शास्त्रवचनातील धडेः होशेय १:१-१४:९
यहोवा आमचा देव दयाळू आहे
यहोवा हा “क्षमाशील, कृपाळू, दयामय, मंदक्रोध व अतिकरुणामय देव” आहे. (नेहम्या ९:१७) तो त्याच्या नीतीमान दर्जांना बिलगून राहतो तरी चूक करणाऱ्यास पश्चातापी होऊन व त्याच्यासोबतच्या चांगल्या नातेसंबंधाचा आनंद लुटण्यास आमंत्रित करतो. देवाने जे काही त्याचा संदेष्टा होशेय याच्याद्वारे स्वच्छंदी इस्त्राएलांना म्हटले त्याकरवी हे केवढ्या उचितरित्या प्रदर्शित होते बरे!
होशेय नाव अंगिकारुन असणारे पवित्र शास्त्रातील पुस्तक संदेष्ट्याने शमरोन प्रांतात त्याच्या ५९ वर्षांच्या सेवेनंतर (सुमारे ८०४ इ. स. पू. ते ७४५ इ. स. पू. नंतर) पूर्ण केले. होशेयने दहा वंशीय इस्त्राएलांचा राजा यरोबाम दुसरा व यहुदाचे राज्यकर्ते उज्जीया, योथाम, अहाज व हिज्किया यांच्या कारकिर्दीत संदेश दिला. (होशेय १:१) इस्त्राएलाने पश्चातापाची हाक दुर्लक्षित केल्यामुळे ते राष्ट्र व त्याच्या राजधानीचे शहर शमरोन अश्शुरच्या पुढे पडले. त्याचा नाश इ. स. पू. ७४० मध्ये झाला. होशेयचे भविष्यवाद गेलेल्या इतिहासजमा लोकांसाठी मार्गदर्शित होते तरी आम्हासाठी आमचा देव यहोवा याच्या दयेसंबंधीचा धडा सामावून आहे.
इस्त्राएलांचे स्वच्छंदी मार्गाक्रमण
यहोवा, पातक्यांचा अंतःकरणापासून असणारा पश्चाताप पाहून त्याच्या आधारावर दया दाखवितो. (स्तोत्रसंहिता ५१:१७; नीतीसूत्रे २८:१३) इस्त्राएलांना दया दाखविण्याची देवाची तयारी, होशेयने त्याची पत्नी गोमरसोबत केलेल्या व्यवहाराकरवी स्पष्ट करण्यात आली. त्याने, आज्ञापिल्याप्रमाणे “व्यभिचारी पत्नी” स्विकारली. होशेयच्या अपत्यास जन्म दिल्यानंतर गोमरने आणखीन दोन मुलांना जारकर्मात जन्म दिला. तरीही संदेष्ट्याने त्याच्या पत्नीस दयाळूपणे पुन्हा स्विकारले. याचप्रमाणे, इस्त्राएल यहोवास अविश्वासून पत्नीसमान होते, त्याने खोटे दैवत बाल याजशी चुकीचा संबंध जोडला होता. ते त्यांच्या आध्यात्मिक जारकर्मापासून पश्चातापी झाले तर यहोवा त्यांना दया दाखविण्यास तयार होता.—१:१-३:५.
इश्वरी दयेची इच्छा करणाऱ्या पातक्यांनी त्यांच्या पापी मार्गापासून फिरलेच पाहिजे व देवाच्या ज्ञानासोबत जुळवण्यास हवे. (स्तोत्रसंहिता ११९:५९, ६६, ६७) यहोवाजवळ इस्त्राएली रहिवाश्यांविरुद्ध त्यांच्यामध्ये सत्य, दया व त्यांच्या राष्ट्रात असणारा देवाच्या ज्ञानाचा अभाव यामुळे कायदेबद्ध प्रकरण होते. त्यांनी ज्ञान धिक्कारल्यामुळे यहोवा त्यांना धिक्कारणार होता. जारकर्मी इस्त्राएल व यहुदा यांचा हिशेब घेतला जाईल. परंतु हे भाकित केले होते की ते देवाचा धावा त्यांच्या “संकटसमयी” करतील.—४:१-५:१५.
वादळाची कापणी!
देवाच्या दयेचा अनुभव पातक्यास घेणे आहे तर पश्चातापास साजेल अशी फळे असावयास हवीत. (प्रे. कृत्ये २६:२०) “यहोवाकडे फिरा,” असे होशेयने विनविले. परंतु इस्त्राएलांचा दयाळूपणा (एफ्राईम मुख्य वंशास संबोधले) व यहुदा “लवकर विरून जाणाऱ्या दहिवराप्रमाणे” होता. लोकांनी देवाच्या कराराचे उल्लंघन केले होते व पश्चातापास शोभतील अशी फळे नव्हती. एखाद्या “खुळ्या निर्बुद्ध पारव्याप्रमाणे,” त्यांनी मिसर व अश्शुरकडून मदत मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु या राजकीय सत्ता त्यांच्यासाठी “फसविणारा धनुष्य” लक्ष्यावर टाकण्यास असमर्थ ठरतो त्यापेक्षा काही चांगले केले नाही.—६:१-७:१६.
यहोवाच्या दयेची अपेक्षा करणाऱ्यांनी जे चांगले त्याची कापणी करण्यासाठी चांगले त्याचीच पेरणी करण्यास हवी. (गलतीकर ६:७, ८) इस्त्राएलांनी चांगले ते टाकून दिल्यामुळे, त्यांनी वाईट त्याची कापणी केली. ‘ते वाऱ्याची पेरणी करतात व वावटळीची कापणी करतात.’ देव “त्यांचे अपराध स्मरील,” व ते त्याच्या दयेची नसून त्याच्या प्रतिकूल न्यायाची कापणी करतील. ते “राष्ट्राराष्ट्रातून भटकणारे” होतील, अश्शुरची विजयश्री या परिस्थितीस हातभार लावणारी ठरेल.—८:१-९:१७; अनुवाद २८:६४, ६५; २ राजे १५:२९; १७:१-६, २२, २३; १८:९-१२; १ इतिहास ५:२६.
आम्ही पवित्र गोष्टींची आवड बाळगण्याचे चालू ठेऊ तरच केवळ देवाच्या दयेपासून फायदा मिळवीत राहू. (इब्रीकर १२:१४-१६) इस्त्राएलामध्ये अशा रसिकतेची कमतरता होती. धार्मिकतेचे बी पेरून दयेनुसारची कापणी करण्याऐवजी त्यांनी दुष्टतेची पेरणी केली व अधार्मिंकतेची कापणी केली. देवाने इस्त्राएलांना पुत्राप्रमाणे मिसरमधून बोलावले होते परंतु त्याच्या प्रेमाची फेड फसवणूकीने केली होती. “तू तुझ्या देवाकडे वळ, दया व न्याय यांचे पालन कर,” अशी यहोवाने सूचना दिली. परंतु, एफ्राईम गंभीर पातकात गढला व दयेऐवजी दोषास पात्र ठरला.—१०:१-१२:१४.
यहोवाकडे वळा
गंभीर पाप केले ते सुद्धा यहोवाकडे वळू शकतात व त्यांच्यावर दया दाखविली जाईल. (स्तोत्रसंहिता १४५:८, ९) होशेयने पुन्हा एकदा इस्त्राएलाबद्दलच्या देवाच्या प्रेमळ काळजीला उद्धृत केले. राष्ट्र यहोवाविरूद्ध उठले तरी त्याने ‘अधोलोकामधून मी त्यांना उद्धरीन, मृत्युपासून त्यांना मुक्त करीन,” असे म्हणून त्यांच्या पुनर्वसनाचे अभिवचन दिले. शमरोना (इस्त्राएला)स त्याच्या बंडखोरीचा मोबदला द्यावा लागणार होता. परंतु इस्त्राएलांना ‘आमच्या वाणीचे फळ’ या हितकर शब्दाने देवाकडे परतण्यास विनविले. भविष्यवादाची समाप्ती समाधानकारक शब्दाने म्हणजेच यहोवाच्या सरळतेच्या मार्गावर चालणारे शहाणे व नीतीमान देवाची दया व प्रीतीचा आनंद लुटतील अशी केली.—१३:१-१४:९.
स्मरणासाठी धडेः यहोवा देव पातक्यांच्या अंतःकरणपूर्वक पश्चातापाच्या आधारावर दया दाखवितो. परंतु त्याच्या दयेची इच्छा करणाऱ्या पातक्याने देवाच्या ज्ञानासोबत जुळते घ्यावे व पश्चातापास साजेशी फळे उत्पादित केलीच पाहिजेत. त्यांनी चांगल्याची पेरणी करून पवित्र गोष्टीबद्दल आवड सतत दाखविण्याची गरज आहे. गंभीर पाप केलेले सुद्धा सर्वसमर्थाकडे आशेने वळू शकतात कारण यहोवा देव दयाळू आहे याचे ज्ञान घेण्याकडून समाधान प्राप्त केले जाऊ शकते.
[३१ पानावरील चौकट]
पवित्र शास्त्र वचनांचे परिक्षण
● २:२१-२३—इज्रेलचा अर्थ “देव बी पेरील” असा आहे. यहोवा विश्वासू शेषांना एकत्र करील व त्यांना यहुदात बीजाप्रमाणे पेरील, तेथे धान्य, मधूर द्राक्षारस व तेल होईल. गरजवंत शेषांच्या वतीने या उत्तम गोष्टी पृथ्वीकडे धान्य, द्राक्षे व अंजीर झाडास पोषक सत्व देण्यास मागणी करतील. पृथ्वी आकाशाकडे पावसाचा आर्जव करील व ते देवाकडे आवश्यक पाऊस देईल अशा मेघांसाठी देवाकडे मागणी करतील.
● ५:१—धर्मभ्रष्ट याजक व इस्त्राएलाचे राजे लोकांना खोट्या भक्तीत गुंतण्यास मोहीत करणारे पाश व जाळे बनले होते. ताबोर पर्वत (यार्देनेच्या पश्चिमेकडे) व मिस्पा (त्या नदीच्या पूर्वेकडील शहर) खोट्या भक्तीची केंद्रे होती. सर्व इस्त्राएलात लोक त्यांच्या नेत्याच्या अनिष्ट उदाहरणामुळे मुर्तिपूजा करीत होते. यांना देवाच्या कटू न्यायाचा अनुभव येणार.
● ७:४, ८—जारकर्मी इस्त्राएलांची बरोबरी भटाऱ्याची पेटी किंवा भट्टीसोबत, त्याच्यामध्ये जळणाऱ्या दुष्ट इच्छेमुळे केली होती. राष्ट्रांसोबत त्यांच्या मार्गाचा अंगिकार करुन व त्यांच्यासोबत सोयरीकीचा प्रयत्न करून हातात हात घालून असल्यामुळे एफ्राईम (इस्त्राएल) ची तुलना एका बाजूने भाजलेल्या गोल भाकरीसोबत केली होती.
● ९:१०—इस्त्राएलांनी मवाबाच्या पठारावर बाल-पौराकडे धाव घेतली त्यावेळी ‘त्यांनी स्वतःस लज्जास्पद गोष्टीस वाहून’ घेतले. (गणना २५:१-५) होशेयने इब्री क्रियापद ज्याचा अर्थ “स्वतःस काढून घेणे; स्वतःस वेगळे राखण्यास आवरणे” याचा उपयोग केला. इस्त्राएल देवास समर्पित होते परंतु त्यांनी स्वतःस बाल पौरासाठी त्यापासून वेगळे केले. त्या प्रसंगाचे अवतरण यासाठीच घेतले असावे कारण बालाची भक्ती हेच दहा वंशीय राज्याचे मुख्य पाप होते. (होशेय २:८, १३) आम्ही या इशाऱ्याकडे लक्ष देऊन कधीही यहोवास केलेल्या आमच्या समर्पणास तडा जाऊ देऊ नये.—१ करिंथकर १०:८, ११.
● १०:५—बेथ-अवेन (म्हणजे, “क्लेशाचे घर”) हे बेथेल, ज्याचा अर्थ “देवाचे घर” आहे त्याच्या मानहानीसाठी उपयोगात आणला. बेथेल देवाचे घर होते पण तेथील वासराच्या भक्तीमुळे क्लेशमय घर बनले. (१ राजे १२:२८-३०) वासराची मूर्ति बंदिवासात घेऊन गेले तेव्हा लोक यासाठी चकित झाले असावेत. ती मूर्ति स्वतःस वाचवू शकली नाही तर तिची भक्ती करणाऱ्यांना कदाचि वाचवू शकत नव्हती.—स्तोत्रसंहिता ११५:४-८.
● १३:१४—यहोवा अवज्ञाकारी इस्त्राएलांना त्यावेळी अधोलोकाच्या शक्तीपासून त्यांना मृत्युपासून सोडविणार नाही. ते दया दाखविण्यास पात्र नसल्यामुळे तो त्यांच्यावर करुणा दाखविणार नाही. परंतु, प्रेषित पौलाने दाखविले की देव सरतेशेवटी मृत्यु कायमचा नाहीसा करील, त्याची विजयश्री रद्द करील. यहोवाने असे करण्याचे त्याचे सामर्थ्य येशू ख्रिस्तास मृत्यु व अधोलोकापासून उठवून प्रदर्शित केले. अशाप्रकारे देवाच्या स्मृतीत असणाऱ्या व्यक्तींना त्याच्या पुत्राच्या राज्य सत्तेखाली पुनरुत्थित केले जाईल याची शाश्वती दिली गेली.—योहान ५:२८, २९.