तुम्ही नवीन विचारांसाठी मोकळेपणा दर्शविता का?
काही लोक कोणत्याही नवीन विचारासाठी आपले मन बंद ठेवतात. ते विचार त्यांच्या मतापेक्षा वेगळे असल्यामुळे ते नापसंती दर्शवितात. उदाहरणार्थ, डेन्मार्कमध्ये एक अशी स्त्री आहे जिने एक साप्ताहिक जेम्मेट याला लिहिलेः “यहोवाचे साक्षीदार वारंवार आमच्या दरवाजात येतात. मला त्यांची फार चीड येते. परंतु त्यांना कशाप्रकारे घालवून लावावे हे मला समजत नाही. . . . त्यांचे अशाप्रकारे सतावणे कायद्याद्वारे मना केले जाऊ शकत नाही का?”
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यंतरी जपान्यांना पाश्चात्य लोकांनी दरवाजा ठोठावला तेव्हा हे देखील ‘सतावण्यासारखे’ वाटले होते. त्यांना वाटत होते की या घुसखोरांसोबतचे सर्व व्यवहार निरुपयोगी किंबहुना हानिकारक आहेत. “अंधारात संशय राक्षस निर्माण करतात,” अशी पूर्वेकडील एक म्हण आहे. जपान्यांना पाश्चात्यांविषयी वाटणारी मनःस्थिती ही त्यांनी पेरीचे ज्या पद्धतीने चित्र रेखाटले त्यावरुन स्पष्ट दिसते. ५० मधील केवळ दोन वा तिघांनी त्याला एक साधारण अमेरिकी नाविक, अधिकारी असे चितारले. इतरांनी त्याला मोठ्या नाकाचे पिशाच्च किंवा फिक्या तोंडाचा राक्षस, जसे येथे या चित्रात दाखवले आहे, तसे संबोधिले.
तथापि, जेव्हा त्यांचा देश उघडा करण्यात आला तेव्हा मोकळ्या मनाचे जपानी हे समजून चुकले की परदेशी हे जंगली नाहीत. अमेरिकेला गेलेल्या पहिल्या जपानी प्रतिनिधी मंडळाने जेव्हा पाश्चिमात्य संस्कृती पाहिली तेव्हा तर काहींच्या डोळ्यातून खपल्या पडल्यासारख्या झाल्या. उच्च जपानी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या दृष्टीकोनातून अमेरिकी किती उद्धट वाटतात त्याची तक्रार केली, परंतु तरुण पिढीने या नवीन संस्कृतीचा समतोलपणे विचार केला.
एका उच्च अधिकाऱ्याच्या १९ वर्षांच्या एका सेवकाने नंतर लिहिलेः “सत्तर जपान्यांच्या या प्रतिनिधी मंडळातील बहुतेक सदस्यांना अमेरिकी लोकांचा द्वेष किंवा संताप वाटला. तरीसुद्धा सत्य परिस्थिती पाहिली गेली तेव्हा आमच्यातील प्रत्येकाला चुकीचा ग्रह करून घेतल्याबद्दल खेद वाटला. परदेश्यांना कुत्र्यासारखे व घोड्यासारखे नीच जातीचे समजणे व त्यांचा नेहमी अपमान करणे हे आम्ही निर्दयी व दुष्ट आहोत अशीच कुप्रसिद्धी आम्हाला मिळवून देईल.” या तरुण सेवकाने ज्याप्रमाणे निःपक्षपाती दृष्टीकोण राखला त्याप्रमाणे नवीन विचारांकडे तुम्हीही मोकळ्या मनाने पाहता का?
बिरुयातील लोकांचे उदाहरण
इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये देखील बऱ्याच यहुद्यांना ख्रिस्ती शिक्षणाचा असमंजस असा पूर्वग्रह झाला होता. हा पूर्वग्रह, काही अंशी, जपानी अज्ञातवासीयांनी बाहेरच्या जगाविषयी ठेवला त्यासारखा होता. “सर्वत्र [ख्रिस्ती धर्माविरुद्ध] बोलले जाते,” असे प्राचीन रोममधील यहुदी हक्काने सांगत होते. (प्रे. कृत्ये २८:२२) थेस्सलनीकातील काही ख्रिस्ती लोकांविषयी पक्षपाती यहुदी ओरडलेः “ज्या लोकांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत.”—प्रे. कृत्ये १७:६.
तथापि, येथेच असेही लोक होते जे आपल्या पूर्वग्रहाच्या पलिकडे पाहणारे होते. उदाहरणार्थ, बिरूयातील लोकांनी, जेव्हा पौल व सीलाद्वारे शुभवर्तमान ऐकले तेव्हा कशी प्रतिक्रिया व्यक्त केली बरे? बिरूयातील लोकांविषयी पवित्र शास्त्र लेखक लूक सांगतोः “तेथील लोक थेस्सलनीकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि या गोष्टी अशाच आहेत काय याविषयी ते शास्त्रात प्रतिदिवशी शोध करीत गेले.” (प्रे. कृत्ये १७:११) तुम्हीही बिरूयातील लोकांसारखेच “मोठ्या मनाचे” आहात का?
कृपया, मासाजी या गृहस्थाच्या प्रकरणाचा विचार करा. एके समयी, ख्रिस्ती धर्माचे व त्याचे अतिशय वैर होते. तो त्या अज्ञातवासीयांसारखा होता जे जपान उघडण्यास विरोध करीत होते. त्याची पत्नी साचिको जेव्हा पवित्र शास्त्राचा अभ्यास करू लागली तेव्हा तो तिचा जबर विरोध करू लागला. त्याने आपल्या कुटुंबातील सर्वांना ठार करण्याचा व स्वतः आत्महत्त्या करण्याचा विचार केला. त्याच्या त्रासामुळे त्याच्या कुटुंबाला, उत्तर जपानमध्ये राहणाऱ्या साचिकोच्या थोरल्या भावाकडे पळ काढावा लागला.
सरतेशेवटी, मासाजीने आपले मन थोडे मोकळे करण्याचा व आपल्या पत्नीच्या धर्माचे परिक्षण करण्याचा निर्णय घेतला. पवित्र शास्त्रावर आधारित पुस्तकांचे वाचन केल्यावर त्याला स्वतःमध्येच बदल करून घेण्याची निकड भासली. जसजसा तो शास्त्रवचनांचा अभ्यास करू लागला तसा त्याचा जुलमी दृष्टीकोन देवाच्या आत्म्याच्या फळात परिवर्तित होऊ लागला. (गलतीकर ५:२२, २३) यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना येण्यास मासाजी जरा का कू करू लागला, कारण साक्षीदार, त्याने केलेल्या जुलमाचा सूड घेतील अशी त्याला भीती होती. परंतु राज्य सभागृहाला भेट दिल्यावर त्याचे जे एवढ्या उत्साहाने स्वागत केले गेले त्यामुळे भारावून त्याच्या डोळ्यातून अश्रु ओघळले.
होय, पूर्वग्रहावरच अवलंबून न राहता नव्या विचारांचे परिक्षण केल्यामुळे आमची दृष्टी विस्तीर्ण होते, व इतर मार्गी ही गोष्ट आम्हाला लाभदायक ठरू शकते. तथापि, याचा असा अर्थ होतो का की, आमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक नवीन विचारांसाठी आम्ही मोकळेपणा प्रदर्शित करावा?
निवडक असा!
जपानच्या अज्ञातवासाच्या समाप्तीनंतर त्या देशात नवीन विचारांचा वर्षाव होऊ लागला. यातील काही विचार जपान्यांना लाभदायक ठरले; पण दुसरे विचार त्यांनी घेतले नसते तर त्यांच्यासाठी अधिक बरे झाले असते. दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागति पत्करल्यावर अमेरिकन सेनापती डग्लस मॅकआर्थर म्हणालेः “पेरीच्या हेतुविरुद्ध जपानने पाश्चात्य ज्ञानाचा उपयोग छळ व गुलामगिरीसाठी केला.” पाश्चात्य सदुपदेशकांचे अनुकरण केल्यामुळे जपानने असे मार्गाक्रमण केले की ज्यामुळे त्याला बरीच युद्धे लढावी लागली. याचा कळस दुसऱ्या महायुद्धात झाला, ज्याच्या समाप्तीला दोन अणुबॉम्ब जपानी हद्दीत टाकण्यात आले.
यापासून आम्ही काय शिकू शकतो? नवीन विचारातील निवडक विचारच आम्ही स्विकारावेत. बिरुयातील लोकांना अनुसरणे आम्हासाठी चांगले ठरेल, जे “[पौलाने शिकवलेल्या] गोष्टी अशाच आहेत काय याविषयी शास्त्रात रोज परिक्षण करीत होते.” (प्रे. कृत्ये १७:११) “परिक्षण” यासाठी येथे वापरण्यात आलेला ग्रीक शब्द “काळजीपूर्वक व अचूक संशोधन, जसे खटले हाताळताना केले जाते,” असा अर्थ देतो. (वर्ड पिक्चर्स इन द न्यू टेस्टमेंट, लेखक, ए. टी. रॉबर्टसन) आमच्यासमोर मांडला जाणारा कोठलाही नवीन विचार अंधळ्यासारखा स्विकारण्या अगोदर आम्ही, कोणी न्यायाधीश खटला सुनावणीच्या वेळेस करतो तसे काळजीपूर्वक व अचूक संशोधन करावे.
आम्ही निवडक असलो तर येणारी प्रत्येक चाल किंवा नव्या विचाराने, जे खरोखरी हानिकारक असू शकतात, आम्ही डगमगणार नाहीत. उदाहरणार्थ, १९६० च्या दरम्यान नव-नीती म्हणून ज्या गोष्टी बोलण्यात आल्या, त्या काही जणांना चांगले असे नवीन विचार वाटले. परंतु काळजीपूर्वक छानणीद्वारे हे प्रकट झाले असते की, ही एक जुनी अनैतिकता नवीन नावाखाली आली आहे. आणखी, १९२० च्या दरम्यान आर्थिक दृष्ट्या समस्येत असलेल्या जर्मनीमध्ये निःसंशये बहुतेकांना वाटले की, नाझीवाद ही एक चांगली कल्पना आहे, परंतु तिच्यामुळे किती व्यथा घडल्या!
तथापि, देवाने एक परिक्षक दिला आहे, जो परिक्षण करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. ते त्याचे प्रेरित वचन, पवित्र शास्त्र आहे. कौटुंबिक जीवन व मानवी संबंधात त्याच्या मार्गदर्शनाचा अवलंब केल्यास आज असलेले समाजशास्त्री व इतर, जे या क्षेत्रात स्वतःला निपुण समजतात, त्यांच्यापासून ऐकलेल्या बऱ्याच नवीन विचारांची तपासणी आपण करू शकतो. (इफिसकर ५:२१—६:४; कलस्सैकर ३:५-१४) देव व आपल्या शेजाऱ्यांसोबत असलेल्या संबंधाविषयीच्या पवित्र शास्त्रीय सल्ल्याद्वारे आज धर्माविषयी पसरत असलेल्या विलक्षण विचारांची तपासणी करता येईल. (मार्क १२:२८-३१) पवित्र शास्त्राचे अचूक ज्ञान, एक नवीन विचार खरोखरी उपयुक्त आहे की नाही हे ठरविण्यास आम्हाला सुसज्ज करील. यामुळे आम्ही ‘सर्व गोष्टींची पारख करून चांगले ते बळकट धरू.’—१ थेस्सलनीकाकर ५:२१.
यहोवाचे साक्षीदार त्यांच्या शेजाऱ्यांची भेट घेऊन त्यांना पवित्र शास्त्राचे शिक्षण घेण्यास उत्तेजन देतात, ज्यामुळे ते नवीन विचार योग्यप्रकारे निवडू शकतात. साक्षीदार आणखी पवित्र शास्त्रविषयक विचार, जे इतरांना नवीन आहेत त्याकडे अंगुली दर्शवितात. यामध्ये आज आपण कोणत्या समयात जगत आहोत व मनुष्यजातीविषयी काय भविष्य राखून ठेवले आहे ते सत्य देखील आहे. (मत्तय २४:३-४४; २ तीमथ्य ३:१-५; प्रकटीकरण २१:३, ४) यासाठीच, साक्षीदार जेव्हा तुमच्या घरी येतात तेव्हा फटकून वागणाऱ्या लोकांसारखा दृष्टीकोन बाळगू नका. उलटपक्षी, आपला दरवाजा उघडून ते काय सांगतात याकडे का लक्ष देऊ नये? यासाठी, जे विचार तुमच्या चिरकालिक हिताचे आहेत ते स्विकारण्यास तुमचे मन बंद ठेऊ नका.