वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ८/१ पृ. २६
  • विश्‍वासूपणाचे बक्षिस

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विश्‍वासूपणाचे बक्षिस
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • मिळती जुळती माहिती
  • “देव पक्षपाती नाही”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • प्रेम कुटुंबाचे ऐक्य घडवते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • अतिशय प्रिय असलेली पत्नी
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • “देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ८/१ पृ. २६

राज्य घोषकाचा वृत्तांत

विश्‍वासूपणाचे बक्षिस

सुमारे १५ वर्षे आधी, श्रीमती बी............... यांना इटलीमध्ये सत्य आढळले. त्यावेळी त्यांचे वय १५ होते. तथापि, त्यांनी सत्यात प्रगति केली नाही त्यामुळे त्यांनी सत्याबाहेरील व्यक्‍तीबरोबर विवाह केला. तरीपण त्यांच्या अंतःकरणात सत्याचे बीज मूळ धरून होते त्यामुळे एका वर्षापूर्वी त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु केला व त्या सभांना येऊ लागल्या. त्यांचे पति भयंकर विरोध करू लागले आणि त्यांना घराबाहेर काढण्याची धमकी देखील दिली. ते त्यांना इतकी मारहाण करीत की त्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागत. एका सायंकाळी राज्य सभागृहात सभा सुरु असताना ते तावातावाने आले, एका बंधुला चांगलाच टोला दिला, दारावरची काच मोडून टाकली व रागाने मोठ्याने आरडाओरडा केला.

त्या घरी परतल्या तेव्हा पती दार उघडत नाही असे दिसले. आपले धैर्य खचू न देता त्या पोलीस चौकीत गेल्या. घटनेची एकंदरीत माहिती पोलिसांना देऊन त्या आपल्या काकूंच्या घरी झोपण्यास गेल्या. दोन दिवसांनी पतीने त्यांना घरात घेतले.

ते गृहस्थ गावात बरेच प्रसिद्ध आहेत. त्यानी यहोवाच्या साक्षीदारांविरूद्ध गावात गवगवा सुरु केला आणि या लोकांनी त्यांचे कौटुंबिक जीवन उद्‌ध्वस्त केले आहे असे सांगू लागले. साक्षीदारांविरूद्धच्या या मोहिमेत त्यांना पाळकांचे पाठबळ मिळाले. एका पाळकांनी पुढील मजकुराचे स्टिकर्स तयार केले: “यहोवाचे साक्षीदारहो, या कुटुंबाची शांती भंगवू नका. धन्यवाद!” ही स्टिकर्स त्यांनी गावातील घराघराच्या दरवाज्यावर चिकटविली. लवकरच गावातील प्रत्येकजण यहोवाच्या साक्षीदारांबद्दल बोलू लागला व त्यांची थट्टा व उपहास करू लागला. असे असले तरी बांधवांनी धैर्य राखून घरोघरचे उपाध्यपण पूर्वीपेक्षा अधिक आवेशाने केले. ही स्टिकर्स आपल्या दारावर नकोत अशी बहुतेकांची इच्छा होती. पाळकांनी स्टिकर्स लावण्यासाठी हाताशी धरलेल्या कांही मुलांना त्यांनी १०० लिरा दिले होते असेही समजले.

मध्यंतरात श्रीयुत बी................ यांनी बायकोला म्हटले की त्यांनी आता कायदेशीररित्या विभक्‍त होण्याचे पाऊल उचलले असल्यामुळे तिने घरातून चालते व्हावे. पण आता गावातील परिस्थिती बदलण्यास आरंभ झाला होता. स्थानिक रेडिओ केंद्राने एक कार्यक्रम प्रसारित केला व त्यात वार्ताहराने गावात घडलेली घटना “संशयित कुरापत, वाईट शिष्टाचार” असल्याचे म्हटले. कार्यक्रमात आमच्या बांधवानी स्पष्ट केले की कित्येक कुटुंबांनी स्टिकर्स लावावेत अशी त्यांजवर जबरदस्ती करण्यात आली. हे काम दिवसाढवळ्या नव्हे तर रात्रीच्या अंधारात करण्यात आले हे याकरवी दिसले की कित्येक स्टिकर्स तर यहोवाच्या साक्षीदारांच्या तसेच जी कुटुंबे त्यांच्याकडून आनंदाने पवित्र शास्त्राचा अभ्यास घेत होती त्यांच्या घराच्या दारावर चिकटविण्यात आली. रेडिओच्या वार्ताहराने यहोवाच्या साक्षीदारांची स्तुती केली व म्हटले की हे लोक “सभ्यतेने वागणारे व दयाळू वृत्तीचे आहेत.”

सरतेशेवटी पतींनी न्यायालयात दाखल केलेला विभक्‍तीविषयीचा दावा न्यायाधिशांपुढे विचारविनिमयासाठी आला. न्यायाधिशांनी श्रीमती बी................ यांची, त्यांनी विभक्‍त होण्याची इच्छा दर्शविली नाही म्हणून प्रशंसा केली. त्यांनी खटल्याच्या निकालापर्यंत मुलांचा ताबा त्यांना दिला. त्यांना त्यांच्या घरात राहता येऊ शकणार होते व पतिने त्यांना महिन्याला २,५०० लिरा पोटगी द्यावी असेही म्हटले. यावर पतींनी हरकत घेऊन म्हटले: “घर माझ्या आईचे आहे तेथे बायकोला राहता येणार नाही.” तेव्हा न्यायाधीश त्यांना म्हणाले: “तुम्ही पती व बॉस राहू इच्छिता तुम्हाला वाटते की बायकोने तुम्हापुढे सारखे होयबा करीत राहावे. पण एकाच वेळी तिने नाही म्हटले तेव्हा तुम्ही सगळे गाव कसे डोक्यावर घेतले होते. तुमची बायको तुमच्याशी अप्रामाणिक असती तर मी समजलो असतो. पण ती कोणता धर्म पाळते याच्याशी तुमचा संबंध नाही.”

आता श्रीमती बी............... आनंदाने यहोवाची सेवा करीत आहेत. (मत्तय ५:१०) गावाच्या लोकांनी आपली प्रवृत्ती बदलली आहे व आता पवित्र शास्त्राविषयक अद्‌भूत चर्चा होत आहे. लोकांना कळाले की यहोवाचे साक्षीदार कुटुंबातील शांती भंगवीत नाहीत. आता काही घराच्या दरवाज्यांवर जरी स्टिकर्स असले तरी त्यांना काहीही अर्थ राहिलेला नाही.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा