प्रामाणिकपणा कालबाह्य झाला आहे का?
प्रामाणिकपणाचा जीवनी मार्ग, आजच्या जगात व्यावहारिक नाही व कसलेही मूल्य राखून नाही म्हणून कालबाह्य झाल्याचा वाटतो का? कदाचित ते तसेच वाटेल. अप्रामाणिकपणा केवढा व्याप्त रुपाने पसरलेला आहे, तो किती प्रकारात दिसतो व केवढ्या थरापर्यंत गेला आहे व यामुळे केवढे भयंकर ओझे निर्माण झाले आहे त्याविषयीची ही काही उदाहरणे पहा.
अलिकडील वर्षांत पश्चिम जर्मनीने कराच्या अफरातफरीची किंमत काढली ती प्रतिवर्षी १५० कोटी रुपये अशी निघाली आणि स्वीडनमध्ये दर माणसाच्या मागे दरवर्षी १०,८०० रुपये इतका खर्च निघतो. तर मग, तुम्ही यापैकीच्या एका देशात असाल तर तुम्ही कररुपाने जी रक्कम देता त्यात अप्रामाणिकपणा आपला जम बसवून आहे. अमेरिकेत उत्पन्न करात फसवाफसवी करण्याचे इतके प्रकार बोकाळले आहेत की सरकारला दरवर्षीं १५०० कोटी रुपये इतका फटका बसत असतो असा अंदाज काढला गेला. इतकाच पैसा संघराज्याच्या लटपटत असलेल्या अर्थसंकल्पाच्या तूटी भरण्यासाठी केवढा साहाय्यक ठरला असता ते विचारात घ्या. याखेरीज जे बेकायदेशीर व्यवसाय चालतात त्यामुळे अमेरिकन सरकारला आणखी १५० कोटी रुपये मुकावे लागते. दुकानाच्या चोऱ्या व भुरट्या चोऱ्या यामुळे अमेरिकेतील दुकानांना दरवर्षी ६० कोटी रुपये खर्च पडतो व यामुळे मालाच्या किंमती वाढवाव्या लागतात. दुसऱ्या कोणाच्या फोनवर दूर ठिकाणी केलेल्या कॉल्सचा आकार बरोबर न केल्यामुळे अमेरिकेतील नागरिकांना दरवर्षाला १५० लाख रुपये खर्च भरावा लागतो.
कॅनडात नोकरीवर वेळ वाया घालविणाऱ्या कामचोरांमुळे त्यांच्या व्यवस्थापकांना दरवर्षी १८७ कोटी रुपये मुकावे लागते व हे नुकसान “पैशांचा अपहार, सुंदर गोष्टींचा विध्वंस, घरफोड्या, दलालीचा हिस्सा, दारुगोळा आणि याप्रकाराने जी व्यावसायिक गुन्हेगारी होते तिच्या नुकसानीपेक्षा तिपट्ट आहे.” १९८६ मध्ये झालेल्या परिक्षणात वेळेच्या चोरीमुळे अमेरिकेत प्रतिवर्षी २,५५० कोटी रुपये बोजा पडतो असे दिसले.
यशस्वी व्यापार करणारे आणि लाखो रुपये फायदा मिळविणाऱ्या कंपन्या स्वतःच्याच सरकारला अधाशीपणे लुबाडतात. हे कसे? सरकारला हत्यारे व सुटे भाग यांची भरमसाट किंमत लावून; उदाहरणेः रु. १.८० ची नट पिळण्याची उचकटणी १,४४,०९० रुपये; १० रुपयांचे ट्रान्झिस्टर्स १२,२१० रुपये; स्टूलच्या पायासाठी लागणाऱ्या प्लास्टिक टोप्या रु. २.५५: १६,७७० रुपये. अमेरिकेचा एक सिनेटचा सदस्य म्हणालाः “हे तर कित्येक कोटी रुपये वाटतात.”
याला आणखी जोड म्हणजे ख्यातनाम व्यक्तींनी राखलेले वाईट उदाहरण, जे प्रामाणिकपणाला काट देते. तुम्हाला कदाचित माहीत असेलच की, काही देशातील पुढारी खोटे वक्तव्य करतात, चुकीची माहिती देतात, आणि आपली जबाबदारी टाळतात. तसेच राजकारणी प्रतिस्पर्ध्याचा खूनही करतात आणि हा दोष कोणा इतरांचा आहे असे भासवतात.
तर मग प्रामाणिक असणे हे कालबाह्य झाले आहे का? ते एक चांगले ब्रीद राहिले नाही का? देवाचे वचन आपल्याला प्रामाणिक राहावयाला सांगते म्हणून प्रामाणिकपणा चांगला दिसतो का? या सर्व प्रश्नांची आपल्याला उत्तरे हवी असतील तर मग पुढील लेख तुम्हासाठी महत्वाचा आहे.