वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 १०/१ पृ. २१-२६
  • शक्‍तीचा वापर योग्यपणे करतात ते धन्य!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शक्‍तीचा वापर योग्यपणे करतात ते धन्य!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा—महासामर्थ्यवान तरी सूज्ञ व न्यायी
  • येशू ख्रिस्ताचे उदाहरण
  • शक्‍तीचा गैरवापर केला नाही असे इतर
  • शक्‍तीचा गैरवापर करण्याविरूद्ध दक्षता बाळगा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • प्रबळ सत्ताधीश—यहोवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • “परमेश्‍वर व त्याचे सामर्थ्य ह्‍यांचा शोध करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • यहोवा तुम्हाला सामर्थ्यशाली बनवू शकतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 १०/१ पृ. २१-२६

शक्‍तीचा वापर योग्यपणे करतात ते धन्य!

“यहोवा मंदक्रोध व महापराक्रमी आहे; तरी तो . . . शासन केल्यावाचून राहणार नाही.”—नहूम १:३.

१. कोणाठायी एखादी विशिष्ठ प्रकारची शक्‍ती आहे तर हे अभिमान बाळगण्याजोगे कारण का असू शकत नाही?

शक्‍तीचे असे विविध प्रकार आहेत ज्यांचा बुद्धीजीवि प्राणिमात्रांना योग्यपणे वापर करता येईल. स्वाभाविक गुण किंवा परिस्थितीनुरूप आम्हाठायी शक्‍तीचा हा किंवा तो प्रकार असू शकेल. तरीपण हे अभिमान करण्याजोगे कारण आहे का? मुळीच नाही. आपण यिर्मया ९:२३ मध्ये काय वाचतो बरे? “ज्ञान्याने आपल्या ज्ञानाचा गर्व बाळगू नये. बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा गर्व बाळगू नये.” (न्यू इन्टरनॅशनल व्हर्शन) पण का? याचे प्रेषित पौल १ करिंथकर ४:७ मध्ये अगदी समर्पक उत्तर देतो: “तुला निराळेपण कोणी दिले? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस?”

२. शक्‍तीचा वापर करण्याची वेळ येते तेव्हा आम्ही दक्ष राहण्याची का गरज आहे?

२ आम्हापाशी असणाऱ्‍या शक्‍तीचा गैरवापर होऊ नये याकरता आम्ही दक्ष राहण्याची का गरज आहे? कारण “मानवाच्या अंतःकरणातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात.” (उत्पत्ती ८:२१) आम्हाला स्वार्थी वृत्तिकडे झुकण्याची प्रवृत्ति अनुवंशिकपणे लाभली असल्या कारणामुळे आम्ही आम्हापाशी असणाऱ्‍या शक्‍तीचा योग्यपणे वापर करण्यासाठी सतत दक्ष राहिले पाहिजे. एका कवीने हा विचार एकदा व्यक्‍त केला होता: “काळजीच्या छटेशिवाय खजिना नाही. दडून राहिलेल्या धूर्त सापळ्याशिवाय शक्‍ती ही नाहीच.” होय. वारशाने अपूर्णत्व लाभले असल्यामुळे शक्‍तीचा वापर स्वार्थ कारणासाठी करण्याकडे नेहमी वृत्ती जाते.

यहोवा—महासामर्थ्यवान तरी सूज्ञ व न्यायी

३. यहोवाठायी कोणत्या प्रकारची शक्‍ती वास करते?

३ शक्‍तीचा वापर कसा व्हावा याचे सुंदर व परिपूर्ण उदाहरण निर्माणकर्ता यहोवा देव याशिवाय इतर कोणाचेहि नाही. आपल्या शक्‍तीचा वापर प्रतिकूलरित्या करण्याची गरज प्रस्तुत झाली तरी तो तसे करण्यात उतावीळ नसतो तर तो मंदक्रोध आहे. (नहूम १:३) देवापेक्षा कोणाचीहि शक्‍ती मोठी नाही व याकारणास्तव आपण त्याला सर्वसमर्थ, सर्वशक्‍तिमान असे संबोधतो. तो स्वतःला “सर्वसमर्थ” हा किताब योग्यपणे लावू शकतो. (उत्पत्ती १७:१) त्याच्याठायी अमर्याद शक्‍ती आहे म्हणून तो पूर्ण शक्‍तीमान आहे एवढेच नाही तर विश्‍वाची निर्मिती केल्यामुळे सबंध विश्‍वाचा सेनाधीश प्रभु या त्याच्या पदामुळे त्याच्याठायी सर्व अधिकार आहेत या कारणामुळेसुद्धा आहे. या कारणास्तव कोणी ‘त्याचा हात धरून, “तू असे काय करितोस” असे म्हणू शकत नाही.’—दानीएल ४:३५.

४. यहोवाचे भय मानणे हा सूज्ञतेचा मार्ग का आहे?

४ यहोवा देव सर्वसमर्थ आहे या कारणामुळे तो असंतुष्ट होऊ नये याची आम्ही भीती बाळगावी हा सूज्ञतेचा मार्ग आहे. होय, “यहोवाचे भय ज्ञानाचा आरंभ होय, आणि परमपवित्राला ओळखणे हाच समंजसपणा होय.” (नीतीसूत्रे ९:१०) आम्ही मूर्तिपूजेच्या कोणत्याहि प्रकारात सहभागी होऊन यहोवा देवाला इर्ष्येला पेटवू नये अशी पौल आम्हाला ताकीद देतो, कारण “आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्‍तीमान आहो काय?” मुळीच नाही! (१ करिंथकर १०:२२) तरीपण जे यहोवाच्या नीतीमान आज्ञा जाणूनबुजून उल्लंघितात ते आपण यहोवापेक्षा जणू बलवान आहोत या अर्थी कृति आचरीत असतात. पौलाचे पुढील शब्द हा मुद्दा ठकळपणे सांगतो: “आपला देव भस्म करणारा अग्नि आहे.”—इब्रीयांस १२:२९.

५. यहोवा सर्वसमर्थ आहे म्हणून आम्हाला त्याची दहशत वाटण्याची जरूरी का नाही?

५ यहोवा देवाने आपले महासामर्थ्य त्याचे इतर तीन गुण: सूज्ञान, न्याय व प्रीती यांजसोबत पूर्णपणे समतोल राखले नसते तर त्याची आम्हाला भयंकर भीती दहशत वाटली असती. त्याला प्रतिकूल मार्गी आपल्या शक्‍तीचा वापर करावा लागला तरी तो त्या गुणांशी नेहमी बद्ध वा सुसंगत असतो. उदाहरणार्थ, नोहाच्याकाळी घडलेला जलप्रलय यहोवाच्या शक्‍तीचे प्रचंड प्रदर्शन खरेच होते. तरीपण देवाने वापरलेली शक्‍ती अन्यायी किंवा निष्ठुर होती का? कदापि नाही! मानवजात इतकी भ्रष्ट झाली होती की पृथ्वीवर घडत असलेल्या गोष्टी बघून देवाच्या अंतःकरणाला बरेच दुःख झाले. (उत्पत्ती ६:५–११) ते दुष्ट जुन्या वळणाचे लोक देवाच्या आशीर्वादांचा गैरवापर करीत होते म्हणून व शिवाय नोहा या ‘धार्मिकतेच्या उपदेशकाने’ त्यांना इशारा सुद्धा दिला तो नाकारल्यामुळे त्याने त्यांचे उच्चाटन पृथ्वीवरून करण्यात योग्य कृति केली.—२ पेत्र २:५.

६. यहोवाने सदोम व गमोरासोबत जे दळणवळण राखले त्याकरवी काय प्रदर्शित होते?

६ सदोम व गमोरा शहराच्या रहिवाश्‍यांनी, मानवजातीचा भाग या अर्थी यहोवा देवाच्या हातून मिळणाऱ्‍या आशीर्वादांचा उपभोग घेत असतानाच स्वतःला नीच वृत्तीचे पापकर्मी केल्यामुळे यहोवाने त्यांचा नायनाट व्हावा अशी दंडाज्ञा बजावली. अब्राहाम या आपल्या मित्राचा विचार राखून यहोवाने या विश्‍वास राखणाऱ्‍या माणसाला सदोम व गमोरा या विषयीचा आपला उद्देश कळवला. अब्राहामाला वाटले की हा शक्‍तीचा दुरुपयोग आहे त्यामुळे त्याने यहोवाला विचारले: “सर्व जगाचा न्यायधीश योग्य न्याय करणार नाही काय?” अब्राहामाने गैरसमज केल्यामुळे तो असे बोलला. सरतेशेवटी त्याला कबूल करावेच लागले की यहोवाने बजाविलेली दंडाज्ञा नीतीमान होती कारण त्या दोन शहरात दहा सुद्धा धार्मिक जण आढळले नाहीत. यावरून हे निश्‍चितपणे दिसते की यहोवा न्यायाने आपली शक्‍ती वापरताना केवढी काळजी घेतो.—उत्पत्ती १८:१७–३३; यशया ४१:८.

७. फारोला यहोवाच्या शक्‍तीकरवी प्रतिकूल दंड का मिळाला?

७ नंतर, मिसराच्या अन्यायी दास्यातून इस्राएलांची सुटका करण्याची वेळ आली तेव्हा यहोवाने फारोला सहकार्य दाखविण्याची संधि दिली. त्यामुळे फारो व त्याला लोकांना कसलीहि इजा होणार नव्हती. तथापि, त्या गर्विष्ठ व उद्दाम अधिपतीने यहोवाची विनंति मान्य करण्याचे नाकारले. त्यामुळे यहोवाने फारोवर एका मागोमग एक अशा दहा पीडा पाठवून आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन घडविले. (निर्गम ९:१६) फारोने इस्राएलांना जाऊ दिल्यावर त्याने पुनः त्यांचा पाठलाग करून यहोवाला परत एकदा आव्हान दिले. त्यामुळे यहोवाने तांबड्या समुद्रात फारो व त्याच्या सर्व लष्करी सैन्याचा नाश करण्याद्वारे आपल्या महासामर्थ्याचे न्यायी प्रदर्शन केले. (स्तोत्रसंहिता १३६:१५) या प्रत्येक घटनेत हे लक्षात घ्या की यहोवाने आपल्या महाशक्‍तीचा वापर आपल्या विश्‍वासू सेवकांचा म्हणजे, नोहा व त्याचे कुटुंब, लोट व त्याच्या दोन मुली आणि इस्राएली राष्ट्र यांच्या बचावाप्रीत्यर्थ केला.—उत्पत्ती १९:१६.

८. यहोवाने सन्हेरीबचे जे काही केले त्याचे योग्य कारण कोणते होते?

८ काही शतकानंतर हिज्किया राजाच्या काळी अश्‍शुरी सेनापती सन्हेरीब याने यरूशलेमाला दहशत भरली त्यावेळी यहोवा देवाने आपल्या महा सामर्थ्याचे अत्यंत प्रभावकारी व नीतीमान मार्गी प्रदर्शन केले. यहोवाच्या लोकांनी व त्यांचे नेतृत्व करणाऱ्‍या देवभिरू व निष्ठावंत हिज्किया राजाने यहोवाला मदतीसाठी याचना केली. ते त्याची सेवा विश्‍वासूपणे करीत त्यामुळे देव त्यांच्या मदतीस आला. सन्हेरीब राजाच्या पक्षाने दुसऱ्‍या बाजूने ही घमेंड मारली होती: ‘हिज्कियाचे ऐकू नका. यहोवा तुमचा बचाव करील अशी त्याला तुम्हाला भुरळ घालू देऊ नका. राष्ट्रांच्या इतर देवांपैकी कोणाला आपला देश सन्हेरीबच्या हातून सोडविता आला का? यापैकीच्या कोणाही देवाला तसे करता आले नाही तर यहोवा तरी तुमचा बचाव करील असा तुम्ही का विचार करावा?’ (यशया ३६:१३–२०) अशा या घमेंडीमुळेच देवाने आपल्या महाशक्‍तीचा वापर केला व एका रात्रीत त्याने १,८५,००० सैनिकांचा संहार घडवून आणला व त्याद्वारे राष्ट्रांचे देव व यहोवा यांजमध्ये किती फरक आहे हे त्याने खरेपणाने दाखवून दिले.

९. यहोवा आपल्या शक्‍तीचा वापर करण्यामध्ये काळजी घेतो हे दाखविण्यासाठी आणखी कोणती उदाहरणे दाखविता येतील?

९ आणखी जी थोडीफार उदाहरणे देता येतील त्यापैकी काहींचा विचार करा. यहोवाने मिर्यामला कोड दिले तेव्हा ते त्याच्या शक्‍तीचे पूर्णपणे न्याय्य व सूज्ञ वक्‍तव्य होते. ती या शिक्षेला पात्र होती कारण तिने देवाकडून नियुक्‍ती लाभलेल्या भावाविरूद्ध उद्दामपणाचे भाषण केले होते. (गणना १२:१–१५) उज्जीया राजासंबंधाने असेच घडले. त्याने मंदिराच्या गाभाऱ्‍यात घुसून सोन्याच्या वेदीपाशी धूप जाळला. लेव्यांनी मध्ये हस्तक्षेप केला तरी त्याने त्यांना जुमानले नाही. यामुळेच या राजास कोड उठवून आपली न्याय्य शक्‍ती दाखवली. (२ इतिहास २६:१६–२१) या दोघांची पापे एकाच पातळीची नसल्यामुळे यहोवाने त्याच पातळीनुरूप त्यांना शिक्षा केली. मिर्यामचे कोड तात्पुरते होते तर उज्जीया आमरण कोडी राहिला. अशा प्रकारे आम्हाला हे स्पष्ट दिसेल की यहोवा सर्वदा आपली शक्‍ती सूज्ञ व न्याय्य मार्गी वापरण्याची काळजी घेतो, तो त्याजवर प्रेम करणाऱ्‍या विश्‍वासू जनांचे राखण करतो तर दुष्टांचा संहार करतो.—स्तोत्रसंहिता १४५:२०.

येशू ख्रिस्ताचे उदाहरण

१०, ११. येशूही आपल्या शक्‍तीचा वापर करण्यात काळजी घेत होता हे कोणत्या उदाहरणांवरून कळते?

१० शक्‍तीचा वापर करण्यामध्ये देवाचा पुत्र आपल्या पित्याचा उत्तम अनुकारी ठरला. या विषयीचे आरंभीचे उदाहरण सैतानाने मोशेच्या शरीरासंबंधाने जो वाद चालविला त्या काळाचे आहे. लोगस किंवा शब्द याला सैतानाची कडकपणे खरडपट्टी काढता आली असती. या उलट, लोगसने तो निषेध यहोवा देवाकडूनच येण्यासाठी जणू काही पिछेहाट घेतली.—यहुदा ८, ९.

११ अरण्यात सैतानाने येशूची परिक्षा घेताना जो पहिलाच मोह टाकला तो शक्‍तीचा गैरवापर करण्याच्या प्रकरणाशी संबंधित होता. येशूने आपणाजवळील अतिमानवी शक्‍ती स्वार्थी उद्देशास्तव, दगडाचे अन्‍नात रूपांतर व्हावे म्हणून वापरावी यासाठी सैतानाने मोह घातला. हा मोह बराच इच्छा प्रदीप्त करणारा होता कारण येशूने प्रत्यक्षात ४० दिवस काहीच खाल्ले नव्हते, “त्याला भूक लागली” होती. सैतानाने हा मोह अशा पद्धतीने सादर केला की त्या करवी येशूला स्वार्थी मार्गाक्रमणात पकडावे. त्यामुळेच त्याने म्हटले की, “तू जर देवाचा पुत्र आहेत तर ह्‍या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर.” त्याला वाटत होते की, येशू या पद्धतीने आपली प्रतिक्रिया दाखवील: “मी देवाचा पुत्र आहे यात काही संशय वाटतो का, तर हे बघ आता धोंड्याच्या भाकरी तयारच होतील.’ तथापि, येशूने स्वार्थी अथवा मूर्ख मार्गाचे अनुकरण मोहात गुरफटण्याच्या किंवा पकडले जाण्याच्या निमिताने केले नाही त्या ऐवजी त्याने असे प्रत्युत्तर दिले: “मनुष्य केवळ भाकरीने नाही तर यहोवाच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल’ असा शास्त्रलेख आहे.” (मत्तय ४:१–४) आपण देवाचे पुत्र आहोत की काय ह्‍या व्यक्‍त केलेल्या संशयाकडे त्याने दुर्लक्ष केले आणि देवाने बहाल केलेल्या शक्‍तीचा गैरवापर करण्याचे त्याने नाकारले.

१२. सत्तेसाठी आपण लोभिष्ठ नाही हे येशूने आणखी कसे दाखविले?

१२ काही अवधिनंतर येशूने ५,००० पुरुषांना व त्यांच्या बरोबरील स्त्रिया व मुले यांना अन्‍नतृप्त केले त्यावेळी त्याला राजा बनवावे अशी यहुद्यांची इच्छा झाली. त्याने त्यांनी केलेली मागणी पत्करली असती तर देवाने अद्‌र्भित चमत्काराद्वारे लोकांना आश्‍चर्यचकित करण्यासाठी जी शक्‍ती बहाल केली होती तिचा तो गैरवापर ठरला असता. जगातील राजकारणाच्या बाबतीत आपल्याला तटस्थ राहिले पाहिजे व यहोवा देवाने आपणाला राज्यपद देण्यासाठी थांबणे जरूरीचे आहे हे त्याला ठाऊक होते. (योहान ६:१–१५) आणखी काही अवधिनंतर लोकसमुदाय त्याला बंदिवान करून नेण्यासाठी आला त्यावेळी देवदूतांच्या बारा सैन्यासाठी याचना करून बंदिवान होण्याचे टाळता आले असते. परंतु तो सुद्धा शक्‍तीचा गैरवापर झाला असता, कारण त्याने लोकांच्या स्वाधीन व्हावे अशी त्याच्या पित्याची इच्छा होती.—मत्तय २६:३९, ५३.

शक्‍तीचा गैरवापर केला नाही असे इतर

१३, १४. (अ) गिदोनाने, स्वतः सत्तेसाठी लोभिष्ट नाही याचे कोणते सुंदर उदाहरण दिले? (ब) शौल राजा झाला तेव्हा आरंभालाच त्याने कोणते उत्तम उदाहरण राखले?

१३ शक्‍तीचा गैरवापर करण्याच्या मोहाचा ज्या अपूर्ण मानवांनी प्रतिकार केला त्यामध्ये गिदोन या शास्त्याचे नाव काढलेच पाहिजे. इस्राएलांची मिद्यान्यांच्या हातून सोडवणूक केल्यावर लोकांना त्यालाच राजा करावेसे वाटले. परंतु, गिदोनाने ते नाकारले व योग्यपणे म्हटले: “मी तुमच्यावर अधिकार गाजविणार नाही; माझा मुलगा हि तुमच्यावर अधिकार गाजविणार नाही. यहोवाच तुमच्यावर अधिकार गाजवील.” होय, जी लीनता त्याने शास्ता या अर्थी आपली कारकीर्द सुरूवात केली त्यावेळी दाखवली ती अद्याप तशीच होती. गिदोनाने दाखविलेला हा प्रतिसाद इस्राएलांनी मानवी राजा मिळावा म्हणून इच्छा व्यक्‍त केली तेव्हा यहोवा देवाला स्वतःला जे वाटले त्यात दिसला. शमुवेल संदेष्ट्याच्या काळी इस्राएलांनी आपणात राजा असण्याची इच्छा धरली त्यावेळी देवाने दाखविलेल्या प्रतिक्रियेत ते आम्हाला कळून येते.—शास्ते ८:२३; ६:१२–१६; १ शमुवेल ८:७.

१४ तरीपण ज्यावेळी राजाची निवड करण्यात आली तेव्हा शौलाने प्रथमदर्शनी शक्‍तीचा वापर करण्यात राखलेल्या नियंत्रणाचे उत्तम उदाहरण प्रस्तुत केले. काही अधम लोक बोलले की, “‘हा मनुष्य आमचा काय उद्धार करणार?’ त्यांनी त्यास तुच्छ जाणिले . . . पण त्याने ते ऐकले न ऐकलेसे केले.” आपल्या हाती बादशाही सत्ता आहे हे जाणून त्याला त्यांच्याशी निष्ठुरपणे वागता आले असते पण त्याने तसे केले नाही. याचप्रमाणे शौलाने अम्मोन्यांवर विजय संपादित केल्यावर त्याच्या काही लोकांना वाटले की ज्यांनी त्याला तुच्छ मानले होते त्यांचे उसने फेडण्याची ही बरी वेळ आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे येऊन म्हटले: “‘हा शौल आमच्यावर राज्य करणार काय,’ असे जे म्हणाले ते कोणते लोक? त्यांस बाहरे काढा म्हणजे आम्ही त्यांस मारून टाकू.” तरीपण शौलाच्या मनात तो विचार नव्हता. त्याने म्हटले: “आज कोणाहि मनुष्याचा वध करावयाचा नाही.” आम्हाला हे दिसू शकेल की शौलाने आपली सुरुवात चांगली व भिडस्त केली होती. (१ शमुवेल ९:२१; १०:२०–२३, २७; ११:१२, १३) तथापि त्याने काही काळाने त्याने आपल्या बादशाही शक्‍तीचा गैरवापर आरंभिला हे केवढे दुःखाचे झाले व त्यामुळेच त्याचा शेवट वाईट झाला!—१ शमुवेल २८:६; ३१:३–६.

१५, १६. (अ) आपल्या न्यायदान शक्‍तीच्या वापराविषयी शास्ता शमुवेल काय साक्ष देऊ शकला? (ब) राजा दावीदानेही असेच कोणते उदाहरण पुरविले?

१५ शमुवेल या संदेष्ट्याने व इस्राएलाच्या शास्त्यानेही सुंदर उदहरण राखले. देवाने त्याचा अगदी बाळपणापासून सामर्थ्यशाली वापर करून घेतला. शमुवेलाने लोकांचा न्याय यथार्थतेने केला व त्यांची सोडवणूक केली. त्याने आपल्या पदाचा वापर स्वार्थीरित्या लाभांची प्राप्त व्हावी म्हणून केला का? कदापि नाही! आपल्या समारोपाच्या भाषणात त्याने लोकांना म्हटले: “पाहा, तुम्ही मला जे काही सांगितले ते सगळे मी ऐकून तुम्हावर राजा नेमिला आहे . . . हा मी तुमच्यापुढे आहे. यहोवा समक्ष व त्याच्या अभिषिक्‍तासमक्ष माझ्याविरूद्ध काही असेल तर सांगा. मी कोणाचा बैल घेतला आहे काय? कोणाचे गाढव घेतले आहे का? कोणाला फसविले आहे काय? कोणावर बलात्कार केला आहे का? डोळेझाक करण्यासाठी कोणाच्या हातून लाच घेतली काय?” या सर्व प्रकरणात शमुवेलाचे मार्गाक्रमण निष्कलंक होते हे त्याच्या लोकांना कबूल करावे लागले. त्याने आपल्या न्यायदान पदाच्या शक्‍तीचा गैरवापर केला नव्हता.—१ शमुवेल १२:१–५.

१६ याचप्रमाणे दावीदाने राखलेल्या उत्तम उदाहरणाकडे सुद्धा डोळेझाक करून चालणार नाही. दोनदा शौल राजा त्याच्या तावडीत सापडला होता व त्याला ठारही मारता आले असते. दावीद कदाचित असे म्हणू शकला असता: ‘शौल जर माझ्या जिवावर उठला आहे तर मी त्याचा जीव घेऊ नये का? माझे जीवन काय फुकट आले?’ किंवा त्याने स्वार्थी दृष्ट्या असा विचार केला असता: ‘इस्राएलाचा राजा होण्यासाठी शमुवेलाने माझा अभिषेक केलाच आहे तर मग शौलाचा विनाश हा ओघानेच आला नाही का? तर मग तो आत्ताच का करू नये?’ नाही. दावीदाने असा विचार केला नाही. राज्याची प्राप्ती होण्यासाठी यहोवाची वेळ येईपर्यंत तो थांबून राहिला. (१ शमुवेल २४:१–२२; २६:१–२५) तरीपण, राजा झाल्यावर दावीदाने दोनदा तरी आपणास लाभलेल्या शक्‍तीचा दुरुपयोग केला: उरीयाचा मृत्यु घडवून आणणे व इस्राएलांच्या सैन्याची मोजदाद करणे.—२ शमुवेल ११:१५; २४:२–४, १२–१४.

१७. पौलाने स्वतः कधीही लोभी नसल्याचे व आपल्या शक्‍तीचा गैरवापर कधीही न केल्याचे कसे दाखविले?

१७ येशू ख्रिस्ताच्या अनुयायांत प्रेषित पौलाने याबाबतीत उत्तम उदाहरण राखले. तो ज्या मंडळ्यांची सेवा करीत होता त्यांच्याकडील आधाराची तो मागणी करू शकत होता. तरीपण असा हा लाभ त्याने घेतला नाही. त्याने इफिसच्या वडीलांना म्हटले: “मी कोणाच्या सोन्याचा, रूप्याचा किंवा वस्त्राचा लोभ धरला नाही. माझ्या व माझ्या सोबत्यांच्या गरजा भागविण्याकरता ह्‍याच हातांनी श्रम केले, हे तुम्ही स्वतः जाणून आहा. (प्रे. कृत्ये २०:३३, ३४) करिंथ येथील मंडळीस प्रेषिताने याच मुद्याविषयी लिहिताना अगदी जोरदारपणे लिहिले. (१ करिंथकर ९:१–१८) प्रांपचिक काम करण्याशिवाय राहणे हा त्याचा हक्क होता, कारण कोणी आपल्याच खर्चाने शिपाईगिरी करतो का? धान्याची मळणी करताना बैलाला मुसके घालू नये असे मोशानेच म्हटले नव्हते का? “मी तर,” पौल म्हणतो, “ह्‍यापैकी कशाचाहि उपायोग केला नाही.” त्याचे बक्षीस कोणते होते? “मी सुवार्ता फुकट सांगावी, अशा हेतूने की, मी सुवार्तेविषयीचा माझा अधिकार पूर्णपणे बजावू नये.”

१८. (अ) यहोवाने शक्‍तीचा जो सर्वोत्तम वापर केला त्या विषयी आम्हाला कसे वाटावे? (ब) याबाबतीत जे त्याचे अनुकरण करतात अशांना धन्य का म्हणता येईल?

१८ होय, ‘आपल्या शक्‍तीचा दुरुपयोग न करणारे ते धन्य’ असे खऱ्‍या अर्थी म्हणता येईल. यहोवा देवाने उत्तम उदाहरण राखून आपली सर्वसमर्थ शक्‍ती सूज्ञान, न्याय, आणि प्रीती या इतर गुणाच्या समतुल्य ठेवल्यामुळे केवढे अत्युत्तम नाव मिळविले! तद्वत आम्ही स्तोत्रकर्त्या दावीदासोबत मिळून असे म्हणू शकतो: “हे माझ्या जिवा, यहोवाचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर.” (स्तोत्रसंहिता १०३:१) ज्यांनी शक्‍तीचा योग्य तो वापर करण्यात यहोवाचे उदाहरण अनुसरले आहेत ते खरेच धन्य आहेत. शास्त्रवचनाद्वारे ज्या उदाहरणांचे आम्ही आता परीक्षण केले त्याकरवी हे दिसले की आम्ही अपूर्ण मानव असलो तरी सुद्धा आम्हापाशी असणाऱ्‍या शक्‍तीचा आम्हाला योग्य वापर करता येईल. असे केल्यामुळे आमचा विवेक स्वच्छ राहील इतकेच नव्हे तर देवाची मर्जी व आमच्या सहमानवाकरवी आमचा आदरही होईल.

तुम्हाला आठवते का?

◻ शक्‍तीचा दुरुपयोग न करण्याविषयीची सूचना रास्त का आहे?

◻ यहोवा देव आपली शक्‍ती योग्यपणे वापरतो ही कोणती उदाहरणे दाखवितात?

◻ शक्‍तीचा गैरवापर होऊ नये याविषयी येशू दक्ष होता असे का म्हणता येते?

◻ इब्री शास्त्रवचनातील कोणत्या लोकांनी शक्‍तीचा दुरुपयोग केला नाही असे दाखविले?

◻ शक्‍तीचा वापर करण्यात प्रेषित पौलोन स्वतःला उदाहरणशील असल्याचे कसे दाखविले?

[२२ पानांवरील चित्र]

यहोवाचे प्रमुख गुण पूर्णपणे समतुल्य आहे

प्रीती शक्‍ती न्याय सूज्ञान

[२३ पानांवरील चित्रं]

देवाने न्याय्यपणे आपल्या शक्‍तीचे प्रदर्शन केले:

जलप्रलयाद्वारे

सदोम व गमोरा येथे

लाल समुद्रात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा