मसलत घेण्यासाठी तुम्ही कोठे जाता?
कोणी तुम्हाला भ्रष्टाचाराचा पैसा दिला आहे का? कदाचित नसेल, पण कोणी तुम्हास सांगितले की, भ्रष्टाचाराचा पैसा वाटला जात आहे तर तुम्ही कोणती प्रतिक्रिया दाखवाल? तुम्हाला वाईट वाटेल? अर्थातच नाही! तुम्हास ही जाणीव दिली गेली म्हणून तुम्ही कृतज्ञता दाखवाल आणि आपला कष्टाने मिळविलेला पैसा या भ्रष्टाचारामध्ये न लावण्यासाठी तुम्ही खबरदारी घ्याल.
आम्हातील बहुतेकांना वेळोवेळी मसलत किंवा इशारे मिळत असतात. खरे म्हटले तर काही इशारे इतरांपेक्षा अधिक उपयुक्त असतात. तरीपण काही मसलत वा सूचनेत आम्हाला वैयक्तीक मोलाचे असे काही दिसत नसले तर ती अवमानण्यात काही तथ्य आहे का?
सत्य हे आहे की, आम्हा प्रत्येकास मदत व मसलतीची वेळोवेळी गरज आहे. कारण प्रत्येकाजवळ सर्वच प्रश्नांची उत्तरे नसतात. आम्ही आर्थिक व राजकीय अनिश्चित गोष्टींनी वेढलेलो असल्यामुळे प्रत्येकाला भवितव्यासाठी निश्चित अशी भक्कम आशा हवी आहे. जगात जवळजवळ निम्म्या विवाहाचा अंत घटस्फोटात होत आहे, नवयौवनातील गर्भधारणा फोफावत आहे, व लैंगिक संसर्गजन्य आजार वाढत आहेत अशा वेळी शांतचित्त व व्यावहारिक मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. सध्याच्या या गोंधळलेल्या व्यवस्थीकरणात मुलांना योग्यरित्या वाढविण्यासाठी पालकांना मदतीची गरज आहे. नवयौवनांना त्रस्त करणाऱ्या भावना तसेच असह्य वाटणारा दबाव यावर मात करण्यासाठी मदत हवी आहे. आज जगात अप्रमाणिकता, अनैतिकता व हिंसाचार अधिकाधिक व्याप्त रूप घेत असता तग धरून राहण्यासाठी प्रत्येकाला व्यावहारिक अशा नैतिक मूल्याची प्राप्ती हवीशी वाटते आहे.
अशी मदत कोठे मिळू शकते? मसलतीचा सर्वोत्तम असा मिळू शकणारा उगम देवाचे प्रेरित वचन पवित्र शास्त्र यात आहे. पुरातन स्तोत्रकर्त्याने लिहिले: “तुझे वचन माझ्या पावलासाठी दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे.” (स्तोत्रसंहिता ११९:१०५) देवाच्या वचनाचे वाचन व त्याचा अवलंब करणाऱ्यांना आजच्या बहुतेक खाचखळग्यांना टाळता येते. याच कारणास्तव यहोवाचे साक्षीदार आपल्या शेजाऱ्यांना भेटी देऊन त्यांच्यासोबत पवित्र शास्त्राविषयी चर्चा करण्यात वर्षभरात लाखो तास खर्च करीत आहेत. तरीपण पुष्कळ लोक त्यांचे ऐकून घेत नाहीत आणि बऱ्याच लोकांना तर याचा त्रागा वाटतो. हे असे का?
संकोचित मने—का?
पुष्कळांना मसलत व खासपणे धार्मिक विषयावरील मसलत ऐकल्यामळे मनाला लागल्यासारखे होते. चर्चला जाणारे सभासद देखील त्यांच्या पाळकांनी दिलेली सूचना नेहमीच ग्रहण करीत नसतात. एका ब्रिटीश पाळकाने शोकाकूलपणे हे म्हटले: “प्रत्येकाला स्वतःच्या काही विशिष्ट कल्पना असतात व त्या पाळकाने सादर केलेल्या सूचनेइतक्याच चांगल्या आहेत असे ते समजतात.” यास्तव कोणी परका त्यांच्या दारी आला तर त्याचे ऐकून घेण्याची लोक का इच्छा करीत नाहीत हे समजण्याजोगे आहे.
यापेक्षा अधिक म्हणजे, आज आम्ही जरी संशयवादी जगात राहात असलो तरीही पुष्कळांचे आपल्या चर्चसोबत अद्याप भावनिक बंध दृढ स्वरूपातील आहेत. एका ज्ञानकोशाने म्हटल्याप्रमाणे, “धर्म असंख्य लोकांच्या भावनेला जबर स्पर्श करून आहे.” अशा प्रकारातील लोकांना, त्यांच्या समस्येवरील उपाय शोधण्याविषयीची चर्चा सामोरी आली असता याविषयी इतर लोकांसोबत पवित्र शास्त्राच्या अनुषंगाने बोलायला प्रशस्त वाटत नाही.
इतर काही लोकांना पवित्र शास्त्रावर चर्चा करण्यास नको वाटते त्याचे हे कारण असते की, त्यांनी धर्मातील ढोंगीपणा व भ्रष्टाचार याविषयीचा अनुभव घेतलेला असतो. धार्मिक पुढारीच अनैतिक गोष्टींना मान्यता देत आहेत हे बघून त्यांना दुखावल्यासारखे होते. याशिवाय, दूरदर्शनावरील प्रचारकांठायी दिसणारी लंपट स्वरुपाची लोभिष्ट वृत्ती बघून त्यांना त्याविषयीची किळस वाटत असते. राजनैतिक युद्धात धर्मपुढारी आपल्या अधिकाराचा उपयोग एका बाजूच्या वतीने करतात हे बघितल्यावर ते हताश झालेले असतात. यामुळे धर्म हा समस्यांचे निरसन करण्याऐवजी त्या अधिक वाढविणारा आहे अशी त्यांची समज होऊन बसते.
अशा प्रकारच्या तक्रारी खऱ्या आहेत. धार्मिकदृष्ट्या बोलायचे झाल्यास आपल्या आधीच्या उदाहरणाप्रमाणे, जणू “भ्रष्टाचाराचा पैसा” वाटला जात आहे. पण यामुळे, पवित्र शास्त्रापासून मोलवान मदत स्विकारण्याचे नाकारणे हे अव्यवहार्य आहे. कारण ते जणू भ्रष्टाचारी पैसा सर्वत्र वाटला जात आहे म्हणून खऱ्या पैशांचा स्वीकार न करणे यासारखे असेल.
तसेच, आधी सांगण्यात आल्याप्रमाणे, आम्हा सर्वांनाच या जगात निवड करण्याचे कठीण जात असल्यामुळे व धोकादायक स्थिती असल्यामुळे मसलतीची अत्यंत गरज आहे. मसलत स्विकारण्याविषयीचे योग्य मार्गदर्शन मिळावे असे काही उपलब्ध आहे का? दुसऱ्या कोणासोबत पवित्र शास्त्राविषयी बोलणे चुकीचे किंवा अनावश्यक असे आहे का? आपले मन उघडून चांगल्या सूचनेचा स्विकार करणे व सोबत बनावटी सल्ल्यापासून फसले न जाण्याची शक्यता आहे का? पवित्र शास्त्र याविषयी काय म्हणते?