वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ८/१ पृ. १८-२३
  • देवाची भक्‍ती करण्यासाठी इतरांना मदत देणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाची भक्‍ती करण्यासाठी इतरांना मदत देणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘विश्‍वास न ठेवणारे आणि साधारण माणसे’ यांना मदत देणे
  • चूक करणाऱ्‍यास मदत देणे
  • लहान मुलांना देवाची सेवा करण्याची मदत देणे
  • यहोवाच्या मेंढरांना प्रेमळ काळजीची आवश्‍यकता आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२०१३
  • आपल्या मुलांना यहोवाची स्तुती करण्यास शिकवा
    आमची राज्य सेवा—२००७
  • राज्याच्या सुवार्तेचे प्रचारक होण्यास बायबल विद्यार्थ्यांना मदत करा
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ८/१ पृ. १८-२३

देवाची भक्‍ती करण्यासाठी इतरांना मदत देणे

“कोणी विश्‍वास न ठेवणारा किंवा साधारण माणूस आत आल्यास . . . त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रकट होतात, आणि तो उपडा पडून देवाची भक्‍ती करील.”—१ करिंथकर १४:२४, २५.

१-३. करिंथमधील पुष्कळांना देवाची मर्जी संपादण्याची कशी मदत मिळाली?

आपल्या दुसऱ्‍या सुवार्तिक यात्रेमध्ये प्रेषित पौल करिंथ शहरात सुमारे दीड वर्ष राहिला. तेथे तो “वचन सांगण्यात . . . गढून गेला.” याचा काय परिणाम दिसला! “पुष्कळ करिंथकरांनी विश्‍वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला.” (प्रे. कृत्ये १८:५-११) ते ‘पवित्र झाले [आणि] पवित्र जन होण्यासाठी बोलाविले गेले.’—१ करिंथकर १:१.

२ नंतर अपुल्लोने करिंथला भेट दिली. या आधी प्रिसिल्ला आणि अक्विला यांनी त्याला बाप्तिस्म्यासहित “देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला.” यामुळे तो ख्रिस्ती झाला व त्याकरवी त्याला देवाची सदिच्छा वा मर्जी मिळाली. (प्रे. कृत्ये १८:२४-१९:७) अपुल्लोने “मुक्या मूर्तीकडे ओढले” गेलेल्या करिंथकरांना मदत केली. (१ करिंथकर १२:२) या लोकांना त्यांच्या घरीच शिक्षण दिले गेले असावे. तसेच ख्रिस्ती सभांना उपस्थित राहून त्यांना आणखी शिकता आले.—प्रे. कृत्ये २०:२०; १ करिंथकर १४:२२-२४.

३ या शिक्षणाचा परिणाम हा दिसला की, ‘विश्‍वास न ठेवणारे किंवा साधारण माणसे’ खऱ्‍या भक्‍तीकडे आकर्षित झाली. बाप्तिस्मा व देवाची मर्जी याप्रत कित्येक पुरुष व स्त्रिया प्रगति करीत आहेत हे पाहणे किती तृप्तीकारक ठरले असावे बरे! आजही तेच तृप्तीदायक आहे.

‘विश्‍वास न ठेवणारे आणि साधारण माणसे’ यांना मदत देणे

४. आज पुष्कळांना करिंथमधील लोकांप्रमाणे कशी मदत दिली जात आहे?

४ आज, यहोवाचे साक्षीदार, “सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यांस . . . बाप्तिस्मा द्या” ही येशूने दिलेली आज्ञा पाळीत आहेत. (मत्तय २८:१९, २०) चांगल्या अंतःकरणावर सत्याच्या बीजाचे रोपण केल्यावर ते परत जाऊन त्याला पाणी घालतात. (१ करिंथकर ३:५-९; मत्तय १३:१९, २३) साक्षीदार मोफत असा घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास चालवितात, त्यामुळे लोकांना त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळतात आणि पवित्र शास्त्रीय सत्ये शिकावयास मिळतात. आणि जसे पहिल्या शतकात ‘विश्‍वास न ठेवणारे’ करिंथमधील सभांना येत त्याचप्रमाणे यहोवाचे साक्षीदार पवित्र शास्त्र अभ्यास घेणाऱ्‍या लोकांना आपल्या सभांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण देतात. पण या पवित्र शास्त्र अभ्यास घेणाऱ्‍या आणि सभांना येत असलेल्या लोकांच्या बाबतीत यहोवाच्या साक्षीदारांनी कोणता दृष्टीकोन धरावा?

५. काही विशिष्ठांसोबत दळणवळण राखण्यात दक्षता घ्यावी यासाठी कोणता शास्त्रवचनीय आधार आहे?

५ ते देवाजवळ येत आहेत हे पाहून आम्हाला आनंद होत आहे. तरीपण यांचा अद्याप बाप्तिस्मा झालेला नाही हे आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आपण मागच्या लेखात जे शिकलो त्यातील दोन धडे लक्षात घ्या. (१) इस्राएलात राहणाऱ्‍या काही परदेशीयांच्या बाबतीत त्यांनी दक्षता बाळगली होती. हे देवाच्या लोकात वावरत होते आणि काही कायदे पाळीत होते तरी सुंती, परिवर्तित आणि उपासनेचे बांधव बनले नव्हते. (२) ‘विश्‍वास न ठेवणारे आणि साधारण माणसे’ यांच्यासोबत व्यवहार राखताना करिंथमधील ख्रिस्तीजन दक्ष होते; त्यांच्या आठवणीत पौलाचे हे शब्द होतेः “तुम्ही विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर जडून विजोड होऊ नका. कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार?”—२ करिंथकर ६:१४.

६. ‘विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांना’ सभेकरवी कसा ‘वाग्दंड’ मिळू शकतो, आणि या वाग्दंडाचे स्वरुप कसे असते?

६ तद्वत, आम्ही जरी ‘विश्‍वास न ठेवणारे आणि साधारण लोक’ यांचे स्वागत करीत असलो तरी यांनी देवाचे दर्जे पुरे केलेले नाहीत याची आम्हाला जाणीव असते. त्यामुळेच पवित्र शास्त्र १ करिंथकरांस पत्र १४:२४, २५ (न्यू वर्ल्ड ट्रान्स्लेशन) मध्ये म्हणते त्याप्रमाणे अशा लोकांचे, ते जे काही शिकत आहेत त्याकरवी “सूक्ष्म परिक्षण होण्यास” हवे, एवढेच काय पण त्यांना त्याकरवी “वाग्दंड” मिळाला पाहिजे. हा वाग्दंड म्हणजे न्यायदान समितीकरवी मिळणारा वाग्दंड नव्हे, कारण या लोकांना, ते अद्याप बाप्तिस्मा घेतलेले सदस्य नसतात म्हणून मंडळीतील न्यायदान करणाऱ्‍या समितीपुढे बोलावले जात नाही. उलटपक्षी, ते जे शिकतात त्याचा परिणाम म्हणून या नव्या लोकांना, देव कोणाही स्वार्थी आणि अनैतिक मार्गांचा धिक्कार करतो हे खात्रीपूर्वकरित्या समजण्यास हवे.

७. काही विद्यार्थी आणखी कोणती प्रगति करण्याचे इच्छितील आणि का?

७ काही काळातच बाप्तिस्मा न झालेल्यापैकी काहींना आस्थेवाईक विद्यार्थी या नात्याने केवळ सभेला उपस्थित न राहता यापलिकडेही जाण्याची जिज्ञासा निर्माण होते. याचे कारण येशूच्या शब्दात सापडते, ते असे की, “शिष्य गुरूपेक्षा श्रेष्ठ नाही; पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरूसारखा होईल.” (लूक ६:४०) या पवित्र शास्त्र विद्यार्थ्याला हे दिसेल की आपल्या शिक्षकाला क्षेत्रकार्य महत्वाचे वाटते व तो त्याकडून आनंद मिळवून घेत आहे. (मत्तय २४:१४) तद्वत, आता विश्‍वास वाढत असल्यामुळे पवित्र शास्त्रीय सत्ये शिकणारा आणि सभांना उपस्थित राहणारा हे शब्द आपल्या अंतःकरणी लावीलः “जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो . . . त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात.” (यशया ५२:७; रोमकर १०:१३-१५) बाप्तिस्मा जरी झालेला नसला तरी आपण राज्याचे प्रचारक बनावे आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीशी संलग्न असावे अशी त्याची इच्छा होते.

८, ९. (अ) जाहीर क्षेत्रकार्यात सहभागी होण्याची कोणा पवित्र शास्त्र विद्यार्थ्याची इच्छा होते तेव्हा काय करावे? (ब) जेव्हा दोन वडील संभाव्य प्रचारक आणि त्याच्या शिक्षकाची भेट घेतात तेव्हा ते काय करतील? (क) नवा प्रचारक आपणावर कोणती जबाबदारी घेत असतो?

८ पवित्र शास्त्र अभ्यास घेणाऱ्‍या साक्षीदाराला, विद्यार्थ्याची क्षेत्र कार्यात सहभागी होण्याची इच्छा आहे असे दिसते तेव्हा या गोष्टीविषयी अध्यक्षीय देखरेख्याला सांगता येईल. अध्यक्षीय देखरेखा दोन वडीलांना तो पवित्र शास्त्र विद्यार्थी आणि त्याचा शिक्षक यांची भेट घेण्याची व्यवस्था करुन देईल. देवाची सेवा करण्यासाठी पुढे येण्याची कोणी नवा माणूस इच्छा दर्शवितो तेव्हा वडीलांना आनंद वाटत असतो. यामुळे ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे त्यांच्याठायी असणाऱ्‍या ज्ञानाची पातळी तसेच त्यांच्याप्रमाणेच या माणसात प्रगति झालेली आहे का याची अपेक्षा ते करणार नाहीत. तरीपण वडील हे पाहण्याची इच्छा करतील या माणसाठायी काही पवित्र शास्त्र शिकवणींचे ज्ञान आहे आणि देवाच्या तत्वानुरुप याने आपले जीवन सुसंबंधित केले आहे. अशाप्रकारे, चांगल्या कारणास्तव दोन वडील संभाव्य प्रचारकाची त्याचा अभ्यास घेणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत भेट घेतात.a

९ ते दोघे वडील विद्यार्थ्याला सांगतील की, तो क्षेत्रकार्यात सहभाग घेण्यास लायक झाल्यावर क्षेत्र कार्याचा अहवाल टाकू शकतो व मग त्याच्या नावाचे मंडळ प्रचारकाचे अहवाल कार्ड बनविण्यात येईल. तेव्हा तो, यहोवाच्या साक्षीदारांच्या ईश्‍वरशासित संस्थेशी संबंध राखून तिच्या अधीन आहे हे प्रदर्शित होईल. (हीच गोष्ट, क्षेत्र सेवेचा अहवाल देणाऱ्‍या बाकीच्यांबद्दलही खरी आहे.) या चर्चेत ऑरगनाइज्ड टू अकम्प्लीश आवर मिनिस्ट्री या पुस्तकातील ९८ व ९९ पृष्ठांवर ज्या शास्त्रवचनीय सूचना देण्यात आल्या आहेत त्यांचाही विचार होण्यास हवा.b याकरताच, विद्यार्थ्याने ते पुस्तक स्वतःसाठी घेण्याची ही चांगली वेळ असेल.

१०. (अ) बाप्तिस्मा न घेतलेला कशी प्रगति करु शकतो, आणि कोणते ध्येय राखून? (ब) “मान्यताप्राप्त सदस्य” या संज्ञेत आता का सुधारणा करण्यात येत आहे? (तळटीप पहा.)

१० बाप्तिस्मा न झालेला कोणी सुवार्तेचा प्रचारक, ‘सदेच्छु मानव’ बनण्याच्या दिशेने आपले पाऊल घेण्याची शक्यता आहे.c (लूक २:१४) जरी याचे अद्याप समर्पण व बाप्तिस्मा झालेला नाही तरी त्याला, “देवाच्या वचनाची घोषणा” करण्यात पृथ्वीभरात क्रियाशील असणाऱ्‍या लाखो लोकांसोबत आपला साक्षीकार्याचा अहवाल देता येईल. (प्रे. कृत्ये १३:५; १७:३; २६:२२, २३) हा बाप्तिस्मा न झालेला असा नवा प्रचारक आहे अशी मंडळीला घोषणा करता येईल. याने आपला पवित्र शास्त्राचा अभ्यास चालू ठेवला पाहिजे, सभेत सहभाग घेतला पाहिजे, जे शिकत आहे ते अमलात आणले पाहिजे व याची सहभागी इतरांमध्ये केली पाहिजे. पण यानंतर लवकरच त्याने ख्रिस्ती बाप्तिस्म्याचे पाऊल उचलले पाहिजे व याकरवी देवाचा मर्जी लाभलेला आणि तारणासाठी ‘चिन्ह’ झालेला सेवक बनले पाहिजे.—यहेज्केल ९:४-६.

चूक करणाऱ्‍यास मदत देणे

११. बाप्तिस्मा झालेल्या पातक्यांसोबत मंडळी कसा व्यवहार करते?

११ मागील लेखात आपण पाहिले होते की, कोणा बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिश्‍चनाने गंभीर पातक केल्यास त्याला मदत देण्याविषयी मंडळीची कोणती तरतूद आहे. (इब्रीयांस १२:९-१३) तसेच पवित्र शास्त्रातून देखील आपणास हे पहावयास मिळाले की, बाप्तिस्मा घेतलेला पातकी जर पश्‍चातापी नाही तर कदाचित मंडळीला त्याला बहिष्कृत करावे लागेल व त्यानंतर त्याचा सहवास टाळावा लागेल. (१ करिंथकर ५:११-१३; २ योहान ९-११; २ थेस्सलनीकाकर २:११, १२) पण बाप्तिस्मा न झालेल्या प्रचारकाने गंभीर चूक वा पातक केले तर त्याची हाताळणी कशी करावी?

१२. (अ) पातक करणाऱ्‍या कोणा बाप्तिस्मा न झालेल्या प्रचारकास दयाळू मदत का उपलब्ध आहे? (ब) लूक १२:४८ मध्ये देण्यात आलेले तत्व पापाविषयी जो जाब द्यावयाचा असतो त्याबद्दल कोणता संकेत दर्शविते?

१२ यहुदाने असे आर्जविले की, कोणा अभिषिक्‍त ख्रिश्‍चनाठायी संशय उद्‌भवला किंवा तो शारीरिक पापात पडला, पण त्याच्याठायी पश्‍चाताप दिसून येत आहे तर त्यांजवर दया दाखवावी. (यहुदा २२, २३; तसेच २ करिंथकर ७:१० सुद्धा पहा.) यास्तव, बाप्तिस्मा न झालेला पातकी जर आपल्यापरीने पश्‍चाताप व्यक्‍त करीत आहे तर त्याला दया दाखविणे योग्य ठरणार नाही का? (प्रे. कृत्ये ३:१९) होय, कारण त्याचा आध्यात्मिक पाया असावा तितका बळकट नाही, तसेच ख्रिस्ती जीवनाक्रमणात त्याचा अनुभव देखील मर्यादित असतो. कदाचित त्याने त्या विशिष्ठ प्रकरणाविषयी देवाचे विचार काय आहेत हे जाणून घेतले नसावेत. त्याने, बाप्तिस्म्याआधी उमेदवार वडीलांसोबत जी पवित्र शास्त्रीय चर्चा करत असतात ती केलेली नसते. शिवाय पाण्याचा बाप्तिस्मा घेण्याचे गंभीर पाऊलही त्याने घेतलेले नसते. आणखी, येशूने म्हटलेच होते की, “ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल.” (लूक १२:४८) तद्वत, बाप्तिस्मा घेतलेल्या व्यक्‍तीकडून अधिकाची अपेक्षा केली जाते ती याकारणास्तव की, याने आपल्या ज्ञानात वाढ केलेली असते आणि अधिक आशीर्वादांचा अनुभव घेतलेला असतो; यामुळे त्याच्यावर अधिक जबाबदारी येते.—याकोब ४:१७; लूक १५:१-७; १ करिंथकर १३:११.

१३. कोणा बाप्तिस्मा न घेतलेल्या प्रचारकाने पातक केल्यास त्याला मदत देण्यासाठी वडील काय करतील?

१३ पौलाने दिलेल्या सल्ल्यास सुसंगत राहून आध्यात्मिकरित्या प्रशिक्षित असणारे बांधव कोणाही बाप्तिस्मा न घेतलेल्या व्यक्‍तीला, त्याच्या हातून जाणीव नसता पातक घडले आहे तर मदत देण्याची इच्छा धरतील. (पडताळा गलतीकर ६:१.) वडीलवर्ग आपल्यापैकी दोघांना (जे बहुतेक तेच असतील ज्यांनी या व्यक्‍तीशी पहिला संपर्क केलेला होता) त्याला मदत घेण्याच्या हेतू आहे तर त्याची सुधारणा करावी यासाठी ठरवितील. ही गोष्ट ते वडील खडसावण्याच्या हेतूने नव्हे तर दयाळूपणे व सौम्यभावाने करतील. (स्तोत्रसंहिता १३०:३) बहुतेक प्रकरणात शास्त्रवचनांचा आग्रहपूर्वक उपदेश आणि व्यावहारिक प्रस्ताव त्या व्यक्‍तीला पश्‍चाताप व्यक्‍त करविण्यास आणि त्याला सरळ मार्गावर आणण्यास पुरेसा असू शकेल.

१४, १५. (अ) पातकी खराच पश्‍चातापी आहे तर काय केले जाऊ शकते? (ब) काही प्रकरणांच्या अनुषंगाने कोणते मर्यादित असे स्पष्ट विधान कळविले जाऊ शकते?

१४ या बाप्तिस्मा न घेतलेल्या पातक्याच्या स्थितीला अनुरुप असणारा योग्य तो निर्देश ते दोघे वडील देऊ शकतील. काही प्रकरणांच्या अनुषंगाने ते पातक्याला काही काळासाठी ईश्‍वरशासित उपाध्यपणाच्या शाळेत भाग देऊ नये किंवा सभेत अभिप्राय विचारु नये असे वडीलवर्गास सुचवितील. किंवा ते असेही सांगू शकतील की त्याची अधिक आध्यात्मिक प्रगति दिसेपर्यंत त्याला मंडळीसोबत जाहीर उपाध्यपणात सहभाग घेता येणार नाही. ती आवश्‍यक असणारी प्रगति दिसल्यावर मग ते त्याला क्षेत्रकार्यात भाग घेण्याचे सांगू शकतील. पातक्याने कळपावर दुर्लौकिक आणला नसल्यास आणि कळपाच्या शुद्धतेला धोका निर्माण केला नसल्यास मंडळीला घोषणा देऊन जागृत करण्याची काही गरज नसणार.

१५ पण समजा, या पातक्याठायी खरा पश्‍चाताप आहे पण त्याचे पातक सर्वत्र परिचित आहे असे या दोन वडीलांना आढळले तर काय? किंवा पातक कालांतराने सर्वत्र जाहीर होणार असले तर काय? या दोन्ही गोष्टींमध्ये ते मंडळीच्या सेवा समितीला कळवू शकतात व ही समिती पुढे नमूद असणारी साधी घोषणा मंडळीला कळविण्याची व्यवस्था करीलः “ . . . विषयीचे प्रकरण हाताळण्यात आले असून तो [किंवा ती] मंडळीत बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक असा राहील.” अशा सर्व प्रकरणाच्या बाबतीत वडीलवर्ग, जे पातक घडले गेले आहे त्याविषयी नंतर शास्त्रवचनीय भाषण व सल्ला देणे योग्य आहे का हे ठरवू शकतात.

१६, १७. (अ) कोणत्या दोन गोष्टी वेगळ्या घोषणेसाठी आधार ठरु शकतात? (ब) या घोषणेचे स्वरुप कसे असते?

१६ तथापि, कधी असेही घडते की, ज्याने पातक केले आहे तो बाप्तिस्मा न झालेला प्रचारक दिल्या जाणाऱ्‍या मदतीला योग्य प्रतिसाद दर्शविणार नाही. किंवा हा बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक म्हणेल की, बाप्तिस्म्यापर्यंत प्रगति करण्याची त्याची इच्छा नाही, तसेच तो वडीलांना कळवतो की, त्याला प्रचारक या अर्थाने ओळखण्यात येऊ नये. तर मग, काय करावे? अशा लोकांच्या बाबतीत बहिष्कृत करण्याची कृति करता येत नाही कारण यांनी आपल्याला देवाच्या मर्जीत बसविलेले नसते. पश्‍चाताप व्यक्‍त न करणाऱ्‍या पातक्यांना बहिष्कृत करण्याची व्यवस्था ही बाप्तिस्मा झालेल्यांच्या बाबतीत, ‘बंधु म्हटलेल्यां’च्या संबंधाने आचरली जाते. (१ करिंथकर ५:११) मग याचा अर्थ असा का की, त्याच्या पातकाकडे दुर्लक्ष करण्यात यावे? नाही.

१७ वडीलांवर ‘त्यांना सोपवण्यात आलेल्या देवाच्या कळपाचे राखण करण्याची’ जबाबदारी असते. (१ पेत्र ५:२) प्रकरणाची हाताळणी करणाऱ्‍या व मदत देणाऱ्‍या त्या दोन वडीलांनी हे ठरविले की, बाप्तिस्मा न घेतलेला तो पातकी पश्‍चातापी दिसत नाही आणि प्रचारक म्हणून राहण्यास लायक नाही तर ते हा निर्णय त्या विशिष्ठाला कळवतील.d किंवा कोणा बाप्तिस्मा न झालेल्या व्यक्‍तीने वडीलांना कळविले की, आपणाला प्रचारक याअर्थी ओळखण्यात येऊ नये तर त्याचा हा निर्णय ते मान्य करतील. या दोन्ही गोष्टीत मंडळीतील सेवा समितीने पुढील साधी घोषणा मंडळीला योग्य वेळी कळवावीः “ . . . आता सुवार्तेचे प्रचारक नाहीत.”

१८. (अ) ती घोषणा झाल्यावर मग काय करावे हे ठरविण्यात ख्रिश्‍चनाने कोणती गोष्ट विचारात घ्यावी? (ब) गतकाळात पातक केलेल्या त्या बाप्तिस्मा न झालेल्या व्यक्‍तीला पूर्णपणे टाळत राहणे आवश्‍यक आहे का?

१८ यानंतर साक्षीदार त्या व्यक्‍तीकडे कोणत्या दृष्टीने बघतील? आधी तो सभांना उपस्थित राहणारा ‘विश्‍वास न ठेवणारा’ असा होता. त्यानंतर त्याने सुवार्तेचे प्रचारक व्हावे व त्यासाठी पात्र बनावे अशी इच्छा धरली होती. पण आता ती स्थिती नाही. त्यामुळे तो जगातील लोकांपैकी एक असा होतो. त्याला बहिष्कृत करण्यात आलेले नाही, त्यामुळे पवित्र शास्त्र अशा व्यक्‍तीसोबत बोलण्याची बंदी घालत नाही.e तरीपण ही जी व्यक्‍ती आता यहोवाची उपासना करीत नाही आणि जगातील लोकांपैकी एक अशी झालेली आहे तिच्याबाबतीत ख्रिस्ती जन व्यवहारात दक्षता राखतील. इस्राएल लोकांनी देखील त्यांच्यातील बेसुंती परदेशीयांच्या संबंधाने अशीच दक्षता राखली होती. ही दक्षता मंडळीला “थोडेसे खमीर” किंवा भ्रष्टावणाऱ्‍या घटकापासून संरक्षण देण्यात साहाय्यक ठरते. (१ करिंथकर ५:६) जर भावी काळात त्या व्यक्‍तीने पवित्र शास्त्र अभ्यास करण्याची प्रामाणिक इच्छा व्यक्‍त केली आणि ती योग्य आहे असे वडीलांनी ठरविले तर कदाचित त्याला यहोवाची सेवा त्याच्या लोकांसोबत मिळून करण्याचा हक्क केवढा मोठा आहे याची रसिकता प्राप्त होऊ शकेल.—स्तोत्रसंहिता १००.

१९. काही प्रकरणात वडीलवर्ग खाजगीरित्या कशी मदत देऊ शकतील?

१९ या प्रकारातील कोणी व्यक्‍ती कळपाला धोका आहे असे वडीलांना दिसत असेल तर ज्यांना तो धोका संभवणार अशांना ते खाजगीपणे धोक्याचा इशारा देतील. उदाहरणार्थ, पूर्वीचा प्रचारक युवक असणार व तो मद्यपी वा अनैतिक आचारात गुंतला असेल. तो आता, बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक असा राहिलेला नाही अशी घोषणा झालेली असली तरी तो मंडळीतील युवकांचा सहवास संपादण्याचा प्रयत्न करील. अशावेळी वडीलजन ज्यांना धोका संभवणार आहे त्या युवकांच्या पालकांसोबत खाजगीरित्या संभाषण करतील आणि यावेळी ते युवकांसोबत देखील बोलतील. (इब्रीयांस १२:१५, १६; प्रे. कृत्ये २०:२८-३०) जो बदनाम आहे किंवा फारच हिंसक बनला आहे त्या व्यक्‍तीच्या प्रकरणाच्या अनुषंगाने त्याने सभेला येऊ नये आणि तसा प्रयत्न केल्यास ते अतिक्रमण ठरेल असे सांगितले जाईल.

लहान मुलांना देवाची सेवा करण्याची मदत देणे

२०. ख्रिस्ती पालक आपल्या मुलांना कोणती मदत देतात व याचा कोणता परिणाम दिसून येतो?

२० आपल्या मुलांना ईश्‍वरी सत्याने सूचना देण्याची जबाबदारी पवित्र शास्त्र पालकांना देऊन आहे. (अनुवाद ६:४-९; ३१:१२, १३) यामुळेच यहोवाच्या साक्षीदारांनी बऱ्‍याच आधीच्या काळापासून हे प्रतिपादिले आहे की, ख्रिस्ती कुटुंबात साप्ताहिक पवित्र शास्त्र अभ्यास असलाच पाहिजे. ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांना, त्यांनी देवाची मर्जी मिळवून घ्यायची आहे तर समर्पण व बाप्तिस्म्यापर्यंत प्रगति करण्याचे प्रोत्साहन दिले पाहिजे. (नीतीसूत्रे ४:१-७) याचा मंडळीत आनंदमय परिणाम हा दिसून येत आहे की, हजारो मुले यहोवावरील आपले प्रेम व्यक्‍त करीत आहेत व ते त्याची सदासर्वदा उपासना करण्याची इच्छा बाळगून आहेत.

२१-२३. (अ) कोणा लहान मुलाचे पातक कसे हाताळण्यात येते? (ब) अशा परिस्थितीत मंडळीतील वडीलांची कोणती भूमिका आहे?

२१ ख्रिस्ती पालकांवर आपल्या मुलांना शिस्त लावण्याची, वाग्दंड देण्याची आणि आवश्‍यक असणारे प्रतिबंध लावण्याची आणि प्रेमळ शिक्षा करण्याची मूलभूत जबाबदारी आहे. (इफिसकर ६:४; इब्रीयांस १२:८, ९; नीतीसूत्रे ३:११, १२; २२:१५) तरीपण, मंडळीशी बाप्तिस्मा न झालेला असा कोणी लहान मुलगा सहवास राखून आहे पण तो कोणा गंभीर पातकात अडकतो तेव्हा ती वडीलांनी काळजी करण्याची बाब आहे कारण ते कळपातील ‘जिवांची राखण करीत असतात.’—इब्री १३:१७.

२२ अशा प्रकारातील पातकाची हाताळणी ही या लेखात आधी जी पद्धत सांगितली आहे त्यानुसार करावी. याकरता दोन वडीलांची नियुक्‍ती केली जावी. यांनी प्रथमतः आईवडील (किंवा एक पालक) यांच्यासोबत जे काही घडलेले आहे, मुलाची प्रवृत्ती कशी आहे आणि सुधारणूकीविषयी कोणती पावले उचलण्यात आलेली आहेत याची चर्चा मूलभूतपणे करावी. (पडताळा अनुवाद २१:१८-२१.) अशा काही परिस्थितीत पालक असतील तर वडील त्यांची वेळोवेळी पाहणी करतील आणि उपयुक्‍त सूचना, प्रस्ताव आणि प्रेमळ प्रोत्साहन देतील.

२३ तरीपण पालकांसोबत केलेल्या चर्चेत हे दिसून येईल की, मार्गभ्रष्ट मुलगा व त्याचे आईवडील यांना एकत्र भेटणे बरे ठरेल. मुलाच्या भावना व त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन वडील त्या बाप्तिस्मा न झालेल्या प्रचारकाला सौम्यतेने बोध करण्याचे ध्यानात ठेवतील. (२ तीमथ्य २:२२-२६) काही प्रकरणात तो प्रचारक असण्याच्या पात्रतेचा नाही असे दिसेल तेव्हा तशी योग्य प्रकारातील घोषणा केली जाण्यास हवी.

२४. (अ) कोणा लहान मुलाकरवी गंभीर पातक झालेले असले तरी पालकांनी काय करणे योग्य ठरेल व हे त्यांना कसे करता येईल? (ब) हेच, जो बहिष्कृत झालेला आहे त्या लहान मुलाच्या बाबतीत कसे लागू होऊ शकेल?

२४ यानंतर आपल्या चुकलेल्या मुलाविषयी पालकांना काय करता येणे शक्य आहे? तो बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक असा राहिला नसला किंवा बाप्तिस्म्यानंतर केलेल्या गंभीर चुकीमुळे त्याला बहिष्कृत करण्यात आले असले तरीही ते आपल्या मुलाविषयी जबाबदार आहेत. त्याला त्यांनी जसे अन्‍न, वस्त्र आणि आसरा देत राहाणे जरुरीचे आहे त्याचप्रमाणे त्याला त्यांनी देवाच्या वचनाच्या अनुषंगाने सूचना देण्याची व शिस्त लावण्याची गरज आहे. (नीतीसूत्रे ६:२०-२२; २९:१७) यामुळे, तो जरी बहिष्कृत असला तरीही प्रेमळ पालक त्याच्यासोबत घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास करण्याची योजना कदाचित करतील.f त्याच्याशी एकटेपणात अभ्यास केल्यामुळे त्यातून त्याला अधिक सुधारणूकीचे फायदे मिळू शकतील. किंवा कुटुंबाच्या अभ्यासाच्या व्यवस्थेत त्याने सहभाग घेण्याचे चालू ठेवावे असे ते इच्छितील. तो जरी भटकलेला असला तरी त्याने, येशूच्या दाखल्यातील उधळ्या मुलाप्रमाणे यहोवाकडे परतावे असे ते इच्छितील.—लूक १५:११-२४.

२५. आज ‘विश्‍वास न ठेवणारे’ यांच्याबद्दल प्रेमळ आस्था व मदत का दिली जात आहे?

२५ इतर लोकांनी खऱ्‍या देवाचे आनंदी उपासक बनावे याकरता त्यांना मदत देण्यासाठी प्रचार करण्याचे व शिक्षण देण्याचे आमचे ध्येय आहे. हे उघड आहे की, करिंथमधील ‘विश्‍वास न ठेवणारे आणि साधारण माणसे’ भारावली गेली आणि त्यांनी ‘उपडे पडून देवाला वंदन करुन त्याची भक्‍ती करुन म्हटलेः “तुम्हामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे.”’ (१ करिंथकर १४:२५) आजही अधिकाधिक लोक देवाची भक्‍ती करण्यासाठी सामोरे येत आहेत हे पाहून किती आनंद होत आहे! ही देवदूताने घोषित केलेल्या घोषणेची गौरवी पूर्णता आहे की, “उर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे [मर्जी बसली आहे] त्या मनुष्यांत शांती.”—लूक २:१४.

[तळटीपा]

a  यापैकीचा एक वडील मंडळीतील सेवा समितीचा सदस्य असावा आणि दुसरा तो विद्यार्थी किंवा त्याला शिकविणाऱ्‍या शिक्षकाशी अधिक परिचित असणारा असावा, जसे की मंडळीच्या पुस्तक अभ्यासाचा चालक.

b  वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क तर्फे १९८३ मध्ये प्रकाशित करण्यात आलेले.

c  क्षेत्रकार्यात लायक असणाऱ्‍या बाप्तिस्मा न झालेल्या व्यक्‍तीला पूर्वी “मान्यताप्राप्त सदस्य” असे म्हणत असू. तथापि, “बाप्तिस्मा न झालेला प्रचारक” अशी संज्ञा आता अधिक योग्य वाटते. हे यासाठीच की देवाची मर्जी ही योग्य समर्पण आणि ख्रिस्ती बाप्तिस्मा यांच्यामुळे लाभत असते हा पवित्र शास्त्राचा संकेत आहे.

d  तो विशिष्ठ या निर्णयाविषयी संतुष्ट नसला तर त्याने त्या प्रकरणाची उजळणी व्हावी अशी विनंति (सात दिवसांच्या आत) करावी.

e  पूर्वी, बाप्तिस्मा न झालेल्या कोणी पातक केले आहे आणि तो पश्‍चातापी नाही तर त्याला पूर्णपणे टाळण्यात येत होते. आता वर दाखविण्यात आलेली सुधारणा करण्यात आली असली तरी पहिले करिंथकर १५:३३ मध्ये दिलेली सूचना अद्याप पाळली जाण्यास हवी.

f  घराबाहेर राहणाऱ्‍या बहिष्कृत नातेवाईकास कसे वागविण्यात यावे याविषयी टेहळणी बुरुज मासिकाच्या ऑक्टोबर १, १९८८ अंकात पृष्ठ २१-२५ आणि फेब्रुवारी १९८२ च्या अंकात चर्चिल्या गेलेल्या सूचनांचा अवलंब होण्यास हवा.

तुम्हाला आठवते का?

◻ सभेला आलेल्या ‘विश्‍वास न ठेवणाऱ्‍या’ लोकांच्या बाबतीत ख्रिश्‍चनांनी कोणता दृष्टीकोन राखावा?

◻ पवित्र शास्त्र अभ्यास घेणाऱ्‍या कोणा विद्यार्थ्याला क्षेत्रकार्यात सहभागी होण्याची इच्छा आहे तर वडील कोणती पावले अनुसरतात, आणि विद्यार्थ्याला कोणती जबाबदारी स्विकारावी लागते?

◻ बाप्तिस्मा न घेतलेल्या कोणा प्रचारकाने गंभीर पातक केल्यास काय केले जाते?

◻ घरात राहणाऱ्‍या लहान मुलांनी गंभीर पातक केल्यास पालक तसेच वडील त्यांना कशी मदत देऊ शकतात?

[१९ पानांवरील चित्रं]

अद्याप बाप्तिस्मा झालेला नसला तरी प्रचारक होणे हे देवाची मर्जी मिळविण्यातील एक महत्वपूर्ण व जबाबदार पाऊल आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा