वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 १/१ पृ. ३२
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • मिळती जुळती माहिती
  • “तुम्ही . . . माझ्याबद्दल साक्ष द्याल”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • स्मारकविधीचे भोजन
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • यहोवा आमचा अधिपती आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • येशू बारा प्रेषित निवडतो
    बायबलमधून शिकू या!
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 १/१ पृ. ३२

वाचकांचे प्रश्‍न

▪ ज्यांच्यापुढे येशू प्रकट झाला ते १ करिंथकर १५:५ मध्ये उल्लेखिलेले “बारा जण” कोण होते?

पहिले करिंथकर १५:५ मध्ये येशूच्या प्रकट होण्याविषयीचा जो उल्लेख आहे तो योहान २०:२६-२९ मधील उल्लेख वाटतो, ज्यात थोमा समाविष्ट होता. तथापि, हे प्रेषितास गट या नात्याने उल्लेखिते व कदाचित मत्थियाला समाविष्ठ करते.

पुनरुत्थानाविषयीची चर्चा करताना, पौलाने येशूचे पुनरुत्थान होण्यानंतर त्याचे मानवापुढे प्रकट होणे याविषयीचा संदर्भ लिहिला. प्रेषिताने म्हटले की, ख्रिस्त “केफास व नंतर बारा जणांस प्रकट झाला. त्यांनतर तो पाचशे पेक्षा अधिक बांधवांना प्रकट झाला.”—१ करिंथकर १५:५, ६.

येशूने आपले शिष्य असणाऱ्‍या अनुयायातून १२ जणांना प्रेषित म्हणून निवडिले. (मत्तय १०:२-५) यहुदा इस्कर्योत त्या बारा जणातील एक होता, पण तो येशूचा विश्‍वासघात करणारा, धरुन देणारा बनला व त्यांनतर त्याने स्वतःला गळफास लावला. (मत्तय २६:२०-२५; २७:३-१०) यास्तव ख्रिस्ताचा मृत्यु व पुनरूत्थानाच्या वेळी मूळ १२ तील केवळ ११ विश्‍वासू प्रेषित होते. येशू त्याचे पुनरूत्थान व स्वर्गारोहण या दरम्यान निरनिराळ्या शिष्यांना प्रकट झाला. त्यानंतर प्रेषितांनी यहुदाची जागा भरुन काढण्याची गरज जाणली. इश्‍वरी मार्गदर्शनाने मत्थियाला निवडले गेले व “त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले.”—प्रे. कृत्ये १:६-२६.

अशाप्रकारे काहीजण, पौलाने येशू “बारा” जणांपुढे प्रकट झाला असे का लिहिले असावे याविषयी आश्‍चर्य करतात. कारण त्यावेळी यहुदा मृत झाला होता व मत्थियाची निवड तोपावेतो झाली नव्हती. अचूकपणे म्हणायचे तर येशूने योजून पुढे पाठविलेल्यातील केवळ “अकरा प्रेषित” होते.—लूक ६:१३-१६.

एखादा सदस्य अनुपस्थित असला तरीही गटास सामुदायिकरित्या संबोधणे ही गोष्ट प्रचलित व सर्वसाधारण आहे. (जसे, “संचालक मंडळाने ठरविले . . . ” “वडील वर्गाची सभा झाली . . . ”) यास्तव, “बारा जण” हा शब्द प्रयोग प्रेषितांच्या संपूर्ण गटास उद्देशून, एक किंवा दुसरा एखाद्या प्रसंगी अनुपस्थित होता तरी उपयोगात आणला गेला असावा. (प्रे. कृत्ये ६:१-६ पडताळा.) येशू सर्वप्रथमतः बंद खोलीत शिष्यांस प्रकट झाला तेव्हा “बारा जणातील एक थोमा . . . त्यांच्यासोबत नव्हता.” आठ दिवसानंतर तो उपस्थित होता व तेव्हा त्याच्या संशयाचे निरसन झाले. (योहान २०:१९-२९) मत्थियास यहुदाचा बदली म्हणून घेतले नव्हते तेव्हा देखील तो बऱ्‍याच काळापासून शिष्य होता. (प्रे. कृत्ये १:२१, २२) तो मुळच्या प्रेषितांच्या निकट संगतीत होता व त्यानंतर लगेच त्याला “त्यांच्यासोबतचा म्हणून ओळखले” गेले हे पाहता येशू “बारा” जणांना प्रकट झाला हे बोल कदाचित मत्थियाला समाविष्ठ करून असावेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा