वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 १०/१ पृ. २९
  • एक अध्यक्ष बोलतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एक अध्यक्ष बोलतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • मिळती जुळती माहिती
  • तुमच्या जीवनात सर्वप्रथम काय आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • एक प्रमुख त्याच्या भवितव्याचा विचार करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांना संभाळतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • यहोवाचे साक्षीदार खरे ख्रिस्ती आहेत का?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 १०/१ पृ. २९

राज्य घोषकांचा वृत्तांत

एक अध्यक्ष बोलतो

या जगात उच्चपदावर असणारे असे काही लोक आहेत ज्यांना प्रामाणिकता व न्याय प्रिय वाटतो व ते अशा गोष्टी उंचावून धरीत आहेत हे जाणणे मोठे उत्तेजनदायक आहे. याविषयीचे उदाहरण आफ्रिका खंडातील एका देशाच्या अध्यक्षांच्या बाबतीत आढळते. येथे यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी आहे. याविषयीचा अहवाल आम्हास सांगतोः

आमच्या गावात अलिकडेच विविध धर्मांच्या गटांनी एक आंतरधर्मीय अधिवेशन योजिले होते. यात कॅथोलिक, प्रेसबिटेरियन्स, पेन्टेकॉस्टल आदींचा समावेश होता. या अधिवेशनाच्या समाप्तीला प्रमुख अध्यक्षांना भाषणासाठी निमंत्रित करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात इतर गोष्टींसमवेत सर्वांना यहोवाच्या साक्षीदारात आढळणारी प्रामाणिकता व उच्च नैतिक दर्जे यांचे अनुकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आणि असेही म्हटले की जर सर्वजण यहोवाच्या साक्षीदारांसारखे झाले तर राष्ट्रात शांती राहील. त्यांचे हे भाषण ऐकून सर्वांनाच मोठे आश्‍चर्य वाटले.

दुसऱ्‍या दिवशी अधिवेशनात प्रतिनिधित्व केलेल्या चर्चच्या प्रमुखांनी या अध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांनी साक्षीदारांच्या स्तुतीचे जे उद्‌गार काढले त्याविषयी आपला निषेध व्यक्‍त केला आणि त्यांना याची जाणीव करुन दिली की या देशात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी आहे. या बंदीची आपणाला कल्पना आहे असे अध्यक्षांनी कबूल केले पण हेही म्हटले की त्यांना यहोवाच्या साक्षीदारांविषयी चुकीचे असे काही आढळले नाही. त्यांनी पुढे म्हटलेः ‘मी माझ्या या अध्यक्षपणाच्या कारकिर्दीत कोणाही यहोवाच्या साक्षीदाराला माझ्या न्यायालयात मोठ्या गुन्ह्‌याखातर आणल्याचे पाहिले नाही. तरीपण, मळ्‌यातून झाड चोरल्याची फिर्याद आली तर चोर म्हणून बहुधा कॅथोलिक लोकांपैकीच मिळतो. तसेच जनावर चोरले गेले तर ते बहुधा कोणा प्रेसबिटेरियन माणसाने चोरल्याचे आढळते. तुमच्या चर्चच्या लोकांनी गर्भपाताकरवी माझा हा देश प्रदुषित बनवला आहे पण या गुन्ह्‌याखातर कोणाही यहोवाच्या साक्षीदाराला मजपुढे आणले गेले नाही. देवाचे कायदे असा दुष्टपणा आचरण्याची मनाई करीत नाही का? किंवा चर्चवर देवाच्या नियमांचा पगडा राहिला नाही?’ धर्मपुढाऱ्‍यांच्या तोंडून एकही शब्द बाहेर येऊ शकला नाही.

“नंतर या अध्यक्षांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले व म्हटले की त्यांनी जपून राहावे व काळजी घ्यावी म्हणजे देवाच्या नावाला कलंक येणार नाही तसेच त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांबद्दल जे प्रशंसोद्‌गार काढले आहेत त्याविषयी त्यांची निंदा होणार नाही.”

अहवाल कळवितो की आता पुष्कळ नवीन जण सत्यासाठी आपली भूमिका घेत आहेत. एक साक्षीदार कळवितो की त्याला आता त्याच्या वसाहतीच्या तीन प्रमुखांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु करता आला व या तिघांपैकी एक जण त्यांच्यात प्रमुख आहे. हे तिघेही प्रमुख आता यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला उपस्थित राहात आहेत!

सत्य व धार्मिकतेवर प्रेम करणाऱ्‍या आणि त्याच्या सेवकांच्या वतीने बोलणाऱ्‍या लोकांची यहोवा दखल घेतो.—मत्तय १०:४२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा