माहिती देते.

शर्लेने याविषयी आपल्या पतीला माहिती विचारली, कारण त्याला पवित्र शास्त्राची ओळख होती. तिला या विषयासंबंधाने पवित्र शास्त्रातील माहिती मिळाल्यावर ती पुन्हा चर्चला गेली नाही. तिच्या एका नातेवाईकाने शर्ले व तिच्या पतीसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास मार्च १९८६ मध्ये आरंभिला. त्यांचा लवकरच बाप्तिस्मा झाला. ती शेवटी म्हणतेः “सत्याची माहिती होणे, पुनरुत्थानाबद्दल माहीत असणे तसेच यहोवा हा केवढा चांगला आहे ते समजून घेणे हे किती चांगले आहे.”

पुनरुत्थान—केव्हा?

प्रेषित योहानाने एका दृष्टांतात पाहिले की, “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे, ह्‍यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा . . . मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्‍यासमोर उभा” होता. (प्रकटीकरण ७:९) हा मोठा लोकसमुदाय ‘देवाच्या राजासनासमोर उभा आहे,’ याचा अर्थ तो पृथ्वीवर जिवंत राहणार आहे. (यशया ६६:१) यांच्यापैकी कोणी आता वारले तर त्यांचे पुनरुत्थान केव्हा होणार? पवित्र शास्त्र तारीख सांगत नाही, पण ते म्हणते की, हे पुनरुत्थान, देव त्याच्या नीतीमान दर्जांनुरुप राहण्याची इच्छा न धरणाऱ्‍या सर्व लोकांचे येत असलेल्या युद्धामध्ये पृथ्वीवरुन उच्चाटन करील, त्यांनतर घडेल. (२ थेस्सलनीकाकर १:६-९) यामुळे न्यायाच्या दिवसासाठी तसेच ज्यांना देव पृथ्वीवर पुनरुत्थान होण्याच्या पात्रतेचे असल्याचे समजतो त्यांचे पुनरुत्थान घडवून आणण्याचा मार्ग मोकळा होईल. (योहान ५:२८, २९; प्रे. कृत्ये २४:१५) पवित्र शास्त्राच्या भविष्यवादांच्या होणाऱ्‍या पूर्णता दाखवितात की, या उत्तेजक तसेच अद्‌भुत घटना लवकरच घडणार आहेत!—प्रकटीकरण १६:१४-१६.

येशूच्या शिष्यांनी त्याला एकदा विचारले होतेः “आपल्या येण्याचे व युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” याचे उत्तर देताना येशूने युद्धे, अन्‍नटंचाई, भूकंप, रोगराई, आणि देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा जगभर प्रचार या गोष्टींची माहिती दिली.—मत्तय २४:३-१४; लूक २१:७-११.

हा अप्रतिम भविष्यवाद १९१४ मध्ये पहिले जागतिक युद्ध भडकले तेव्हापासून पूर्ण होत आहे. त्या युद्धात कितीतरी लाखो लोक ठार झाले व त्याने दुष्काळ व अन्‍नटंचाई कित्येक देशात आणली. दुसऱ्‍या जागतिक महायुद्धापासून जगाची स्थिती तर अधिकच वाईट होत आहे.

रोगराईच्या बाबतीत पुष्कळांना वाटते की, एड्‌स्‌ हे यापैकीचे अत्यंत वाईट उदाहरण म्हणून सांगता येईल. “ही पीडा इतकी व्याप्तपणे पसरली आहे व इतकी संहारक आहे की, तज्ञ लोक याची तुलना १४ व्या शतकात युरोपातील एक चतुर्थांश लोक ज्यामुळे ठार झाले होते त्या काळ्या मृत्युशी करतात.”—रिडर्स डायजेस्ट, जून १९८७.

सध्याची इतकी भयानक स्थिती असली तरी पुनरुत्थानाचा प्रसंग किती अद्‌भुत रितीचा असेल! त्यावेळी मृत्युकरवी ताटातूट घडलेल्या कुटुंबांचे पुनर्मिलन घडेल तेव्हा आनंदाला पारावार उरणार नाही. यास्तव, आता सूज्ञतेचा मार्ग हा आहे की, आम्ही आपल्या जीवनाला देवाच्या इच्छेनुरुपचे वळण द्यावे व याद्वारे नंतर पुनरुत्थान घडेल तेव्हा हजर असण्यासाठी स्वतःला पात्र बनवावे.

[७ पानांवरील चित्रं]

पवित्र शास्त्र म्हणते की, जसा एखादा वृक्ष छाटण्यात येतो, पण त्याला पुन्हा बहर येऊ शकतो; त्याचप्रमाणे देव आपल्या स्मरणात असलेल्या सर्वांना मृतातून पुन्हा उठवू शकतो.—ईयोब १४:७-९, १४, १५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा