एवढी गुन्हेगारी का?
“बहुतेक गुन्हेगारी मालमत्तेविरुद्ध घडते,” असे ब्रिटीश सरकारची एक पत्रिका प्रतिपादन करते. तरीसुद्धा, त्या देशात लोकांविरुद्धची गुन्हेगारी, जी तसे पाहता केवळ ५ टक्के आहे, तीव्रतेने वाढत आहे असा अहवाल आहे.
ही परिस्थिती जगभरातील वाढती गुन्हेगारी प्रतिबिंबित करते. चाचेगिरी, दरोडे, बलात्कार व इतर जबर गुन्हे नियमितपणे बातम्यांत आढळतात व यामुळे इतर गुन्ह्यांच्या अहवालांपेक्षा याकडे जास्त लक्ष आकर्षित होते. कदाचित, तुम्ही तसेच तुमची मालमत्ता या गुन्ह्यांचे लक्ष्य असू शकेल. पण असे का असावे? लोकांना गुन्हेगार बनण्यास काय प्रवृत्त करते?
बरेच गुन्हेगार संधिसाधु असतात. परिणामस्वरुप, या वाढत्या गुन्हेगारीवर प्रतिउपाय करण्यासाठी अधिकारी, लोकांना त्यांच्या शेजारी जे चालले आहे त्याविषयी सतर्क राहण्यास उत्तेजन देतात. याप्रकारचे डावपेच गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जरी उपयोगात आणले जातात तरीही ते लोकांना गुन्हेगार बनण्यापासून अडवू शकतात का? नाही.
गुन्हेगारीचे व्यक्तीमत्व, आज अधिक अभ्यासाचा विषय बनला आहे. पवित्र शास्त्र देखील गुन्हेगार माणसाचे विचार काय असतात त्याविषयीचा दृष्टीकोन आम्हाला देते. ते त्या तरुणांविषयीचा इशारा देताना आम्हाला ते स्पष्ट करते. हे तरुण फसविण्याच्या निमित्ताने असे म्हणतातः “चला रक्तपात करण्यास आपण कोणाला तरी शोधू! निर्दोष व्यक्तीवर मजेखातर हल्ला करू! जेव्हा आम्हाला ते सापडतील तेव्हा ते स्वस्थ व जिवंत असतील. परंतु जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत व्यवहार करू ते मृत होतील! आपणास सर्व प्रकारचे मौल्यवान पदार्थ मिळतील व आपण आपली घरे लुटीने भरू! ये आणि आमचा भागीदार हो, व आपण जे लुटू त्याचे आपण हिस्से करू.” (नीती १:११-१४) होय, हाव, लोभ व भौतिक दृष्टीकोण हे गुण गुन्हे घडवून आणतात.
मादक द्रव्याचा दुरुपयोग व सुखापेक्षक कर्मवाद या गोष्टी आज २० व्या शतकात बऱ्याच लोकांवर आपला प्रभाव पाडीत आहेत. हे अतिप्रमाणात करण्यासाठी पैसा लागतो व तो मिळविण्यासाठी दुसऱ्यांना इजा केली जाते व वेळप्रसंगी जीवही घेतला जातो. या “कठीण दिवसा”त वाढत्या प्रमाणात लोकांचे ‘पाय दुष्कर्म करण्यास धावतात व रक्तपात करण्यास त्वरा करीत आहेत.’—२ तीमथ्य ३:१, ३, ४; नीतीसूत्रे १:१६.
वेबस्टरचा नववा न्यू कॉलेजिएट शब्दकोष सांगतो की, गुन्हा हा विशेषेकरुन “नैतिकतेविरुद्ध एक गंभीर अपराध” आहे. नैतिकता उतरणीस लागलेल्या या युगात आपण जीवन जगत आहोत. प्रेषित पौलाने इफिसमधील ख्रिश्चनांना अशा लोकांविरुद्ध इशारा दिला होता. तो म्हणाला की, हे लोक ‘भ्रष्ट मनाने चालत आहेत; यांची बुद्धी अंधःकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते ईश्वरी जीवनाला पारखे झाले आहेत. ते सर्व तऱ्हेच्या नैतिक जबाबदारीपासून कोडगे झाले आहेत.’ या कारणास्तव आम्ही देखील स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे.—इफिसकर ४:१७-१९.
विकृत व्हिडीओ टेप्स, युद्धास गौरविणे, तसेच अनैतिक मनोरंजनाच्या मागे लागणे या गोष्टी लोकांना गुन्हेगार बनण्यास व निरपराधी लोकांना त्यांच्या गुन्ह्याचे लक्ष्य बनण्यास हातभार लावीत नाही का? परंतु या गुन्हेगारी कारस्थानाच्या जाळ्यात अजून एक घटक गोवलेला आहे. तो काय आहे?
तो दियाबल सैतान आहे. त्याचा क्रोध सध्याच्या जगात असणारा भयंकर उपद्रव व गुन्ह्यतून दृष्य होत आहे. (१ योहान ५:१९; प्रकटीकरण १२:१२) त्याचे ध्येय सर्व लोकांना देवापासून वळविणे हे आहे. जरी तो बऱ्याच लोकांविषयी यात यशस्वी होईल, तरी पवित्र शास्त्र हे भविष्यवादितपणे उघड करते की, देवाच्या खऱ्या सेवकांची सचोटी दुभंगविण्यात त्याला अपयश येईल. सरतेशेवटी सैतानाला काढून टाकण्यात येईल. तथापि, सैतान जरी मार्गात नसला तरी गुन्हेगारीची समाप्ती होणे शक्य आहे का? तर मग, गुन्हेगारीचा अंत समीप आहे का?