वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 १०/१ पृ. ४-७
  • तुम्हास गुरुकिल्ली मिळाली आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हास गुरुकिल्ली मिळाली आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आम्ही खरेच देवावर प्रीति करतो तर
  • इतरासोबत सहभागी करण्याची चालना मिळाली
  • सोबतीच्या ख्रिश्‍चनासाठीचे प्रेम
  • तुमच्यावर प्रीती करणाऱ्‍या देवावर प्रेम करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • प्रीतीने तुमची उन्‍नती होत जावी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • प्रीतीचा सर्वोत्कृष्ट मार्ग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • प्रेम—एक मौल्यवान गुण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 १०/१ पृ. ४-७

तुम्हास गुरुकिल्ली मिळाली आहे का?

प्रीती ख्रिश्‍चनांना एवढी महत्वपूर्ण का असावी? कारण त्या स्वरूपाच्या देवाची ते भक्‍ती करतात. प्रेषित योहान त्यास या शब्दांनी वर्णितो: “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) बहुधा पालक त्यांची लेकरे त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचे अपेक्षितात त्याचप्रमाणे यहोवा देव ख्रिश्‍चनांनी त्याजसारखे असण्याचा प्रयत्न करण्याचे इच्छितो. अशाप्रकारे प्रेषित पौलाने आर्जविले की: “देवाची प्रिय मुले या नाते त्याचे अनुकरण करणारे व्हा व प्रीतिने चाला.”—इफिसकर ५:१, २.

प्रीति इतर ख्रिश्‍चन गुणांचा समतोल साधते. येशूच्या दिवसात यहुदी—खासरित्या त्यांचे पुढारी—पवित्रशास्त्राचे मेहनती विद्यार्थी होते. परंतु येशू त्यांना काय म्हणाला याचा विचार करा: “तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता; कारण त्याच्या द्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हास वाटते; . . . पण मला याची जाणीव आहे की तुम्हाठायी देवाची प्रीति नाही.” (योहान ५:३९, ४२; लूक ११:४२) त्यांच्या जवळ ज्ञानाप्रमाणेच, प्रीति असती तर त्यांनी येशूचा मसिहा म्हणून स्विकार केला असता, या कारणास्तव ख्रिश्‍चन मंडळीचे पहिले सभासद होण्याची संधी त्यांनी दवडली.

आठवण करा की रोमन कॅथोलीक लोकांनी त्यांचा धर्म शोध लागलेल्या नव्या जगाकडे नेला. त्यांच्या जवळ दृढ़ विश्‍वास होता व त्यांनी जे केले होते ते प्रस्थापण्याचा आवेश होता. तथापि, याला प्रीतीचे पाठबळ नव्हते. हे खरे असे असते तर, त्यांनी अमेरिका प्रदेशातील त्यांचे ग्रामबंधूना त्रास, लुटमार, बलात्कार व वध कधीच केला नसता.

अशाप्रकारे, प्रीति ही ख्रिश्‍चन गुणांची मुख्य किल्ली आहे. या प्रीतिचे मुख्य लक्ष्य कोण असावे? येशू आम्हास सांगतो: “तू तुझा देव यहोवा यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर, हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की ‘तू आपणा स्वतःवर तशी तुझ्या शेजाऱ्‍यावर प्रीति कर.’”—मत्तय २२:३७–३९.

वस्तुतः ख्रिश्‍चन प्रीति याही पुढे जाते. येशू असेही म्हणाला: “तुम्ही आपल्या वैऱ्‍यावर प्रीति करा व जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवितो व नीतिमानांवर व अनीतिमानावर पाऊस पाडितो.” (मत्तय ५:४४, ४५) दुसऱ्‍या शब्दात म्हणायचे तर, ख्रिश्‍चनांची प्रीति सर्वांना कवटाळते! परंतु व्यवहारिक दृष्ट्या याचा अर्थ काय होतो?

आम्ही खरेच देवावर प्रीति करतो तर

आम्ही देवावर प्रीति करू इच्छितो तर एक गोष्ट ही की आम्हास त्याला चांगल्या रीतिने जाणण्याची गरज आहे. देवाने ती गोष्ट स्वतःच पवित्रशास्त्र पुरवून शक्य करून दिली आहे परिणामतः ते जणू काय त्याजपासूनचे आम्हासाठीचे पत्र आहे. आम्हास प्रिय असणाऱ्‍यांकडून पत्र येते तेव्हा आम्हातील बहुतेक जण कितीही कार्यमग्न असलो तरी ते झटकन वाचतो. पवित्रशास्त्र वाचण्याबाबत कांही वेगळे असावे का? मुळीच नाही. पुष्कळांचे जीवन सध्या विचलीत गोष्टींनी भरले आहे हे सत्य आहे, गंभीर वाचनाऐवजी बहुतेक दूरचित्रवाणी पाहण्याचे पसंत करतात. परंतु खरे ख्रिश्‍चन त्या गोष्टींना देवाच्या वचनाचे वाचन करण्यापासून स्वतःस परावृत करू देणार नाही. अशा प्रकारे ते स्तोत्रकर्त्याप्रमाणे आहेत ज्याने लिहिले: “माझा जीव तुझे निर्बंध पाळतो, [जे आज पवित्र शास्त्रात सापडतात] ते मला अत्यंत प्रिय आहेत.”—स्तोत्रसंहिता ११९:१६७.

देव आम्हास, पवित्रशास्त्रात आम्ही कसे वागावे असे तो इच्छितो ते सांगतो. पालक त्यांच्या लेकरासाठी वागणूकीचे दर्जे घालतात त्याप्रमाणेच आम्ही पाळावेत असे तो अपेक्षितो ते दर्जे आखून आहे—दर्जे ते ओलांडता येणार नाहीत. उदाहरणार्थ, पवित्र शास्त्र आम्हास सांगते: “जारकर्मी, मुर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुष संभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (१ करिंथकर ६:९, १०) ती भली मोठी यादी आहे! देवावर खरोखर प्रीति करतो, तो या गोष्टीची दखल घेण्यात हर्षित असणार. ते का? कारण प्रेषित योहानाने निर्देश केला की: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय.”—१ योहान ५:३.

दुर्दैवीपणे पाहता पवित्र शास्त्रात धिक्कारलेली वर्तणूक सध्या “ख्रिश्‍चन” लोकात सुद्धा स्विकृत बनत चालली आहे. कॅनडामधील प्रॉटेस्टंट पंथीयांच्या अहवालाने शिफारस केली की समलींगी संभोग घेणारे सेवकाच्या दिक्षेस पात्र आहेत, विवाहाआधीचे लैंगिक नाते विशिष्ट परिस्थीतीत स्विकृत व सुचविले की वैवाहिक निष्ठेत जारकर्म काढून टाकण्याची गरज नाही. यात संशय तो काय की त्या अहवालाचे लेखक स्वतःस विशाल मनोवृतीचे सादर करू इच्छीत होते परंतु, ते देवाबाबत किंवा ज्यांना अशा अनैतिक भानगडीत जाण्याचे उत्तेजन देतात त्यांच्यावर प्रीति दाखवित होते का? क्वचितच, कारण प्रेषित पौल म्हणतो की अशी कृती करणाऱ्‍यांना देवाचे राज्याचे वतन मिळणार नाही, हे पाहता तर निश्‍चीतच नाही. दुर्बळांना साधा सोपा मार्ग जो सरतेशेवटी नाशाकडे निरवितो त्याबाबत उत्तेजन देण्याऐवजी देवाचे दर्जे निर्भयपणे उंचावणे व तो आपल्या सभासदांना अनुसरण्यास लावणे हा केवढा प्रेमळ मार्ग आहे बरे!

इतरासोबत सहभागी करण्याची चालना मिळाली

पवित्रशास्त्र आम्ही वाचतो त्यावेळी आम्ही देवाने मानवजातीसाठी उद्देशिलेल्या विलोभनिय गोष्टी शिकतो. आम्ही शिकतो की “देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याजवर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) पृथ्वीची दुष्टतेपासून मुक्‍तता करून शांतीदायी नंदनवनमय व्यवस्थीकरण त्याचे राज्य याच येशूच्या वर्चस्वाखाली असेल त्याच्या द्वारे आणण्याचा त्याचा उद्देश ही आम्ही शिकतो. (मत्तय ६:९, १०; प्रकटीकरण २१:३, ४) पवित्रशास्त्र अभिवचन देते त्यानरूप: “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल . . . परंतु लीन जन पृथ्वीचे वतन पावतील व ते उदंड सुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्रसंहिता ३७:१०, ११.

वस्तुतः पवित्रशास्त्राचा संदेश हा अक्षरशः जे मानवजातीच्या गरजेचे आहे तोच आहे. म्हणूनच ख्रिश्‍चन राष्ट्र समुहाचे मिशनरी गरीब देशातील दारिद्र व अन्याय पाहून अस्वस्थ झाले व ते राजकारण एवढेच काय पण क्रांतीत समाविष्ट झाले हे वाचणे दुखःद आहे. क्रांती ही त्या देशाची समस्या सोडविणार नाही. असे मिशनरी खरोखरच देवावर प्रीति करतात का? असे असल्यास काय ते त्याच्या अभिवचनावर विश्‍वास दाखवून त्यांच्या कळपास त्याच्या राज्याकडे निरविणार नाहीत काय? त्यांच्या कळपावर खरोखरी प्रीति दर्शविणारे मेंढपाळ त्यांना खात्रीने देवाच्या आज्ञास आज्ञाधारकपणा कसा मदत करू शकतो हे त्यांना स्वतःला कोणत्याही राजकीय योजनेत ज्या शेवटास केवळ निष्फळतेत संपतात त्यात समाविष्ठ होण्याऐवजी दाखवितील.

सत्य हे आहे की पवित्र शास्त्रातील विलोभनिय संदेश कोणतीही प्रेमळ व्यक्‍ती स्वतःपुरताच राखणार नाही. या कारणास्तव, ही प्रीति अशी आहे की जी खऱ्‍या ख्रिश्‍चनास त्यांना ठाउक आहे त्याची इतरासोबत सहभागी करण्याची चालना देईल. ख्रिश्‍चन राष्ट्र समुहात पवित्र शास्त्राबाबत इतरासोबत बोलण्याचे काम हे पगारी, व्यावसायिक लहानसा गट—धर्मगुरु यांच्यावर सोपविले आहे. याचे वाईट परिणाम झाले. एका ल्युथरन पाळकाने ख्रिश्‍चॅनिटी टूडे या मासिकात कबुल केले की: “सद्या चर्च दुबळे आहे कारण आध्यात्मिक नेते जे करतात तेच कार्य करण्यास विश्‍वासू जनांच्या गटास तालीम देण्यात ते अपयशी ठरले. किंवा विश्‍वासूजन हे उपाध्यपण स्विकारण्यात व ओळखण्यात मागे पडले.”

खरे ख्रिश्‍चन ‘हे उपाध्यपण ओळखतात व स्विकारतात.’ प्रेषित पौलाचे हे शब्द: “आपण न डळमळता आपल्या आशेचा जाहीर पत्कर दृढ धरू; कारण ज्याने वचन दिले तो विश्‍वासनीय आहे” ते गांभिर्याने घेतात. (इब्रीयांस १०:२३) त्यांचा हेतु? पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांच्या गटास ज्याने प्रवृत केले त्यासारखा आहे, ज्याविषयी प्रेषित पौलाने उबदारपणे प्रशंसोद्‌गार काढले: “ते ख्रिस्त प्रीतिमुळे जाहीर करतात.”—फिलिपैकर १:१६.

सोबतीच्या ख्रिश्‍चनासाठीचे प्रेम

होय, प्रीति ही खऱ्‍या ख्रिश्‍चनत्वाची गुरुकिल्ली आहे जी खऱ्‍या ख्रिश्‍चनाच्या जीवनातील प्रत्येक व्यवहारावर प्रभाव करते. अशाप्रकारे ती त्यांच्या सभोवतालच्या लोकापासून त्यांना भिन्‍न करते. का? प्रेषित योहानाने या जगाबाबत म्हटले: “जग तर त्या दुष्टाच्या अधीन आहे.” (१ योहान ५:१९) हा दुष्ट दियाबल सैतान आहे व जग हे त्याच्या बहुतेक कार्यात त्याचे रूप प्रतिबींबीत करते. सैतानाचा प्रभाव हा वाढती अप्रामाणिकता अनीती, अन्याय, वंशभेद तणाव, व आर्थिक असमांतरता, आज अस्तित्वात आहे त्यात दिसून येतो. एक ख्रिश्‍चन, प्रेमळ देवाची उपासना करतो व प्रीतिचा गुण विकसीत करून त्यास अनुसरतो तर त्याने वेगळे असलेच पाहिजे.

आता हे एकट्याने करणे सोपे नाही. यास्तव ज्याच्या जवळ प्रीति गुणाविषयी अशीच गुणग्राहकता आहे त्यांना शोधण्याचे आम्हास पवित्र शास्त्र उत्तेजन देते. अशाप्रकारे ख्रिश्‍चन एकमेकांना मदत करू शकतात. याचसाठी प्रेषित पौलाने हे उत्तेजनपर शब्द लिहिले: “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकाकडे लक्ष देऊ, आम्ही एकत्र मिळण्याचे न सोडता, . . . एकमेकांना उत्तेजन द्यावे.”—इब्रीकर १०:२३–२५.

तुम्हास त्या उत्तेजनास पुष्टी देणे असेल तर यहोवाचे साक्षीदाराना तुम्हास जे त्यांच्या जिवनात इश्‍वरी प्रीति दाखविण्याचा अटीतटीचा प्रयत्न करतात त्या गटासोबत तुमची ओळख करून देण्यात आनंद वाटेल. तुमच्या वसाहतीत अशा प्रकारचा गट आहे यात मुळीच शंका नाही व देवाचा आत्मा त्यांच्यावर आहे कारण तात्पर्य पहाता तोच खऱ्‍या ख्रिश्‍चन प्रीतिचा उगम आहे. “आत्म्याची फळप्राप्ती प्रीति आहे.” (गलतीकर ५:२२) त्यांच्यासोबत एकत्र येणे हे प्रेषित पेत्राच्या “बंधुवर्गावर प्रीति करा” या उत्तेजनाकडे लक्ष देण्यास मदत करील.—१ पेत्र २:१७.

देवाची सेवा करण्याचा कठोर प्रयत्न करूनही ज्यांना येशूचे भयप्रद शब्द: “माझी तुमची कधीच ओळख नव्हती! अहो अधर्म करणाऱ्‍यांनो मजपुढून चालते व्हा” एकावे लागतील अशा मध्ये एकाद्याने असणे केवढे दुखःद आहे बरे! (मत्तय ७:२३) आम्ही प्रीतिचा विकास करू, जी खऱ्‍या ख्रिश्‍चनत्वाची गुरुकिल्ली आहे तर ही गोष्ट आमच्या बाबत घडणार नाही. प्रीति आम्हास पवित्र शास्त्र वाचण्यास, त्याच्या दर्जानरूप जीवन कंठण्यास, इतर ख्रिश्‍चनाबरोबर एकत्र येण्याचा शोध घेण्यास, पवित्र शास्त्र सामावून असणाऱ्‍या चांगल्या गोष्टीविषयी इतरासोबत बोलण्यास चालना देईल. होय, प्रीति आम्ही जे करावे असे देव इच्छीतो ते करण्यास चालना देईल. येशूने म्हटले त्याप्रमाणे “जो कोणी [त्याच्या] स्वर्गीय पित्याचा इच्छेप्रमाणे वर्ततो” त्यास देवाच्या अभिवचनाचा लाभ होईल. प्रेषित योहानाने पुष्टी दिली: “देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—मत्तय ७:२१; १ योहान २:१७.

होय, प्रीति वाढवा. देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास तिला तुम्हास चालना देऊ द्या. अशाप्रकारे, तुम्ही स्वतःस खरे ख्रिश्‍चन शाबीत कराल. येशूने म्हटले त्याप्रमाणे: “तुमची एकमेकावर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) जे देवावर प्रीति करतात त्यांना त्याने दिलेल्या चिरकालीक बक्षीसाचा आनंद तुम्हीही लूटू शकाल.

[७ पानांवरील चित्रं]

प्रीति जोपासा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा