वचनयुक्त देशाचे देखावे
यरुशलेम पवित्र शास्त्रातील घटनांचे केंद्रस्थान
बहुतेक सर्व राष्ट्रांना राजधानीचे शहर आहे; परंतु असे एक प्रमुख शहर आहे जेथे सरकारी आसन स्थापिलेले आहे. हे ऐकताच, पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना चटकन यरुशलेमाची, मानवी हिताची राजधानी म्हणून आठवण येईल. त्याचे कारणही वाजवी आहे. कारण येथे ज्या सर्व महत्त्वपूर्ण घटना घडल्या त्या आम्हा सर्वांकरिता महत्त्वाच्या आहेत.
यरुशलेमातील दक्षिण भागातील एखाद्या उंचवट्यावर उभे राहिल्यास वरील चित्रातील दृश्य आपणास दिसेल.a जेथे गर्द हिरव्या झाडांची वनराई दिसते तेथेच दोन दऱ्या एकमेकींना मिळतात. किद्रोन दरी उजवीकडून खाली उतरते तर पश्चिमेकडून किंवा डाव्या हाताकडून हिन्नोम दरी आलेली आहे, जिने पवित्र शास्त्रातील गेहेन्ना हे प्रसिद्धीस आणले. (मत्तय १०:२८; २३:३३) मध्यभागी (सध्याच्या वेशीसमोरील सूर्यप्रकाशित भाग) प्राचीन काळी दावीद नगरी उभारण्यात आली होती. वेशीच्या आतील भागात एका ऐतिहासिक स्थळावर दोन प्रसिद्ध मुस्लीम इमारती उभ्या आहेत. वेशीला लागून चंदेरी घुमटाची मशीद आहे व मागील बाजूस सोनेरी रंगाच्या मोठ्या घुमटाचा डोम आहे. याला डोम ऑफ रॉक म्हणतात.
पण यरुशलेम, तसेच त्यातील ती सपाटीची जागा, जिचेवर आज दोन घुमटधारी इमारती उभ्या आहेत, आम्हाला एवढ्या महत्त्वाच्या का वाटाव्यात? बरे, तर पवित्र शास्त्रातील, झुडुपात अडकलेल्या एडक्याचा वृत्तांत तुम्हाला कशाची आठवण करून देतो? नक्कीच अब्राहामाची. होय, तोच असा होता, जो त्याचा पुत्र इसहाक याला सोबत घेऊन मोराय पर्वतावर गेला होता, जो, तुम्ही या ज्या दोन घुमटधारी इमारती पाहात आहात त्यांच्या अगदी जवळ आहे. अब्राहाम अगदी विश्वासाने आपल्या एकुलत्या एक आणि प्रिय पुत्रास अर्पण करण्यास तयार झाला होता, पण देवदूताने त्याचा हात थांबविला. मग अब्राहामाने पाहिलेः “तो आपल्या मागे झुडुपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला, . . . तो घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला.” या दृष्टीकोनातून जर यरुशलेमाकडे पाहिले तर हा नाट्यमय जीवनी प्रसंग डोळ्यासमोर उभा राहील.—उत्पत्ती २२:१-१३.
इतर अर्पणाबद्दल म्हटल्यास ती नंतर म्हणजे शलमोनाने, ज्या सपाटीवर आज या घुमटधारी इमारती उभ्या आहेत तिजवर आधी, अति भव्य यहोवाचे मंदिर उभारल्यानंतर समर्पणाच्या प्रसंगी जी वाहिली तेव्हा सामोरी आली. (२ इतिहास ३:१) मग इस्राएल लोक देशातील आपआपल्या स्थानाहून येथे प्रतिवर्षी आपापली अर्पणे वाहण्यास येत होते ते दृश्य नजरेसमोर आणा. यातील सर्वात पवित्र म्हणजे प्रायश्चित्ताचा दिवस होता. त्या दिवशी एक बकरा निवडला जाई व “[अझालेल, म्हणजेच] पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून” दिला जाई. बहुतेक किद्रोन खोऱ्यात व पुढे आग्नेयेकडील यहुदीयाच्या अरण्यात सोडून देत. दुसरा एक बकरा आणि गोऱ्हा वधीत आणि त्यांचे रक्त याजक आणि लोकांचे प्रायश्चिताकरता अर्पण केले जाई. काही रक्त मंदिरातील पडद्यापलिकडील परम पवित्रस्थानातही नेले जाई. यास्तव आपण या शहराच्या चित्राकडे, आपल्या नजरेसमोर ते दृश्य आणूनही, पाहू शकता.—लेवीय १६:१-३४.
यरुशलेमात वाहिली जाणारी ही सर्व अर्पणे येशू ख्रिस्ताने वाहिलेल्या परिपूर्ण अर्पणाप्रत अंगुली दाखवीत होती. पृथ्वीवरील त्याच्या शेवटल्या रात्री, जी पौर्णिमेची रात्र होती, येशू त्याच्या प्रेषितांच्या सोबतीत शेवटला बंधनकारक वल्हांडण सण साजरा करण्यास तेथे उपस्थित होता. हे ते एका अशा वरच्या माडीवर पार पाडणार होते, जी इमारत शहरात, मंदिराच्या डावीकडे (पश्चिमेस) उंच भागात होती. येशूने, प्रभुचे सांज भोजन याची स्थापना केल्यानंतर, त्याने आपल्या प्रेषितांना जैतुनाच्या डोंगरावर नेले; जो किद्रोन खोऱ्याच्या पलिकडे व मंदिराच्या पूर्व (उजव्या) भागात आहे.—लूक २२:१४-३९.
या दृश्यात डोकाविण्यात साहाय्य व्हावे म्हणून, खाली दिलेल्या चित्रात पहा, जे कदाचित येशूने तेथे सांजभोजनाची स्थापना केली होती त्या भागातून काढलेले आहे. या आभासातून डोकावत असता आपणाला खालच्या भागात डावीकडे मंदिराच्या उंचवट्यावर बांधलेल्या मशीदीचा घुमट (चंद्रप्रकाशात) चकाकत असलेला दिसेल. दूरवर पूर्वेकडे किद्रोन दरी (दृष्टीटप्प्याखाली) आणि पलिकडे गेथशेमाने बागेतील वनराई दिसते. वरील भागात जैतूनाचा डोंगर उजवीकडे उभा आहे.
होय, एप्रिल १०, १९९० रोजी पौर्णिमा असेल तेव्हा जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या सर्व मंडळ्या सूर्यास्तानंतर, येशूच्या समर्पित मरणाचे आठवणीत प्रभूचा सांजभोजन विधि साजरा करण्यास एकत्र होतील.b आपणही, कृपया तेथे उपस्थित राहण्याचे आयोजित करा. त्या दिवशी आपणासही यरुशलेमात त्याकाळी ज्या सर्व घटना, येशूने जो आपला जीव मरणात ओतिला, त्याला अनुसरुन घडल्या, आठवाव्या असे वाटेल. याप्रकारे, येशूने यहोवाच्या धार्मिकतेस उंचाविले व विश्वास ठेवणाऱ्या मानवांची पाप व मरणापासून सुटका होण्यासाठी त्याने आपली खंडणी दिली.—१ करिंथकर ११:२३-२६; इब्रीयांस ९:११-२८.
[तळटीपा]
a यहोवाच्या साक्षीदारांच्या १९८९ च्या कॅलेंडरमध्ये हे चित्र मोठ्या आकारात पहावयास मिळेल.
b प्रभुच्या सांजभोजनाची वेळ मोजण्याच्या पद्धतीची सविस्तर माहिती द वॉचटावरच्या जून १५, १९७७ च्या अंकात पृष्ठ ३८३ वर पहा.