युवकांनो, तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या प्रगतिशील आहात का?
“तुझी प्रगति सर्वांस दिसून यावी म्हणून तू या गोष्टींचा अभ्यास ठेव. यात गढून जा.”—१ तीमथ्यी ४:१५.
१, २. आध्यात्मिकदृष्ट्या प्रगतिशील असण्याचा काय अर्थ होतो व काय होत नाही?
आध्यात्मिकदृष्ट्या प्रगतिशील असण्याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ आपल्या जीवनात आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थान देणे. हेच येशू व तीमथ्याने केले. तुम्ही आध्यात्मिकदृष्टया प्रगतिशील आहात तर तुम्हाला आपल्या जीवनाचे काय करायचे ते समजेल. “मी जेव्हा मोठा होईन तेव्हा यहोवाची सेवा करण्याविषयीचा विचार करीन,” असे तुम्ही म्हणणार नाही. होय, तुम्ही त्याची सेवा आत्ताच सुरु कराल!
२ उलटपक्षी, आध्यात्मिकदृष्ट्या प्रगतिशील असणे याचा भिक्षुक बनणे, धार्मिक दिखावा करणे किंवा धार्मिक गोष्टींच्या वाचनाची फाजील आवड आहे हे दाखविणे असा अर्थ नाही. शिवाय, दुःखी असणे, गंभीर होणे आणि समाजप्रिय नसणे हाही त्याचा अर्थ नाही. (योहान २:१-१०) यहोवा आनंदी देव आहे आणि त्याला वाटते की त्याच्या पृथ्वीवरील मुलांनी सुध्दा आनंदी राहावे. या कारणास्तव क्रिडा आणि इतर करमणुकीच्या कार्यक्रमात संयमाने घेतलेला भाग याला देवाची संमती आहे.—१ तीमथ्यी १:११; ४:८.
बाप्तिस्मा हा याचा पुरावा आहे
३. तीमथ्याचा बाप्तिस्मा केव्हा झाला असावा?
३ कोणी युवक बाप्तिस्म्याची तयारी करुन तो घेतो, तर तो आध्यात्मिकदृष्ट्या प्रगतिपथावर असल्याचे ते चिन्ह आहे. तीमथ्यी प्रेषित पौलाचा सुवार्तिक सोबती बनला त्यावेळी तो युवकावस्थेत होता असे सांगितले गेले आहे तर याचा अर्थ त्याचा बाप्तिस्मा पंधराव्या किंवा तेराव्या वर्षी झाला असावा. त्याला बाळपणापासूनच शास्त्रवचनांचे शिक्षण मिळाले होते त्यामुळे त्याच्याठायी पुरेसे ज्ञान व समज वाढली तेव्हा त्याने बाप्तिस्मा घेण्यात माघार घेतली नाही.—२ तीमथ्यी ३:१५.
४. फिलिप्पाला कोणता प्रश्न विचारण्यात आला, आणि जरी या प्रश्नकर्त्याने ख्रिस्ताविषयी नुकतेच शिकून घेतले होते तरी फिलिप्पाने त्याची विनंति का मान्य केली?
४ तर मग तुम्हा युवकांचे काय? तुम्हाला सुध्दा शास्त्रवचनांचे शिक्षण मिळाले आहे ना? तुम्ही हा प्रश्न विचारात घेतला आहे काः “मला बाप्तिस्मा घेण्यास काय अडचण?” हाच प्रश्न पहिल्या शतकात शास्त्रवचनांचा चांगला परिचय असणाऱ्या पण ज्याला नुकतेच ख्रिस्ताविषयी शिकण्यास मिळाले होते त्या गृहस्थाने विचारला होता. हे खरे की, देवाच्या उद्देशाविषयी जाणून घेण्याजोगी सर्व माहिती या माणसाला नव्हती, तरीपण जे काही त्याला ज्ञात होते त्याविषयीच्या रसिकतेने तो भारावून गेला असावा. यामुळेच शिष्य फिलिप्पाला त्याला बाप्तिस्मा न देण्यासंबंधी कोणतेही पटण्याजोगे योग्य असे कारण आढळले नाही.—प्रे. कृत्ये ८:२६-३९.
५. तुम्हाला बाप्तिस्मा घेण्यासाठी काय काय करावे लागेल?
५ तर आता तुम्हाला बाप्तिस्मा घेण्यात कोणती अडचण आहे? बाप्तिस्मा घ्यावयाचा आहे तर अर्थात त्यात काय गोवलेले असते त्याची पूर्ण समज तुम्हाला झाली पाहिजे. तुमचे यहोवा देवावर प्रेम असल्यामुळे तुम्ही त्याची सेवा करण्याची इच्छा खरेपणाने बाळगण्यास हवी. याकरता तुम्हाला प्रार्थनेद्वारे त्याला स्वतःचे व्यक्तिगत समर्पण करावे लागेल. यासोबत देवाच्या नैतिक गरजांना तुम्ही चिकटून राहण्यास हवे आणि आपला विश्वास इतरांमध्ये सहभागी करण्याचा तुम्हाला पुरेसा अनुभव असण्यास हवा. अशाप्रकारे तुम्ही पात्र झाल्यावर मग पुढे होऊन बाप्तिस्मा घेतला पाहिजे.—मत्तय २८:१९, २०; प्रे. कृत्ये २:३८.
६. बाप्तिस्म्याची कशासोबत तुलना करता येईल, व त्यानंतर काय होण्यास हवे?
६ बाप्तिस्मा घेतल्यामुळे तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या प्रगतिशील आहात हे दिसत असले तरी बाप्तिस्मा ही नुसती सुरुवात असते हे लक्षात असू द्या. यहोवाला आपले समर्पण केल्यामुळे तुम्ही, सैतानाकरवी अधिपत्य केल्या जाणाऱ्या या जगाला परके होत असता. याकरताच समर्पणाची तुलना, देवाच्या नव्या व्यवस्थेमधील सार्वकालिक जीवनासाठी पाऊल उचलणे याजशी करता येईल आणि बाप्तिस्मा विधि हा या गोष्टीची पुष्टी इतर साक्षीदारांसमोर प्रदर्शित करीत असतो. (योहान १२:३१; इब्रीकर ११:१३) यानंतर देवाकडील सार्वकालिक जीवनाचे दान मिळवून घेण्यासाठी तुम्ही आपल्या समर्पणास विश्वासूपणे जागले पाहिजे.—रोमकर ६:२३.
वागणूकीद्वारे ते प्रदर्शित होते
७. तुम्ही जगातील गोष्टींविषयी राखलेली प्रवृत्ति तुमच्या आध्यात्मिक प्रगतिसोबत कोणता संबंध दर्शवीत असते?
७ तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या प्रगतिशील आहात की नाही हे तुम्ही जगातील गोष्टींविषयी जी प्रवृत्ति राखता त्याकरवी प्रदर्शित होत असते. कोणत्या त्या गोष्टी? त्यात मनमानी जीवनाक्रमण, मादक औषधे, लैंगिक स्वैराचार, अश्लील चित्रपट, वासना उद्दिप्त करणारे संगीत, घाणेरडी भाषा, ज्ञानेंद्रियांना सुखकर भासविणारे नृत्य, वंश व राष्ट्राभिमान इत्यादि गोष्टींचा समावेश आहे. (१ योहान २:१५; इफिसकर ५:३-५) युवकांना खासपणे दक्ष राहण्यास हवे. याविषयी तुम्ही जी वागणूक प्रदर्शित करता त्याकरवी तुमचे आध्यात्मिक आरोग्य कसे आहे हे दिसत असते हे ध्यानात घ्या.—नीतीसूत्रे २०:११.
८. काही युवक बाप्तिस्मा घेण्यात मागेपुढे का पाहतात?
८ जगातील अनैतिक मार्ग खूपच आकर्षित भासविण्याचा सैतानाचा प्रयत्न असतो. खरे म्हणजे एका १५ वर्षे वयाच्या युवकाने म्हटलेः “आम्ही टीव्हीवर जितक्या अधिकपणे लैंगिक आचार व मादक औषधांविषयी बघतो तितक्या अधिकपणे आम्हाला समाजातील हा नित्याचा मार्ग आहे असे वाटायला लागते.” जे युवक जगातील गोष्टींत सहभागी होत नाहीत अशांना तऱ्हेवाईक आणि जीवनातील मजा हरपून बसता असे भासविले जाते. तुम्हाला असे कधी वाटले का? मंडळीसोबत संबंध राखणाऱ्या काहींना तसे वाटते व त्यामुळे ते अस्थिरपणा दाखवितात. बाप्तिस्मा घेण्याविषयी काय विचार आहे अशी विचारणा एका युवकाला करण्यात आली तेव्हा त्याने म्हटलेः “माझी आता इच्छा नाही, कारण माझ्या हातून असे काही होऊन बसेल ज्याद्वारे मला बहिष्कृत होण्याची पाळी येईल.” तरीपण तुम्ही कुंपणावर दोन्ही बाजूला पाय ठेवून उभे राहू शकत नाही तसेच दोन वेगवेगळ्या मतांमध्ये राहता येणार नाही. देवाच्या संदेष्ट्याने एकदा म्हटले होतेः “यहोवा हा देव असला तर त्याच्या भजनी लागा; बाल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा.”—१ राजे १८:२१.
९. आध्यात्मिकदृष्ट्या प्रगतिशील राहण्यामुळे कोणते संरक्षण आहे?
९ खरे म्हणजे, जगाच्या अनैतिक मार्गाला टाळल्यामुळे तुम्ही बहुतेक त्रास टाळत असता. “मी जे जीवन जगत होते त्याच्या वेगळेपणाची व तीव्र खेदाची प्रचंड भावना मला चिरडून टाकत आहे.” असे एका स्त्रीने कबूल केले. “यामुळे मी मजसाठी व ज्याला जन्म दिला त्या बाळासाठी जीवन हे व्यर्थतेचे केले.” होय, दियाबलाच्या जगातील आकर्षण व चकाकीपणा हा मृगजळासारखा फसवा आहे. त्यात कोणतीही अर्थपूर्ण गोष्ट नसते. जगाचे मार्ग अनुसरल्यामुळे विवाहाबाहेरील गरोदरपणा, विभक्त घरे, लैंगिकरित्या संक्रमित होणारे आजार आणि प्रचंड नैराश्य व दैन्यावस्था वाट्याला येते. तर मग हा सल्ला ऐका व आध्यात्मिकदृष्ट्या प्रगतिशील असाः “वाईटाचा त्याग करुन बरे ते कर.”—१ पेत्र ३:११.
१०. आध्यात्मिकदृष्ट्या प्रगतिशील असणारा युवक कोणती सूचना ग्रहण करील आणि कोणाचे उदाहरण अनुसरील?
१० आध्यात्मिकदृष्टया प्रगतिशील असणारा युवक प्रेषित पौलाच्या या सूचनेकडे लक्ष देईलः “दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजूतपणाबाबत प्रौढ असे व्हा.” (१ करिंथकर १४:२०) तरूण तीमथ्याने ही सूचना निश्चितार्थाने अवलंबिली. तुम्हाला वाटते का की त्याने त्याच्या काळातील स्वैराचारी युवकांची संगत धरली असावी? मुळीच नाही! त्याचे सोबती तर देवाचे सेवक होते. (नीतीसूत्रे १३:२०) याकरता त्याचे उदाहरण अनुसरा. कोणत्याही प्रश्नार्थक हालचालीत समाविष्ट होण्याचा प्रसंग आला तर स्वतःला हे विचाराः ही अशी गोष्ट तीमथ्याने किंवा येशूने केली असती का?
पवित्र शास्त्राभ्यासाकरवी ती प्रदर्शित होते
११. जगातील युवकांना कोणता देखावा दिसत नाही, पण तो कसा मिळविता व राखता येईल?
११ इटलीतील वर्ल्ड प्रेस रिव्ह्यु या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या लेखात म्हटले आहेः “दिवसेंदिवस युवकांतील संभ्रम व नैराश्य वाढत आहे, आणि कोणीही त्यांना प्रोत्साहनदायक भवितव्याचे उत्तेजन देऊ शकत नाही.” सैतानी जगतात अंध बनलेल्या डोळ्यांना देवाच्या वचनयुक्त नव्या जगाचा आणि तेथे जीवनप्राप्ती मिळविणाऱ्यांसाठी जे वैभवी भवितव्य थांबून आहे त्याचा देखावा दिसत नाही. (२ करिंथकर ४:४; नीतीसूत्रे २९:१८; २ पेत्र ३:१३) तरीपण आध्यात्मिकदृष्ट्या प्रगतिशील असणाऱ्या युवकांना हा देखावा दिसत आहे व तो नियमित पवित्र शास्त्राच्या अध्ययनाने स्पष्ट व तेजोमय राखला जातो.
१२. (अ) देवाविषयीचे ज्ञान आम्ही कसे प्राप्त करण्यास हवे? (ब) हे ज्ञान मिळविण्याची खटपट करणे योग्यच का आहे?
१२ देवाचे नवे जग तुम्हाला खरे वाटते का? ते वाटू शकेल पण त्याच्या प्राप्तीसाठी तुम्ही खरा प्रयत्न करण्यास हवा. पवित्र शास्त्राच्या समजावणूकीच्या बाबतीत तुम्ही गाढ इच्छा दाखविली पाहिजे ती अशी की, ‘तुम्ही रुप्याप्रमाणे त्याचा शोध कराल व गुप्तनिधिप्रमाणे त्याला उमगून काढाल.’ (नीतीसूत्रे २:१-६) खजिना शोधणाऱ्याला शोध करीत राहण्यात आणि याला कित्येक वर्षे लागली तरी यात हार न खाण्यात काय चालना देत असते? एके दिवशी आपल्याला ऐश्वर्य लाभेल या विचाराने, तो खजिना प्राप्त करण्याची त्याची उत्कट इच्छा. वस्तुतः ज्ञान हे भौतिक खजिन्यापेक्षा कितीतरी मोलवान आहे. “सार्वकालिक जीवन हेच आहे,” असे येशूने म्हटले, “तू जो एकच खरा देव त्या तुझे व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताचे ज्ञान संपादावे.” (योहान १७:३) येशूने हे जे म्हटले आहे त्यावर तुमचा विश्वास आहे तर मग पवित्र शास्त्राच्या अभ्यासाचा तुम्ही मोठ्या आस्थेने पाठलाग करणार व ही गोष्ट तुम्हाला असे प्रतिफळ देईल जी कोणत्याहि मोलवान रत्नापेक्षा निश्चितपणे अमोल ठरणार.—नीतीसूत्रे ३:१३-१८.
१३. आध्यात्मिकदृष्ट्या प्रगतिशील असणारे युवक अभ्यासाविषयीचे कोणते प्रस्ताव अनुसरतील?
१३ तुम्ही जितका अभ्यास कराल तितकी आध्यात्मिक अन्नाविषयीची तुमची क्षुधा अधिक वाढत आहे हे तुम्हाला दिसेल. यासाठीच अभ्यासाच्या चांगल्या पद्धतींचा अवलंब करा. नुसती उत्तरे अधोरेखित करू नका तर परिच्छेदात असणारी शास्त्रवचने काढून वाचा आणि मग पवित्र शास्त्र संदर्भाच्या अनुषंगाने असणारी वचने पडताळा. तुम्हाला १९३०-१९८५ वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स याच्या सहाय्याने अधिक संशोधन करता येईल. ते साहित्य कसे लागू करण्यात आले आहे त्याचे परिक्षण करा आणि त्याचा वापर कसा करता येईल ते सुध्दा पहा. तुम्ही जे अभ्यासता त्याविषयी इतरामध्ये चर्चा करा. यामुळे तुमच्या मनावर तो विषय बिंबवला जाईल आणि इतरांनाही संशोधन करण्याचे प्रोत्साहन मिळेल. तुम्ही असा प्रयत्न राखला तर तरुण तीमथ्याला जी सूचना देण्यात आली होती त्याचा अवलंब तुम्ही करालः “तुझी प्रगति सर्वांस दिसून यावी म्हणून तू या गोष्टींचा अभ्यास ठेव, त्यात गढून जा.”—१ तीमथ्यी ४:१५; २ तीमथ्यी २:१५.
सभा व कार्याद्वारे ती दाखविली जाते
१४. कशामुळे ख्रिस्ती सभा अधिक आवडीच्या वाटू लागतात आणि सभांना उपस्थित राहिल्यावर तुम्ही इतरांना कोणत्या मार्गाने प्रोत्साहन देऊ शकता?
१४ तुम्हाला पवित्रशास्त्राचा अभ्यास आवडू लागेल व त्याची तुम्ही चांगली तयारी केली तर ख्रिस्ती सभाही तुम्हाला मोठ्या सुखकारक वाटतील. (स्तोत्रसंहिता १२२:१; इब्रीकर २:१२) याकरवी तुम्हाला सभागृहातील चर्चेत अधिक भाग घ्यावासा वाटेल आणि इश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेत देखील उत्साहाने भाग घ्यावासा वाटेल. पण जेव्हा तुम्ही सभांना येता त्यावेळी “एकमेकांकडे लक्ष देणे” आणि “प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन” देण्याजोगे इतरही काही मार्ग आहेत. (इब्रीकर १०:२४, २५) उदाहरणार्थ, तुम्ही स्वतः पुढे होऊन इतरांसोबत बोलणी करता का? “नमस्ते, तुम्हाला भेटण्यास आनंद वाटला,” तसेच, “तुम्हाला आता बरे वाटते का?” ही प्रामाणिक विचारणा बरीच उत्तेजनात्मक वाटते आणि ती जर युवकाकडून आहे तर अधिक आत्मीयतेची वाटते.
१५. आवश्यक असणाऱ्या सेवेसाठी तुम्ही स्वतःला कसे सादर करू शकाल आणि ख्रिस्ताचे उदाहरण लक्षात ठेवणे का चांगले आहे?
१५ मंडळीत बरीच कामे असतात. तुम्ही यात सहभाग घेणार का? तीमथ्याने पौलासाठी, बाजारहाट करणे, धान्य आणणे, निरोप पोहंचविणे इत्यादि कामे केली असावीत. तुम्ही मंडळीत काही कामे केली नसली तर याविषयी मंडळीच्या वडीलांना आपली इच्छा बोलून दाखवा. तुम्हाला कदाचित सभेत नेमून दिलेल्या नेमणूका वाटण्यात, सभागृह स्वच्छ ठेवण्यात किंवा दुसरी काही जरुरीची सेवा करण्यात सहभाग घ्यावा असे सांगण्यात येईल. ख्रिस्तानेही आपल्या शिष्यांचे पाय धुतले होते हे आठवा, त्यामुळे आध्यात्मिक प्रगति राखणाऱ्यास कोणतेहि काम मानहानीचे वाटणार नाही.—योहान १३:४, ५.
१६. एका कॅथोलिक मासिकाने कोणते काम ख्रिस्ती जबाबदारी असल्याचे ओळखले?
१६ आम्ही इतर धर्मांकडे पाहिल्यावर, आपल्याला अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रचारकार्याच्या बाबतीत जी तालीम आमच्या सभांमध्ये मिळत असते त्याविषयी खरेच कृतज्ञतेचे वाटायला लागते. दोन वर्षांआधी यु. एस. कॅथोलिक मासिकात केनेथ गुंटर्ट यांनी लिहिलेः “माझी अशा काळात वाढ झाली जेव्हा कॅथोलिकांनी पवित्र शास्त्र वाचू नये असे म्हटले जात होते. कारण ख्रिश्चनांनी घरोघर जाऊन दार ठोकावे आणि लोकांना परिवर्तित करावे यासारख्या विचित्र कल्पना आपल्यात उभारल्या जातील असे मानले जात होते. मग व्हॅटीकन २ आले आणि मी पवित्र शास्त्र वाचू लागलो. आता मला खात्रीने वाटू लागले आहे की, ख्रिश्चनांनी घरोघर जावे आणि लोकांना परिवर्तित करावे.” त्यांनी पुढे म्हटलेः “अशा या कल्पनेमुळे मजठायी काही त्रस्तता उद्भवत नाही असे नाही; तरीपण जेव्हा तुम्ही स्वतः नवा करार वाचता तेव्हा हा निर्वाळा तुम्हाला टाळता येणे अशक्य आहे.”—मत्तय १०:११-१३; लूक १०:१-६; प्रे. कृत्ये २०:२०, २१.
१७. उपाध्यपण तुम्हाला केव्हा आनंददायी वाटू लागेल?
१७ होय, आरंभीचे ख्रिस्ती घरोघरच्या प्रचारकार्यात क्रियाशील होते आणि तीमथ्यासारखे युवक या उपाध्यपणात प्रौढांसोबत सहभागी झाले असावेत हे निर्विवाद आहे. तरीपण आज काहींना हे काम आनंदाचे वाटत नाही. ते का बरे? परिस्थितीशी जुळवून घेणे ही ती बाब आहे. उदाहरणार्थ, तुम्ही जेव्हा एखादा खेळ किंवा क्रिडा चांगलेपणाने खेळता तेव्हा तुम्हाला त्यात आनंद वाटत नाही का? हेच उपाध्यपणाच्या बाबतीत सुद्धा आहे. तुम्ही पवित्र शास्त्र आणि पवित्र शास्त्रावर आधारित असणारा संभाषणाचा विषय हाताळण्यात अधिक प्रभावशाली बनाल तसतसे तुम्हाला हे उपाध्यपण अधिक आनंददायी व विशेषतः कोणी तुमच्या या जीवन-प्रदायक ज्ञानात रस घेऊ लागला तर ते निश्चितपणे उत्साहाचे वाटेल. यासाठीच, आध्यात्मिकदृष्ट्या प्रगतिशील बना! घरोघरच्या सादरतेचा सराव करा. इतरांपासून सूचना मिळवा. यहोवाकडे मदतीसाठी प्रार्थना करा.—लूक ११:१३.
प्रौढांसोबतच्या नातेसंबंधाद्वारे
१८. येशू व तीमथ्यी यांनी प्रौढजनांसोबत कोणत्या प्रकारचे नातेसंबंध अनुभवले?
१८ येशू केवळ बारा वर्षांचा असताना त्याला प्रौढांसोबत वेळ घालविण्यात व त्यांच्यासोबत आध्यात्मिक गोष्टींची चर्चा करण्यात आनंद वाटला. त्याच्या आईवडिलाला तो एकदा “मंदिरात गुरुमंडळामध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांस प्रश्न करताना . . . आढळला.” (लूक २:४६) हेच तीमथ्याच्या बाबतीतही घडले. प्रेषित पौल व त्याच्या सहकाऱ्यांनी लिस्त्रा येथे भेट दिली तेव्हा त्यांच्या सहवासात राहण्यात तीमथ्याला आनंद वाटला आणि त्याने त्यांचे शिक्षण लक्ष देऊन ऐकले. त्याचा स्थानिक मंडळीसोबत जवळचा संबंध होता व त्यांनी त्याची खूपच प्रशंसा केली.—प्रे. कृत्ये १६:१-३.
१९. पौलाने तीमथ्याला आपल्या प्रवासातील सहकारी म्हणून का निवडून घेतले, आणि तीमथ्यी कसा साहाय्यक ठरला?
१९ तीमथ्याने इतरांची शारीरिक सेवा स्वेच्छेने केली तरी पौलाने त्याला आपल्या प्रवासातील सहकारी असे निवडून घेतले ते यासाठी की त्याच्याठायी लोकांच्या आध्यात्मिक गरजांविषयीची सेवा प्रदान करण्याची क्षमता होती. पौलाने थेस्सलनीका सोडून जावे म्हणून जमावाने दंगा केला तेव्हा पौलाने तरुण तीमथ्याला येथील नव्या शिष्यांचे सांत्वन व त्यांची उभारी करण्यासाठी पाठविले. अशाप्रकारे तीमथ्याला प्रौढजनांपासून शिक्षण घेण्याची आणि त्यांच्या सहवासात राहण्याची केवळ आवडच नव्हती तर तो त्यांना खऱ्या अर्थाने आध्यात्मिक मदत देणारा असा ठरला.—प्रे. कृत्ये १७:१-१०; १ थेस्सलनीकाकर ३:१-३.
२०. तुम्ही काय करण्यात सूज्ञ व्हाल आणि तुम्हाला वयस्करांची कशी सेवा करता येईल?
२० तुम्ही येशूचे व तीमथ्याचे अनुकरण केले तर सूज्ञ ठराल आणि प्रौढजनांच्या अनुभवापासून व ज्ञानाकडून बराच लाभ मिळवू शकाल. त्यांची संगत राखा आणि त्यांना प्रश्न विचारा. पण यासोबत त्यांना सहाय्य करून आपण आध्यात्मिक दृष्टीने प्रगतिशील आहोत हे दाखवून द्या. तुम्हाला कोणाचा बाजारहाट वा जरुरीची कामे करता येतील असे काही वृद्ध वा अपंग लोक आहेत का? तुम्हाला त्यांना नुसती भेटही देता येईल, त्यांना वाचन करून दाखविता येईल आणि तुम्हाला उपाध्यपणात जे अनुभव आले त्यांची सहभागिता त्यांच्याबरोबर करता येईल.
पालक व इतरांची भूमिका
२१. पालकांची भूमिका किती महत्वपूर्ण आहे, आणि कशावर अधिक जोर देण्याची आवश्यकता नाही?
२१ युवकांचे आध्यात्मिक आरोग्य हे बहुतांशी त्यांना त्यांच्या पालकांकरवी जे शिक्षण मिळते व त्यांच्यापुढे जे उदाहरण मांडले जाते त्यावर अवलंबून आहे. (नीतीसूत्रे २२:६) येशूला त्याच्या ऐहिक देवभिरू पालकांकडून जे मार्गदर्शन मिळाले त्याकडून निःसंशये लाभ घडला. (लूक २:५१, ५२) तीमथ्याला त्याची आई व आजी यांनी तालीम दिली नसती तर आध्यात्मिक प्रगति राखणारा मुलगा मुळीच होता आले नसते. (२ तीमथ्यी १:५; ३:१५) पवित्र शास्त्राच्या सूचना नियमित रुपाने प्रदान करणे किती महत्वाचे आहे हे अधिक जोर देऊन सांगण्याची गरज नाही. पालक या नात्याने तुम्ही त्या देत आहात का? किंवा त्याकडे दुर्लक्ष होत आहे?
२२. (अ) पालक जेव्हा कौटुंबिक पवित्र शास्त्राभ्यासाकडे महत्वपूर्ण या अर्थाने बघतात त्यावेळी मुलांवर याचा कसा परिणाम घडतो? (ब) पालकांनी आपल्या मुलांना कोणते मार्गदर्शन द्यावे?
२२ यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्यालयात असणारा एक तरुण म्हणतो की त्याच्या वाढत्या वयात त्याच्या कुटुंबातील नित्याचा भाग, घरातील मुलांसोबत होणारा साप्ताहिक पवित्र शास्त्राचा अभ्यास हा होता. “कधीकधी वडील कामावरुन इतक्या थकलेल्या स्थितीत येत की त्यांना अगदी गळून गेल्यासारखे वाटे. तरीही अभ्यास घेतला जाई व यामुळेच त्याच्या गंभीरतेविषयीची रसिकता आम्हा सर्वांठायी बळावली.” पालकहो, तुम्ही आपल्या मुलांबरोबर जर हा अभ्यास केला नाही तर ती आध्यात्मिक गोष्टींना अधिक महत्व देतील हे क्वचितच घडेल. याकरताच त्यांच्यापुढे पायनियरिंग, मिशनरी कार्याचे वा बेथेल सेवेचे ध्येय ठेवा. उपाध्यपण हे असे काम आहे ज्याला खरे भवितव्य आहे, असे हे भवितव्य दुसऱ्या कोणत्याहि जागतिक कामामध्ये मिळू शकणार नाही याची रसिकता त्यांच्याठायी उभारण्यात मदत करा.—पडताळा १ शमुवेल १:२६-२८.
२३. युवकांनी आध्यात्मिकदृष्ट्या प्रगति करावी याकरता मंडळीतील इतर कोणती मदत करू शकतात?
२३ युवकांनी आध्यात्मिकरित्या प्रगति करावी यासाठी इतरहि मदत पुरवू शकतील. तुम्ही त्यांच्यासोबत सभेला आल्यानंतर बोलण्याचे ध्येय ठेवा. याशिवाय त्यांना तुमच्या काही कार्यक्रमात सहभागी करण्याचा प्रयत्न करा. पालकांच्या अनुमतिने कोणा वडीलाला त्यांच्या मुलाला दुसऱ्या स्थळी ते देत असलेल्या भाषणाच्या नेमणूकीमध्ये सोबत नेता येईल किंवा कोठे बाहेर फिरण्यासाठी नेता येईल. (इयोब ३१:१६-१८) एखादी गोष्ट तशी पाहता लहान दिसत असली तरी तिचा खूप अर्थ होतो. एका फिरत्या देखरेख्याने पाहिले की त्यांचे भाषण लक्षपूर्वक ऐकणाऱ्या एका युवकाकडे स्वतःचे पवित्र शास्त्र नाही. तेव्हा त्यांनी त्याला एक पवित्र शास्त्र बक्षीस दिले. युवकाला बक्षीसासोबत त्याच्याविषयी जो जिव्हाळा दाखवला गेला त्याविषयी खूप आनंद वाटला. आता ३० वर्षे लोटली असताना देखील तो मुलगा, सध्या स्वतः वडील आहे तरी त्या बंधूचा प्रेमळपणा आठवून सांगतो.
२४. कोणती गोष्ट जाणणे मोठे थरारक वाटते, तर मग आमचा काय निश्चय असावा?
२४ ‘पहाटेच्या दहिवरासारखे असणारे तरुण’ आज हजारोंनी उत्साहवर्धक राज्याचा संदेश प्रसिद्ध करीत आहेत तसेच यांच्या सोबतीला “मंगल वार्ता प्रसिद्ध करणाऱ्या [युवतींची] मोठी सेना” देखील हेच कार्य करीत आहे हे जाणणे थरारक वाटत नाही का? या सर्वांनी आध्यात्मिकदृष्ट्या प्रगतिशील असावे आणि आम्ही सर्वांनी त्यांना तसे राहण्याची मदत द्यावी असेच घडो.
उजळणीसाठी प्रश्न
◻ बाप्तिस्मा केव्हा घ्यावयाचा हे ठरविण्यात युवकाला कोणती गोष्ट मदत करील?
◻ युवकाची वागणूक त्याच्या आध्यात्मिक प्रगतिचे परिमाण कशी ठरते? ◻ सभा व क्षेत्रकार्य यात आनंद मिळविण्यासाठी कोणती गोष्ट युवकाला साहाय्यक ठरेल?
◻ युवकांनी प्रौढांसोबत कशा स्वरुपातला नातेसंबंध वाढवावा?
◻ पालक व प्रौढ जन युवकांना कशी मदत देऊ शकतात?
[११ पानांवरील चित्रं]
तुम्हाला बाप्तिस्मा घेण्यास कोणती अडचण आहे?