मुलांना सभांमध्ये आणण्याची बंदी करावी?
‘देवाच्या घरात तान्ही बाळके व मुले आणू नयेत.’ अशाप्रकारचे उद्गार प्रसिध्द पवित्र शास्त्र विवेचनकार ॲडम क्लार्क यांनी बोलून दाखविले. तरीपण यामध्ये त्यांनी, गरीब मातांना, ‘घरी अनुपस्थितीत मुलाची काळजी घेण्यासाठी कोणी नसल्यामुळे’ सूट दिली. यांना आपली मुले चर्चला आणता येत होती, पण “यामुळे मंडळीला तसेच उपाध्यायाला मुलांच्या मध्येच रडण्यामुळे गैरसोय निर्माण होणार होती.”
क्लार्क यांनी आपला हा मुलेविरोधी कल नेहम्या ८:२ वर आधारला होता. ते वचन असे वाचण्यात येतेः “तेव्हा मंडळीतील स्त्रीपुरुषांपुढे व ज्यांस ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्या सर्वांपुढे एज्रा याजकाने तो धर्मग्रंथ आणिला.” तथापि, अशाप्रकारचे हे प्रतिपादन अनुवाद ३१:१२ मधील आत्म्याशी विसंगत ठरणारे आहे, जे म्हणतेः “सर्व लोकांना म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके . . . ह्यांना जमव म्हणजे ते ऐकून शिकतील.”—तसेच २ तीमथ्यी ३:१५ देखील पहा.
याच्या दृष्टीकोणातून बघता, या सभेची व्यवस्था करतेवेळी नेहम्याने कोणालाही वगळण्याचा विचार आणला होता हे दिसत नाही. उलटपक्षी, या आमंत्रणामागील उद्देश हा होता की “ज्यांस ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते” त्या सर्वांनी यावे व पूर्णपणे सहभाग घ्यावा! तर मग पालकांनी आपापली मुले घरी तशीच सोडून यावीत हे सांगणे किती मूर्खपणाचे झाले असते बरे!
यहोवाच्या साक्षीदारांना आपली तान्ही बाळके व मुले यांना ख्रिस्ती सभांना घेऊन येण्यास सांगितले जाते हे चित्तवेधक आहे. हे खरे की याकरवी पालकांना थोडा त्रास व थोडी उद्विग्नता निर्माण होते. पण ख्रिस्ती पालक आपल्या मुलांना शांत बसून राहण्याची तालीम देतात. काही काळातच त्यांची मुले “ऐकून समजण्याचे सामर्थ्य” प्राप्त करतील आणि जीवन-प्रदायक माहिती समजून घेतील ही आशा असते.—इब्रीयांस १०:२४, २५.