“बोलण्याचा समय”—केव्हा?
मेरी वैद्यकीय मदतनीस म्हणून दवाखान्यात काम करते. तिने तिच्या कामाची गोपनीयता राखावी ही एक अट आहे. तिच्या कामासंबंधीचे कागदपत्र व माहिती अनधिकृत व्यर्क्तिच्या हाती जाण्यापासून तिने दूर राखणे होते. रुग्णांची गुप्त माहिती उघड करण्यावर तिच्या राष्ट्राच्या कायद्यात बंदी होती.
एके दिवशी मेरी पेचात पडली. वैद्यकीय अहवाल तयार करीत असता तिला अशा माहितीचा सुगावा लागला की एक रुग्ण जी समविश्वासू ख्रिश्चन आहे तिने गर्भपात करवून घेतला होता. तिच्यावर मंडळीतील वडीलांपुढे ही माहिती, जरी ते तिला तिच्या नोकरीस गमावण्याप्रत, तिच्यावर दंड भरण्याची वेळ आणण्याप्रत किंवा तिच्या मालकावर कायदेविषयक समस्या येण्याप्रत निरविणार होती, तरीही उघड करण्याची शास्त्रवचनीय जबाबदारी होती का? किंवा नीतीसूत्रे ११:१३ गोष्टींची गुप्तता राखण्याविषयी जे म्हणते त्याचे तिने समर्थन धरावे? ते वचन असे म्हणतेः “लावालावी करीत फिरणारा गुप्त गोष्टी उघड करतो, पण ज्याच्या चित्ती इमान वसतो तो गोष्टींची गुप्तता पाळतो.”—पडताळा नीतीसूत्रे २५:९, १०.
अशाप्रकारच्या परिस्थितीला यहोवाचे साक्षीदार वारंवार तोंड देतात. मेरीप्रमाणे तेही राजा शलमोनाने जे न्याहाळले होते त्याविषयी दक्ष आहेत कीः “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतोः . . . मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.” (उपदेशक ३:१, ७) तर मग, मेरीसाठी हा समय मौन धरण्याचा होता की तिला जे समजले होते ते बोलण्याचा होता?a
परिस्थितीमध्ये भिन्नत्व असू शकते. तथापि, प्रत्येक प्रकरण विशिष्ठ पध्दतीने हाताळले जावे याबद्दल मेरीने हाताळले होते तसेच प्रत्येकाने प्रकरणे हाताळावीत असे खास दर्जे घालून देणे अशक्य ठरेल. अशाप्रकारच्या परिस्थितीस कोणा ख्रिश्चनाला तोंड देणे आहेच तर त्याने समाविष्ठ अशा सर्व बाजूंचा विचार करण्याची तयारी राखली पाहिजे व मग, पवित्र शास्त्रीय तत्वे आणि कायदेशीर बाबी यावर आधारीत असा योग्य तो निर्णय घ्यावा की ज्यामुळे त्याच्या वा तिच्या विवेकभावास देवासमोर शुध्दतेत राखले जाईल. (१ तीमथ्य १:५, १९) पातके लहान व मानवी अपूर्णतेमुळे घडलेली असतात त्यावेळी हे तत्व लागू पडतेः “प्रीती पापांची रास झाकते.” (१ पेत्र ४:८) पण गंभीर पातक दिसते तेव्हा निष्ठावान ख्रिस्ती देवावरील व त्याच्या सोबतीच्या ख्रिस्तीजनांवरील प्रीतीमुळे त्याला जे माहीत आहे ते उघड करील का की ज्यामुळे पातक्यास स्पष्टपणे मदत प्राप्त होईल व मंडळीची शुध्दता अबाधित राखली जाईल?
पवित्रशास्त्र तत्वे लागू करणे
येथे कोणती मूलभूत पवित्रशास्त्र तत्वे लागू पडतात? पहिले, जो कोणी गंभीर पातक करीत असतो त्याने ते दडविण्याचा प्रयत्न करु नये. “जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही; जो ते कबूल करुन सोडून देतो त्याजवर दया होते.” (नीतीसूत्रे २८:१३) यहोवाच्या नजरेतून काहीच चुकत नाही. गुप्त गोष्टी सरतेशेवटी उघडकीस येतील. (नीतीसूत्रे १५:३; १ तीमथ्य ५:२४, २५) यहोवा गुप्त चुका वेळेवर मंडळीच्या सभासदांच्या नजरेत आणून देतो की ज्याविषयी योग्य लक्ष दिले जावे.—यहोशवा ७:१-२६.
आणखी एक पवित्रशास्त्र मार्गदर्शिका लेवीय ५:१ मध्ये दिसतेः “तू काही पाहिले किंवा जाहीर शाप्पोचरण ऐकले काय असे कोणास साक्षीदार या नात्याने प्रतिज्ञेवर विचारले असता तो काही सांगत नाही, हे पातक त्याच्याकडून घडले तर त्याच्या दुष्कर्माचा त्याला जाब द्यावा लागेल.” हे जाहीर “शाप्पोचरण” धर्मभ्रष्टता किंवा धर्मनिंदकपणा नव्हता. याऐवजी हे बहुदा असे घडत असे की ज्याच्याविरुध्द हे पातक घडले आहे तो ज्याने ते पातक केले व ज्याची अद्याप ओळख पडलेली नाही त्याच्याविरुध्द जाहीर शाप—बहुधा तो यहोवाकडून येवो असे वदवितो त्यावेळी या संभाव्य साक्षीदाराने त्याला न्याय मिळण्यास मदत द्यावी ही त्याची अपेक्षा राही. हे एखाद्यास शपथेच्या बंधनाखाली घालण्याप्रमाणे होते. ज्याच्याकडून ते पातक घडले आहे ते पाहिलेल्या कोणाही साक्षीदारास याची माहिती असावी की कोणावर अन्याय झाला आहे व यामुळेच त्याच्यावर चूक शाबीत करण्यास पुढे येण्याची जबाबदारी असे. तसे न केल्यास त्याला “त्याच्या चुकीबद्दल(चे) उत्तर” यहोवापुढे द्यावे लागणार होते.b
विश्वातील सर्वोच्च अधिकाऱ्याकडून आलेली ही आज्ञा प्रत्येक इस्त्राएलावर त्याने पाहिलेल्या कोणत्याही गंभीर पापाची हकीकत न्यायाधिशापुढे देण्याची जबाबदारी टाकत होती, ज्यामुळे प्रकरणाचा छडा लावला जाई. ख्रिस्ती हे जरी मोशाच्या नियमशास्त्र वर्चस्वाखाली नसले तरीही त्याची तत्वे ख्रिस्ती मंडळ्यात अद्यापि लागू होतात. तथापि, अशीही काही वेळ येते जेव्हा ख्रिस्ती सदस्य वडीलांपुढे एखादे प्रकरण आणण्याच्या बंधनाखाली येतो. खाजगी दप्तरात जे काही सापडते ते अनधिकृत व्यक्तीपुढे आणणे हे काही राष्ट्रात कायदेभंग कृत्ये ठरते ही वस्तुस्थिती आहे. तरीपण ख्रिश्चनास प्रार्थनापूर्वक विचार केल्यानंतर जर वाटते की, कनिष्ठ अधिकाऱ्यांची मागणी असली तरीही देवाची आज्ञा त्याजकडून, त्याला जे माहीत आहे ते कळवावे याची अपेक्षा धरते तर तो यहोवापुढे ती जबाबदारी स्विकारीत असतो. असेही प्रसंग येतात जेव्हा की ख्रिश्चनाने “मनुष्यापेक्षा अधिकारी यानात्याने देवाचे ऐकले पाहिजे.”—प्रे. कृत्ये ५:२९.
शपथा किंवा गंभीर अभिवचने केव्हाही हलक्या प्रतीची समजू नयेत असे असले तरीही, असेहि प्रसंग उद्भवतात जेथे मानव जी प्रतिज्ञा दुसऱ्यापासून घेतो ती आम्ही आमच्या देवाला निष्ठावान भक्ती द्यावी या गरजेच्या विरोधात उभी ठाकते. कोणी गंभीर पाप करतो त्यावेळी तो यहोवाकडून जणू, ‘जाहीर शापाखाली’ येत असतो. (अनुवाद २७:२६; नीतीसूत्रे ३:३३) ख्रिस्ती मंडळीचा भाग बनणारे सर्वजण, मंडळीची शुध्दता राखण्यामध्ये ते जे काही वैयक्तिकपणे करतात आणि इतरांनी शुध्द राहावे म्हणून जी मदत देतात त्याकरवी स्वतःला “प्रतिज्ञे”खाली आणीत असतात.
वैयक्तिक जबाबदारी
ही काही पवित्रशास्त्रीय तत्वे आहेत ज्याचा मेरीने तिचा स्व-निर्णय घेण्यात विचार केला होता. सूज्ञता हेच सांगत होती की प्रकरणाचा गंभीरपणे विचार न करता तिने झटकन काहीही करु नये. पवित्र शास्त्र सूचना देतेः “आपल्या सोबतीच्या मनुष्याविरुध्द विनाकारण साक्ष देऊ नको, तुझ्या वाणीने तुला मूर्ख ठरावे लागेल.” (नीतीसूत्रे २४:२८) निर्णायकपणे प्रकरणे शाबीत करण्यासाठी कमीत कमी दोन प्रत्यक्ष साक्षीदारांची साक्ष आवश्यक आहे. (अनुवाद १९:१५) मेरीने गर्भपात केल्याची संक्षिप्त नोंद केवळ पाहिली असती तर तिने जागरुकपणे निश्चय केला असता की चुकीबद्दलचा कोणताही पुरावा निर्णायक नसल्यामुळे तिने पुढे जाऊ नये. कदाचित बील तयार करताना लिखाणामध्ये चूक घडली असावी वा कागदपत्रातील माहितीवरुन वस्तुस्थिती सुस्पष्ट होत नसावी.
तथापि, या विशिष्ट प्रकरणाच्या बाबतीत मेरीजवळ इतर काही अर्थपूर्ण माहिती होती. उदाहरणार्थ, तिला माहीत होते की बहिणीने बिलाचे पैसे चुकते केले होते याचा अर्थ तिने विशिष्ट उपचार प्राप्त केला होता याचा तो पुरावा होता. तसेच तिला वैयक्तिकपणे ती बहीण सडी होती हे माहीत होते व त्यामुळेच व्यभिचाराची दाट शक्यता निर्माण झाली. ज्या बहिणीने ही चुक केली होती तिला प्रेमळपणे मदत करावी हे मेरीला नीतीसूत्रे १४:२५ च्या स्मरणाने कळून आलेः “खरा साक्षी लोकांचे प्राण सोडवितो, परंतु लबाडखोर दगलबाजी करतो.”
मेरी कायदेबध्द परिणामाबद्दल थोडीफार भयभीत होती परंतु वैद्यकीय खाजगी अहवालाची गुप्तता राखण्यापेक्षा या परिस्थितीत पवित्र शास्त्र तत्वे अति महत्वाची आहेत असे तिला वाटले. बहिणीने चिडखोर बनावे व उद्विग्न बनून स्वतःवर अधिक त्रास ओढावू नये असाही तिने विचार केला. यास्तव, तिच्याजवळ उपलब्ध असणाऱ्या सर्व सत्य माहितीचा तिने विचार केला तेव्हा तिने जाणीवपूर्वक ठरविले की हा समय “मौन धरण्याचा” नव्हे तर “बोलण्याचा” होता.
आता मेरी अजून एका पेचदायक प्रश्नात पडलीः तिने कोणासोबत बोलावे व हे ती दक्षतेने कशी करु शकेल? ती तडकपणे वडीलांकडे जाऊ शकत होती, पण तिने, कोणाला कळू न देता त्या बहिणीकडे प्रथम जाण्याचे ठरविले. हा प्रेमळ पवित्रा होता. मेरीने विचार केला की यामुळे संशयात असलेल्या व्यक्तिला स्पष्टीकरण करण्याची संधि मिळेल आणि काही चूक आहे तर संशयाची खात्री होईल. बहिणीने या प्रकरणाबाबत वडीलांसोबत अगोदरच बोलणी केलेली असल्यास ती तसे मेरीला सांगेल व मग मेरीला ते प्रकरण पुढे नेण्याची गरज राहणार नाही. मेरीने अनुमान केले की बहिणीने गर्भपात करवून घेतला होता आणि ह्या देवाच्या नियमाविरुध्दच्या गंभीर पातकाची तिने कबुली दिली नसेल तर ती तिला तसे करण्यास उत्तेजन देईल. मग वडीलवर्ग तिला याकोब ५:१३-२० प्रमाणे मदत करु शकतील. खरे म्हणजे अगदी असेच घडले होते. मेरीला आढळले की बहिणीने गर्भपात मोठ्या दबावाखाली व आध्यात्मिक दुर्बळतेमुळे करवून घेतला होता. लज्जा व भीतीने तिला पाप दडविण्यास चालना दिली. पण आध्यात्मिक सुधारणा घडावी याकरता वडीलांकडून मदत प्राप्त करण्यास ती आनंदी होती.
मेरीने प्रथमतः वडील मंडळास हे वृत्त कळविले असते तर त्यांनाही अशाच निर्णयास तोंड द्यावे लागले असते. त्यांनी त्यांना प्राप्त झालेल्या गुप्त माहितीचा शहनिशा कसा लावला असता? त्यांना कळपाचे मेंढपाळ म्हणून त्यांच्याकडून यहोवा व त्याचा शब्द ज्याची अपेक्षा धरतो त्याच्या आधारावर निर्णय घ्यावा लागला असता. त्यांना प्राप्त झालेल्या अहवालात, मंडळीसोबत क्रियाशील संबंध राखून असणाऱ्या बाप्तिस्मा झालेल्या सदस्याचा संबंध आहे तर मग मेरीने केले तसे त्यांना पुढे कारवाई करायची का ते ठरविण्यासाठी पुराव्याची पारख करण्याची जरुरी होती. मंडळीत “खमीरा”सारख्या परिस्थितीची दाट शक्यता आहे तर त्यांना, या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी न्यायदान समितीची नेमणूक करण्याची गरज होती. (गलतीकर ५:९, १०) संशयात असणाऱ्या बहिणीने तिच्या कृतीमुळे याच्या परिणामात सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे व काही काळ कोणत्याही सभेस उपस्थित राहिली नाही आणि आपल्याला यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखू देत नसेल तर वडील वर्गाला, तिने साक्षीदार म्हणून आपली पुन्हा ओळख देण्याची सुरुवात करीपर्यंत हे प्रकरण शांत ठेवावे असेही ठरवावे लागले असते.
पुढील विचार करणे
मालकांना आपल्या ख्रिस्ती कामगारांपासून “परिपूर्ण चांगल्या इमानीपणाची”, ज्यात गुप्ततेचे नियम पाळणे समाविष्ठ आहे याची अपेक्षा करण्याचा हक्क आहे. (तीतास २:९, १०) प्रतिज्ञा दिली असेल तर ती हीन दर्जाची समजू नये. एखादी प्रतिज्ञा अभिवचनास अधिक गंभीर व बंधनकारक बनविते. (स्तोत्रसंहिता २४:४) कायदा जेथे गुप्ततेच्या आवश्यकतेवर अधिक भर देतो तेथे प्रकरण फारच गुंतागुंतीचे बनते. या कारणास्तव कोणी ख्रिश्चन प्रतिज्ञा देतो किंवा स्वतःला गुप्तता राखण्याच्या बंधनाखाली घालतो त्यापूर्वी त्याने, मग ती नोकरी असो की इतर काही असो, पवित्र शास्त्र गरजांच्या विरोधात शक्य तेवढ्या कोणकोणत्या समस्या उभ्या राहणार याचे निदान करणे सूज्ञपणाचे ठरेल. कोणी बांधव वा बहीण आपला ग्राहक आहे तर एखादा असे प्रकरण कसे हाताळील? बहुदा डॉक्टर, दवाखाने, न्यायालये व वकील अशाप्रकारातील व्यवसायात काम करणे समस्या वाढवू शकेल. आम्ही कैसराच्या आज्ञा वा एखाद्या प्रतिज्ञेच्या गांभिर्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. पण यहोवाची आज्ञा सर्वोच्च आहे.
अपेक्षित समस्या दृष्टीपथात ठेवून वकील, डॉक्टर व हिशेबनीस इत्यादि व्यवसायात काम करणाऱ्या बांधवांनी लिखित स्वरुपाची मार्गदर्शक रुपरेषा तयार केली व त्यांच्याकडे सल्लामसलत विचारावयास येणाऱ्या बांधवांना, यांनी त्यांजपुढे कोणतीही गुप्तता उघड करण्याआधी ती वाचण्यास दिली. अशाप्रकारे काही गंभीर गोष्ट उजेडात येईल तर अगोदरच समजदारीची आवश्यकता आहे की चूक करणाऱ्यास प्रकरणाविषयी त्याच्या मंडळीतील वडिलांकडे जाण्यास उत्तजेन देण्यात येईल. हे समजण्यासारखे आहे की तो जर गेलाच नाही तर मग सल्लागाराला स्वतः वडिलांकडे जाण्याचे बंधन वाटू लागेल.
असेही प्रसंग असतील ज्यावेळी देवाच्या विश्वासू सेवकांना देवाच्या वचनाच्या त्याच्या ज्ञानावर आधारीत व्यक्तीगत खात्रीने गुप्ततेच्या गरजांना इश्वरी आज्ञेच्या सर्वोच्चतेमुळे दुर्लक्षित करावयास किंवा न जुमानण्यास चालना दिली असेल. याकरता धाडस व दुरदर्शीपणा जरुरीचा आहे. एखाद्याच्या स्वातंत्र्याची हेरगिरी करणे हे यात उद्दिष्ट नसून चूक केलेल्यास व ख्रिस्ती मंडळी शुध्द राखण्यात मदत करणे हे आहे. पापामुळे होणाऱ्या लहान चुकाकडे दुर्लक्ष केले जावे. येथेच, “प्रीती पापाची रास झाकते” व आम्ही “साताच्या सत्तर वेळा” क्षमा करावी. (मत्तय १८:२१, २२) हा “मौन धरण्याचा समय” आहे. परंतु मोठे पातक दडविण्याचा प्रयत्न असेल तेव्हा तो “बोलण्याचा समय” असेल.
[तळटीपा]
a मेरी, काही ख्रिस्तीजन ज्या परिस्थितीला तोंड देतात त्याला तोंड देणारी काल्पनिक व्यक्ती आहे. ती ज्याप्रकारे परिस्थिती हाताळते ते अशाच परिस्थितीमध्ये काहींनी पवित्र शास्त्र तत्वे कशी लागू केली त्याचे प्रतीक आहे.
b केली डेलीट्झ आपल्या कॉमेन्ट्री ऑन द ओल्ड टेस्टमेन्ट या पुस्तकात म्हणतात की कोणा माणसाला “दुसऱ्याच्या गुन्ह्याविषयी काही माहिती आहे, त्याने ते पाहिले असेल किंवा इतर कोणत्याही विशिष्ठ मार्गी लक्षात आले आहे व गुन्ह्याची खात्री पटविण्यासाठी साक्षीदार म्हणून न्यायालयापुढे जाण्याच्या पात्रतेचा आहे; गुन्ह्याच्या जाहीरपणे होणाऱ्या चौकशीत तो न्यायाधिशाने ही गंभीर शपथ देण्याची की, ज्याला प्रकरणाची माहिती आहे त्याने साक्षीदार म्हणून पुढे येऊन सांगावे, हे ऐकतो तरी त्याकडे दुर्लक्ष करतो व आपण पाहिलेले वा कळालेल्या गोष्टी सांगण्याचे नाकारतो” तो आपणावर चुकीचा आणि पाप करण्याचा दोष आणीत होता.
[३१ पानांवरील चित्रं]
चूक केलेल्या साक्षीदाराला वडील त्याची समस्या दयाळू व समजूतदार मार्गाने हाताळतील हा आत्मविश्वास राखून बोलावे असे उत्तेजन देणे हा योग्य व प्रेमळ मार्ग आहे