वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 ५/१ पृ. २५
  • बातम्यांवरील दृष्टीकोण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बातम्यांवरील दृष्टीकोण
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आजारी शिक्षण
  • खोटी आशा
  • “जगाचे नाहीत”
  • पुनरुत्थानावरील तुमचा विश्‍वास किती भक्कम आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • जीवाकरता एक चांगली आशा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 ५/१ पृ. २५

बातम्यांवरील दृष्टीकोण

आजारी शिक्षण

गेली दहा वर्षे न्यूयॉर्क संस्थानातील एक कॉलेज मानवी लैंगिकता विषयाचा एक वर्ग चालवीत आहे, ज्यातील विद्यार्थ्यांना तीन कॉलेज मान्यता मिळविण्याची संधि उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना “रस्त्यांवर हिंडून तेथे भेटणाऱ्‍या वेश्‍यांसोबत बोलणी करणे, भडक मद्यपान गृहांना भेटी देणे आणि समुद्रकिनाऱ्‍यावरील नग्न लोकांकडून माहिती मिळविणे हा त्यांचा ‘क्षेत्रभाग’ आहे,” असे न्यूयॉर्क पोस्टचे स्तंभलेखक लिहितात. वर्गातील क्रमिक पुस्तकात तोंडी लिंगाचार आणि हस्तमैथुनास उत्तेजन देणाऱ्‍या सूचना खास प्रकारे आढळतात असे म्हटले जाते. पोस्ट या पत्रकाच्या मते, त्या वर्गाचा अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना “जोडप्यांचा संभोग” तसेच पुरुष व स्त्रीच्या शरीरशास्त्राचे अगदी जवळचे छायाचित्रण दाखविले जाते. मग, शुद्धता व कुमारपण हे गमाविण्यात यापेक्षा अधिक धोक्याचे काय असेल?—फिलिप्पैकर ४:८, ९.

जीवनाची सत्ये जाणणे व त्याजबाबत सुदृढ चित्तवृती राखणे हे तरुणांसाठी जरुर असले तरी तशा सूचना पुरविण्याची मुख्य जबाबदारी पालकावर आहे. (नीतीसूत्रे २२:६) लैंगिकतेबद्दलचा कोणताही शालेय कार्यक्रम असो, जो नेहमी विवाहाबाहेरील लैंगिकतेस प्रोत्साहन देतो व विद्यार्थ्यांनी कामुकतेचे चित्रपट पहावेत असे सुचवितो, तसेच समलिंगी समागम व वेश्‍याव्यवसायाचा सखोल अभ्यास देतो, त्याचे शिक्षण घेणाऱ्‍यास देवाच्या खऱ्‍या भक्‍तांमध्ये कधीही स्विकारण्यात येणार नाही. पवित्र शास्त्र, जारकर्म, व्यभिचार, समलिंग समागम आचरणारे “निंद्य (लैंगिक) मनोभावनांच्या” अधीन असतात व “अनुचित कर्मे” करतात असे म्हणते. अशा गोष्टीविषयी ते हा आदेश देऊन आहेः “जारकर्मापासून स्वतःस दूर राखावे.” शिवाय ते असेही म्हणते की, “जारकर्म . . . यांचा तुम्हामध्ये उच्चारही न होवो.”—रोमकर १:२४-३२; १ थेस्सलनीकाकर ४:३; इफिसकर ५:३, ५; गलतीकर ५:१९, २१.

खोटी आशा

जे लोक मरणातही आपला “अधिक व्यक्‍तीगत मार्ग” असावा असे धुंडाळत असतात, ते नेहमीच्या दफनविधीच्या पद्धतीस सोडून प्राचीन काळातील ममीजसारखे रासायनिक पद्धतीने शरीरास कुजू न देण्याच्या पद्धतीकडे वळत आहेत असा वॉल स्ट्रीट जर्नल पत्रकाचा अहवाल आहे. ७,५०० डॉलर्स भरल्यास, “गिऱ्‍हाईकाचे शव दोन महिने द्राक्षारसात, औषधी वनस्पति व रासायनिक द्रवात भिजवून ठेविले जाईल. मग, सुगंधी तेलाचे मार्जन करून त्याला कॉकून रेशमाच्या खास कपड्यात लपेटून फायबरग्लास, पॉलीथेलिन किंवा प्लॅस्टरमध्ये ठेविले जाईल,” असे जर्नल म्हणते. तसेच सोने व जवाहिरांचा साज, ब्राँझचे कवच चढवून तीत ते शेव ठेवण्याची किंमत सुमारे १,००,००० डॉलर्स किंवा त्याहूनही अधिक जाईल.

तथापि, यात शवांची ममीजसारखी भव्यता करण्याकडे ग्राहकांची चित्ते आकर्षित केली जात आहेत असे नाही. एका व्यक्‍तीने तर असेही म्हटले की, “काही ख्रिश्‍चन म्हणतात तसे जर खरे असेल की, न्यायाच्या दिवशी ख्रिस्त आम्हास आमच्या कबरेतून बाहेर बोलवील, तेव्हा मी माझ्या सर्वोत्तम रुपात असावे असेच मला नेहमी वाटते.”

प्राचीन मिसऱ्‍यांची अशी समजूत होती की, जीवात्मा हा नंतर प्राप्त होणाऱ्‍या जीवनास परत येऊन मिळतो म्हणून शवाचे जतन केले पाहिजे. याचप्रमाणे हेही लोक आपली आशा, जीव अमर असतो या शिक्षणावर ठेवून आहेत. धर्म पुढारी ही शिकवण देतात की, न्यायाच्या दिवशी धार्मिक तसेच अधार्मिक लोकांची शरीरे आपापल्या जीवात्म्यांना परत मिळतील ती याचकरिता की, काहींना स्वर्गसुख तर बाकीच्यांना नरकाग्नीतील अधोगती मिळेल.

तरी, ही जन्मापासूनच्या अमरत्वाची शिकवण पवित्र शास्त्रात शिकविलेली नाही. याउलट शास्त्र हे शिकविते की, जीव हा मर्त्य आहे. “जो जीवात्मा पाप करेल तो मरेल.” (यहेज्केल १८:४) याप्रमाणे, भावी जीवनाकरिता जी पवित्र शास्त्रीय आशा आहे ती जिवाचे अमरत्वावर विसंबून नसून, देवाने, त्या व्यक्‍तीस त्याच्या स्वतःच्या जीवनपद्धतीसह पुनरुत्थित करून व त्याच्याच व्यक्‍तीत्वाचे सुदृढ शरीर आणि मरतेवेळीच्या आठवणी पुरवून उठविण्यावर अवलंबून आहे. येशू हे अगदी बरोबर म्हणू शकला की, “असा समय येत आहे की, त्यात स्मृती कबरेतील सर्व मनुष्ये त्याची वाणी ऐकतील . . . (व) बाहेर येतील.”—योहान ५:२८, २९.

“जगाचे नाहीत”

गेल्या वर्षी द वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क इन्कार्पोरेशनच्या सदस्यांनी, एक १९ मजली इमारत उभारण्याकरता झोनल पद्धतीत काही बदल करावेत असे अपील घेऊन द न्यूयॉर्क सिटी बोर्ड ऑफ एस्टिमेटची भेट घेतली. जरी बोर्डाच्या अनेक सदस्यांनी या प्रकल्पास विरोध केला तरी दोघा सदस्यांनी झोन बदलास अनुकूल मत दिले. यात न्यूयॉर्क शहराचे महापौर एडवर्ड कौऊच यांनी सहमत दिले. आपल्या निर्णयामागील मूळ कारणाचे स्पष्टीकरण देताना महापौर कौऊच म्हणालेः “यहोवाचे साक्षीदार . . . यांना चांगले शेजारी समजण्यात काहीच वावगे ठरणार नाही. . . . मी स्वतः त्यांना मोठे मानतो.” पुढे ते म्हणालेः “मला सांगण्यात आले की, धार्मिक कारणामुळे ते कोणाही निवडणूकीत मतदान करीत नाहीत आणि तेच कदाचित या प्रकल्पामागील कारण असू शकेल. कारण कोणाही वादग्रस्त प्रकरणात जय मिळविणे हे मतदान न करणाऱ्‍या लोकांकरिता अवघड असते; कारण तेथे निवडून दिलेल्या अधिकाऱ्‍यांकडे आपल्याच मागण्या मंजूर करून घेण्यासाठी सारखी विनंति करणाऱ्‍यांची संख्या मोठी असते.”

महापौर कौऊच यांचे, त्यांचे धैर्य आणि एवढ्या विरोधकांच्या पुढ्यात निपक्षपातीपणा प्रदर्शित करण्यात जे धाडस दाखविले याबद्दल अभिनंदन करतो. जर यहोवाचे साक्षीदार राजकीय निवडणूकीत सहभागी होणारे असते तर कदाचित या प्रकरणास वेगळ्या प्रकारे हाताळले गेले असते, पण त्यांना, राजकीय विषयाबाबतच्या त्यांच्या तटस्थतेच्या भूमिकेपासून परावृत्त करणे शक्यतेचे नाही; मग त्याकरता केवढीही मोठी किंमत द्यावी लागली तरीही ते शक्य नाही. कारण खऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी त्यांची भूमिका स्पष्ट आहे. येशू म्हणालाः “जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत.”—योहान १७:१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा