वाचकांचे प्रश्न
◼ नवीन जग येत आहे अशी परिभाषा वापरणे योग्य आहे का?
हा प्रश्न उचितपणे विचारण्यात आला आहे कारण ज्या ग्रीक शब्दाचे “जग” असे भाषांतर होते तो को‘समॉस शब्द मुलभूतरित्या मानवजात असा अर्थ देतो आणि देव नवीनच मानवी वंश बनविणार नाही. याशिवाय आम्हाला पवित्र शास्त्रात काई.नॉस को‘समॉस (शब्दशः, “नवीन जग”) अशी संज्ञा आढळत नाही.
परंतु को‘समॉस याचा पवित्र शास्त्र करीत असणारा वापर ख्रिश्चनाला, पृथ्वीवर पुनर्स्थापित होणाऱ्या नंदनवनास उल्लेखून दाखविताना “नवीन जग” ही संज्ञा उपयोगात आणण्याची मुभा देतो. द न्यू इन्टरनॅशनल डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट थिऑलॉजी विवेचीत करीते: “कोसमॉस हे नाम मूलतः इमारतीला सूचित करते पण ते खास अर्थाने व्यवस्थेला उल्लेखिते.” या शब्दाला आणखी काही विशिष्ठ अर्थ आहे असे तो शब्दकोष सांगतो, जसे की, “दागिने वा सुशोभितपणा,” “मानवी समाजातील नियमबद्द जीवन,” आणि “पृथ्वीतील निवासी, मानवजात.”
ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात को‘समॉस हा शब्द सबंध मानवी कुटुंब या अर्थाने वापरलेला आहे. त्यामुळेच आम्ही वाचतो की, ‘सर्वांनी पाप केले [म्हणजे, आदामाच्या सर्व अपूर्ण संततीने] व ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत.’ (रोमकर ३:१९, २३) पण तेच दुसरीकडे वाचतो: “देवाने जगावर [को‘समॉस] एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याजवर विश्वास ठेवतो. . . त्याला सार्वकालीक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) होय, ख्रिस्ताचे यज्ञार्पण विश्वास धरणाऱ्या मानवजातीतील प्रत्येकाला उपलब्ध आहे.
तद्वत, को‘समॉस शब्दाचा इतकाच पवित्र शास्त्र वापर असला तर मग “नवीन जग” येत आहे असे म्हणणे बरोबर दिसणार नाही. ते का बरे? कारण मानवजातीतील काही जण येणाऱ्या मोठ्या संकटातून वाचतील. यांना पुनर्स्थापित नंदनवनात जगण्याची संधि असेल. अशाप्रकारे देव नवा मानवी वंश, नवी मानवजात, लोकांचे नवे जग निर्माण करणार नाही. तथापि, पवित्र शास्त्र को‘समॉस शब्द केवळ सबंध मानवजातीस लागू करीत नाही.
उदाहरणार्थ, ग्रीक शब्द देवापासून दुरावलेल्या सबंध मानवजातीस सुद्धा सूचित करतो. इब्रीयांस पत्र ११:७ म्हणते: “विश्वासाच्या द्वारे [नोहाने] जगाला [को‘समॉस] दोषी ठरविले.” त्याने अर्थातच, मानवजातीतील प्रत्येकाकडे जाऊन धिक्कारले नाही, प्रत्यक्षात तो व त्याच्या कुटुंबातील सात सदस्य जलप्रलयातून वाचले. अशाचप्रकारे येशूनेही प्रार्थिले: “मी जगासाठी [को‘समॉस] विनंति करीत नाही तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी . . . जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.”—योहान १७:९, १४; पडताळा २ पेत्र २:५; ३:६.
आता आपण पवित्र शास्त्र को‘समॉस ज्या आणखी एका पद्धतीने वापर करते त्याकडे लक्ष देऊ. तो मानवी जीवनाची चाकोरी, व्यवस्था वा अंग याला अनुलक्षून आहे.a येशूने आपल्या विवेचनात असा वापर केला होता हे आपल्या लक्षात येते. त्याने म्हटले: “मनुष्याने सर्व जग [को‘समॉस] मिळविले व आपला जीव गमविला तर त्याला काय लाभ?” (मत्तय १६:२६) येथे ख्रिस्त कोणा व्यक्तीने ‘मावनजातीचे सर्व जग मिळविणे’ किंवा ‘देवापासून दुरावलेल्या मानवजातीच्या सबंध जगास प्राप्त करणे’ या अर्थी बोलत नव्हता. जडवादी व्यक्ती मानवजातीची नव्हे तर लोकांपाशी जे आहे, ते जे करतात व ज्याची व्यवस्था आखतात त्याविषयीची इच्छा धरते. प्रेषित पौलाला सुद्धा हे परीक्षण खऱ्याअर्थाने वाटले असावे कारण त्याने म्हटले की, विवाहीत पुरुष “जगाच्या गोष्टीविषयीची चिंता करतो.” याप्रमाणे ख्रिश्चनाने देखील ‘ह्या जगाचा उपयोग पूर्णपणे करू नये.’—१ करिंथकर ७:२१-३३.
या अर्थाने को‘समॉस चा अर्थ आ.योन‘ या ग्रीक शब्दाशी सदृश्य आहे जो “व्यवस्थीकरण” किंवा “युग” या अर्थाने वापरला जाऊ शकतो. (पहा एड टू बायबल अंडरस्टँडिंग, पृष्ठे १६७१-४.) काही प्रकरणात हे दोन्ही शब्द एकमेकांच्या बदलीने वापरता येतात असेही दिसते. को‘समॉस व आ.योन‘ यांच्यामधील सदृश्यतेची ही दोन उदाहरणे बघा: (१) पौलाने म्हटले की देमास याला “ऐहिक [आ.योन‘] सुख प्रिय असल्यामुळे” तो त्याला सोडून गेला. तथापि, प्रेषित योहानाने म्हटले की “जगावर [को‘समॉस] . . . प्रीती करू नका” कारण त्यापासून “देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराविषयीची फुशारकी” ही येतात. (२ तिमथ्यी ४:१०; १ योहान २:१५-१७) (२) योहान १२:३१ वचन “या जगाचा [को‘समॉस] अधिपति” विषयी सांगते आणि याचीच ओळख २ करिंथकर ४:४ “या युगाचा [आ.योन‘] देव” अशी दिलेली आहे.
तद्वत, को‘समॉस किंवा “जग” हा शब्द सबंध मानवजातीला त्याचप्रमाणे मानवी आटोक्यातील सर्व चाकोरीबद्ध गोष्टींना लागू करता येतो. या कारणामुळे आम्ही योग्यपणे व अचूकतेने “नवे व्यवस्थीकरण” किंवा “नवीन जग” येत आहे असे बोलू शकतो. ही नवी चाकोरी, नवी जागतिक व्यवस्था किंवा मानवी जीवनाचा नवा पैलू असेल. पृथ्वीवरील पुनर्स्थापित नंदनवनात वसतीस राहणारे बहुतेक सर्वजण जुन्या व्यवस्थकरणात राहिलेले असतील. तरीपण ते त्याच्यातून निभावून गेलेले असणार वा त्यांचे पुनरूत्थान झालेले असणार, त्यामुळे ते तीच मानवजात असतील. तथापि, देवापासून दुरावलेले मानवजातीचे जग आता नसल्यामुळे व देवाच्या प्रकटविलेल्या इच्छेनुसार आता नवी व्यवस्था अस्तित्वात आल्यामुळे पुनर्स्थापित नंदनवन नवीन जग असेल.
[तळटीपा]
a वर नमूद करण्यात आलेला शब्दकोश हेही दर्शवितो की प्राचीन, पवित्रशास्त्राबाहेर वापरल्या जाणाऱ्या ग्रीक भाषेतील “को‘समॉस जागतिक व्यवस्था किंवा जगाचे व्यवस्थीकरण याकरता मुलभूत संज्ञा होती.”
[३१ पानांवरील चित्रं]
नवीन जगात धार्मिक मानवजात नंदनवनात पुनर्स्थापित करण्यात येईल