मानवाने आज्ञाभंग केला तरीही नंदनवनाची संभाव्यता रास्त आहे
१. आता वेळ निघून गेला असताना पहिला पुरुष व त्याची स्त्री कोठे दिसताहेत आणि त्यांचा परिसरही कसा दिसतो?
वेळ निघून गेला आहे. आता पहिला मानव व त्याची स्त्री विवस्त्र नाहीत. त्यांनी आपणावर जनावरांच्या कातड्यांचे लांब झगे घातले आहेत. ते त्या परिपूर्ण एदेन बागेच्या बाहेर प्रवेशद्वारापाशीच थांबले आहेत. ते बागेला पाठमोरे आहेत. त्यांना आपणासमोर असणारे दृश्य दिसते. समोर लागवड झालेली नाही अशी जमीन आहे. तिजवर यहोवाचा आशीर्वाद नाही हे स्पष्ट आहे. त्यांना काटे व कुसळे स्पष्ट दिसताहेत. हीच ती भूमि नव्हती का, जिची मशागत त्यांना करायला सांगितले होते? होय, पण आदाम व हव्वा आता एदेनाबाहेरील जमिनीवर बाग फुलविण्यासाठी आले नव्हते.
२. नंदनवन उद्यानात परत शिरण्याचा त्या प्रथम पुरुषाला व स्त्रीला का प्रयत्न करता येत नाही?
२ हे दृश्य वेगळेच वाटत असले तरीही ते परत नंदनवन उद्यानात आत का जात नाहीत? जरा पहा, तेथे प्रवेशद्वारापाशी कोण आहे? ते असे प्राणी आहेत ज्यांना त्यांनी पूर्वी कधीही पाहिले नाही. हे प्राणी बागेतसुद्धा नव्हते. ते करूब आहेत, आणि बागेच्या प्रवेशद्वारात गरगर फिरणारी अग्नीची तरवार आहे. यांना डावलून लावून पहिला मनुष्य व त्याच्या स्त्रीला जिवंतपणे आत जाताच येणार नाही!—उत्पत्ती ३:२४.
३. पहिल्या जोडप्याची स्थिती इतक्या भयानकपणे बदलण्याजोगे असे काय घडले?
३ पण असे काय घडले? ती काही विज्ञानशास्त्राला हजारो वर्षे आश्चर्यात पाडणारी गूढार्थक गोष्ट नाही. ती फारच साधी आहे. पहिल्या पुरुषाला व स्त्रीला, देवाने त्यांच्या लग्नाच्या दिवशी सुचविलेले अद्भुत भवितव्य, यांनी आपल्या स्वर्गीय पित्याची एका लहान गोष्टीत आज्ञा पाळली तर मिळणार होते. त्यांच्याठायी परिपूर्ण आज्ञापालनाचा गुण आहे की नाही याची खात्री एका विशिष्ठ आहाराच्या मनाईद्वारे परिक्षिली जाणार होतीः “बऱ्या वाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ” त्यांनी खायचे नव्हते. (उत्पत्ती २:१६, १७) देवाची आज्ञा अवमानून त्यांनी हे केले तर ते खचितच मरणार होते. हे, आदामाने देवाचा संदेष्टा या नात्याने आपल्या बायकोला, नव्यानेच निर्मिण्यात आलेली निर्मिती, हिला सांगितले होते. पण ते “बऱ्या वाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ” याविषयी देवाने आदामाला जो ईशारा दिला होता त्याच्या सत्यतेविषयी त्या ना․चाशʹने, त्या सापाने नकार दर्शविला. देवाचा कायदा मोडला व मना केलेले फळ खाल्ले की तुम्ही देवासारखे व्हाल व तुम्हालाही बरे व वाईट ठरविण्याची देवासारखी स्वतंत्रता मिळू शकेल असे म्हणून त्या सर्पाने स्त्रीची फसवणूक केली.—उत्पत्ती ३:१-५.
दंतकथा नाही
४, ५. सर्पाने पहिल्या स्त्रीला फसविण्याविषयीचा अहवाल दंतकथा नाही हे प्रेषित पौलाने कसे दाखवून दिले?
४ हे सर्व अविश्वसनीय वाटते का? ही वस्तुस्थितीवर आधारीत नसलेली व त्यामुळे आधुनिक प्रज्वलित प्रौढ मनास न पटणारी अशी दंतकथा वाटते का? नाही. ज्याचे लिखाण इतक्या प्रसिद्धपणे वाचण्यात येते त्या लेखकाच्या व खास निवडण्यात आलेल्या प्रेषिताच्या मते तर नाहीच. आपण जे लिहिले त्याची अचूकता या लेखकाला माहीत होती. ऐहिकदृष्ट्या शहाणे समजल्या जाणाऱ्या करिंथ शहरातील प्रौढ ख्रिश्चनांना लिहिताना प्रेषित पौल म्हणालाः “जसे सापाने कपट करून हव्वेला ठकविले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.”—२ करिंथकर ११:३.
५ मूर्तिपूजक ग्रीक धर्मातील दंतकथांशी परिचित असणाऱ्या करिंथकरांना कोणा दंतकथेचा, परिकथेचा विषय सांगून त्या काल्पनिक गोष्टींच्या आधारे आपला मुद्दा, पौल केव्हाही स्पष्ट करणार नव्हता. उलटपक्षी, इब्री शास्त्रवचने “देवाचे वचन” आहे असे त्याने घोषित केले होते, त्यामधून त्याने अवतरण घेऊन याची पुष्टी दिली की, “सापाने कपट करून हव्वेला फसविले.” (१ थेस्सलनीकाकर २:१३) याखेरीज, ख्रिस्ती देखरेख्याचा कारभार सोपविण्यात आलेल्या एकाला, शिक्षणाविषयीच्या “सुवचनांचा नमुना” याचे कर्तव्य पार पाडण्याचा उपदेश देताना पौल म्हणालाः “प्रथम आदाम घडला; नंतर हव्वा; आणि आदाम भुलविला गेला नाही, तर स्त्री भुलून अपराधात सापडली.”—२ तीमथ्य १:१३; १ तीमथ्य २:१३, १४.
६. (अ) आदामाने देवाविरूद्ध केलेले पातक, स्त्रीच्या पातकापेक्षा कसे भिन्न ठरते? (ब) स्त्री सर्पाची कोणती गोष्ट बनवून सांगत नव्हती हे आपल्याला कसे समजते?
६ स्त्रीने अवज्ञा करुन मना केलेले फळ खाल्ल्यामुळे तिला जे परिणाम मिळाले, जे इतिहासाची वस्तुस्थिती वदवतात त्या आधारे आपणाला हे समजू शकते की, तिचे सर्पाकरवी फसविले जाणे हे दंतकथा नाही तर सत्य घटना आहे. देवाविरूद्ध हे पातक केल्यानंतर तिने आपल्या नवऱ्याला ते फळ खाण्याची गळ घालून त्यात सहभागी केले. पण त्याने केलेले फळाचे सेवन हे फसविले गेल्यामुळे नव्हते. (उत्पत्ती ३:६) जे काही घडल्याचे त्यांनी नंतर देवाला बोलून दाखविले त्याविषयीचा वृत्तांत म्हणतोः “आदाम म्हणालाः ‘जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले.’ यहोवा देव त्या स्त्रीला म्हणालाः ‘हे तू काय केले?’ स्त्री म्हणालीः ‘सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले.’” (उत्पत्ती ३:१२, १३) ती स्त्री काही कोणा सर्पाविषयी, ना·चाशʹबद्दल गोष्ट तयार करून सांगत नव्हती, आणि तिने दिलेल्या स्पष्टीकरणाविषयी, ते चुकीचे आहे किंवा काही दंतकथा आहे असे यहोवा देवाने म्हटले नाही. तिला, तिचा देव व निर्माणकर्ता याजविरूद्ध बंडाळी करण्यास चिथावण्यात एक साधन झाल्याबद्दल देवाने सापाला देखील दंड दिला. कोणा दंतकथेतल्या सापाविषयी खरे मानणे हे देवाच्या भव्यतेला साजेसे नसणार.
७. (अ) देवाने सर्पावर जो न्यायदंड बजावला त्याविषयी पवित्र शास्त्र अहवालात काय वर्णन आहे? (ब) ज्या सर्पाने पहिल्या स्त्रीला फसविले तोच आजही आम्हास कसे फसवू शकतो? (आपले विचार मांडताना तळटीप लक्षात घ्या.)
७ एदेन बागेतील सर्पावर बजावण्यात आलेल्या देवाच्या न्यायदंडाविषयी सांगताना अहवाल म्हणतोः “तेव्हा यहोवा देव सर्पास म्हणालाः ‘तू हे केले म्हणून सर्व ग्रामपशु व वनचर यापेक्षा तू शापग्रस्त हो; तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडिशील.’” (उत्पत्ती ३:१४, १५) कोणतेही खरे न्यायालय दंतकथा नव्हे तर वस्तुस्थिती आणि खरा पुरावा यांची तपासणी करतात. यहोवा देव कोणा दंतकथेतील सापावर आपला न्यायदंड बजावून स्वतःला मूर्ख किंवा वेडा बनवीत नव्हता; तो तर खऱ्या जिवंत, दोषपात्र प्राण्याला हा दंड देत होता. याच सर्पाने, तो कधीही अस्तित्वात नव्हता, तर ती दंतकथा होती आणि पृथ्वीवर तो कसल्याही कृत्याला जबाबदार नव्हता अशी आमची फसवणूक केली तर ती हास्यास्पद नव्हे तर दयनीय गोष्ट असणार.a
८. देवाने स्त्रीवर कोणती दंडाज्ञा बजावली, आणि याचा तिच्या मुलींवर व नातींवरही कसा परिणाम होणार होता?
८ स्त्रीने सर्पाविषयी केलेले भाष्य वस्तुस्थिती असे गृहीत धरून तिजविषयी अहवाल म्हणतोः “तो [देव] स्त्रीला म्हणालाः ‘मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन; तू क्लेशाने लेकरे प्रसवशील; तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.’” (उत्पत्ती ३:१६) तिचा विवाह आदामासोबत झाला त्यावेळी, “फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा व पृथ्वी व्यापून टाका,” असा देवाने आशीर्वाद देताना त्याने असे काही म्हटले नव्हते. (उत्पत्ती १:२८) परिपूर्ण मानवी जोडप्याला पूर्वी जो आशीर्वाद दिला होता, त्यामध्ये स्त्रीला बऱ्याच गर्भधारणांचा अनुभव येणार होता, पण तो दुःखदायक व अति वेदनाकारक असणार नव्हता; तसेच नवरा तिच्यावर स्वामित्व चालविणार नव्हता. पण आता जो न्यायदंड दिला गेला तो या स्त्रीवर, तिच्या मुलींवर आणि मुलींच्या मुलींवरही युगानुयुगे परिणामित होणार होता.
आदामाविरूद्ध दंडाज्ञा बजावण्याकरवी देवाच्या कायद्याचे श्रेष्ठत्व दिसले
९, १०. (अ) आदामाला देवाने कोणता इशारा थेट दिला होता; आणि देवाने दंड दिला तर या शिक्षेचा काय परिणाम होणार होता? (ब) देवाने आदामास कोणता न्यायदंड दिला?
९ तरीपण, जिने आपल्या पतीला पातक करण्यासाठी सहभागी होण्यात प्रलोभित केले होते त्या स्त्रीला त्याच्यासोबत आता कोणत्या परिस्थितीचा अनुभव घ्यावा लागणार होता? आधी, आदामास देवाने थेटपणे म्हटले होतेः “बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्पत्ती २:१७) आता आदामाने त्या फळातील नुसता एक तुकडा खाल्ला म्हणून न्यायाधीश देव त्या शिक्षेचा पूर्ण अवलंब करणार होता का? त्या शिक्षेच्या अवलंबनाचा काय अर्थ होणार होता याचा जरा विचार करा! आपल्या विवाहाच्या दिवशी आदाम व हव्वेने जिवाला थरारुन सोडणारी जी संभाव्यता न्याहाळली होती ती, म्हणजे आपल्या संतानांकरवी सबंध पृथ्वी भरून टाकणे, नंदनवन पृथ्वीत परिपूर्ण मानवी वंश शांतीने वास्तव्यास असणे, तो आपला देव व स्वर्गीय पिता याच्याबरोबर सुद्धा शांतीचे नातेसंबंध अनुभवतील आहे, ही सर्व संभाव्यता नष्ट होणार! सबंध मानवजातीच्या पहिल्या मानवी पालकांवर मृत्युची शिक्षा कडकपणे बजावून देवाने मानवजात तसेच मानवाच्या पार्थिव घराविषयी जो हेतू राखला होता तो अपूर्ण ठेवणारच नाही असे कदाचित वाटणे शक्य आहे. पण पवित्र शास्त्र अहवालात जो निकाल स्पष्टरित्या वदविण्यात आला तो ऐकाः
१० “आदामास तो म्हणालाः ‘तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील; ती तुला काटे व कुसळे देईल; तू शेतातले पीक खाशील. तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुनः मातीला जाऊन मिळशील; कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे; तू माती आहेत आणि मातीला परत जाऊन मिळशील.’”—उत्पत्ती ३:१७-१९.
११. आज्ञाधारकपणाविषयीच्या कोणत्या सत्यतेने, देवाने आदामाविरुद्ध बजावण्यात आलेल्या दंडाची खरी पात्रता विवेचीत केली?
११ या न्यायदंडामुळे, देवाने या पृथ्वीविषयी राखलेल्या हेतूविषयी की, ती परिपूर्ण पुरुष व स्त्रियांनी भरून जावी, ते आपसात शांतीने व प्रेमाने सदासर्वदा राहून नंदनवन बागेची मशागत व काळजी करीत राहावे यावर कसलाही परिणाम झाला तरी मानवावर मृत्युदंड लागू करणे हे होते. मना केलेल्या “बऱ्या वाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ” खाऊ नको ही देवाचे आज्ञा ऐकण्याऐवजी आदामाने आपल्या बायकोचे ऐकले होते. आता त्यानेच जर देवाचे ऐकले नव्हते तर तो आपल्या मुलांना सातत्याने तसे करण्याचे शिक्षण देऊ शकणार होता का? यहोवा देवास आज्ञाकारी असावे हे शिक्षण देताना त्याचे स्वतःचे उदाहरण बोलके असणार होते का?—पडताळा १ शमुवेल १५:२२.
१२, १३. (अ) आदामाच्या पापाच्या परिणाम त्याच्या मुलांवर कसा होणार होता? (ब) नंदनवनात काय पण पृथ्वीवर सुद्धा जिवंत राहण्यास आदाम का लायक नव्हता?
१२ आदाम आपल्या मानवी पूर्णतेत असताना जसे देवाचे नियम पूर्णपणे पालन करू शकत होता तसे आदामाची मुले करू शकणार होते का? वंशक्रमाच्या नियमाप्रमाणे तो आपल्या मुलांना आपला अशक्तपणा आणि देवाची वाणी ऐकण्याऐवजी दुसऱ्या कोणाचे तरी ऐकावे ही प्रवृत्ती वारशाने देणार नव्हता का? या प्रश्नांची उत्तरे इतिहासातील वस्तुस्थिती देते.—रोमकर ५:१२.
१३ असा हा मनुष्य, ज्याने मानवी निर्मितीखातर देवावरील पूर्ण प्रेमास अनुलक्षून असणाऱ्या देवाच्या आज्ञापालनास भिरकावून दिले त्याला नंदनवनात काय पण पृथ्वीवरही चिरकाल जिवंत राहण्याचा हक्क असू शकेल का? त्याला पृथ्वीवर राहू दिलेच तर ते सुरक्षितपणाचे असेल का? त्याला आपल्या पातकात पृथ्वीवर जिवंत राहू देण्यामुळे देवाच्या नियमाची श्रेष्ठता आणि त्याच्या संपूर्ण न्यायाचे प्रदर्शन होईल की, देवाच्या कायद्याविषयी अनादर दाखवता येतो व देवाचे वचन विश्वासाह्य नाही हेच दिसेल?
एदेन बागेतून बाहेर हाकलून देण्यात आले
१४. देवाने आदाम व त्याच्या बायकोविरुद्ध जी हालचाल केली त्याविषयी पवित्र शास्त्र अहवाल कोणते वर्णन देतो?
१४ या सर्व गोष्टी देवाने कशा ठरविल्या ते पवित्र शास्त्र अहवाल आम्हाला सांगतोः “यहोवा देवाने आदाम व त्याची स्त्री यांसाठी चर्मवस्त्रे करून त्यांस घातली. मग यहोवा देव म्हणालाः ‘पाहा, मनुष्याला बरेवाईट कळू लागून तो आमच्यातला एकासमान झाला आहे. तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल व सर्वकाळ जिवंत राहील.—’ यास्तव ज्या जमिनीतून त्यास उत्पन्न केले होते, तिची मशागत करावी म्हणून यहोवा देवाने त्यास एदेन बागेतून बाहेर काढून लाविले. देवाने मनुष्यास बाहेर घालविले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तरवार ठेविली.”—उत्पत्ती ३:२१-२४.
१५. (अ) नग्न असल्यामुळे आदाम व हव्वा यांना जी लज्जा वाटू लागली त्याविषयी देवाने योग्य समज कशी दाखविली? (ब) पहिल्या जोडप्याला एदेन बागेबाहेर कसे हाकलून लावण्यात आले? (क) एदेन बागेबाहेर आदाम व त्याच्या बायकोला कोणत्या बदलत्या स्थितीला सामोरे जावे लागले?
१५ पापी आदाम व त्याच्या बायकोला, आपण नग्न आहोत या गोष्टीमुळे आता जी लज्जा वाटू लागली होती ते ईश्वरी न्यायधिशाने विचारात घेतले. त्यांनी स्वतःसाठी अंजिराची पाने शिवून जी कटिवेष्टने तयार केली होती त्याच्या ऐवजी त्याने त्यांना चर्मवस्त्रे दिली. ही वस्त्रे कशी तयार करण्यात आली हे सांगण्यात आले नाही. (उत्पत्ती ३:७) या चर्मवस्त्रामुळे त्यांना काटे व कुसळे तसेच एदेन बागेबाहेर असणाऱ्या इतर जाचक गोष्टीपासून संरक्षण मिळणार होते आणि ही वस्त्रे अधिक काळ टिकणार होती. पाप केल्यामुळे त्यांचा विवेक कलंकित झाला व ते देवाच्या दृष्टीपासून आड होण्यासाठी एदेन बागेतील झाडांमागे लपले. (उत्पत्ती ३:८) आता शिक्षा बजावल्यानंतर त्यांना देवाने एदेन बागेबाहेर हाकलून दिल्यावर त्यांना काही स्वरुपात ईश्वरी प्रभाव जाणू लागला. त्यांना पूर्वेकडे घालवून दिले गेले व लवकरच ते बागेबाहेर आल्यावर त्यांच्या परतण्याची बंदी झाली—कायमची. आता ते बागेचा विस्तार करून त्याला सबंध पृथ्वीवर नंदनवनासारखी स्थिती आणण्यासाठी काम करणार नव्हते. तर येथून पुढे शेतातील पिकामुळे भाकरी करून खाणार होते, पण ती भाकर त्यांना मानवी जीवन सार्वकालिकपणे टिकवून ठेवण्यात साहाय्य करणार नव्हती. त्यांना “जीवनाचे झाड” यापासून छाटून टाकण्यात आले होते. काही काळानंतर, त्यांना मरणे भाग होते!
यहोवाचा मूळ हेतू अपयशी ठरला नाही
१६. देवाने काय करण्याचे उद्देशिले नाही व का?
१६ तर मग, जेव्हा की, जमिनीतील धुळीच्या दोन जीवांनी देवाविरूद्ध पातक केले होते म्हणून आता देवाने पृथ्वीचा व सोबत चंद्र, सूर्य व तारे यांचाही विश्वामध्ये आगीचा डोंब उसळवून नाश केला का? तसे त्याने केले असते तर ना·चाशʹने सुरु केलेल्या गोष्टीमुळे देव आपल्या वैभवी उद्देशात अपयशी ठरला आहे असे दिसले नसते का? एक क्षुद्र साप देवाचे सर्व हेतू हाणून पाडू शकतो का? त्याने आपले हेतू, आदाम व हव्वा यांचे लग्न झाले व त्यांना आशीर्वाद दिला होता तेव्हा त्यांच्याविषयी त्याची इच्छा काय होती ते सांगताना जाहीर केले होतेः सबंध पृथ्वी परिपूर्ण मानवी वंशाने भरणे, सबंध पृथ्वीची मशागत करून तिला एदेन बागेसारखे परिपूर्ण स्वरुप आणणे आणि सबंध मानवजातीच्या अधीन पृथ्वीवरील तसेच पाण्यातील कनिष्ठ निर्मिती आणून त्यामध्ये शांती आणणे. देवाचा हेतू पूर्ण करणारे ते दैदिप्यमान दृश्य, ज्याच्या पूर्णतेसाठी हजारो वर्षांच्या कालावधीचे सहा निर्मितीकार्याचे दिवस त्याने खर्ची घातले होते ना! मग, इतका हा स्तुतीपात्र हेतू केवळ एक साप व पहिल्या मानवी जोडप्याच्या कुमार्गामुळे उधळून लावायचा का? निश्चितच नाही!—पडताळा यशया ४६:९-११.
१७. सातव्या दिवसाविषयी काय करण्याचा देवाने निश्चय केला होता; आणि मग या दिवसाचा अंत कसा होणार?
१७ अद्याप यहोवा देवाचा सातवा, विश्रामाचा दिवस चालू होता. त्याने तो आशीर्वादित करण्याच्या हेतूने पवित्र केला होता. तो याला कधीच शापमय होऊ देणार नव्हता आणि जरी कोणी तो शापमय करण्याचा प्रयत्न केला तरीही तो त्याचे पर्यवसान आशीर्वादात करून शेवटी त्याला आशीर्वादित करणार होता. यामुळे ही सबंध पृथ्वी पवित्र स्थळ होणार होती व येथे देवाची इच्छा, स्वर्गात होते त्याप्रमाणेच परिपूर्ण मानवी वंशाकरवी साकार होणार होती.—पडताळा मत्तय ६:१०.
१८, १९. (अ) पहिल्या पापी जोडप्याच्या दुःख भोगणाऱ्या संतानांना आता उत्साह का मिळवता येईल? (ब) टेहळणी बुरुज यातील रकान्यात पुढे कशाची चर्चा होणार?
१८ देव चलबिचल झाला नाही. त्याने आपला हेतू सोडून दिला नाही. आपण पूर्ण तऱ्हेने विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे आहोत, हेतू बाळगून ते पूर्ण करून दाखवितो याप्रमाणे स्वतःचे गौरव करण्याचे आणि सर्व श्रेय आपल्याला मिळावे हे त्याने इच्छिले होते. (यशया ४५:१८) पहिल्या पापी जोडप्याच्या संतानांना, देव आपला मूळचा हेतू विश्वासाने पार पाडण्याचे पहावयास मिळून त्याद्वारे त्यांना चिरकालिक फायदे मिळतील या आशेने ते सर्व उत्कंठित होवोत. आधीच या विश्रामदिनाची काही हजार वर्षे निघून गेली आहेत आणि या दिवसाचा अंतिम भाग, जेव्हा की, त्याचा खास आशीर्वाद त्याला मिळणार तो जवळ आहे. त्याच्या विश्रामदिनाची “संध्याकाळ” सरत आहे आणि निर्मितीच्या इतर सहा दिवसांप्रमाणेच येथेही “सकाळ” आलीच पाहिजे. ही “सकाळ” आपल्या कळसास पोहंचत असता देवाचा अटळ हेतू वैभवीरित्या पूर्ण झाला आहे हे सर्वांना दिसेल तेव्हा अहवालात हे नमूद करणे शक्य होईलः ‘संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा सातवा दिवस.” खरेच केवढी भव्य संभाव्यता!
१९ हे सर्व आमच्या शरीरात केवढे रोमांच भरविते! आता लवकरच टेहळणी बुरुजच्या नंतरच्या काही अंकात, देवाच्या कायद्यांविषयी प्रेम बाळगणाऱ्या आज्ञाधारक मानवांसाठी नंदनवनात कोणत्या देहभान हरपविणाऱ्या संभाव्यता मिळतील त्याविषयीची चर्चा करण्यात येईल.
[तळटीपा]
a प्रकटीकरण १२:९ मध्ये दियाबल सैतानाची ओळख “जुनाट साप” अशी दिलेली आहे; आणि योहान ८:४४ मध्ये येशू ख्रिस्ताने त्याला “लबाडांचा बाप” असे संबोधिले.
तुम्ही काय म्हणाल?
◻ पहिल्या मानवी जोडप्याला आपले नंदनवनातील घर का गमवावे लागले?
◻ सर्पाने केलेली हव्वेची भूलवणूक ही काही दंतकथा नव्हती हे आम्ही का जाणतो?
◻ देवाने स्त्रीला कोणती शिक्षा सांगितली?
◻ देवाने आदामाला कोणती शिक्षा सांगितली, आणि यामुळे देवाच्या कायद्याचे श्रेष्ठत्व का दिसून आले?
◻ ही सबंध पृथ्वी नंदनवनातील परिपूर्ण मानवांनी भरून जावी या आपल्या हेतूविषयी देवाला विचलित झाल्याचे का वाटले नाही?