शक्तीचा गैरवापर करण्याविरूद्ध दक्षता बाळगा
“यहोवाचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय. गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी यांचा मी द्वेष करते.”—नीतीसूत्रे ८:१३.
१. मानवी हृदय कपटी असते हे ते कोणत्या एका मार्गाकरवी प्रदर्शित करीत असते?
शक्तीचा स्वार्थीपणे गैरवापर करणे हा त्या वाईट मार्गपैकीचा आहे ज्याचा यहोवा द्वेष करतो. त्याला मानवी अंतःकरणाची चांगला कल्पना असल्यामुळे तो आपल्या वचनाद्वारे आम्हाला या अपूर्ण मानवी प्रवृत्तिविषयी दक्ष असण्याचा सल्ला देतो. आम्ही वाचतो: “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे; त्याचा भेद कोणास समजतो? प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी यहोवा हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखितो.”—यिर्मया १७:९, १०.
२. जे स्वतःपाशी शक्ती राखून आहेत त्यांना ती काय करायला लावते?
२ या कारणास्तव शक्तीचा गैरवापर होऊ नये असे देवाचे वचन योग्यपणे आम्हाला बजावते. शक्तीचा गैरवापर वा विपर्यास होण्याचा कल असल्यामुळे एकदा एका इंग्रज प्रामाण्यांनी हे निरिक्षिले: “शक्ती भ्रष्टतेकडे वळते आणि सर्वाधिकाराचे सामर्थ्य तर पूर्णपणे भ्रष्टावून सोडते.” त्यांनी आणखी असे परिक्षिले: “माणसांना अधःपतित व नीतीभ्रष्ट करणारी जी कारणे आहेत त्यात शक्ती हे नित्याचे व अति क्रियाशील कारण आहे.” अर्थातच शक्तीठायी भ्रष्टावणारा प्रभाव आहे असे नाही, जसे की आम्ही मागील लेखात पाहिलेच आहे, पण भ्रष्टाचार निर्माण होण्याचा त्यात धोका असतो.
३. कोणकोणत्या मानवी नातेसंबंधात शक्तीचा गैरवापर होऊ शकतो आणि हे असे का घडते?
३ शक्तीचा गैरवापर होऊ नये याकरता कोणी दक्ष राहण्याची गरज आहे? प्रत्येकाने! कारण बहुधा सर्वच मानवी नातेसंबंधात अशी परिस्थिती येते की जेथे धन, शिक्षण, शारीरीक बळ, हुद्दा, शारीरीक सौंदर्य इत्यादि प्रकरणात एकाला दुसऱ्याचा फायदा घेण्यात मिळतो. जितका फायदा जास्त, तितक्या अधिक स्वार्थपणे तो घेण्याचा मोह जडतो. पण असे का व्हावे? कारण “मानवाच्या हृदयातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात.” (उत्पत्ती ८:२१) होय, अपूर्ण मानवी हृदय हे “कपटी,” फसवे वा दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे आहे.—यिर्मया १७:९.
ख्रिस्ती वडील
४. इथ्रोने मोशेला असा कोणता सुंदर सल्ला दिला जो एखाद्यास शक्ती व अधिकार प्राप्त झाल्यावर जडणाऱ्या मोहाची जाणीव घडवून देतो?
४ याविषयी आपण प्रथमतः ख्रिस्ती मंडळीतील देखरेखे किंवा वडील यांचा विचार करू या. त्यांच्या गुणवत्तेविषयी आम्ही विचार करतो तेव्हा मोशेला हजार, शंभर, पन्नास व दहावर देखरेख करण्यासाठी ज्या पुरुषांची निवड करण्यास इथ्रोने सांगितले होते त्याची आठवण होते: “तू ह्या लोकांतून कर्तबगार, देवाचे भय धरणारे, विश्वासू, लाचलुचातीचा द्वेष करणारे असे पुरुष निवडून घे.” (निर्गम १८:२१) अशा लोकांना देखरेखीची जबाबदारी सोपविता येऊ शकत होती. देखरेखीच्या पदानुसार त्यांच्या वाट्यास जो हक्क येणार होता त्याचा ते अवमान करणार नव्हते, कारण देवाचे भय बाळगणे याचा अर्थ वाइटाचा द्वेष मानणे हे होते. ही माणसे लाचलुचपतीची प्राप्ती किंवा त्याविषयी प्रेम तर बाळगणार नव्हते उलट ते त्याचा “द्वेष करणारे” असे असणार होते.
५. पहिले पेत्र ५:२, ३ मधील सल्ला का योग्य आहे व तो कसा लागू करता येईल?
५ शक्तीचा वापर विपरीतपणे वडीलांकरवी होऊ शकतो या धोक्याची जाणीव प्रेषित पेत्राला होती या कारणामुळेच त्याने ख्रिस्ती मंडळीतील देखरेख्यांना असा सल्ला दिला: “तुम्हातील देवाच्या कळपाचे पालन करा. करावे लागते म्हणून नव्हे तर संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा. तुमच्या हाती सोपविलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे तर कळपाला कित्ते व्हा.” (१ पेत्र ५:२, ३) द्रव्यलोभासाठी देवाच्या मंडळीची राखण करणे हे शक्तीचा गैरवापर करणे आहे. त्याच प्रमाणे कळपावर धनीपण करणे हे स्वतःला लाभलेल्या शक्तीचा उपयोग स्वार्थी कारणासाठी करणे होते. उदाहरणार्थ, कोणा वडीलाचे, आपल्या कुटुंबातील सदस्यांचा पेहराव कसा असावा या बद्दलचे निश्चित मत असेल. पण असे हे वैयक्तिक मत त्याने कळपावर लादू नये याची खबरदारी घ्यावी, कारण तसे करणे हे त्यांच्यावर धनीपणा करण्यासारखे ठरते.
६. वशिलेबाजी म्हणजे काय व वडीलांवर याचा कसा दोष येऊ शकतो?
६ वडीलांनी काळजी घेतली नाही तर त्यांच्यावर वशिलेबाजीपणाचा दोष येऊ शकतो कारण हे सुद्धा शक्तीचा गैरवापर करण्यासारखे ठरते. वशिलेबाजी? होय, कारण याचा मूळ शब्द लॅटिन भाषेतून आहे व त्याचे अर्थ, “भाचे” असा आहे. या शब्दांचा संबंध जुळता आहे कारण पोप व इतर चर्च अधिकाऱ्यांची ही खोडकर प्रथा होती की आपले नातेवाईक व खासपणे भाऊ किंवा बहिणींच्या मुलांना खास अशी धार्मिक व भौतिक मर्जी दाखवायची. पोप निकलस ३ हे तर “पोपच्या राजेशाही कारभारात वशिलेबाजी करणारे कुलपिता” असे प्रसिद्ध झाले. ख्रिस्ती वडीलांनी अत्यंत काळजी बाळगली नाही तर आध्यात्मिक तत्वाऐवजी कौटुंबिक नातेसंबंधाचे त्यांच्यावर अधिक वजन पडण्याची शक्यता आहे. एका वडीलाला असे जोरदारपणे वाटत होते की त्याच्या मुलाची मंडळीत देखेरख्याच्या जागेसाठी शिफारस केलीच पाहिजे, पण इतर वडीलांचे याला सहमत नव्हते. तेव्हा या बापाने दुसऱ्या मंडळीत स्थलांतर केले. काही वर्षे निघून गेली तरी त्याचा मुलगा वडील होऊ शकला नाही. याद्वारे हे स्पष्ट दिसते की त्या बापाने स्वतःवर रक्ताच्या नात्याचे वर्चस्व होऊ दिले होते.
७, ८. वशिलेबाजी वडीलांना खरीच धोक्याची ठरू शकते हे कोणती उदाहरणे दाखवतात?
७ वडील आपल्या नातेवाईकांच्या चुकीच्या कृत्यांबद्दल आवश्यक ती कारवाई करण्यात मागे पडतात तेव्हा ती वशिलेबाजीच व शक्तीचा गैरवापर असतो. (पडताळा १ शमुवेल २:२२–२५, ३०–३५.) काही वर्षाआधी मध्य अमेरिकेतील काही मंडळ्यात धक्कादायक स्वरूपाचे वाईट कर्म आचरले गेले. अगदी अलिकडेच हीच गोष्ट काही युरोपियन मंडळयात घडली. कित्येक युवक जारकर्म, मादक औषधांचा वापर इत्यादि गोष्टीत गढले गेले. यात वडीलांचीही मुले होती, पण त्यांनी आपल्या मुलांच्या गैरवर्तणुकीकडे कानाडोळा केला असे दिसते. जेव्हा सर्व गोष्टी उजेडात आल्या तेव्हा कित्येक वडीलांना, त्यांनी आपल्या विशेष हक्काचा दुरुपयोग केला किंवा अधिक स्पष्ट म्हणायचे तर त्यांनी आपला अधिकार योग्यपणे वापरला नाही म्हणून त्यांच्या पदावरून दूर करण्यात आले.
८ वडील किंवा उपाध्य सेवक सभेतील भाग हाताळताना उपस्थितांसोबत चर्चा करीत असतात तेव्हा असाच वशिलेबाजीचा प्रकार घडण्याची शक्यता आहे. आपल्याकडून पक्षपात घडला जाऊ नये याची त्यांनी दखल घेतली पाहिजे. याबाबतीत त्यांच्या घरचे सदस्य सहकार्य देऊ शकतात. जेव्हा इतर लोक विवेचने मांडत नाहीत असे दिसते त्यावेळी हे कौटुंबिक सदस्य आपले विवेचने देऊ शकतील. जेव्हा बहुतेक इतर विवेचन सादर करण्यात आपले हात वर करून असतील त्यावेळी यांनी अधीरतेने पुढे होता कामा नये.
फिरते देखरेखे
९. सिमनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुन्ह्यात शक्तीचा गैरवापर कसा सामावलेला आहे व त्याला तेच नाव कसे पडले?
९ जबाबदारपदी असणारे ख्रिश्चन व खासपणे वॉचटावर संस्थेच्या फिरत्या देखेरख्यांनी, ज्याला इंग्रजीत सिमनी म्हणतात त्याचे म्हणजे अधिकारप्राप्तीकरता पैसा देण्याचा किंवा घेण्याचा गुन्हा करणे याचे जाणूनबुजून किंवा नकळतपणे दोषी होत नाही याविषयी काळजी बाळगली पाहिजे. हा शब्द प्रे. कृत्ये ८:९–२४ मध्ये ज्या गृहस्थाचा शिमोन या नावाने उल्लेख आलेला आहे त्यावरून घडला गेला. याने, प्रेषितांनी आपल्यावर हात ठेवून पवित्र आत्म्याचे दान द्यावे याकरता त्यांना पैसे देऊ केले. लूक कळवितो: “पेत्र त्याला म्हणाला: ‘तुझ्या रूप्याचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवावयाचा तू विचार केलास . ह्या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही, कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. तू ह्या आपल्या दुष्टतेचा पश्चाताप करून यहोवाजवळ विनंती कर म्हणजे तुझ्या अंतःकरणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल.’” ही अशीच प्रथा निघून गेलेल्या काही वर्षात रोमन कॅथोलिक चर्चच्या अधिकाऱ्यांनी जोपासली होती. एक ज्ञानकोश कळवितो की, “हा गुन्हा ११ व १२व्या शतकात चर्चमध्ये अगदी सर्वसाधारण बनला होता.”
१०, ११. सिमनी या गुन्ह्यास वडील कसे बळी ठरू शकतात?
१० या संबंधाने यहोवाच्या सेवकांकडून कशी चूक घडू शकतो? त्यांनी जर अत्यंत काळजी बाळगली नाही तर ज्या बांधवाने त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले असेल वा उदारतेने देणग्या दिल्या त्यांची विभागिय संमेलने वा प्रांतिय अधिवेशनाच्या एखाद्या कार्यक्रमाची हाताळणी करण्यासाठी शिफारस करण्याकडे त्यांचा कल झुकू शकेल. खरे म्हणजे एखाद्या वडीलाने उदारतेच्या देणग्या देऊ केल्या व त्याच वेळेला काही खास हक्क प्राप्त होण्याची संधि सामोरी आणली हे अगदी क्वचितच घडले. याद्वारे हे प्रदर्शित झाले की अशांनी स्वतःला “कनिष्ठ” या अर्थी वागविले नाही व त्या जबाबदार पदाकरता इश्वरशासित नियुक्ति करण्याकरता पवित्र आत्म्याला वाव दिला नाही. (लूक ९:४८) त्या विशिष्ठ प्रकरणात त्या देणग्या नाकारल्या गेल्या व त्याकरवी शक्तीचा गैरवापर केला जात नाही याचे उत्तम उदाहरण प्रस्तुत करण्यात आले. ही सर्व उदाहरणे दाखवतात की ख्यातनाम वडीलांनी स्वतःवर सिमनीचा कलंक लागू नये याकरता केवढी काळजी बाळगली पाहिजे!
११ एखाद्या फिरत्या उपाध्यायाने कोणा वडीलांना कडक सूचना देण्याची वेळ कधी कधी येते. पण जर या फिरत्या उपाध्यायाला त्या वडीलांकडून वेळोवेळी देणग्या मिळत राहिल्या असतील वा त्याच्याकरवीच्या आदरातिथ्याचा वेळोवेळी उपभोग घेतला असेल तर त्याला कदाचित ती सूचना थेटपणे सांगण्याचे कठीण वाटेल. तर मग, आवश्यक अशी सूचना प्रदान करण्यातील आपले कर्तव्य करण्यात या स्वार्थी विचारधारा त्यांना परावृत्त करतील का? स्वतःच्या भौतिक लाभापेक्षा आपल्या बांधवांची आध्यात्मिक आस्था ते पुढे ठेवतील का? होय, त्यांचा कोणास संतुष्ट करण्याचा विचार आहे—देवास की मानवास?—गलतीकर १:१०.
कौटुंबिक वर्तुळात
१२. पतीने आपल्या शक्तीचा वापर कोणत्या कारणास्तव याग्यपणे करण्यास हवा?
१२ कौटुंबिक वर्तुळातसुद्धा प्रत्येक सदस्याने फायद्याचा अथवा शक्तीचा गैरवापर होऊ नये याची काळजी करण्याची गरज आहे. पतीला आपण मस्तक आहोत, मजठायी जादा शारीरिक बळ आहे आणि कुटुंबाच्या उपजिविकेची काळजी करणारा मीच असे वाटून लहरीपणा, स्वार्थीपणा, निष्ठुरता आणि सहानुभूति न राखता कुटुंबासोबत व्यवहार राखण्याची शक्यता असते. बायकांनी आपल्या पतीच्या अधीन राहावे असे पौल जोरदारपणे सांगतो. पण त्याच वेळी तो पतींना आपल्या बायकोवर स्वतःच्या शरीराप्रमाणे प्रीती करावयाला तसेच ख्रिस्ताने आपल्या ख्रिस्ती मंडळीसाठी जसे स्वतःचे आत्मसमर्पण केले तसे करायला सांगतो. (इफिसकर ५:२५–३३) ही सूचना, पतीने आपल्या शक्तीचा वा फायद्याचा गैरवापर होऊ नये म्हणून त्याचे परीक्षण करणारी ठरली पाहिजे. प्रेषित पेत्राने सुद्धा, स्त्रियांनी आपल्या पतीच्या अधीन राहावे अशी सूचना प्रस्तुत केल्यावर पतींना संबोधून म्हटले: “पतींनो, तसेच तुम्हीही आपल्या स्त्रियांबरोबर, त्या अधिक नाजूक पात्र आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहात म्हणून तुम्ही त्यांना मान द्या. म्हणजे तुमच्या प्रार्थनांना व्यत्यय येणार नाही.” होय, पतीला यहोवा देवासोबत चांगले नातेसंबंध राखून ठेवायचे आहे तर त्याने आपल्या शक्तीचा वापर योग्यतेने करण्याची काळजी घेतली पाहिजे.—१ पेत्र ३:७.
१३. (अ) स्त्रीच्या कोणत्या वृत्तीचा पतीने कधी कधी गैरफायदा घेतला आहे? (ब) स्वार्थी स्त्रियांनी त्यांना असलेल्या हक्काचा विश्वासघाती रूपाने कसा दुरुपयोग केला व त्याकरवी कोणत्या शास्त्रवचनीय तत्वाचा भंग केला?
१३ जो सोबती सखोल प्रीती करतो तो तशी प्रीती व्यक्त न करणाऱ्या सोबत्यापेक्षा अधिक दयेस पात्र ठरतो असे निरिक्षिले गेले आहे. त्यात काही अंशी सत्यता आढळते. सर्वसाधारणपणे स्त्रिया त्यांच्या पतीपेक्षा अधिक खोल प्रीती व्यक्त करतात—त्यांना प्रेम महत्वाचे वाटते आणि याच गोष्टीचा कित्येक पती स्वार्थीरूपात फायदा घेतात. उलटपक्षी स्त्रिया आपल्या इच्छांना काट मारण्यात येते त्यावेळी वैवाहिक देणे देऊ करण्याच्या बाबतीत नाखूष बनतात. खरे पाहता काही स्त्रियांनी तर ते अजिबात नाकारले आहे. यामुळे पती व्यभिचार करण्यासाठी ओढला जातो ही खेदाची गोष्ट आहे. पौलाने १ करिंथकर ७:३–५ मध्ये देऊ केलेली सूचना अमान्य करण्यामुळे घडणारे हे परिणाम हक्काचा स्वार्थीरित्या दुरुपयोग करणे आहे.
१४. काही पालक त्यांच्या मुलावर असणाऱ्या शक्तीचा कसा दुरुपयोग करीत आहेत हे कसे दिसते?
१४ मुलांनी आपल्या पालकांच्या आज्ञा प्रभुमध्ये मानावयाच्या आहेत ही गोष्ट पालकांना व विशेषरित्या बापाला त्यांच्यावर प्रभुत्वाची शक्ती देते. ते या शक्तीचा कसा वापर करतील? निर्दयीपणे, अभावात्मकपणे व समभावना न राखता? जगातील कित्येक आईबाप अगदी हेच करीत आहेत व त्यामुळे ते “इजात्मक मुलांची वाढ” करीत आहेत. वर्ल्ड हेल्थ मासिकाच्या जानेवारी–फेब्रुवारी १९८४ अंकाच्या मते “प्रत्येक समाजात मुलांना वाईट वृत्तीने वागविण्यात येत आहे,” आणि “असे दिसते की आज अधिकाधिक मुलांना वाईटपणे वागविले जात आहे, त्यांची पिळवणूक केली जात आहे, त्यांना सारखे तडाखे लगावले जात आहेत तर काहींचा त्यागही केला जात आहे. जगातील कोणताही भाग या पासून अलिप्त नाही.” आणखी एक अहवाल कळवितो की मुलांना वाईट तऱ्हेने वागविणे याचे प्रमाण अमेरिकेत गेल्या दहा वर्षात दुप्पट झाले आहे. हे सर्व काही शक्तीचा दुरुपयोग खरेपणाने आहे. मुलाला अत्यंत कटुपणाने वागविण्याचा विचार ख्रिस्ती पालकांना सुसह्य वाटत नसला तरी ते एका प्रकाराविषयी दोषी ठरू शकतात. तो कोणता हे पौलाच्या या सूचनेत दिसून येईल: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांस चिरडीस आणू नका; तर यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना संतापण्यास प्रवृत्त होऊ नका, संतापवाल तर ती खिन्न होती.”—इफिसकर ६:४; कलस्सैकर ३:२१.
१५, १६. मुलेही त्यांच्या हक्काचा दुरुपयोग करण्याचे कसे दोषी बनू शकतात व त्यामुळे पालकांना काय करावे लागते?
१५ कदाचित हे नवलाचे वाटेल पण मुलेसुद्धा आपल्या हक्काचा दुरुपयोग करण्याचे दोषी ठरू शकतात. ते कसे काय? मुलांच्या बाबतीत पालक जो कनवाळूपणा राखून आहेत त्याचा फायदा घेऊन ती त्यांना त्यांच्या निर्णयाविरूद्ध वागण्यास प्रवृत्त करू शकतात. आपल्याला चोप मिळणार हे मुलाला कळते तेव्हा ते इतके गहिवरून रडते की ते बघून आईलासुद्धा गहिवरून येते व ती चोप देण्याचे बाजूला टाकते. ग्राहकांना हाताळण्याची क्षमता असणारी एक यशस्वी महिला भांडवलदार म्हणते: “स्त्रियांना अशी हाताळणी उपजत जमते. माझी मुलगी तिच्या पप्पांना केवढ्या चतुरपणे हाताळते ते तुम्ही सहज पाहू शकता.”
१६ एक वृत्तपत्राच्या अहवालानुसार, “उत्तर अमेरिकेत आपल्या पालकांवर वर्चस्व राखणाऱ्या व त्यांची मोठ्या चतुरपणे हाताळणी करणाऱ्या ‘जहाल मुलांची’ संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.” यावरील उपाय मुलांना नव्हेतर त्यांच्या पालकांना सूचना देण्यात दडलेला आहे. पालकांनी आपल्या मुलांसमोर एकत्वाची भूमिका नित्याने राखली पाहिजे. फुटीरपणाची थोडीशीही चुणूक मुलांना लगेच कळते व याचा फायदा ते एका पालकाला दुसऱ्या पालकाच्या विरूद्ध उभे ठेऊन स्वतःचे काम करून घेण्यात उचलतात. जे योग्य त्याकरता पालकांनी नेहमी दृढ राहिले पाहिजे पण मुलांना आपल्या प्रेमाची जाणही नित्याने होऊ दिली पाहिजे. यहोवा करतो तसे ख्रिस्ती पालकांनी प्रेमाने शिस्त लावण्यास हवी.—इब्रीयांस १२:५, ६.
इतर नातेसंबंधात
१७. कर्मचारी–मालक नातेसंबंधात शक्तीचा कसा दुरुपयोग होऊ शकतो?
१७ कर्मचारी–मालक यांच्यातील नातेसंबंध सुद्धा शक्तीचा गैरवापर करण्याचा मोह प्रस्तुत करतो. हे ध्यानात राखूनच पौलाने आजचे मालक, देखरेखे, धनी पण त्याकाळच्या दासांच्या मालकांना अशी सूचना दिली: “धन्यांनो, तुम्ही . . . धमकावण्याचे सोडून द्या. कारण तुम्हाला हे ठाऊक आहे की तुमचा व त्यांचा धनी स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.” (इफिसकर ६:९; कलस्सैकर ४:१) प्रापंचिक गोष्टीत ज्या ख्रिश्चनांना देखरेखीचा दर्जा आहे त्यांनी त्यांना असणाऱ्या शक्तीचा वा सामर्थ्याचा दुरुपयोग केला जाऊ नये याची दक्षता घ्यावी. कर्मचाऱ्यांशी ज्यांनी चांगले संबंध राखले त्याबाबतीत प्राचीन काळचा बवाज याचे उदाहरण उल्लेखनीयरित्या देता येण्याजोगे आहे.—रूथ २:४.
१८. अविवाहीत बंधु–भगिनींनी कशाची दक्षता घ्याची म्हणजे त्यांना असलेल्या हक्काचा दुरुपयोग करण्याचा दोष त्यांच्यावर येणार नाही?
१८ ख्रिश्चनांनी आपल्या हक्काचा वा शक्तीचा दुरुपयोग न होऊ देण्याविषयी आणखी एक क्षेत्र आहे व ते म्हणजे लैंगिक आकर्षण. कित्येक तरूण भगिनींना आपल्या स्वभावामुळे विवाहीत होण्याची व कुटुंब प्रस्थापित करण्याची इच्छा असते. याचा परिणाम असा होतो की कित्येक बांधवांना भगिनींच्या भावनांसोबत खेळणे सहजसोपे वाटते. हे अर्थातच हक्काचा दुरुपयोग करणे आहे. पौलाने तिमथ्याला सल्ला दिला: “वडील स्त्रियांस मातेसमान मान, तरूण स्त्रियांस पूर्ण शुद्धतेने बहिणीसमान मान.” उलटपक्षी ख्रिस्ती स्त्रियांना अशी सूचना आहे की त्यांनी “स्वतःस साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे.” त्या विवाहीत असोत वा अविवाहीत, त्यांनी “निर्मल वर्तन” प्रदर्शित करीत राहिलेच पाहिजे.—१ तिमथ्यी २:९; ५:२; १ पेत्र ३:२.
१९. ज्ञान, न्याय व प्रीती प्रदर्शित करण्यासोबत आम्ही आणखी कोणत्या गुणाच्या वापराबद्दल काळजी राखून असावयास हवे?
१९ आमच्या पवित्र शास्त्रीय प्रकाशनात ख्रिश्चनांनी स्वतःला इश्वरी सुज्ञानाकरवी मार्गदर्शित करावे, आपल्या सर्व दळणवळणात न्यायीपणाने वागावे, तत्वनिष्ठ प्रेम अ.गा’पे याची चालना मिळवावी याबद्दल बरेच काही सांगण्यात आले आहे. या लेखात चर्चिलेली माहिती स्पष्ट करते की यहोवाच्या सर्व सेवकांनी शक्तीचा गुण, शैली व ठेवा याविषयीही काळजी राखावी. त्यांनी त्याचा केव्हाही दुरुपयोग करू नये तर तिचा योग्य वापर करावा. खरेच देवाचे वचन याबाबतीत जी सूचना देऊन आहे त्याद्वारे इश्वरी सुज्ञानाचा भाव प्रदर्शित होतो. या सूचनांकडे लक्षपूर्वक कान दिल्याने आम्ही यहोवाच्या नामास गौरव आणू, इतरांना आशीर्वाद ठरू आणि देवाची मर्जी प्राप्त करू.
तुम्हाला कोणती सूचना आठवते?
◻ आम्हाठायी शक्तीचा गैरवापर करण्याची उपजत प्रवृत्ती आहे असे कसे म्हणता येते?
◻ शक्तीचा गैरवापर केला जाऊ नये यासाठी वडीलांनी दक्षता का घेतली पाहिजे?
◻ पती व पत्नी या दोघांनीही आपसातील नातेसंबंधात कोणत्या बाबतीत आपल्या हक्काचा गैरवापर होऊ देता कामा नये?
◻ पालक व मुले यांनी आपल्या नातेसंबंधात हक्काचा गैरवापर होऊ नये याकरता काय टाळण्यास हवे?
[१२ पानांवरील चित्रं]
शिमोनाने आपल्याकडील संपत्तीच्या आधारे पेत्राला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. या अहवालापासून आम्हाला कोणता धडा घेता येईल?
[१४ पानांवरील चित्रं]
तुमचे मूल तुमची चतुराईने हाताळणी करण्यासाठी आपल्याकडील हक्काचा वापर करते का?