कोडेक्स सायनाटीकसला बचावणे
कोडेक्स सायनाटीकसबद्दल अशी आख्यायिका आहे की, ते “प्रचलित पुस्तकात अत्यंत महत्त्वाचे, खळबळजनक आणि बहुमोल पुस्तक आहे.” हे केवळ ते १,६०० वर्षे जुने आहे म्हणूनच नव्हे तर आमच्या पवित्र शास्त्रातील यादी जुळवणीतील महत्त्वाचा दुवा आहे. त्याचा टिश्चेनडॉर्फ यांनी सुमारे शंभर वर्षांआधी लावलेला पुनः शोध ही चित्ताकर्षित गोष्ट आहे.
कॉन्स्टंटाईन व्हॉन टिश्चेनडॉर्फ यांचा जन्म उत्तर युरोपातील सेक्सोनी येथे १८१५ मध्ये झाला. त्यांनी लिपेग येथील विश्वविद्यालयात ग्रीक भाषेचे शिक्षण घेतले. शिक्षणक्रम चालू असताना ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात काहीच खरेपणा नाही हे शाबीत करण्यात जर्मन वेदांत्यांनी उठविलेल्या उच्चस्तरीय बायबल टीकेने त्यांचे मन अतिशय चलबिचल झाले. तथापि, टिश्चेनडॉर्फ यांची ही खात्री झाली होती की, आधीच्या शास्त्रवचन प्रतींचा अभ्यास केल्यास तो हे शाबीत करील की, पवित्र शास्त्रातील वचने खरी आहेत. याचा परिणाम हा झाला की, सर्व प्रसिद्ध शास्त्रप्रतीमधून त्यांनी स्वतःच संशोधन करण्याचा निश्चय केला; तसेच प्रवासात कोठे दुसऱ्या प्रती आढळल्यास त्यांचाही आधार घेण्याचे ठरविले.
युरोपातील सर्व महशूर ग्रंथालयात चार वर्षे संशोधनार्थ खर्च केल्यावर टिश्चेनडॉर्फ मे १८४४ मध्ये सिनायमध्ये तांबड्या समुद्राच्या ४,५०० फूट उंचीवर वसविलेल्या सेन्ट कॅथरीन मठात आले. भिक्षुकांच्या या किल्लेवजा विश्रामस्थानी पोहचण्यास, टोपलीत बसून तिला दोरखंडाने वर खेचल्याविना व भिंतीतील एका छोट्या भेगेतून पार गेल्याविना पोहचता येत नव्हते.
फलदायी शोध
तेथील तीन ग्रंथालयात त्यांना काही दिवस संशोधन करण्याची परवानगी मिळाली पण त्यात काहीच हाती लागले नाही. मग, कष्टी मनाने निघण्याच्या इराद्यात असता त्यांना इतके दिवस जे हवे होते तेच पुढ्यात आढळले—प्राचीन काळातील चर्मपत्रे! मुख्य ग्रंथालयाच्या मध्यवर्ती दिवाणखान्यात एका मोठ्या टोपलीत ती भरून ठेवलेली होती. ग्रंथपालांनी म्हटले की, या आधीच्या दोन टोपल्या भरून जाळण्यात आल्या; तसेच हिचीही विल्हेवाट लागणार. त्या चर्मपत्रात शोधता टिश्चेनडॉर्फना, पूर्वी कधीही दृष्टीस पडल्या नव्हत्या अशा, इब्री शास्त्रवचनाच्या ग्रीक भाषेत अनुवादित केलेल्या अगदी पुरातन काळच्या १२९ प्रती सापडल्याचे पाहून केवढे आश्चर्य वाटले. त्यांना यापैकीच्या केवळ ४३ प्रती देण्यात आल्या; बाकीच्या नाकारण्यात आल्या.
टिश्चेनडॉर्फ यांनी १८५३ मध्ये मठास परत भेट दिली. येथे त्यांना त्याच चवथ्या शतकाच्या हस्तलिखितातील उत्पत्तीचा काही भाग सापडला. त्यांना ही खात्री देण्यात आली की, “या हस्तलिखित प्रतीत सुरवातीस सबंध जुना करार असावा, पण आता त्याचा बराचसा भाग जाळला गेला असावा.” सबंध हस्तलिखित प्रतीत कदाचित एकूण ७३० पाने असावीत. ही सर्व पाने, जी मेंढरु किंवा बकरीच्या उत्तम प्रतीच्या कातड्यावर कमवलेली होती, त्यांजवर ग्रीक भाषेतील स्पष्ट शब्दातील लिखाण होते.
पुन्हा सहा वर्षांनंतर टिश्चेनडॉर्फ यांनी सिनायमधील मठास तिसऱ्या वेळी भेट दिली. ते निघण्याच्या सायंकाळी, त्यांनी १५ वर्षांपूर्वी ज्या हस्तलिखित प्रतींना जाळण्यापासून वाचविले होते त्यांच्यासोबत इतरही काही प्रती त्यांना दाखविल्या गेल्या. यात सबंध ग्रीक शास्त्रवचनांचा भाग होता, शिवाय इब्री शास्त्रवचनांचे ग्रीक भाषेत केलेल्या अनुवादांच्या प्रतीही होत्या.
ही हस्तलिखिते टिश्चेनडॉर्फ यांना मिसरातील कैरोस नेण्याची आणि त्याच्या नकला करण्याची परवानगी देण्यात आली. ओघाओघाने भिक्षुकाकडून देणगी म्हणून ती रशियाचे झारकडे पोहचविण्यात आली. आज ती ब्रिटीश संग्राहालयात कोडेक्स अलेक्सांद्रीयन्स सोबत प्रदर्शनास ठेवलेली आढळते. या आधीच्या ४३ प्रती लिपेगमधील विद्यालयाच्या ग्रंथालयात जर्मनीत ठेवलेल्या आढळतात.
ज्यांनी या कामाकरता आपले आयुष्य वेचले आणि बायबल हस्तलिखितांचे संशोधन करण्यात कौशल्य पणास लाविले व विशेष म्हणजे सुप्रसिद्ध कोडेक्स सायनाटीकसला जाळण्यापासून बचाविले त्याबद्दल टिश्चेनडॉर्फचे आम्ही कृतज्ञ असावयास हवे. पण आमचे सर्वथोर आभार यहोवा देवास जातात, ज्याने याकडे केवढ्या बारकाईने लक्ष पुरविले की त्याचा शब्द इतक्या अचूकपणे आज आमच्या फायद्याकरता जतन करून ठेवला आहे.
[३० पानावरील चौकट]
कोडेक्सचा वापर
कोडेक्स सायनाटीकसचे चिन्ह א हा इब्री शब्द आहे. हा कोडेक्स पवित्र शास्त्राच्या अत्यंत अलिकडील चर्मपत्रांच्या हस्तलिखितांच्या अचूकपणाची पुष्टी देतो. याखेरीज, तो नंतरच्या प्रती कोणत्या युक्तीबाज चुका लिखाणात घुसविण्यात आल्या त्याची आधुनिक पवित्र शास्त्र प्रामाण्यांना माहिती पुरवितो.
उदाहरणार्थ, योहान १:१८ असे वाचण्यात येतेः “देवाला कोणी कधी पाहिले नाही. पित्याच्या उराशी असणारा जो एकुलता एक जन्मलेला देव याने पित्याला प्रगट केले.” “न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल” मधील तळटीप प्रकट करते की, कोडेक्स सायनाटीकस व इतर जुनी हस्तलिखिते “एकुलता एक पुत्र” या पर्यायी संज्ञेपेक्षा “एकुलता एक जन्मलेला देव” या संज्ञेची पुष्टी देते. ‘א मधील संदर्भ तळटीप या कोडेक्सच्या अचूकतेविषयीची आणखी एक नोंद देताना कळवते की त्यात “एक” हे व्याकरणाचे निश्चयी पद राखण्यात आले आहे व त्यामुळे “एकुलता एक जन्मलेला देव” अशी संज्ञा तयार होते. अशाप्रकारे येशू ख्रिस्ताचे स्थान हे अद्वितीय आहे व त्याची साक्ष शास्त्रवचने देतात.
[३१ पानांवरील चित्रं]
सांप्रदायिक सीनाय डोंगराच्या पायथ्याशी असणारा सेन्ट कॅथरिनचा मठ. [आतील चित्र] त्याचे सध्याचे ग्रंथालय