संपत्ती व गरीबी यांचे धोके
पवित्र शास्त्र संपत्तीला कमी दर्जाचे लेखते आणि गरीबीची शिफारस करते का? बहुतेक लोकांना तसेच वाटते. पण याविषयीची दोन नीतीसूत्रे याचे स्पष्टीकरण आम्हास देतात.
नीतीसूत्र १०:१५ म्हणतेः “धनवानाचे धन हे त्याचे बळकट नगर होय, परंतु गरीबांचा नाश त्यांच्या दारिद्र्यात आहे.” पुढे १६व्या वचनात म्हटले आहेः “धार्मिकाचा उद्योग जीवनप्रद आहे, दुर्जनाची समृद्धि पापाला कारण आहे.” आता ही दोन्ही वचने एकमेकांची कशी पूर्णतादर्शक आहेत ते लक्षात आणा.
वचन १५वे संपत्तीचा कोणता फायदा आहे आणि गरीबीकरवी कोणते नुकसान आहे त्याची माहिती देते. धनसंपत्ती ही माणसाला जीवनातील काही अनिश्चित गोष्टींत सहाय्य करु शकेल. पण तेच या अनपेक्षित गोष्टीना तोंड देण्यास आर्थिक दृष्ट्या सबळ नसल्यामुळे अधिक समस्या जाणवतात. अशाप्रकारे पवित्र शास्त्र वास्तवता स्पष्ट करते.—उपदेशक ७:१२.
तरीपण १५ वे वचन हे संपत्ती किंवा गरीबी यात समाविष्ट असणाऱ्या धोक्याची चुणूक दाखविणारे आहे या दृष्टीने समजले जाऊ शकते. बहुतेक धनवान माणसे आपणापाशी असणारी संपत्ती आपल्याला गरज असणारी सर्व तऱ्हेची सुरक्षितता पुरवू शकेल असे मानून ते पैशावर आपला पूर्ण आत्मविश्वास टाकतात. (नीतीसूत्रे १८:११) पण पैसा कोणाला देवाबरोबर चांगले नाव मिळविण्यास समर्थक ठरत नाही वा त्याला चिरकालिक सुखाची हमी देऊ शकत नाही. खरे म्हणजे संपत्तीच यामध्ये आडकाठी निर्माण करते. येशूने, आपली कोठारे मोडून ती मोठमोठी बांधणारा, पण देवाच्या दृष्टीने श्रीमंत नसणाऱ्या त्या धनवानाविषयीचा जो दाखला सांगितला तो याची साक्ष देतो. (लूक १२:१६-२१; १८:२४, २५) दुसऱ्या बाजूला पाहता, पुष्कळ गरीबांना वाटते की आपल्या गरीबीमुळे आपले भविष्य निराशाजनक आहे.
पण तेच १६ वे वचन या गोष्टीला कसे वळण देते ते बघा. कोणा धार्मिक माणसाकडे आर्थिकदृष्ट्या बहुत असले की अल्प असले तरी त्याचे काम वा उद्योग त्याला सुखदायी ठरतो असे ते म्हणते. आपल्या परिश्रमामुळे जो आर्थिक लाभ त्याला घडतो त्याला तो देवाबरोबरील आपल्या नातेसंबंधात बाधा आणू देत नाही. उलटपक्षी, धार्मिक माणसाच्या जीवनातील परिश्रम त्याला सध्याच्या सौख्यानंदासोबत भावी काळातील सार्वकालिक जीवनाची हमी देखील देतात. (इयोब ४२:१०-१३) पण दुष्टाने जरी अमाप संपत्ती मिळविली तरी त्याचा लाभ प्राप्त होत नाही. धनाचे संरक्षणयुक्त मोल आणि देवाच्या इच्छेनुरुप जीवन व्यतित करणे याविषयीची रसिकता बाळगण्याऐवजी तो आपल्या संपत्तीचा उपयोग पापयुक्त जीवनासाठी करतो.