वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 १०/१ पृ. २३-२८
  • आपल्या विश्‍वास व आध्यात्मिक आरोग्य राखून ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या विश्‍वास व आध्यात्मिक आरोग्य राखून ठेवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हे जग किती आजारी आहे?
  • आजारी जगातील आध्यात्मिक धोके
  • आध्यात्मिक आजार जडविणारे बाहेरील उगम
  • विश्‍वासात सुदृढ राहणे
  • आध्यात्मिक आरोग्य चिरकालिक जीवनाकडे नेते
  • यहोवाकडून पारखले जाणे—का लाभदायक?
    आमची राज्य सेवा—१९९५
  • आरोग्याची निगा राखा, पण बायबलमधील तत्त्वांच्या चाकोरीत राहून
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • सर्वांकरता उत्तम आरोग्य—लवकरच!
    सावध राहा!—२००१
  • सर्वांकरता उत्तम आरोग्य
    सावध राहा!—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 १०/१ पृ. २३-२८

आपल्या विश्‍वास व आध्यात्मिक आरोग्य राखून ठेवा

“ज्या सुवचनांचा नमुना तू मजपासून ऐकून घेतला तो, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेला तुझा विश्‍वास व प्रीती यांमध्ये दृढपणे राख.”—२ तीमथ्य १:१३.

१. चांगले शारीरिक आरोग्य एक महत्त्वाचा ठेवा का आहे, व त्याला का राखले पाहीजे?

चांगले शारीरिक आरोग्य हा मोठा ठेवा आहे. आपण सुदृढ असलो तर पुष्कळ गोष्टी करता येतात व जीवनाचा अधिक आनंद मिळतो. पण जेव्हा आपण कोणा जुनाट रोगाने बाधलेलो असतो किंवा दुबळे बनतो तेव्हा जीवन किती कठीण वाटते. अर्थात, चांगले आरोग्य टिकवता आले पाहीजे. पुष्कळ जण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात किंवा अशा गोष्टी करतात ज्यामुळे ते आजारी पडतात. पण जे आपली काळजी घेतात अशांचे आरोग्य व बळ त्यांचा बहुतेक जीवनमानात चांगले राहते.

२. (अ) शारीरिक आरोग्यापेक्षा आध्यात्मिक आरोग्य का महत्त्वाचे आहे? (ब) विश्‍वासामध्ये सुदृढ राहण्यासाठी काय केले पाहिजे?

२ शारीरिक आरोग्यापेक्षा आध्यात्मिक आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे. शारीरिक आरोग्य कितीही उत्तम असले तरी ते देवाकडून चिरकालिक जीवनाचे बक्षीस मिळवू शकत नही. उत्तम आध्यात्मिक आरोग्य हे अचूक ज्ञानावर आधारीत शुद्ध भक्‍ती व विश्‍वास यावर आधारलेले असते. (योहान १७:३; इब्रीयांस ११:६; याकोब १:२७) प्रेषित पौलाने म्हटले: “वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादशील असून विश्‍वास, प्रीती व सहनता यामध्ये दृढ राहावे.” (तीत. २:२) विश्‍वासात सुदृढ राहण्याची ज्याची इच्छा आहे अशांनी परिश्रम केले पाहिजे व सतत जागृतता राखली पाहिजे. आध्यात्मिक आरोग्याला धोका आमच्यामधून किंवा बाहेरील उगमाकडून येऊ शकतो. यासाठीच, या आजारी जगात आपला विश्‍वास व आध्यात्मिक आरोग्य टिकवता यावे म्हणून या धोक्यांबद्दल जागृत असावयास हवे.

हे जग किती आजारी आहे?

३, ४. या जगाच्या तसेच लोकांच्या आचारात नैतिक आजार कसा दिसून येतो?

३ हे जा नैतिकदृष्ट्या खूपच आजारी आहे यात काही प्रश्‍नच नाही. या जगाची धार्मिक, राजकीय व्यवस्था, त्याच्या व्यापारी संस्था, त्याची करमणूक अशी जी विविध “अंगे” आहेत त्यात भयानक आजार जडल्याचे आपण बघू शकतो. देव तसेच त्याने मानवजातीचे कल्याण व्हावे म्हणून ज्या आज्ञा दिल्या आहेत त्याबद्दल फारच थोड्या लोकांना आदर वाटतो. शिवाय इतिहास दाखवितो त्यानुसार नैतिक कीड ही शारीरिक आजार व त्रास उद्‌भवत असतो. ही आजारी असलेली नैतिक स्थिती बरे करण्याची बहुतेकांची इच्छा दिसत नाही, कारण ही स्थिती ज्यामुळे उद्‌भवते त्या गोष्टीबद्दल यांना प्रेम वाटत असते.

४ खरेच हे जग किती आजारी आहे! काहीतरी थरारक गोष्टी कराव्यात किंवा वास्तवतेला टाळले म्हणून पुष्कळजण दारू व मादक द्रव्याचा आहारी जाऊन त्यांनी आपल्या जीवनाचे नुकसान केले आहे. हिंसाचार तर सर्वत्र आहे, जीवन खूपच स्वस्थ बनले आहे आणि कैदखाने वाढत्या गुन्हेगारांनी महामूर भरली आहेत. पुष्कळ देशात अर्धे विवाह घटस्फोटात संपतात. ज्यांना पालकांची देखरेख मिळू शकली नाही अशी मुले बंडखोर बनतात. लैंगिक अनैतिकता ही वाढत असल्यामुळे एड्‌स तसेच लैंगिकरित्या संक्रमित होणारे आजार देखील जलदगतीने वाढत आहेत.

५. प्राचीन यहूदात अस्तित्वात असलेल्या स्थितीचे यशयाने कसे वर्णन केले आहे?

५ देवाने यशयाला भटकलेल्या यहूदाबद्दल जे भाकित करण्यासाठी प्रेरित केले होते तेच तो आजच्या आजारी जगाबद्दल म्हणू शकतो: “किती हे पापिष्ट राष्ट्र! दुष्कर्माने भारावलेले लोक, दुर्जनांची संतति! ही आचारभ्रष्ट मुले! यांनी यहोवाला सोडीले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूस तुच्छ मानले आहे; ती वियुक्‍त होऊन मागे फिरली आहेत. तुम्ही अधिकाधिक फितून मार का खात राहता? हरएक मस्तक व्यथित झाले आहे, हरएक हृदय म्लान झाले आहे. पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही.”—यशया १:४-६.

६. चांगले करण्यास शिका या यहोवाच्या अपीलाबद्दल प्राचीन यहूदा आणि आमच्या काळी कसा प्रतिसाद राहिलेला आहे?

६ यहोवाने पश्‍चाताप करण्याविषयी आणि “चांगले करण्यास शिकण्या”विषयी केलेल्या अपीलाकडे यहूदामध्ये कोणी लक्ष दिले नाही. (यशया १:१६-२०) याने यरुशलेमाचा नाश घडवून आणला आणि यहुद्यांना बाबेलात बंदिवासात नेले. त्या आजारी राष्ट्रात केवळ काहींनीच देवाचे आशीर्वाद व संरक्षण यांचा अनुभव घेतला. याचप्रमाणे आज नखशिखात आजारी असणाऱ्‍या या जगात काही थोडे चांगले करण्यास शिकण्याची आशा धरून आहेत. यहोवाचे हे विश्‍वासू सेवक आज विश्‍वास व आध्यात्मिक आरोग्य राखण्यासाठी खूप परिश्रम घेत आहेत व ते देवाने अभिवचन दिलेल्या नव्या जगात पूर्ण रुपाचे शारीरिक आरोग्य व चिरकालिक जीवन मिळवण्याची आशा बाळगून आहेत.—२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:१-४.

आजारी जगातील आध्यात्मिक धोके

७. (अ) आमचा विश्‍वास तसेच आध्यात्मिक आरोग्य यांजविषयी कोणते धोके संभावून आहेत? (ब) आमचे आध्यात्मिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्‍या तीन प्रमुख घटकांना सामना देण्याबद्दल शास्त्रवचने काय म्हणतात?

७ सध्याच्या जगाच्या नैतिक आजार सांसर्गिक असल्यामुळे विश्‍वास व आध्यात्मिक आरोग्य राखणे हे मोठे आव्हानात्मक आहे. ख्रिश्‍चनांना वारशाने लाभलेल्या अपूर्णतेचाही सामना करावा लागतो. (रोमकर ७:२१-२५) याखेरीज, “जगाचा अधिकारी” सैतान, याला देहाचा अशक्‍तपणा चांगला माहीत आहे व तो मोहपाश टाकण्यात मोठा चतुर आहे. (योहान १४:३०; १ योहान ५:१९) विश्‍वास व आध्यात्मिक आरोग्याला दुबळे बनविणारे हे तीन धोके—शरीर, जग व सैतान—खूपच भयानक आहेत. तथापि, जगात रहात असलो तरी, या “जगाचे नाहीत” असे होण्याची शक्यता आहे. आम्हाला ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालता येऊन देहवासना तृप्त करता येऊ शकणार नाहीत.’ तसेच ईश्‍वरी मदतीने आपल्याला “सैतानाच्या कुयुक्‍तीपुढे टिकाव” धरता येईल. (योहान १७:१५, १६; गलतीकर ५:१६; इफिसकर ६:११; २ करिंथकर २:११) पण प्रथम आपण हे पाहू की, विश्‍वास व आध्यात्मिक आरोग्याला तडा देणाऱ्‍या या तीन प्रमुख घटकांचा कसा सामना करता येईल.

८. आम्हामध्ये असणाऱ्‍या व आमचे आध्यात्मिक आरोग्य धोक्यात टाकणाऱ्‍या शक्‍तींचे येशूने कसे वर्णन केले?

८ आमच्या अपूर्ण मानवी स्वभावात अशा शक्‍ती आहेत ज्या पापास प्रवृत्त करून आम्हाला आध्यात्मिक आजारी करतात. (याकोब १:१४, १५) हे खासपणे लाक्षणिक अंतःकरणाबद्दव अगदीच खरे आहे. येशूने म्हटले: “आतून म्हणजे मनुष्याच्या अंतःकरणातून दुष्ट विचार निघतात. जारकर्मे, चोऱ्‍या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, दुष्टदृष्टी, शिव्यागाळी, गर्व, मूर्खपणा या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व मनुष्याला अपवित्र करतात.”—मार्क ७:२१-२३.

९. (अ) लाक्षणिक अंतःकरणात कोणत्या इच्छा मूळ धरून असतात? (ब) नीतीसूत्रे ४:२०-२३ नुसार आपल्याला अंतःकरणाचे कसे रक्षण करता येईल?

९ अंतःकरण हे वाईट विचारांचे उगमस्थान असले तरी ईश्‍वरी भक्‍ती आचारणाऱ्‍यांमध्ये तेच अंतःकरण यहोवाबद्दलचा पूज्यभाव व बरोबरच्या गोष्टींबद्दल प्रेम राखते. (मत्तय २२:३७; इफिसकर ४:२०-२४) आमच्या अंतःकरणात कशाची वस्ती असेल हे आपण त्यामध्ये ज्या गोष्टी भरवितो त्यावर अवलंबून राहते. देवाच्या वचनांचा असा सल्ला आहे: “माझ्या मुला, माझ्या वचनांकडे लक्ष लाव. माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नको. ती आपल्या अंतःकरणात ठेव. कारण ज्यास ती लाभतात, त्यांस ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.”—नीतीसूत्रे ४:२०-२३.

१०. आमची शारीरिक दुर्बळता आमच्या भावना व इच्छा यांजवर कशी परिणाम करू शकते?

१० आमचा शारीरिक अशक्‍तपणा आमच्या भावना व इच्छांवर परिणाम करतो. निराशा, अधीरपणा, आपल्या मानाला लागून घेणे या गोष्टी वेळोवेळी कोणाला पीडा देत नाहीत? त्यामुळे या शारीरिक प्रवृत्त्या लागलीच सुधारल्यास आमचे आध्यात्मिक आरोग्य टिकवता येते. पण आमच्या अंतःकरणात गर्व तसेच अभिमान या गोष्टी लगेच मूळ धरतात. लोभ तसेच अतिरेकी सुखविलास व रंगेलपणाची इच्छा प्रबळ होऊ शकते. तसेच लैंगिक इच्छा, जरी देवाने आमची निर्मिती तशी केल्यामुळे स्वाभाविक असली तरी, ती आम्हाला मोठ्या युक्‍तीने मार्गभ्रष्ट करू शकते. हे आध्यात्मिक आजार आम्हामध्ये वाढवले जाऊ नये म्हणून आम्ही दर दिवशी देवाच्या आत्म्याची फलप्राप्ती जोपासली पाहिजे, “वाईटाचा वीट मान”ण्यास व “बऱ्‍याला चिकटून राह”ण्यासाठी स्वतःला तालीम दिली पाहीजे.—रोमकर १२:९; गलतीकर ५:२२, २३.

आध्यात्मिक आजार जडविणारे बाहेरील उगम

११. (अ) कोणत्या जागतिक प्रवृत्त्या व हालचाली अत्यंत संसर्गजन्य आहेत? (ब) येशूच्या मते आपण आमच्या अंतःकरणाबद्दल कोणकोणत्या प्रकारात लक्ष दिले पाहिजे?

११ आध्यात्मिक संसर्ग हा बाहेरील उगमापासूनही लागू शकतो. जे आध्यात्मिकरित्या मृतवत्‌ झालेले आहेत अशांकडून तो आम्हाला जडू शकतो. (इफिसकर २:१-३) आम्ही यांच्याशी अधिक जवळीक राखल्यास त्यांच्या प्रवृत्त्या व राहणीमानाची छाप आम्हावर पाडू शकते. प्रापंचिक गोष्टीत पुढे जाणे, पैशांचा लोभ धरणे, भौतिकदृष्ट्या उत्तमोत्तम गोष्टींचा अनुभव घेणे आणि विलासात वेळ घालविणे या गोष्टी जगात राहणाऱ्‍या लोकांना आपल्या जीवनात मोठ्या वाटतात. पण अशा गोष्टींची इच्छा संसर्गित आहे, आणि विलासात वेळ घालविणे या गोष्टी जगात राहणाऱ्‍या लोकांना आपल्या जीवनात मोठ्या वाटतात. पण अशा गोष्टींची इच्छा संसर्गित आहे, आणि यांचा थोडा सुद्धा संपर्क धरला तर त्या आम्हाला आध्यात्मिकरित्या आळशी बनवू शकतात. येशूने इशारा दिला: “तुम्ही आपणास संभाळा, नाहीतर कदाचित गुंगी, दारूबाजी व संसासाच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे जड होऊन तो दिवस पाशाप्रमाणे अकस्मात तुम्हावर येईल. कारण तो अवघ्या पृथ्वीतलावर राहणाऱ्‍या सर्व लोकांवर तसाच येईल.”—लूक २१:३४, ३५.

१२. चुकीच्या कल्पना व शिक्षण आध्यात्मिक आरोग्यास कसे धोकादायक ठरू शकते?

१२ या जगाच्या चुकीच्या कल्पना व शिक्षण हे देखील संसर्ग करू शकते. पौलाने ताकीद दिली: “ते सुशिक्षण सहन करणार नाहीत, तर त्यांचे कान खाजत असता, ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची रास घालतील; आणि ते सत्य ऐकेतनाशे होतील, व कहाण्यांकडे वळतील अशी वेळ येईल.” (२ तीमथ्य ४:३, ४) खोटे शिक्षण हे पुळीसारखे पसरते. (२ तीमथ्य २:१६, १७) या पुळीचा संसर्ग शरीरात जेथे जडतो तेथील मांस सडते, करण त्या भागाला जीवनदायी रक्‍ताचा पुरवठा होत नसतो.

१३. आध्यात्मिक आजार पुळीसारखा जडला असला तर काय केले पाहिजे?

१३ हा पुळीचा आजार किती लवकर पसरतो! मृत्यु घडू नये यासाठी डॉक्टर तो शरीराचा भाग कापून काढतात. यास्तव, शंकाकुशंका, तक्रारी वृत्ती किंवा धर्मत्याग तुमच्या आध्यात्मिकतेला दूषित करीत आहेत तर त्यांना लागलीच छाटून टाका! (पडताळा मत्तय ५:२९, ३०.) मंडळीच्या वडीलांची मदत घ्या. ‘सुवचने मान्य न केल्यामुळे,’ “वादविवाद व शब्दयुद्ध यांमुळे वेडा बनला आहे,” असे पौलाने ज्यांचे वर्णन, केले आहे त्या लोकांसारखे बनू नका.—१ तीमथ्य ६:३, ४.

१४. मंडळीचे आध्यात्मिक आरोग्य टिकवता यावे यासाठी वडीलांना कदाचित काय करावे लागेल?

१४ मंडळीचे आध्यात्मिक आरोग्य टिकवता यावे यासाठी वडीलांनी ‘सुशिक्षणाने बोध करण्याची व उलट बोलणाऱ्‍यांस कुंठित करण्याची’ जरुरी आहे. (तीत १:९, १३, १६; २:१) अशा व्यक्‍तींना कदाचित आध्यात्मिक सुदृढ स्थितीत परत आणता येऊ शकते. (२ तीमथ्य २:२३-२६) पण तेच, यांनी पश्‍चाताप न करता खोट्या शिक्षणाची वाढ केली तर काय? तर मग, यांना बाहेर घालवून दिले पाहिजे. त्यांना बहिष्कृत केल्यावर आम्हाला त्यांच्यापासून वेगळे राहता येते त्यामुळे त्यांच्यापासून वेगळे राहता येते त्यामुळे त्यांची आध्यात्मिक लागण आम्हाला लागत नाही.—रोमकर १६:१७, १८; १ करिंथकर ५:९-१३; तीतास पत्र ३:९-११.

१५. देवाच्या लोकांचे आध्यात्मिक आरोग्य हाणून पाडण्यासाठी सैतान कोणत्या दोन पावित्र्यांचा उपयोग करीत आलेला आहे?

१५ विश्‍वास व आध्यात्मिक आरोग्यास असणारा तिसरा धोका, सैतान आहे. (इफिसकर ६:११, १२) आमच्या काळापर्यंत त्याने छळ, जमावाचा हल्ला, मारहाण, तुरुंगवास व ठार करण्याची दहशत याद्वारे यहोवाच्या लोकांचा विश्‍वास दुर्बळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. (प्रकटीकरण २:१०) या युक्‍त्‌यांमुळे सैतानाला कदाचित देवाच्या एका विशिष्ट सेवकाला कमी यश येत असले तर तो ज्याचा प्रत्यक्ष देव आहे त्या या जगाच्या आकर्षणांचा उपयोग करून त्याला पाडण्याचा प्रयत्न करतो.—२ करिंथकर ४:४; ११:३, १४.

१६. आमचा विश्‍वास व आध्यात्मिक आरोग्य यावर चढविण्यात आलेल्या सैतानाच्या हल्ल्यात आपणास टिकून राहण्यासाठी कोणकोणती मदत उपलब्ध आहे?

१६ सैतानाच्या हल्ल्यांमध्ये आम्हाला कसे टिकून राहता येईल? देवाकडील आध्यात्मिक रुपाची संपूर्ण शस्रसामग्री धारण करून. सैतान आमच्या दिशेने जे जळते बाण सोडतो ते विझवून टाकण्यासाठी आपण ‘विश्‍वासरुपी मोठी ढाल धरून उभे राहिले पाहिजे.’ यासोबत, आम्ही येशूच्या शब्दांच्या सहमतात ही प्रार्थना करावी की, “आम्हास परिक्षेत आणू नकोस, तर आम्हास त्या दुष्टापासून सोडीव.” (इफिसकर ६:११-१८; मत्तय ६:१३) आपण ही प्रार्थना करून त्यानुरुप हालचाल केल्यास आम्हाला सैतानाचे जळते बाण विझवण्यासाठी आमच्या स्वर्गीय पित्याकडून मदत मिळत असल्याचा अनुभव येईल.

विश्‍वासात सुदृढ राहणे

१७. आध्यात्मिक आरोग्य टिकविण्यासाठी “यथाकाळी” अन्‍न सेवन करणे तसेच ख्रिस्ती कार्यात नियमित रुपाने सहभागी होणे कसे महत्त्वाचे आहे?

१७ शारीरिक आरोग्य पथ्यावर चांगले राहते. पौष्टिक आहार, पुरेसा व्यायाम, आणि मन व शरीर यांची सर्वसाधारण काळजी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सुदृढ शरीरात रोगाची प्रतिकारक शक्‍ती अधीक असते. याचप्रमाणे आध्यात्मिक आरोग्याचेही आहे. त्याकरता देवाने नेमून दिलेले पथ्य अनुसरणे व “विश्‍वासू व बुद्धिमान दास”वार्गाद्वारे “यथाकाळी” पुरविण्यात येणाऱ्‍या अन्‍नाची कदर करणे समाविष्ट आहे. या जगातील आध्यात्मिक कचरपट्टी नाकारण्यासाठी आम्ही पवित्र शास्त्र व ख्रिस्ती प्रकाशनांचा अभ्यास करावा व देवाच्या लोकांसोबत नियमितपणे एकत्र यावे. (मतत्य २४:४५-४७; इब्रीयांस १०:२४, २५) याचप्रमाणे, “प्रभूच्या कामात सर्वदा अति तत्पर” राहण्याद्वारे मिळणारा व्यायाम देखील जरुरीचा आहे.—१ करिंथकर १५:५८.

१८. “सुवचनांचा नमुना” काय आहे, व तो आम्ही आपल्या मनात व अंतःकरणात का जतन केला पाहिजे?

१८ विश्‍वासात सुदृढ राहण्यासाठी देवाच्या आध्यात्मिक तरतुदींचा पूर्ण लाभ घ्या. पौलाने तीमथ्याला म्हटलेच होते: “ज्या सुवचनांचा नमुना तू मजपासून ऐकून घेतला तो, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेला तुझा विश्‍वास व प्रीती यांमध्ये दृढपणे राख. आपल्यामध्ये वस्ती करणाऱ्‍या पवित्र आत्म्याच्या योगे ती ठेव चांगली संभाळ.” (२ तीमथ्य १:१३, १४) कोणाही भाषेत शब्दांचा नमुना असतो. याप्रमाणे पवित्र शास्त्रीय सत्याच्या “शुद्ध वाणी”त देखील देवाच्या राज्याद्वारे यहोवाचे सार्वभौमत्व गाजविले जाणे या विषयावर आधारीत नमुना आहे. (सफन्या ३:९) आपल्याला हा सुवचनांचा नमुना आपल्या अंतःकरणी व मनात, आपला विश्‍वास व आध्यात्मिक आरोग्य टिकवण्यासाठी बाळगावयाचा आहे. ते न केल्यास त्याबद्दलची अपूर्वता आम्ही गमावू. हेच करिंथच्या मंडळीबाबत घडले होते. आध्यात्मिक सूक्ष्मदृष्टीची उणीव असल्यामुळे त्यांच्यापैकी काही “दुर्बळ व आजारी” होते.—१ करिंथकर ११:२९-३२.

१९. (अ) आध्यात्मिक आजार जडला असल्यास काय करावे? (ब) कोणी आध्यात्मिकरित्या आजारी असल्यास वडील काय करू शकतील?

१९ तुम्हाला आध्यात्मिक आजार जडला असल्यास काय करावे? यासाठी प्रेमळ मदतीची गरज आहे व ती उपलब्ध आहे, कारण याकोबाने म्हटले: “तुम्हापैकी कोणी दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे, आणि त्याने यहोवाच्या नामाने त्याला तेल लावावे व त्याजवर ओणवून प्रार्थना करावी.” (याकोब ५:१४) होय, वडीलांची भेट घ्या. ते आध्यात्मिक वैद्य या नात्याने तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक आजाराच्या मुळाशी जाण्यात मदत देतील. ते तुम्हाला देवाच्या वचनाचे बरे करणारे तेल सौम्यपणे व परिणामकारक रितीने लावतील. तुम्ही पापे केली आहेत, पण खरेपणाने पश्‍चातापी असाल तर यहोवा तुमची खरोखरी क्षमा करील ही खात्री राहू द्या. (स्तोत्रसंहिता १०३:८-१४) वडीलजन तुम्हाबरोबर मिळून तुम्हासाठी प्रार्थना करतात तेव्हा काय घडू शकते? याकोब म्हणतो: “विश्‍वासाची प्रार्थना दुखणाइतास वाचवील आणि यहोवा त्याला उठवील, आणि त्याने पापे केली असली तरी त्याला क्षमा होईल.”—याकोब ५:१५.

आध्यात्मिक आरोग्य चिरकालिक जीवनाकडे नेते

२०. आध्यात्मिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी पहिल्या शतकातील नियमन मंडळाने कोणता सल्ला दिला? (ब) नवीन जगाच्या आशीर्वादांची वाट पहात असता काय आम्हाला मदत देणारे ठरेल?

२० ख्रिस्तीजनांनी ज्या “अगत्याच्या गोष्टी” पाळावयाच्या आहेत त्याची माहिती, पहिल्या शतकातील यहोवाच्या लोकांच्या नियमन मंडळाने आपल्या पत्रात दिल्यावर शेवटी असे म्हटले: “तुमचे बरे होईल; कल्याण असो!” ख्रिश्‍चनांनी “मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्‍त, गुदमरून मेलेले प्राणी व जारकर्म” या गोष्टी वर्ज्य करावयाच्या होत्या. (प्रे. कृत्ये १५:२८, २९) चांगल्या आध्यात्मिक आरोग्यासंबंधाने केलेले ते निदान आजही लागू आहे. आम्ही नव्या जगाच्या आशीर्वादांची वाट पाहून असता, राज्याच्या सुवार्तेचा प्रसार आवेशाने करीत राहिलो व या आजारी जगात यहोवाचे नाम उंचावत राहिलो तर आम्हाला आपला विश्‍वास व आध्यात्मिक आरोग्य टिकवता येईल. या कार्यात मग्न राहिल्यामुळे आम्ही, जवळ आलेल्या नवीन जगाच्या आशीर्वादांसाठी अधीर होणार नाही. हे खेर की, “आशा लांबणीवर पडली असता अंथःकरण कष्टी होते, पण इष्टप्राप्ती जीवनाचा वृक्ष आहे.”—नीतीसूत्रे १३:१२.

२१. जे या आजारी जगात आपला विश्‍वास व आध्यात्मिक आरोग्य टिकवण्यात यशस्वी होतात अशांना कोणते आशीर्वाद राखून ठेवले आहेत?

२१ यहोवाने आपणावर प्रीती करणाऱ्‍यांसाठी जे भव्य आशीर्वाद राखून ठेवले आहेत ते चुकवू नका. जागतिक प्रभावांचा प्रतिकार करणे, शारीरिक अशक्‍तपणाविरुद्ध लढत देत राहणे आणि दियाबलाच्या सर्व जळत्या बाणांना विझवून टाकण्यात तयार राहणे हे व्यर्थ जाणार नाही. यहोवाच्या नवीन जगात तुम्ही आपल्या डोळ्यांनी हे बघाल की, “‘मी रोगी आहे,’ असे एकही रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४) हे सर्व, देवाने येशू ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञामार्फत जी तरतुद पुरविली आहे त्यामुळे खरे ठरणार आहे. येशूने “स्वत: आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले.” (मत्तय ८:१७; यशया ५३:४) तुम्हाला लाक्षणिक “जीवन पाण्याची नदी” यामधून पिता येईल व “राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी” ठरणाऱ्‍या “जीवनाच्या झाडांमधून” खाता येईल. (प्रकटीकरण २२:१, २) या आजारी जगात तुम्ही आपला विश्‍वास व आध्यात्मिक आरोग्य टिकवून ठेवल्यास पूर्णत्व व सौख्यानंदातील चिरकाल जीवन तुमचे होऊ शकेल.

तुम्हाला आठवते का?

◻ चांगल्या शारीरिक आरोग्यापेक्षा विश्‍वासात सुदृढ राहणे हे अधिक महत्त्वाचे का आहे?

◻ विश्‍वास व आध्यात्मिक आरोग्य यात क्षय आणणारे तीन प्रमुख धोके कोणते आहेत?

◻ चांगल्या आध्यात्मिक आरोग्याचा लाक्षणिक अंतःकरणासोबत कोणता संबंध आहे?

◻ कोणी आध्यात्मिक रितीने आजारी असल्यास त्याने काय करावे

[२४ पानांवरील चित्रं]

या आजारी जगात दृढ विश्‍वास व चांगले आध्यात्मिक आरोग्य टिकवता येणे शक्य आहे

[२६ पानांवरील चित्रं]

चांगले आध्यात्मिक आरोग्य आवेशी ख्रिस्ती कार्यात सहभागी होणे व योग्य वेळी आध्यात्मिक अन्‍न नियमितपणे घेत राहण्यावर अवलंबून आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा