बातम्यांवरील दृष्टीकोण
आपसात फूट पडलेले घर
येशूने म्हटले होतेः “आपसात फूट पडलेले घर टिकत नाही.” (मार्क ३:२५) हाच प्रकार युनायटेड चर्च ऑफ कॅनडा, जे राष्ट्रातील सर्वात मोठे प्रॉटेस्टंट चर्च आहे, त्यातील पुरुषगामी आणि खुशालविचारी पुरुष व स्त्रियांची पाळकपदी नेमणूक केल्यामुळे घडत आहे.
युनायटेड चर्च ऑफ कॅनडा याच्या ३२ व्या सर्वसाधारण कौन्सीलने आपल्या एका ठरावात हे म्हटले की, जे पुरुषगामीपणा आचरत असतील अशांनाही पाळक बनण्यास परवानगी द्यावी. द ग्लोब ॲण्ड मेल या कॅनडातील वर्तमानपत्रातील बातमीनुसार या ठरावात म्हटले आहे की, त्यांच्यामधील लिंगभेद न बघता, “जे कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आहेत व त्याच्या आज्ञा पाळतात असे तोंडाने कबूल करतात अशा सर्वांचे संपूर्ण सदस्य राहण्यास किंवा बनण्यास स्वागत आहे.” तसेच “चर्चच्या सर्व सदस्यांना अधिकृत उपाध्यपणाकरिता लायक असल्याचे समजले जाते.” १२५ पानांच्या या युनायटेड चर्चच्या अहवालात म्हटले आहेः “तसे पाहता लैंगिकतेच्या उगमाचे अनेक प्रकार आहेतः होमोसेक्शूअल्स, बायसेक्शूअल, हितेरोसेक्शुअल वगैरे. यांजकडे स्वाभाविक आणि देवाकडील देणगी या दृष्टीकोणातून पाहिलेच पाहिजे.”
पुरुषगाम्यांना पाळक या अर्थी स्विकार करावा या चर्चच्या निर्णयावर विचार मांडताना ग्लोब पत्रक म्हणतेः “सर्वात निकडीचा विषय चर्च बचावून राहण्याचा आहे.” १९७२ पासून चर्च संथपणे सतत आपले सदस्य गमावीत आहे व आर्थिक अडचणीत आहे, असे अहवाल स्पष्ट करतो. कारण? पाळक जॉन व्टिडी सांगतातः “चर्च आपल्या ख्रिश्चन मुळापासून ढासळत आहे.” “यास्तव,” कॅनडाचे द पोस्ट हे पत्रक म्हणतेः “त्यांनी पुरुषगामीपणा विवाह बंधनाबाहेरील लैंगिकता, मागणीपूर्वक गर्भपात व विवाहाचे सहजगत्या निर्मूलन या गोष्टींचा केलेला अंगीकार म्हणजे तरुण पिढीसाठी एक उपोद्धांत आहे.”
तथापि ख्रिस्ताशी आज्ञाधारक राहणे हे पवित्र शास्त्रीय तत्त्वाबाबत हातमिळवणी करण्याची परवानगी देते का? देवाचे वचन याबद्दल स्पष्ट सांगतेः “अनीतीमान मनुष्याला देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हास ठाऊक नाही काय? फसू नका . . .व्यभिचारी, छंदिष्ट पुरुषगामी . . . असे तेथे नसणार.”—१ करिंथकर ६:९, १०, टुडेज इंग्लिश व्हर्शन.
छडीचा उपयोग
“छडी आवरा पण त्याचे परिणाम लक्षात घ्या,” या मथळ्याचा लेख द नाताल मर्क्युरी या दक्षिण आफ्रिकेतील वर्तमानपत्रात आला होता. अलिकडील काळात घरात तसेच शाळेत देखील लेकरांना शारीरिक शिक्षा करण्यापासून दूर राहण्याकडे कल झुकू लागला याविषयीचे दुःख त्यात व्यक्त करण्यात आले होते. तर छडी मारण्याविषयीच्या प्रवृत्तीत बदल करण्यासंबंधाने कोण जबाबदार आहे? दक्षिण आफ्रिकेतील नाताल शहराच्या विश्वविद्यालयात बालरोगतज्ञ असणारे प्राध्यापक स्मिथ हा दोष बालमानसिक तज्ञावर ठेवतात. “भावनाच्या मुळाशी पोहंचून तेथील पालेमुळांच्या शोधात असताना,” स्मिथ पुढे म्हणतात, “मानसशास्त्र मतप्रणालीनुसार एखाद्याला प्रवृत्तीत काहीसा बदल दिसू लागतो. प्रथम कोणाही शारीरिक शिक्षेस हिंसकवृत्तीने विरोध करणे ही ती प्रवृत्ती असते. मग, निराशा नको आणि भावनावर कसलेही बंधन नको या संप्रदायामुळे निर्माण झालेल्या बेशिस्त प्रवृत्तीमुळे घाबरटपणा निर्माण होतो.”
स्मिथ यांचे म्हणणे आहे की यात समतोल राखावा. “शिक्षेचा अतिरेक जसा वाईट तसा मुभा देत राहण्याची उदारता देखील वाईट ठरते.” ते पुढे म्हणतातः “लेकरु बेशिस्त असण्यापेक्षा कडक शिस्तीवर तोडगा काढणे बरे म्हणजे ते, काही संशय उत्पादित झाल्यास शिस्तीकडे झुकण्याची आवड बाळगून असेल.” प्राध्यापक या मतावर जोर देतात की, शारीरिक शिक्षा देण्यामागील प्रेमळ हेतू हा असावा की, त्यात लेकराचे सध्याचे व भवितव्यातील स्वास्थ्य समाविष्ट असावे.”
हा सल्ला काही नवा नाही, पण तो पवित्र शास्त्रातील अचूक मार्गदर्शनाकडे निर्देश करतोः “जो आपली छडी आवरतो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करतो तो त्याजवर प्रीती करणारा होय.”—नीतीसूत्रे १३:२४; तसेच नीतीसूत्रे २३:१३, १४ सुद्धा पहा.
जुगार—पाप नाही?
एका रोमन कॅथोलिक चर्च संस्थेने प्रथमच लॉटरी तिकिटे विक्री करण्याचा परवाना मागणारी धार्मिक संस्था अशी विसकॉझीन या शहरात ख्याति मिळविली. ही बातमी शेबॉयगान प्रेस या पत्रकाने दिली. ही विक्री, आठवडाभरात जमा होणाऱ्या दानात “भर” पडावी या उद्देशाने आहे असे म्हणण्यात आले आहे तरी प्रेसला दिसून आले आहे की, “बिंगो गेम खेळण्यासाठी अधिक ग्राहक गोळा करावेत” हा लॉटरी तिकिटे विकण्यामागील प्रमुख उद्देश आहे. चर्च आधीपासूनच बिंगो गेम चालवीत आहे व त्याला याकडून दर रात्री ८०० ते १,००० डॉलर्सचा फायदा होत आहे असा अहवाल आहे.
जुगार हा खरेच पाप आहे का असे विचारले असता पाळक रॉबर्ट फ्लेईशमॅन यांनी म्हटलेः “मला तितकेसे ठाऊक नाही.” चर्चने बिंगो गेमला किंवा लॉटरी तिकीट विक्रीला आपली संमती दिली हे “आमच्या आध्यात्मिक सेवेशी तितकेसे जुळणारे नाही,” हे मान्य करुन देखील ते पुढे म्हणतातः “लोक जर इकडे आले नाही तर ते दुसरीकडे जाणारच” आणि आपला पैसा तेथे उधळणार.
मग, स्वतःला ख्रिस्ताचे कट्टर अनुयायी म्हणवून घेणाऱ्या धर्मपुढाऱ्यांनी जुगार खेळण्याचे प्रोत्साहन द्यावे का? कधीच नाही! जुगार, मग तो कोणाही स्वरुपात असो, तो मानवी प्रकृतीतील सर्वात वाईट गुण, हाव, याला उत्तेजीत करीत असतो. जे तो खेळण्याची चालना देतात ते लोकांना हे प्रोत्साहन देत असतात की, इतरांना हरवून आपला फायदा साध्य करून घेण्यात काही वाईट नाही. परंतु देवाचे प्रेरित वचन अगदी स्पष्टरित्या म्हणते की, लोभी लोकांचा देवाच्या राज्यात केव्हाही प्रवेश होणार नाही.—१ करिंथकर ६:९, १०; इफिसकर ४:१९; ५:३.