नंदनवनाप्रत निरविणारा मार्ग उघडा करणे
“[येशू] त्याला म्हणालाः ‘आज मी तुला खचित सांगतो, तू माझ्याबरोबर नंदनवनात असशील.’”—लूक २३:४३, न्यू.व.
१, २. (अ) “नंदनवन” याचा काय अर्थ होतो, आणि एदेन बाग कशासारखा असावा? (ब) “बाग” यासाठी असणारा इब्री शब्द ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात कसा भाषांतरित करण्यात आला?
मानवी कुटुंबाला आपली सुरवात नंदनवनात मिळाली. मानवाच्या उत्पत्तीबद्दल आपण पवित्र शास्त्रवचनांच्या पहिल्याच पुस्तकात असे वाचतोः “यहोवा देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. यहोवा देवाने पूर्वेस एदेनात बाग लाविली आणि तीत आपण घडिलेल्या मनुष्याला ठेवले.” (उत्पत्ती २:७, ८) “एदेन” या नावाचा अर्थ “सुख” होतो आणि यामुळेच एदेन बाग सुखाचे उद्यान होते व त्यात विविध अशा सुंदर गोष्टी होत्या.
२ नंदनवन किंवा “परादीस”साठी असणारा ग्रीक भाषेतील शब्द उद्यानासमान असणारी बाग असा अर्थ सूचवितो. “बाग” असा अर्थ देणारे इब्री नाम गन याचे ग्रीकमध्ये भाषांतर करताना वापरण्यात आलेला शब्द आहे पॅ․राʹडेई․सोस. मत्तय ते प्रकटीकरण या शास्त्रवचनांचे लिखाण ग्रीक भाषेत करण्यात आले आणि हा ग्रीक शब्द, प्रभु येशू ख्रिस्ताने इ. स. ३३ मधील निसान १४ तारखेस कालवरी येथे वधस्तंभावर मरणदंड भोगत असताना जे उद्गार काढले ते लिखित करण्यासाठी वापरण्यात आला.
येशूने अपराध्याला दिलेले नंदनवनाचे अभिवचन
३. (अ) एका सहानुभूतिदर्शक अपराध्याने येशूला कोणती विचारणा केली? (ब) अपराध्याने केलेल्या विनंतीमुळे त्याचा येशूवर कशाप्रकारचा विश्वास होता हे दर्शविले?
३ त्यावेळी येशूच्या बाजूला दोन अपराध्यांना वधस्तंभावर टांगण्यात आले होते. यापैकी एकाने येशूची निंदा केली पण दुसऱ्याने ती केली नाही. या सहानुभूतिदर्शक अपराध्याने म्हटलेः “हे येशू, तू आपल्या राज्याधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर.” याकरवी त्याने हा विश्वास व्यक्त केला की, जरी येशू आता वधस्तंभावर होता तरी त्याला पुढे राज्य मिळणार होते. (लूक २३:४२; मार्क १५:३२) हे प्रभु येशूच्या अंतःकरणाला केवढे शिवून गेले असावे! त्या मित्रत्व दर्शविणाऱ्या अपराध्याला, येशू ख्रिस्त अजाण होता व तो जाहीरपणे अशी अपमान करणारी कठोर शिक्षा मिळण्याच्या पात्रतेचा नव्हता असा त्याचा विश्वास होता. (लूक २३:४१) येशूला मृतातून पुनरुत्थान मिळेल व तो आपल्या राज्यात येईल असा विश्वास दाखवून त्याने ते व्यक्त केले. आपले सुद्धा पुनरुत्थान होऊ शकेल आणि येशू आपल्याला हाक मारील व आपण मृतातून सजीव होऊन या पृथ्वीवर नवजीवन मिळवू शकू असाही विश्वास असल्याचे त्याने दर्शविले.
४. येशूने त्या अपराध्याच्या विनंतीला काय उत्तर दिले, व याकरवी काय सूचित केले?
४ येशूने त्याला म्हटलेः “आज मी तुला खचित सांगतो, तू माझ्याबरोबर नंदनवनात असशील.” याद्वारे त्याने त्या सहानुभूति दाखवणाऱ्या अपराध्याच्या पुनरुत्थानाकडे निर्देश केला. त्या अपराध्याने विश्वास प्रदर्शित केल्यामुळे येशूचे शब्द त्याला खरे सांत्वनदायक वाटले असावे. पण या माणसाचे पुनरुत्थान व्हावयाचे आहे तर त्या आधी येशूचे पुनरुत्थान झाले पाहिजे. मग, देवाने दिलेल्या पुनरुत्थान करण्याच्या अधिकाराने तो या अपराध्याला, मानवजातीच्या जगाचे पुनरुत्थान करण्याच्या दिवशी हाक मारुन उठवणार.—लूक २३:४३; योहान ५:२८, २९; १ करिंथकर १५:२०, २३; इब्रीयांस ९:१५.
५, ६. (अ) वधस्तंभी असलेल्या येशूच्या डोक्याच्या वरील भागी सुभेदार पंतय पिलात याने काय पाटी लावली? (ब) येशूने त्या अपराध्यासोबत कोणत्या भाषेत बोलणी केली असावी?
५ येशूने ते अभिवचन कोणत्या भाषेत दिले असावे? त्याकाळी अनेक भाषा प्रचलित होत्या. हे, पंतय पिलाताने, वधस्तंभावर असणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर जो फलक वाचणाऱ्यांसाठी लावला होता त्यावरून कळते. योहान १९:१९, २० मध्यील अहवाल म्हणतोः “पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लावली; तिच्यावर ‘यहूद्यांचा राजा नासोरी येशू’ असे लिहिले होते. येशूला वधस्तंभावर खिळले ते स्थळ नगराच्या जवळ होते. म्हणून पुष्कळ यहुद्यांनी ती पाटी वाचली. ती इब्री, रोमी व हेल्लेणी ह्या भाषांत लिहिली होती.”
६ बेथलहेमात कुमारी माता मरीया हिजपासून जन्म झाल्यापासून येशू हा यहुदी किंवा इब्री म्हणून समजला जात होता. या कारणास्तव त्याने आपल्या जन्मस्थानी साडेतीन वर्षे जो प्रचार केला तो तेव्हाच्या यहुदी वा इब्री भाषेत होता हे उघड आहे. यामुळेच, तो वधस्तंभावरील अपराध्यासोबत इब्री भाषेत बोलला हे साहजिक आहे. अशावेळी नंदनवनाचा उल्लेख करताना त्याने गन हा इब्री शब्द वापरला असावा जो आपल्याला उत्पत्ती २:८ मध्ये आढळतो. या मूळ गन याचे भाषांतर करताना ग्रीक सेप्ट्युजंट आवृत्ती पॅ․राʹडेई․सोस. हा शब्द वापरते.
७. येशूचे पुनरुत्थान झाल्यावर त्याला कसे गौरविण्यात आले?
७ येशूला वधस्तंभी खिळल्याच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजे इब्री पंचांगाच्या निसान १६ रोजी त्याचे पुनरुत्थान झाले. चाळीस दिवसानंतर त्याचे त्याच्या मूळ घरी, पण आता उच्च पदावर असण्यासाठी स्वर्गारोहण झाले. (प्रे. कृत्ये ५:३०, ३१; फिलिप्पैकर २:९) आता त्याला अमरत्वाने भूषविण्यात आले होते; ही त्याच्या पित्याठायी असणाऱ्या गुणामध्ये सहभागी होती. येशूचे पुनरुत्थान त्या रविवारी, निसान १६ रोजी होण्याआधी यहोवा देव एकटाच अमरत्व राखून होता.—रोमकर ६:९; १ तीमथ्य ६:१५, १६.
खंडणी मार्ग उघडा करते
८. यहोवाचा पृथ्वीविषयी काय मूळ उद्देश होता, व त्या उद्देशाला अजूनही तो धरून आहे हे कशामुळे दिसते?
८ सबंध पृथ्वीत नंदनवनरूपी सौंदर्य व्यापून टाकावे व त्यात गोलार्धव्याप्त सुंदरता राहावी या देवाने राखलेल्या हेतूमधील ही सर्व पावले होती. (उत्पत्ती १:२८; यशया ५५:१०, ११) १ करिंथकर १५:४५ मध्ये प्रेषित पौल येशूला “शेवटला आदाम” असे संबोधितो. याकरवी हे सूचित होते की, देवाने पृथ्वीविषयी राखलेला आपला मूळ उद्देश कायम ठेवला होता व पहिल्या आदामाने पूर्ण करण्यात कुचराई दाखविलेला हा उद्देश कोणीतरी पूर्ण करून दाखवील.
९. नंदनवनातील मार्ग उघडा करण्यासाठी येशूने काय दिले?
९ प्रेषित पौल म्हणतो त्याप्रमाणे येशूने “जुळणारी खंडणी” दिली. (१ तीमथ्य २:६) येशू ख्रिस्ताने देखील स्वतःविषयी म्हटले होतेः “याप्रकारे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नव्हे, तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीस्तव आपला जीव द्यावयास आला.” यामुळे, जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात अशांना सार्वकालिक जीवन मिळणे शक्य करण्यात आले आहे.—मत्तय २०:२८; योहान ३:१६.
१०. (अ) देवाने कृपाप्राप्त मानवाच्या थोड्या संख्येच्या बाबतीत काय उद्देश राखला? (ब) “लहान कळप” याची निवड केव्हापासून सुरु झाली, आणि कोणाकरवी?
१० मृतातून पुनरुत्थानानंतर स्वर्गात गेल्यावर येशूने देवाला आपल्या खंडणी यज्ञार्पणाचे मोल मानवजातीखातर वाहिले. तथापि, स्वर्गीय पिता यहोवा देवाचा हा उद्देश होता की, पृथ्वीतील राष्ट्रांमधून “आपल्या नावासाठी लोक” काढून घ्यावे. (प्रे. कृत्ये १५:१४) प्रकटीकरण ७:४ व १४:१-४ नुसार यांची संख्या केवळ १,४४,००० आहे. हा देवाच्या स्वर्गीय राज्यासाठी पाचारण झालेल्यांचा “लहान कळप” आहे. (लूक १२:३२) यहोवा देवाची खास संमती असलेल्या या लोकांची निवड येशू ख्रिस्ताच्या १२ प्रेषितांच्या निवडीपासून सुरु झाली. (मत्तय १०:२-४; प्रे. कृत्ये १:२३-२६) येशूने आपल्या मंडळीचे पाये असणाऱ्या सदस्यांना म्हटलेः “तुम्ही मला निवडले नाही; तर मी तुम्हाला निवडले आहे.” (योहान १५:१६) हे देवाच्या राज्य वर्चस्वाखाली जे गोलार्धव्याप्त नंदनवन प्रस्थापित होणार त्याची घोषणा करण्यात अग्रभागी असणार.
राज्य येण्याचा काळ
११. मशीही राज्याची केव्हा प्रस्थापना होणार होती?
११ आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने यहोवाला त्याचे राज्य यावे अशी प्रार्थना करीत आहोत. (मत्तय ६:९, १०; योहान १४:१३, १४) हे मशीही राज्य “विदेश्यांच्या काळा”च्या समाप्तीस स्थापिले जाणार होते. (लूक २१:२४) या विदेश्यांच्या काळाची समाप्ती १९१४ या वर्षी घडली.a
१२. येशूने त्याची अदृश्य उपस्थिती चिन्हांकित होईल अशा ज्या अद्भूत गोष्टी घडण्याच्या भविष्यवादाचे कथन केले त्याच्या एकमतात १९१४ मध्ये काय घडले?
१२ ते वर्ष मानवी इतिहासातील पहिल्या जागतिक युद्धाने चिन्हांकित झाले. हे येशूने, पृथ्वीसंबंधीच्या त्याच्या राज्य-सामर्थ्याच्या अनुषंगाने त्याची जी अदृश्य उपस्थिती चिन्हांकित होणार होती त्याविषयीच्या ज्या अद्भूत गोष्टींचा भविष्यवाद दिला त्याच्या एकमतात होते. त्याच्या शिष्यांनी त्याला असा प्रश्न विचारला होताः “ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या उपस्थितीचे तसेच व्यवस्थीकरणाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हास सांगा.” येशूने याचे उत्तर देताना म्हटलेः “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल, आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील; पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत. सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:३, ७, ८, १४; मार्क १३:१०.
१३. (अ) देवाच्या राज्याचा प्रचार कोणत्या बाबतीत सुवार्ता आहे? (ब) देवाचे राज्य यावे अशी प्रार्थना किती काळापासून करण्यात येत आहे, आणि त्याच्या पृथ्वीवरील साक्षीदारांना ही प्रार्थना म्हणण्यात कधी कंटाळा वाटला का?
१३ यहोवाच्या राज्याची ही सुवार्ता आज २०० पेक्षा अधिक देशात गाजविली जात आहे आणि ती आणखीन अधिक क्षेत्रावर गाजविली जावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. ही येणाऱ्या कोणा जागतिक सरकारची वार्ता नव्हे तर जे राज्य आधीच सत्ता गाजवीत आहे, राज्य करीत आहे त्याची आहे. या राज्याची प्रस्थापना १९१४ मध्ये झाली. याने, साधारण १,९०० वर्षांआधी येशूने जी प्रार्थना शिकविली त्याच्या उत्तरासाठी सर्व गोष्टी आखून ठेवल्या आहेत. ही प्रार्थना, त्या सरकारचा होणारा राजा याने आपल्या शिष्यांना ती शिकवली तेव्हापासून राज्याचा प्रस्थापक, यहोवा देवाला सादर करण्यात येत आहे. याचा अर्थ हा की, राज्याच्या मालकाने ही प्रार्थना बऱ्याच काळापासून ऐकली आहे. या पृथ्वीवरील आपल्या सर्व साक्षीदारांनी इतक्या दीर्घ काळापासून ही जी प्रार्थना त्याला म्हटली तिचे श्रवण करण्यात त्याला आनंद वाटला, कारण त्यामुळे येणाऱ्या राज्यावर त्यांचा केवढा अटळ विश्वास होता ते दिसले. आपल्या “स्वर्गातील पित्या”ला ही प्रार्थना म्हणण्यात त्यांनी कंटाळा आणला नाही; ती त्यांच्या जुनी वा टाकाऊ वाटली नाही.—मत्तय ६:९, १०.
१४. देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात यहोवाचे साक्षीदार इतके परिश्रम का घेत आहेत?
१४ ते राज्य १९१४ मध्ये स्वर्गात स्थापन झाले आहे असा यहोवाच्या साक्षीदारांचा विश्वास आहे व तसे त्यांनी जाहीर देखील केले आहे तरी ते या राज्याची ही सुवार्ता प्रसारीत करण्यात परिश्रम घेत आहेत. याचे कारण हे की, त्या प्रस्थापित राज्याने अजून पृथ्वीचा ताबा पूर्णपणे आपणाकडे घेतलेला नाही तर या जगातील राज्यांना मानवजातीचे सर्व वंश व लोक यावर आपली सत्ता व अधिकार गाजविण्याची अनुज्ञा दिली आहे. (रोमकर १३:१) पण ते पूर्ण अर्थाने आलेच पाहिजे की सबंध पृथ्वीवर पूर्णपणे नियंत्रण राखणारे सरकार असे दिसून येईल.—दानीएल २:४४.
१५. इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्टपासून असे काय घडते आहे जे इस्राएली राजांचा जो अभिषेक होई त्यापेक्षा भव्य प्रमाणात आहे?
१५ त्या राज्याचा राजा या नात्याने नियुक्ती असली तरी येशू एकटाच राज्याधिकार करीत नाही. यहोवा देवाने आपल्या बादशाही पुत्राच्या १,४४,००० अनुयायांना त्याच्या मशीही देवराज्यात त्याचे सहवारीस म्हणून नियुक्ती दिली आहे. (दानीएल ७:२७) पूर्वीच्या काळी प्रमुख याजक इस्राएलाच्या राजाचा तेलाने पवित्र अभिषेक करी, तसेच इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्टपासून यहोवा देवाने येशू ख्रिस्ताच्या या १,४४,००० सहवारीसांचा त्याच्या पवित्र आत्म्याने अभिषेक केला आहे आणि “राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू” याजसोबत स्वर्गात आत्मिक जीवन मिळवावे यासाठी त्यांना नव्याने जन्म दिला.—प्रकटीकरण १९:१६; पडताळा १ राजे १:३९.
“शेवटला आदाम” याकरवी नंदनवनाची होणारी पुनर्स्थापना
१६. येशूला वधस्तंभी दिले तेव्हा राज्याविषयी केवढी संभाव्यता वाटत होती, पण तो राज्याविषयी निरर्थक घोषणा करणारा असा का ठरला नाही?
१६ इ. स. ३३ मध्ये येशूला वधस्तंभी खिळण्यात आले तेव्हा त्याला राज्य मिळू शकेल की काय अशी साशंकता नक्कीच भासली होती. पण आपल्या प्रचारात त्याने देवाच्या राज्याविषयी जी घोषणा केली होती ती निरर्थक नव्हती. त्याला वधस्तंभी खिळल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्या राज्याच्या संस्थापकाने हे दाखवून दिले की, येशूचे शिष्य अशक्य कोटीतील सरकारविषयी पुढे प्रार्थना करीत राहणार नव्हते. यासाठीच, प्रार्थना केल्या गेलेल्या त्या राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्याला यहोवाने पुनरुत्थित केले आणि त्याला अमरत्व प्रदान केले.
१७, १८. (अ) येशूला “शेवटला आदाम” असे म्हणण्यात काय अर्थसूचकता दिसते? (ब) १९१४ पासून घडत असलेल्या जागतिक घटना काय सांगतात?
१७ पृथ्वीवरील पहिल्या नंदनवनाचा निर्माता त्या नंदनवनाचे नूतनीकरण करण्याचे तसेच ती गोलार्धव्याप्त बाग वसाहतीने भरलेली आहे हे पाहण्याचे काम आपणास सोपून देईल हे येशूला माहीत होते. १ ले करिंथकर १५:४५, ४७ मध्ये आम्ही वाचतोः “त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की, ‘पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला.’ शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे.” दुसरा आदाम हा स्वर्गातून खाली आला व तोच असा आहे ज्याच्याकरवी यहोवा पृथ्वीवरील नंदनवनाची पुनर्स्थापना करणार. याच आधारावर प्रभू येशू त्या सहानुभूतिदर्शक अपराध्याला हे म्हणू शकलाः “तू मजबरोबर नंदनवनात असशील.” (लूक २३:४३) या संभाषणावरुन परत हे स्पष्ट होते की, “शेवटला आदाम,” वैभवी येशू ख्रिस्ताच्या हाती असणाऱ्या स्वर्गाच्या राज्यामार्फत या पृथ्वीवर नंदनवनाची प्रस्थापना होणार.
१८ १९१४ पासून घडणाऱ्या जागतिक घटना येशू ख्रिस्ताने वदलेल्या भविष्यवादाशी सुसंगत असल्याचे दाखवितात व याकरवी येशू हा तेव्हापासून राज्यसत्तेत आल्याचे सिद्ध होते. येशूने मत्तय २४ मध्ये सांगितलेल्या भविष्यवादाच्या घटना या २० व्या शतकात १९१४ पासून जगणाऱ्या लोकांनी आता सात दशकांपेक्षाही अधिक काळ अनुभवलेल्या आहेत. यास्तव, आता हा काळ संपत आहे व पृथ्वीवरील नंदनवनाची प्रस्थापना जवळ आली आहे.—मत्तय २४:३२-३५; पडताळा स्तोत्रसंहिता ९०:१०.
उत्तेजक असे नव्या जगाचे पर्व अगदी जवळ आहे
१९, २०. (अ) हर्मगिदोनानंतर यहोवा त्याच्या प्रेमीजनांना कोठे निरवील? (ब) हर्मगिदोनानंतर लगेच काय करण्याची गरज राहील?
१९ यहोवा देवाने हर्मगिद्दोनच्या युद्धक्षेत्रावर आपले विश्वव्यापी सार्वभौमत्व निर्विवादपणे गौरविल्यावर तो त्याच्या प्रेमीजनांसाठी ज्या व्यवस्थीकरणाची सुरवात करून देणार ते कंटाळवाणे, निस्तेज नसणार. मानवी कुटुंबासाठी देवाचा पुत्र येशू याच्या मशीही राजाच्या वर्चस्वाखालील हितकारक सत्ता अत्यंत उत्तेजक असे पर्व सुरु करील. खरेच, केवढ्या लाभदायक प्रकारातील गोष्टी तेथे उरकण्यात येतील! यहोवाचे स्वर्गीय सैन्य आणि दुष्ट शक्ती यांजमधील चकमकीचे जे डाग असतील ते सर्व काढून, पुसून टाकले जातील. त्यांचा मागमूसही दिसणार नाही.
२० पण राष्ट्रांची जी युद्ध-हत्यारे मागे राहतील त्यांचे काय? जो दीर्घ मुदतीचा काळ सूचित करण्यात आला आहे त्याची अर्थसूचकता लक्षात घेता ते सर्व जाळून टाकण्यास बराच कालावधी लागणार कारण ती शस्त्रे बरीच असणार. (यहेज्केल ३९:८-१०) राष्ट्रांच्या बाकी राहिलेल्या युद्धाच्या साधनांपासून हर्मगिदोनातून बचावलेले लोक काही उपयुक्त वस्तु तयार करतील.—यशया २:२-४.
२१. हर्मगिदोनातून वाचलेल्यांना, जलप्रलयातून वाचलेल्या लोकांसारखाच कसा अनुभव येईल, पण यात कोणता ठळक फरक असेल?
२१ प्राचीन काळी नोहा व त्याच्या कुटुंबाला जलप्रलयातून बाहेर आल्यावर ज्या नव्या स्थितीला सामोरे जावे लागले तसेच त्यांचा प्रतिनमुना असलेल्या आशीर्वादित जनांना गोलार्धव्याप्त अशा लाक्षणिक प्रलयातून वाचल्यावर एक नवी स्थिती पहावयास मिळेल. तेव्हा दियाबल सैतान व त्याचे दुरात्मे हे पृथ्वीच्या आसमंतातील अदृश्य वातावरणात धुमाकूळ घालणार नाहीत, कारण यांना दहा शतकांसाठी अक्रियाक केले जाणार. (प्रकटीकरण २०:१-३) हर्मगिदोनातून बचावलेल्या लोकांसमोर “सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसा”मधून बचावून राहिलेल्या या पृथ्वीची मशागत करण्याचे मोठे काम असेल व ते करताना त्यांच्यापुढे या गोलार्धवर जे परिणाम मागे राहिलेले असतील त्यांच्या आव्हानांना तोंड द्यावे लागले.—प्रकटीकरण १६:१४.
२२. पृथ्वीभर नंदनवन पसरविण्याच्या आव्हानाला हर्मगिदोनातून वाचलेले लोक कसा प्रतिसाद देतील?
२२ हर्मगिदोनच्या युद्धातून वाचलेल्या आणि संख्यने अल्प असणाऱ्या लोकांपुढे सबंध पृथ्वीला नंदनवनात परीवर्तित करण्याचे भव्य काम उभे राहील तेव्हा ते गर्भगळीत होणार की काय असे वाटायला लागेल. तथापि, त्यांच्याठायीच्या पूर्ण आवेशाकरवी ते आज्ञाधारकपणे धडाडीने कामास लागतील. ही पृथ्वी देवाचे लाक्षणिक पदासन आहे हे त्यांना ठाऊक आहे त्यामुळे हा भौगोलिक परिसर सुशोभित व आनंदमय करावा व देवाचे पाय येथे विसावले जावेत अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असणार.
२३. नंदनवनाची पुनर्स्थापना करण्याच्या कामास नक्कीच यश मिळणार याची हर्मगिदोनातून वाचलेल्या लोकांना खात्री राहू शकेल असा कोणता पाठिंबा त्यांना मिळणार?
२३ पृथ्वीविषयी बाळगण्यात आलेल्या ईश्वरी हेतूच्या पूर्णतेच्या कामाची आनंदी सुरुवात केल्यावर हे लोक एकटेच राहणार नाहीत ही मोठी आनंदाची व प्रोत्साहनदायक गोष्ट आहे. (पडताळा यशया ६५:१७, २१-२४.) ज्याने पुनर्स्थापित नंदनवनाचे अभिवचन दिले त्याचा पूर्ण व अमर्याद पाठिंबा यांना असणार. कारण आपले स्वर्गारोहण होण्याच्या दिवशी तो म्हणाला होताः “स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.” (मत्तय २८:१८) तो अधिकार अद्याप त्याच्या हाती आहे आणि त्याला, त्याने त्या सहानुभूतिकारक अपराध्याला जे अप्रतिम अभिवचन दिले होते ते पूर्ण करता येणे शक्य आहे. कसे ते आपण पुढील लेखात पाहणार आहोत.
[तळटीपा]
a सविस्तर माहितीसाठी, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रसिद्ध केलेल्या “तुझे राज्य येवो,” या पुस्तकातील पृष्ठे १३५-९ पहा. तसेच यहेज्केल २१:२७ पहा.
उजळणीचे प्रश्न
◻ येशूने कालवरी येथे दिलेले अभिवचन मानवजातीला आणि एका अपराध्याला कशाची खात्री देते?
◻ नंदनवनातील परतीचा मार्ग उघडा करण्याचा मूलभूत आधार कोणता?
◻ पहिला मानव आदाम काय करण्यात अपयशी ठरला, पण “शेवटला आदाम” काय करुन दाखवील?
◻ हर्मगिदोनानंतर यहोवा त्याच्या प्रेमीजनांना कोणत्या प्रकारच्या व्यवस्थीकरणाप्रत निरवील?
[१३ पानांवरील चित्रं]
“१९१४ मध्ये सर्व राज्यांचा अंत” हा लेख “द वर्ल्ड मॅगझीन” यामध्ये ऑगस्ट ३०, १९१४ रोजी प्रसिद्ध झाला