वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ११/१ पृ. ८-९
  • चार शिष्यांना पाचारण करण्यात आले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चार शिष्यांना पाचारण करण्यात आले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मिळती जुळती माहिती
  • चार शिष्यांना पाचारण
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • माणसे धरणारे अशी सेवा करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • त्यानं भीती व शंका यांवर मात केली
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • मासेमारीच्या जाळ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ११/१ पृ. ८-९

येशूचे जीवन व उपाध्यपण

चार शिष्यांना पाचारण करण्यात आले

नासारेथ येथील स्वगृही येशूवर प्राणघातक हल्ला झाल्यावर तो गालील समुद्रानजीक असलेल्या कफर्णहुम या गावी येतो. यामुळे यशयाचा आणखी एक भविष्यवाद पूर्ण होतो. त्या समुद्रालगत राहात असलेल्या गालीलच्या लोकांना एक मोठा प्रकाश दिसतो याबद्दलचे भाकित आहे.

याठिकाणी येशू आपले राज्याच्या प्रचाराचे प्रकाशमय कार्य पार पाडीत असता त्याला त्याचे चार शिष्य आढळतात. हे त्याच्या सोबत आधी होते पण जेव्हा ते येशू सोबत यहुदीयातून निघाले त्यावेळी आपल्या मासे धरण्याच्या उद्योगाकडे परतले होते. आता येशू त्यांचा शोध घेतो कारण उपाध्यपणात त्याच्या नंतर जे भाग घेऊ शकतील अशांना तालीम देऊन नियमित मदतनीस तयार करण्यासाठी ती वेळ निकडीची होती.

यामुळेच येशू समुद्र किनाऱ्‍यावरून चालत असता शिमोन पेत्राला आपल्या सोबत्यांबरोबर जाळी धुताना बघतो, तेव्हा तो त्यांच्याकडे येतो. तो पेत्राच्या बोटीत जातो व त्याला ती नाव किनाऱ्‍यापासून आत पाण्यात नेण्यास सांगतो. ते थोडे दूरवर गेल्यावर येशू त्या बोटीत बसून किनाऱ्‍यावर उभा असलेल्या जनसमूहाला उद्देशून शिक्षण देतो.

त्यानंतर येशू पेत्राला म्हणतो: ‘आता बोट खोल पाण्याकडे न्या व तुम्ही आपली जाळी खाली सोडा.’

“गुरुजी,” पेत्र म्हणतो. “आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी खाली सोडतो.”

जाळी खाली सोडल्यावर त्यात इतके मासे येतात की जाळी ओढता ओढता ती फाटू लागतात. लगेच बोटीतील माणसे जवळच्या बोटीतील मासेमाऱ्‍यांना मदतीसाठी हाक देतात. लवकरच दोन्ही बोटी इतक्या माशांनी भरून जातात की त्या भारामुळे बोटीच खाली जाऊ लागतात. हे बघून पेत्र येशू पुढे पडतो व म्हणतो: “प्रभुजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे.”

“भिऊ नकोस.” असे येशू म्हणतो. “येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.”

येशू पेत्राचा भाऊ आंद्रिया यालाही बोलावितो. “माझ्यामागे चला,” तो आर्जवितो. “मी तुम्हाला माणसे धरणारे करीन.” त्यांचे सोबती जब्दीचे पुत्र याकोब व योहान यांनाही हेच आमंत्रण दिले जाते व ते सुद्धा काही का कू न करता त्याच्या मागे जातात. अशाप्रकारे हे चौघे जण मासे धरण्याचा आपला व्यवसाय सोडून देतात व ते येशूचे पहिले चार असे अचल व क्रियाशील शिष्य बनतात. लूक ५:१–११; मत्तय ४:१३–२२; मार्क १:१६–२०; यशया ९:१, २.

◆ येशू त्याच्या शिष्यांना त्याला अनुसरण्यास का सांगतो व ते कोण आहेत?

◆ कोणता चमत्कार पाहून पेत्र भयभीत होतो?

◆ येशू आपल्या शिष्यांना कोणास धरण्याचे काम करण्याचे निमंत्रण देतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा