“ऊब घ्या व तृप्त व्हा” असे नुसते बोलण्यापेक्षा करून दाखवा
“तुम्हातील कोणी [गरजवंत बांधवांना] म्हणतो, ‘सुखाने जा, उब घ्या, व तृप्त व्हा,’ पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ? . . . विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे.”—याकोबाचे पत्र २:१५–१७.
१. नायजेरियातील एक बंधु अडचणीत कसा सापडला?
लेबेची ओकवाराओचा जन्म १८८० पूर्वी झालेला आहे, यास्तव ते आज शंभरपेक्षाही अधिक वर्षाचे आहेत. जुजु या त्यांच्या नायजेरियन पालकांच्या दैवतांचे ते आराधक होते, नंतर वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास आरंभिला. शिकलेल्या गोष्टींचा त्यांनी अवलंब केला व त्यांचा बाप्तिस्माही झाला. आता ते ३०पेक्षा अधिक वर्षे साक्षीदार आहेत. काही काळाआधी, एका वादळी पावसानंतर त्यांच्या मंडळीच्या वडिलांनी त्यांची व त्यांच्या ७२ वर्षे वयाच्या अँग्लीकन बायकोची भेट घेतली. दोघेही हताश दिसले. त्यांचे गवताचे छप्पर असलेले बहुतेक घर पाण्याखाली आले होते. त्यांना आसरा देणारे वा घराची दुरूस्ती करु शकणारे जवळचे असे कोणी नातेवाईक नव्हते. तुम्ही तेथे असता तर काय केले असते? काय घडले ते पाहण्याआधी आपण पवित्र शास्त्रातील काही सल्याचा विचार करू या.
२. आम्ही “चांगल्या कामा” विषयी का आस्थेवाईक आहोत?
२ ख्रिस्त येशूने “स्वतःला आपल्याकरिता दिले, यासाठी की, . . . चांगल्या कामात तत्पर करून आपले स्वतःचे लोक असे आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.” (तीतास पत्र २:१४) ती कामे जीवन वाचविणाऱ्या राज्य प्रचारासभोवती केंद्रित आहेत. (मार्क १३:१०; प्रकटीकरण ७:९,१०) तरी पण ख्रिस्ती ‘चांगली कामे’ यात महत्वपूर्ण प्रचाराकार्यापेक्षा अधिक गोष्टींचा समावेश आहे कारण येशूचा दुधभाऊ याकोब स्पष्ट करतो: “देवपिता याच्या दृष्टिने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगाच्या कलंकापासून राखणे हे आहे.”—याकोब १:२७.
३, ४. आम्हाला “चांगल्या कामा” बद्दल १ तिमथ्यी अध्याय ३ ते ५ मधून काय शिकता येईल व ते कोणते प्रश्न सामोरे आणतात?
३ पहिल्या शतकातील मंडळ्या या दोन्ही प्रकारच्या “चांगल्या कामात” स्वतःला गंतवून होत्या. देखरेखे व उपाध्य सेवकांच्या गुणवत्तेची चर्चा १ले तिमथ्यीच्या ३ ऱ्या अध्यायात केल्यावर प्रेषित पौलाने पुढे लिहिले की, “सदाजीवी देवाची मंडळी सत्याचा स्तंभ व पाया अशी आहे.” (१ तिमथ्यी ३:१–१५) त्या सत्याच्या शिक्षणानुरूप राहणारे स्वतःचे आणि त्यांचे ऐकणाऱ्यांचे तारण करू शकतात असेही त्याने म्हटले. (१ तिमथ्यी ४:१६) त्यानंतर पौलाने ‘एकट्या पडलेल्या’ विश्वासू विधवांची शारिरीक दृष्टया काळजी करणाऱ्या “चांगल्या कामा” विषयीची चर्चा केली.—१ तिमथ्यी ५:३–५.
४ तद्वत, आमच्या सुवार्तिक कार्यासोबत आम्ही “अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे” या “चांगल्या कामा” कडे लक्ष देण्यास हवे. प्रत्यक्षात वडील व उपाध्यसेवक ‘पुढाकार घेणारे आहेत’ त्यामुळे यांना याबाबतीत काय करता येईल? (इब्रीयास १३:१७) आम्हा इतरांना त्यांना या गोष्टीत कसा हातभार देता येईल? शिवाय या “चांगल्या कामात” आम्हाला व्यक्तिशः काय करता येण्याजोगे आहे?
उत्तमरित्या पुढाकार घेणारे वडील
५. पौलाने विशिष्ट गरज कशी हाताळली व त्याचा कोणता अत्याधूनिक नमुना सापडतो?
५ यहुदीया प्रांतात खास अशी अडचण निर्माण झाली तेव्हा पौल या वडीलाने मदत कार्याची व्यवस्था आखण्यात पुढाकार घेतला. अशा या नेतृत्वामुळे गोंधळ उडत नाही,सर्व गोष्टीचे वितरण सम प्रमाणात व गरजेनुरूप होते. (१ करिंथकर १६:१–३; प्रे. कृत्ये ६:१, २) अशाच प्रकारे आजच्या वडिलांनी सुद्धा महापुराची विपत्ती, डोंगरावरुन घसरत येणारा चिखलांचा गाळ, भरतीच्या लाटा, तुफानी वावटळ किंवा भूकंपानंतर मदत कार्य करण्यात पुढाकार घेतला व त्याकरवी “आपलेच हित [न पाहता] दुसऱ्याचेहि” पाहिले.—फिलिप्पैकर २:३, ४.
६. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे विपत्ती ओढावली त्यावेळी वडिलांचा कोणता प्रतिसाद होता?
६ कृतीत उतरलेल्या अशा या ख्रिश्चनत्वाचा पुरावा अवेक! मासिकाच्या ऑक्टोबर ८, १९८६ च्या अंकात दिला गेला. अमेरिकेत ज्वालामुखी फुटून तो कॅलिफोर्निया येथे पसरला तेव्हा वडिलांनी हालचाल केली. या आध्यात्मिक मेंढपाळांनी आपल्यापैकी कोणी हरवले आहे का, कोणास अन्न, निवारा वा वैद्यकिय इलाज हवा आहे का याची तातडीने दखल घेतली. या वडिलांनी यहोवाच्या साक्षीदांच्या मुख्यालयाशी संयोजन केले. मदत देणारी समिति स्थापन झाली आणि जसे अधिक साक्षीदार मदतीसाठी येऊ लागले तसतसे त्यांच्या, मोडकळलेली घरे दुरूस्ती व स्वच्छ करण्यासाठी तुकड्या पाडल्या गेल्या. आवश्यक साठ्यांची खरेदी व त्यांचे वितरण यावर वडिलांनी देखरेख ठेवली. याकरवी हे चित्रित होते की, जेव्हा खास अडचणी उभ्या राहतात तेव्हा ‘प्रत्येक शिष्य बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्ती काही पाठवून देऊ शकतो’ पण प्रथमतः त्याने याबाबतीत स्थानिक देखेरेख्यांचा परामर्श घेणे सुज्ञतेचे ठरेल.—पडताळा प्रे. कृत्ये ११:२७–३०.
७. आणखी कोणत्या अधिक गरजांना सुद्धा आम्ही प्रतिसाद दाखवावा?
७ आपत्ति ओढावल्यावर तुम्ही (वडील असा किंवा नसा) वेळप्रसंगी मदत देत असालच, तरीही प्रत्यक्षात तुमच्याच मंडळीत उद्भवणाऱ्या सर्वसाधारण अशा काही गरजा असतील ज्या तितक्याच महत्वपूर्ण असतील. वस्तुतः या गरजा मोठ्या आपत्तीएवढ्या संवेदनाशील नसल्यामुळे त्यांच्याकडे एकतर दुर्लक्ष होऊ शकते वा कमी लक्ष दिले जाऊ शकते. पण खरे पाहता या स्थानिक गरजा याकोबाचे पत्र २:१५–१७ मधील नमुन्यानुरूप असतात. होय, ‘तुमच्या विश्वासाला क्रिया आहेत की तो मृत आहे’ याबाबतीत तुमच्या मंडळीपुढे सर्वथोर आव्हान आहे.
८. मंडळीतील गरजा हाताळण्याच्या बाबतीत देखरेखे कशी सूज्ञता दाखवू शकतील?
८ पुढाकार घेण्यात वडिलांनी “सूज्ञ व समंजस” असल्याचे दाखवले पाहिजे. (याकोब ३:१३) सूज्ञ राहिल्यामुळे त्यांना, जे लोक प्रत्येक बांधवाकडून उधारीने पैसे घेत राहतात किंवा “मदत” मिळविण्यासाठी निरनिराळ्या गोष्टी सांगतात त्यांच्याकडून कळपाचे रक्षण करता येईल. देखरेखे सूज्ञपणामुळेच आळशीपणाला मंजूरी देऊ शकणार नाहीत, कारण “जो काम करीत नाही त्याने खाऊही नये” असा पवित्र शास्त्राचा नियम आहे. (२ थेस्लनीकाकर ३:१०–१५) तरीपण त्यांनी ‘स्वतःला कळवळा न आणणारे’ होऊ देऊ नये किंवा बंधूजनांना तसे बनण्यास प्रवृत्त करू नये (१ योहान ३:१७) त्यांनी सूज्ञता दाखवलीच पाहिजे त्याचे आणखी एक कारण म्हणजे गरजवंत वा पिडीतांची काळजी कशी करावी याविषयी पवित्रशास्त्र अखंड नियम देत नाही. परिस्थिती ही जागोजागी व विविध ठिकाणी वेगवेगळी असते.
९. (अ) पहिल्या शतकात लायक विधवांची काळजी कशी वाहिली जाई? (ब) आज अशांना लाभाच्या कोणत्या प्रकारचा फायदा मिळवता येईल?
९ उदाहरणार्थ, १ ले तिमथ्यी ५:३–१० मध्ये पौल “एकट्या पडलेल्या” विधवांची चर्चा करतो. विश्वासात असलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना मदत केली पाहिजे तसे झाले नाही तर त्या नातेवाईकांचा देवाबरोबरचा संबंध बिघडू शकेल. तरीपण या गरजवंत व लायक विधवेला या मार्गाने मदत मिळाली नसेल तर वडिलांनी तिला मंडळीतून काही भौतिक साहाय्य करण्याची शक्यता राहील. अलिकडच्या काळात काही मंडळयानी आपणातील गरजवंतांस खासपणे साहाय्य दिले. तरीपण आता बहुतेक देशात उतारवयीन, अपंग तसेच काम करण्यास इच्छूक पण बेकार आहेत अशांना कराद्वारे मिळणाऱ्या रकमेतून साहाय्य देण्याच्या योजना आहेत. ख्रिस्ती वडील आणखी एका पद्धतीने मदत देण्याची इच्छा धरतील. खरेच गरजवंत असणारे आणि तमाम लोकांसाठी उपलब्ध असणारे फायदे मिळू न शकणारे असे काही असतील ज्यांना अर्ज करावा ते माहीत नसेल किंवा ते पुढे येण्यास कचरत असतील. तद्वत वडील सरकारी एजन्सी वा जे या प्रकरणात अनुभवी आहेत त्या साक्षीदारांचा संपर्क घेऊ शकतात. उपलब्ध असणारे फायदे गरजवंतांना मिळवून देण्यासाठी ते कोणा लायक बंधू वा भगिनीची व्यवस्था करू शकतील.—रोमकर १३:१, ४.
व्यावहारिक मदतीची योजना आखणे
१०. कळपाची देखरेख करीत असता वडिलांनी कशाकडे लक्ष दिले पाहिजे?
१० पीडित व गरजवंतांना त्यांच्या प्रेमळ बंधुभगिनीकडील मदत मिळत आहे याकडे दक्ष देखरेख्यांचे लक्ष असते. कळपातील सर्वांची देखरेख ठेवीत असता वडीलांनी त्यांच्या आध्यात्मिक व शारिरीक गरजांबद्दल जागृत राहावयास हवे. वडीलांनी “प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर” राहावे हे योग्यच आहे. (प्रे. कृत्ये ६:४) याकरताच त्यांनी, अंथरूणाला खिळलेले आणि इस्पितळात असणाऱ्या कळपाच्या सदस्यांना आध्यात्मिक भरवणूक मिळत आहे यासाठी व्यवस्था आखण्यास हवी. ज्यांना सभांना येता येणे शक्य नाही अशांसाठी वडील सभेतील कार्यक्रम ध्वनिमुद्रित करू शकतील. या ध्वनिफिती त्या आजाऱ्यांना नेऊन देण्यात आळीपाळीने वडील व उपाध्य सेवकांनी ज्या भेटी घेतल्या त्यामुळे त्यांना आध्यात्मिक देणग्या देता आल्या हे दिसले. (रोमकर १:११, १२) याचवेळी त्यांना उभी ठाकलेली गरजसुद्धा न्याहळता येते.
११. गरजवंत असणाऱ्या भगिनीचे कसे साहाय्य केले जाऊ शकते ते उदाहरणाने स्पष्ट करा.
११ अडचणीत असणाऱ्या वा वृद्ध भगिनीला कोणा भगिनीने मदत केली, तिला अंघोळ घालणे व तिला कपडे घालणे यासारखी मदत देऊ केली तर ती भगिनी अधुनमधून सभांना येऊ शकते व क्षेत्रकार्यात सुद्धा थोडाफार सहभाग घेऊ शकते. (पडताळा स्तोत्रसंहिता २३:१, २, ५.) देखरेखे आपणातील कोणा एकाची ती व्यवस्था पाहण्याकरता नेमणूक देऊ शकतात. याशिवाय पीडित व्यक्तिसोबत प्रवासात मदत द्यावी वा स्वतःच्या वाहनात त्यांना ने–आण करण्याची मदत करावी याकरता मंडळीने स्वयंस्फुर्तिने पुढे यावे अशी विचारणा करू शकतात. या व्यवस्थेकरता आराखडा योजून देणे हे सर्व गोष्टी अधिक कार्यक्षमपणे उरकण्यात मदत देईल.
१२. आजारी किंवा वृद्धांना मदत देण्याच्या बाबतीत इतरजण देखरेख्यांसोबत कसे कार्य करु शकतात?
१२ वडीलांच्या लक्षात आणखी काही गोष्टी येतील ज्यात त्यांना मदत देता येईल वा तशी व्यवस्था आखता येईल. उदाहरणार्थ, आजारी असलेल्या वा वृद्ध झालेल्या भगिनीला तिच्या घरची काळजी व व्यवस्था पूर्वी ठेवत होती तशी आता ठेवता येत नाही. याबद्दल कोणा उपाध्य सेवकाला वा इतरांना तिला मदतीचा हात देता येईल का? तिच्या घरासमोर असलेल्या झाडे–झुडुपांची काळजी घेण्यामुळे तिला आनंदच वाटेल कारण यामुळेच शेजाऱ्यांसमोर आपल्या घरासमोरील परिसर स्वच्छ आहे याची तिला धन्यता वाटेल. बागेस पाणी द्यावयाचे आहे का व त्यातील निदण काढावयाचे आहे का? कोणी भगिनी बाजारहाट करण्यासाठी निघाली आहे तेव्हा या भगिनीच्या घरी येऊन तिला कशाची गरज आहे ते विचारता येईल का? अशा या व्यावहारिक गोष्टींबद्दल प्रेषित आस्थेवाईक होते हे लक्षात घ्या आणि याच कारणास्तव त्यांनी मंडळीतील लायक जणांना तशी मदत देण्यासाठी संघटीत केले.—प्रे. कृत्ये ६:१–६.
१३. आधी उल्लेखिण्यात आलेल्या नायजेरियन बांधवास मदत दिल्यामुळे काय परिणाम दिसला?
१३ अशा स्वरूपाची ही ख्रिस्ती कळकळ आरंभाला उल्लेखिलेल्या वडीलांनी, त्यांना मेंढपाळकत्वाची भेट देताना लेबेची ओकवाराओचा व त्यांची पत्नी ज्या दशेत असल्याचे दिसले तेव्हा व्यक्त केली. वडीलांनी तातडीने विचारविनिमय केला व त्यांच्या मनात जे होते ते त्यांनी कळविले—घराची पुनर्बांधणी करणे. विविध बंधूभगिनींनीं साहित्याचे अनुदान दिले आणि बांधणीच्या कामास स्वेच्छेने भाग घेतला. आठवड्यातच त्यांनी छोटेसे सुरक्षित व धातुचे छप्पर घातलेले घर बांधून दिले. नायजेरियाचा अहवाल सांगतो:
“खेड्यातील लोकांना खूपच आश्चर्य वाटले. त्यांनी, पावसाची सर येण्याआधी शिकस्तीने काम करीत असलेल्या बांधवासाठी उदारपणे अन्न व पेय आणून दिले. कित्येक खेडूतांनी इतर धार्मिक गटाविषयीचा तक्रारीच्या सुराने म्हटले की ते गरीबांची मदत करण्याऐवजी लोकांची पिळवणूक करतात. घरबांधणीची घटना लोकात चर्चेचा विषय बनली. खेड्यातील लोकांनी उत्तम प्रतिसाद दर्शविला व याच्या परिणामात पुष्कळ घरगुती अभ्यास सुरू करण्यात आले”.
“चांगल्या कामात” असलेला तुमचा सहभाग
१४. आमच्या बंधुच्या बाबतीत “चांगली कामे” करण्याच्या संबंधाने आमचा दृष्टिकोन कसा असावा?
१४ वृद्ध, अपंग, इस्पितळात दाखल झालेले आणि इतर कारणांनी पीडित बनलेल्या लोकांना आम्हाला खाजगीरित्या व थेटपणे साहाय्य करता येते. खऱ्या ख्रिश्चनत्वाचे प्रदर्शन करण्याचा आम्हाला मार्ग दिसत आहे तर पुढे जाऊन आम्ही का मदत देऊ नये? (प्रे. कृत्ये ९:३६–३९) इतरांकडील दबाव नव्हे तर ख्रिस्ती प्रेमाने आम्हास उद्युक्त करावे. कोणतीही व्यावहारिक मदत देण्यामध्ये पुढे सरसावण्यातील आमची चालना अस्सल स्वरुपाची आस्था व कनवाळूपणा ही असावी. आम्हापैकी कोणालाही वृद्धांना परत चिरतारुण्य देता येणे, आजाऱ्यांना अद्र्भित चमत्काराद्वारे बरे करणे आणि मंडळीतील सर्वांना एकाच पातळीची आर्थिक स्थिती प्राप्त करुन देता येणे शक्य नाही. तरीपण आम्हाठायी काळजीपूर्वक व दातृत्वाचा आत्मा असलाच पाहिजे. तो आम्हाठायी असला व त्याप्रमाणे आम्ही कृति ठेवली तर त्याकरवी आम्हात व ज्यांना आम्ही साहाय्य करतो त्यांच्यातील प्रेमाचे बंध बळकट बनतील. हेच पौल व ओनेसिस, जो नव्याने ख्रिस्ती बनला होता व ज्याने ‘पौलाची तुरुंगातील बंधनात सेवा केली’ त्यांच्याबाबतीत घडले गेले.—फिलेमोन १०–१३; कलस्सैकर ३:१२–१४; ४:१०, ११.
१५. खरेपणाने गरजवंत असणाऱ्यांच्या बाबतीत आम्ही कशी मदत देऊ शकतो?
१५ कधीकधी दयावंतपणे देणगी देऊन—निनावी अथवा खाजगीपणे—आम्हाला आर्थिक गरजेविषयीचा प्रतिसाद दाखवता येईल. कोणा बंधुने आपली नोकरी गमावली आहे व त्याला दुसरी मिळण्यात अडचण भासत आहे का? कोणा भगिनीला अनपेक्षित असा इस्पितळाचा खर्च देण्याची स्थिती आली आहे का? तिला अपघात घडला का वा तिला लुबाडण्यात आले का? अशी परिस्थिती आम्हा कोणावरही येऊ शकते. आम्ही “दानधर्म” करतो ते आमचा गुप्तदर्शी पिता पाहत असतो व तो आम्हास निश्चये संमती प्रदान करील. (मत्तय ६:१–४) पैसे देण्याऐवजी आम्ही इयोबाप्रमाणे गरीबांना कपडे आणि विधवा व अनाथ यांना अन्नपदार्थ वा शिजवलेले अन्नही देऊ शकतो.—इयोब ६:१४; २९:१२–१६; ३१:१६–२२.
१६. आणखी इतर कोणत्या मार्गी कधी कधी मदत देता येऊ शकते? विवेचीत करा.
१६ तुमचा अनुभव व संपर्क इतरांना व्यावहारिक मदतीचा उगम ठरु शकतो. एका बंधुने बंधु व—यांना कर्जाबद्दल विचारणा केली. त्यांचे प्रेमळ उत्तर होते: ‘मजपाशी कर्ज देता येण्याएवढे पैसे असू शकतील असे तुम्हाला का वाटते?’ त्यांना उत्तर मिळाले: ‘कारण तुम्ही पैशाचा व्यय योग्यपणे हाताळता.’ बंधु व—यांनी गरजवंताना पैसे कर्जाऊ दिले होते त्यांनी विचारपूर्वक हा प्रस्ताव मांडला:‘मला वाटते की तुम्हाला सध्या ज्याची गरज आहे ती तुमच्या पैशांचा व्यय कसा करावा ह्याची मदत द्यावी. तुमची इच्छा असल्यास ती मदत द्यायला मी तयार आहे.’ अशी ही मदत नव्या परिस्थितीनुरूप आपल्या राहणीमानात जुळते घेऊ इच्छिणाऱ्या तसेच कमी प्रतिष्ठेच्या कामात परिश्रमपुर्वक करण्याची इच्छा राखणाऱ्या बांधवांच्या बाबतीत खूपच उपयुक्त ठरते. अर्थात कर्जाची खरी गरज आहे तेथे हस्ताक्षर केलेला लिखित दस्ताऐवज ठेवणे बरे ठरेल म्हणजे नंतर समस्या उद्भवु शकणार नाहीत. तरीपण पैसे उधारीने घेण्याचे टाळणाऱ्या बांधवासाठी सल्ला वा अनुभव यांच्या रुपातील व्यक्तिगत साहाय्य खरेच उपयुक्त ठरते. (रोमकर १३:८) हे पश्चिम आफ्रिकेच्या पुढील अनुभवाद्वारे स्पष्ट होते, जो इम्मानुएल बद्दलचा आहे:
इम्मानुएल हा निपुण न्हावी होता पण त्याच्या दुकानात कमी ग्राहक येत. शिवाय योग्य अर्थप्राप्ती होऊ शकत नाही या कारणामुळे तो उदास बनला होता. मंडळीतील एका वडीलाने ते हेरले आणि इम्मानुएलला विचारले की त्याला दुसऱ्या प्रकारचे काम करण्यास आवडेल का. होय, असे त्याने म्हटले. त्याने आपला व्यावसायिक गर्व यामध्ये आड येऊ दिला नाही. वडीलाने आपल्या सहकाऱ्यांसोबत बोलणी करुन पाहिली आणि इम्मानुएलला एका इस्पितळात सेवकाची नोकरी लावली. या कामात त्याने चांगली प्रगती दाखवली व याद्वारे तो मंडळीतील इतरांनाही मदत देऊ शकला.
१७. इस्पितळात असणाऱ्या कोणा बांधवाला तुम्ही कशी मदत देऊ शकाल? (स्तोत्रसंहिता ४१:१–३)
१७ कोणी सहख्रिश्चन इस्पितळात वा शुश्रूषागृहात असल्यास त्याला मदत देण्याविषयी खास संध्या आहेत. तरीही यात प्रांजळ आस्था व काळजी समाविष्ट आहे. तुम्ही आजारी व्यक्तिला उभारणीकारक ख्रिस्ती प्रकाशनांचे वाचन करुन दाखविणे व त्याला प्रोत्साहनपर अनुभव कथित करणे याकरवी ते प्रदर्शित करू शकाल तरीही, तुम्ही साहाय्य करु शकाल अशा काही शारिरीक गरजा आहेत का? काही ठिकाणी वैद्यकीय खर्च इतका महाग असतो की रोग्याला त्याच्या भेटीस येणाऱ्याने अंघोळ घालावी लागते व स्वतःचे जेवण पुरवावे लागते. याकरताच डॉक्टरांची अनुमती असल्यास तुम्ही रोग्यास सत्वयुक्त आहार आणू शकता आणि त्याचे डोके धुवून त्याला अंघोळ घालू शकता. एखादा गरम झगा व चपलांची गरज आहे का? त्याची गुणग्राहकता जाणली जाईल. (२ तिमथ्यी ४:१३) किंवा रोग्याला चिंता वाटत आहे अशा काही गोष्टीची तुम्हाला काळजी घेता येईल का? आपला पगार कसा मिळेल व त्यातून खर्च कसा केला जाईल याची काळजी त्याला वाटत असावी. साध्या साध्या गोष्टी करण्याद्वारे जसे की, त्याच्या घरी पत्रे पडून राहात नाहीत, घरासभोवतीच्या फुलझाडांना पाणी मिळत आहे किंवा विजेरी मालवली जाते याकरवी तुम्हाला त्याला विरंगुळा देता येईल.
१८. गरजवंत बांधवांच्या बाबतीत काय करण्याचा तुमचा निर्धार आहे?
१८ होय, “उब घ्या व तृप्त व्हा” असे नुसते बोलण्यापेक्षा करुन दाखविण्याचे अनेक मार्ग आम्हातील प्रत्येकाला सापडू शकतील. (याकोब २:१६) तुमच्या मंडळीतील बंधु भगिनींचा विचार राखा. खरेपणाने गरजवंत असणारे भौतिकरित्या अडचणीत आहेत का? ते आजारी, अडचणीत सापडलेले किंवा अंथरुणास खिळलेले आहेत का? ज्यांच्यासाठी ख्रिस्ताने मरण पत्करले त्या मंडळीतील या प्रेमळ बांधवासाठी व्यावहारिकदृष्ट्या तुम्हाला काय करता येणे शक्य आहे? ही प्रवृत्ती राखल्यास अडचणीची स्थिती उभी ठाकल्यास तिची हाताळणी योग्यपणे करण्यासाठी तयार राहता येईल.
१९. (अ) या प्रकरणात तोल अत्यंत महत्वाचा का आहे? (ब) इतरांच्या बाबतीत आम्हाला सर्वोत्तम असे कोणते भले करता येईल व ते तसे का? (स्तोत्रसंहिता ७२:४, १६)
१९ आमच्या बंधुजनांचे साहाय्य करण्यात आम्ही स्वतःला कामी लावल्यास आमचा विश्वास मृतवत् नाही असे सिद्ध करता येईल. हाच विश्वास आम्हाला ख्रिस्ती प्रचारात परिश्रमाने काम करण्याची चालना देतो. इतरांना भौतिकरित्या मदत करणे आणि ख्रिस्ती सुवार्ता प्रचाराच्या कार्यात नियमाने सहभागी होणे यात आम्ही तोल राखण्याची गरज आहे. (पडताळा मत्तय १५:३–९; २३:२३) येशूने मार्था व मरीयेला केलेली सूचना तो तोल स्पष्ट करते. त्याने म्हटले की कोणा व्यक्तिने भौतिक अन्न पदार्थाची तुलना आध्यात्मिक अन्नासोबत करून पाहिल्यास दुसरी गोष्ट “चांगला वाटा” आहे व ती काढून घेण्यात येणार नाही. (लूक १०:३९–४२) सद्य व्यवस्थिकरणात आजारी व गरीब नेहमीच असतील. आम्ही त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत व कराव्यात. (मार्क १४:७) तरीपण सर्वोत्तम व चिरकाल टिकणारी अशी आपल्याला करता येण्याजोगी गोष्ट म्हणजे इतरांना देवाच्या राज्याविषयीचे शिक्षण देणे. याच गोष्टीवर येशूने आपले लक्ष केंद्रित केले. (लूक ४:१६–१९) याकरवीच गरीब, आजारी व पीडितांना सार्वकालिक सुटका मिळू शकेल. देवावर आशा ठेवणाऱ्या आणि “जे खरे जीवन” त्यावरील आपली पकड घट्ट करणाऱ्या आमच्या बांधवांना व इतरांना या मार्गी मदत देण्याचा केवढा आनंदाचा मार्ग आहे बरे!—१ तिमथ्यी ६:१७–१९. (w86 10/15)
तुम्हाला आठवते का?
◻ ख्रिस्ती मंडळीने करण्याजोगी अत्यंत महत्वपूर्ण अशी “चांगली कामे” कोणती आहेत?
◻ आपल्या बांधवांच्या भौतिक परिस्थितीनुसार असणाऱ्या “चांगल्या कामा” संबंधाने स्थानिक वडील कसे समतोल लक्ष देऊ शकतात?
◻ वडीलांकरवी कोणती व्यावहारिक पावले उचलली जाऊ शकतात?
◻ गरजवंत अशा तुमच्या बंधुभगिनींसाठी तुम्हाला कोणत्या व्यवहारी गोष्टी करता येतील?
[१७ पानावरील चौकट]
मंडळीने वाहिलेली काळजी
ग्रामीण भागात एका लहानश्या मंडळीत स्थलांतरीत झालेल्या एका जोडप्याने हा विचार प्रवर्तक अहवाल दिला:
“तीन वर्षाआधी आम्ही आपले घर विकले आणि एका दुरवरच्या मंडळीत आलो. येथे काही समस्या असल्यामुळे प्रौढ मार्गदर्शनाची गरज होती. लवकरच मला चार जबाबदार पदावरील कामे मिळाली. आम्ही बंधुजनांवर खुप प्रीती केली व त्यांच्या सोबत काम करण्याची सतत इच्छा राखली. काही महिन्यातच मंडळीचा आत्मा सुधारला गेला आणि मंडळीत दोन चांगल्या वडीलांची भर पडली.
“माझ्या बायकोला आजारपण जडले व तिच्यावर गत वर्षी मोठी शस्त्रक्रिया करण्याची गरज आली. तिला इस्पितळात दाखल केले त्याच दिवशी मला हेपाटीटीस जडला. दोन महिन्यांनी, आमच्या वसाहतीतील आर्थिक परिस्थिती कोलमडल्यामुळे मी तर पार बुडालो. माझे काम गेले व त्यात आम्ही दोघेही आमची शारिरीक प्रकृती सुधारण्याच्या बेतात होतो. मला आणखी निराशा या गोष्टीची वाटली की प्रांतिय अधिवेशन आता जवळ आले होते व त्या कार्यक्रमात मला एक भाग होता. शिवाय मला विभागिय संमेलनात सुद्धा एक नेमणूक होती व हे संमेलन आता केवळ दोन आठवड्यावर येऊन ठेपले होते. पण हातात पैसा नसल्यामुळे त्यांना कसे उपस्थित राहता येईल किंवा माझ्या कुटुंबाची कशी काळजी घेता येईल ते मला समजत नव्हते. एके दिवशी सकाळी माझी बायको क्षेत्र कार्यास गेली असता मी माझ्या परिस्थितीचा आढावा घेण्यास खाली बसलो.
“मी खिडकीतून बाहेर पाहत बसलो असताना स्वतःलाच विचारले, माझा यहोवावरील विश्वास कोठे आहे? मी माझ्या बायकोला म्हटले होते की कशाचीही काळजी करायची नाही, पण स्वतःच थोडासा शंकाकुल झालो होतो. तेव्हा मी मजपाशी असलेल्या “थोड्या विश्वासा”च्या आधारावर यहोवाला मदतीकरता याचना केली. मी प्रार्थना संपविली तेवढ्यात एका बंधुने घराचा दरवाजा ठोठावला. त्याने म्हटले की दोघेही कॉफी घेण्यासाठी बाहेर जाऊ या. मी नको म्हटले कारण मला त्या दिवशी सायंकाळी होणाऱ्या सभेतील एका भागाची तयारी करायची होती. तरीपण त्याने गळ घातली व म्हटले काही मिनिटातच आम्ही परत येऊ त्यामुळे आम्ही निघालो. आम्ही साधारणतः अर्ध्या तासाने परतलो. मी त्याच्या कारमधून उतरलो तेव्हा मला बरे वाटले.
“मी घरात प्रवेश केला तेव्हा मला दिसले की स्वयंपाक घरात किराणा माल ठेवलेला आहे. मला वाटले की माझ्या बायकोनेच बाजारहाट केला असावा व त्या जिनसा तेथे ठेवल्या असाव्यात. पण थांबा, आमच्यापाशी तर पैसे नव्हते, मग तिला बाजार तरी कसा करता येणार होता? मग मी एक पाकिट बघितले, त्यावर असे लिहिले होते:
“‘तुम्हावर मनापासून प्रेम करणाऱ्या तुमच्या बंधुभगिनींकडून. यातील काहीही अनुदान पेटीत टाकू नका. हे सर्व तुमच्यासाठीच देण्यात आलेले आहेत.’”
“मला आपले अश्रु आवरता आले नाहीत. मला माझ्या त्या थोड्या विश्वासाची आठवण झाली तेव्हा अधिकच गहिवरून आले. इतक्यात माझी बायको घरी आली. तिला मी ते अन्नपदार्थ व इतर बक्षिसे दाखविली. ते बघून ती देखील रडू लागली आणि तिजसोबत आलेल्या दोन बहिणींनाही आपले अश्रु आवरता आले नाहीत. आम्ही त्या भगिनींना हे सांगण्याचा प्रयत्न केला की आम्हाला इतके नको होते. तरीपण त्यांनी आम्हाला म्हटले की कोणी काय दिले होते याची त्यांना माहिती नव्हती. सबंध मंडळीने आपला सहभाग दिला होता. मंडळीने आमच्या बाबतीत हे औदार्य व्यक्त केले होते याचे कारण हे की इतरांसोबत आपली भागी कशी करावी याविषयीचे शिक्षण आम्हीच त्यांना दिले होते असे त्यांना वाटत होते. याकारणामुळे आमच्या डोळ्यातून अधिक अश्रु ओसंडू लागले.”
या बंधुने आपला हा अहवाल लिहून संपवल्यावर नंतर काही कालावधीतच त्याला एक नवीन नोकरी मिळाली तेव्हा त्याने व त्याच्या बायकोने सहाय्यक पायनियरींग कार्य सुरु केले.
[१८ पानावरील चौकट]
ख्रिस्ती प्रेमाचा पुरावा
पश्चिम अमेरिकेतील यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मंडळीला असा एक अप्रतिम प्रसंग लाभला की ज्यामुळे तिला पवित्र शास्त्रवचनांमध्ये शिफारस करण्यात आलेल्या ख्रिस्ती प्रेमाचे वक्तव्य करता आले. त्यांच्या विभागात शासनाने मेंदूचा पक्षघात जडलेल्या रोग्यांच्या उपचारासाठी एक केंद्र उघडले होते. या केंद्रातील पहिल्या रहिवाशांमध्ये गॅरी हा २५ वर्षे वयाचा युवक होता ज्याला आता घरी होत असलेला इलाज अपुरा पडत होता. या आजाराने त्याला भयंकर पक्षघात जडवला होता व त्यात त्याची वाचासुद्धा बाधली होती.
गॅरीचा बाप्तिस्मा होऊन तो जवळ जवळ सात वर्षे साक्षीदार होता. आता नव्या केंद्रात आल्यापासून त्याची मंडळीतील सभांना उपस्थित राहण्याची इच्छा झाली. त्याचे आईवडील त्याच्या पासून दुरवर राहात नव्हते ते त्याला अधूनमधून घेऊन येत. त्यांचे वय लक्षात घेता इतर बांधवांनी मदत द्यायचे ठरविले. एकापाशी मोटारगाडी होती. तो, त्याची बायको व दोन मुली तयार होऊन सभा सुरु होण्याच्या पंचेचाळीस मिनिटे आधी घर सोडीत त्यामुळे त्यांना आपणासोबत गॅरीला घेऊन येता येत होते. सभा संपल्यावर ते त्याला केंद्रावर परत नेऊन सोडीत व अशाप्रकारे घरी उशीरा जात.
पण या केंद्रात आणखी हालचाली घडत होत्या. त्या केंद्रातील इतर पक्षघात्यांनी पवित्र शास्त्रीय सत्यासंबंधाने रस प्रदर्शित केला. त्यामध्ये दोघांचा पवित्र शास्त्र अभ्यास सुरु झाला. नंतर आणखी काहींनी आस्था दाखवली. आता या सर्वांना सभांना कसे आणता येऊ शकत होते? मंडळीतील आणखी एका कुटुंबाने मोटारगाडी विकत घेतली व त्या प्रमाणे स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या एका स्थानिक साक्षीदाराने देखील तिसरी मोटारगाडी उपलब्ध करून दिली. तरीपण या तिन्ही मोटारगाड्यातील जागा कधी कधी अपुरी पडू लागली. आता मंडळीला आणखी काही करता येण्याजोगे होते का?
मंडळीतील वडीलांनी या गोष्टीची चर्चा केली व हे ठरविले की केवळ त्या पीडीतांची सभांना ने आण करण्यासाठी मंडळीने एक स्वतंत्र मोटारगाडी विकत घ्यावी. मंडळीने यावर सहमत दर्शविले व उदारपणे अर्थसहाय्य दिले. या प्रकल्पाबद्दलची बातमी ज्या जवळच्या साक्षीदारांना मिळाली त्यांनीही मदत दिली. एक मोटार गाडी विकत घेण्यात आली व त्याला अशी सोय केली गेली की ज्यामुळे त्यास चाके असलेल्या खुर्च्या वाहून नेता येत होत्या.
आता दर महिन्याला मंडळीतील वेगवेगळा पुस्तक अभ्यास गट आपापल्या पाळीनुसार सभेला व संमेलनाला ही मोटार गाडी चालवितो. त्या पक्षघाती केंद्रातील पाच जण नियमाने उपस्थित राहतात व त्यापैकी चार जण बाप्तिस्मा झालेले साक्षीदार आहेत. यांना पुष्कळ बंधुभगिनींची प्रीती लाभली व या बांधवांना त्या विपत्तिग्रस्त बांधवांना मदत करण्याचा आनंद व समाधान मिळत राहिले. ते कसे काय? बंधुभगिनी त्यांच्यासाठी सभेत गीतपुस्तके उचलून धरतात व त्यांना शास्त्रवचने उघडून देतात. विभागीय संमेलनात व प्रांतिय अधिवेशनात त्यांनी या पैकीच्या ज्यांना स्वतः अन्न खाता आले नाही त्यांना आपल्या हाताने भरविले. या मुळे एकमेकांविषयीची गाढ प्रीती व उबदारपणा निर्मिला गेला. पण त्या गॅरीबद्दल काय? ज्या मंडळीने त्याला इतकी मदत दिली त्या त्याच्या मंडळीत तो आता उपाध्य सेवक या नात्याने काम करीत आहे.—प्रे. कृत्ये २०:३५.