वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 ४/१ पृ. ८
  • एक वेगळाच शिष्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एक वेगळाच शिष्य
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • एक असंभवनीय शिष्य
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • दुरात्मे वास्तविक आहेत का?
    सावध राहा!—१९९८
  • देवदूत आणि दुरात्मे यांच्याबद्दलचं सत्य
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 ४/१ पृ. ८

येशूचे जीवन व उपाध्यपण

एक वेगळाच शिष्य

येशू किनाऱ्‍यावर उतरतो तेव्हा किती भयानक दृश्‍य दिसते! दोन अक्राळविक्राळ माणसे कबरेतून बाहेर निघून ते त्याच्याकडे पळत येतात. त्यांना दुरात्मा लागलेला आहे. या दोघांपैकी एकजण बराच हिंसकपणे वागत आहे व तो या दुरात्मिक प्रभावाखाली बराच काळ राहिलेला असल्यामुळे त्याच्याकडे सर्वांचे अधिक लक्ष जाते.

हा माणूस बऱ्‍याच काळापासून कबरांमध्ये नग्न राहात असे. तो रात्रंदिवस ओरडत असतो व खडकांना धडका देत राहतो. तो इतका हिंसक आहे की कोणालाही त्या रस्त्याने जाण्याचे धाडस होत नाही. त्याला साखळदंडांनी बांधून जखडण्याचे प्रयत्नही करण्यात आले; पण तो ते जणू कापडाप्रमाणे फाडून आपल्या पायावर ते तोडून टाकत असे. त्याला काबूत ठेवायला कोणीही समर्थ नव्हता.

हा माणूस येऊन येशूच्या पायावर पडतो तेव्हा त्याजवर प्रभुत्व करणारा दुरात्मा गरजतोः “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालून सांगतो, मला छळू नकोस.”

“अरे अशुद्ध आत्म्या, ह्‍या माणसातून नीघ.” असे येशू त्याला म्हणत राहतो. मग येशू म्हणतोः “तुझे नाव काय?”

“माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत,” असे उत्तर मिळते. दुरात्मे ज्यावर आपला जम बसवू शकतात, त्यांना होणाऱ्‍या त्रासाची त्यांना मजा वाटते व मग ते त्या माणसावर एकत्रपणे तुटून पडतात. पण आता येशू सामोरा आला आहे तेव्हा ते त्याला विनंति करतात की त्याने त्यांना अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नये. येथे आपल्याला येशूठायी खोडकर दुरात्म्यांना देखील जिंकण्याची केवढी मोठी शक्‍ती आहे ते कळते. शिवाय हे देखील कळते की, या दुरात्म्यांना, ते सर्व आपला सरदार दियाबल सैतान याच्या बरोबर शेवटी अगाधकूपात जावे लागणार हा देवाचा अंतिम न्याय त्यांच्यावर येणार आहे हे ठाऊक आहे.

जवळच्या डोंगरावर साधारण २,००० डुकरांचा कळप चरत आहे. या कारणास्तव दुरात्मे येशूला म्हणतातः “आम्ही त्या डुकरात शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे.” यावरून असे दिसते की, दुरात्म्यांना मांसल देह असणाऱ्‍या प्राण्यात शिरकाव करण्याद्वारे अस्वाभाविक आणि हेकट आनंद मिळत असतो. येशू त्यांना डुकरात शिरण्याची परवानगी देतो तेव्हा ती सर्व डुकरे डोंगराच्या कड्यावरुन धडकत जातात आणि शेवटी समुद्रात पडून गुदमरून मरतात.

डुकरांचा कळप चारणारे हे बघतात तेव्हा ते घाबरुन गावात येतात व घडलेली गोष्ट लोकांना सांगतात. तेव्हा लोक येऊन काय झाले ते पहातात. आल्यावर ते काय बघतात की, तो भूतग्रस्त माणूस आता बरा झाला आहे, त्याने कपडे घातले आहेत व तो येशूच्या चरणाजवळ बसला आहे!

हा माणूस कसा बरा झाला ते बघणारे लोक या लोकांना कळवतात. तसेच डुकरांवर जे तऱ्‍हेवाईक रितीने मरण ओढवले तेही ते त्यांना सांगतात. हे सर्व ऐकून लोकांना मोठी भीती वाटते, त्यामुळे ते येशूला लगेच त्यांच्या गावातून निघून जावे अशी कळकळीची विनंती करतात. यामुळे तो होडीत बसून निघतो. तो पूर्वीचा भूतग्रस्त माणूस येशूला त्याच्याबरोबर नेण्याची विनंती करतो. पण येशू त्याला म्हणतोः “तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा; आणि यहोवाने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग.”

येशू ज्यांना बरे करतो त्यांना तो हे निक्षून सांगत असतो की त्यांनी बरे झाल्याची बातमी इतरांना कळवू नये. कारण खळबळजनक वृत्ताआधारे लोकांनी आपला निर्णय घेऊ नये असे त्याला वाटत असते. पण आताची गोष्ट वेगळी आहे, कारण येशूला आता बहुधा तेथील लोकांत जाऊन काम करता येणार नव्हते, पण हा पूर्वीचा भूतग्रस्त या लोकांना साक्ष देऊ शकणार होता. याखेरीज या माणसाच्या उपस्थितीमुळे येशू केवढे चांगले कार्य करू शकतो ते, आणि डुकरांची जी हानि झाली त्याविषयी जे विपरीत विचार लोकात बोलले जाणार होते त्याचे निरसन होणार होते.

येशूचे म्हणणे ऐकून तो पूर्वीचा भूतग्रस्त जातो, व सबंध दकापलिसमध्ये येशूने त्याला कसे बरे केले याविषयीची घोषणा करतो. लोकांना ते ऐकून मोठे आश्‍चर्य वाटते. मत्तय ८:२८-३४; मार्क ५:१-२०; लूक ८:२६-३९; प्रकटीकरण २०:१-३.

◆ दोन भूतग्रस्त असताना केवळ एकावरच का लक्ष केंद्रित करण्यात आले आहे?

◆ भावी काळात अगाधकूपात जायचे आहे याची माहिती दुरात्म्यांना आहे हे कशावरुन दिसते?

◆ दुरात्म्यांना माणसे व जनावरे यांच्यावर जम बसविणे का आवडते?

◆ पूर्वीच्या भूतग्रस्ताच्या बाबतीत अपवाद धरुन येशू त्याला, त्याने त्याच्यासाठी जे केले ते का सांगायला सांगतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा