येशूचे जीवन व उपाध्यपण
त्याच्या स्वदेशी सभास्थानात
येशू घरी परततो, तेव्हा नासरेथ येथील घडलेल्या खळबळीची आपण कल्पना करू शकतो. योहानाकडून बाप्तिस्मा करून घेण्याच्या वर्षापूर्वी येशू एक सुतार म्हणून ओळखला जात होता. पण आता तो अद्भुत कृत्ये करणारा ख्यातनाम व्यक्ती ठरला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशी त्याने केलेल्या चमत्कारापैकी काही त्यांच्यामध्ये घडावे म्हणून पाहण्यास उत्सुक आहेत.
येशू आपल्या चालीरितीप्रमाणे तेथील स्थानिक सभास्थानात जातो व परिपाठाप्रमाणे वाचावयास उभा राहतो तेव्हा त्यांच्या अपेक्षा उंचावतात. विधी चालू असताना तो वाचावयाला उभा राहतो. संदेष्ट्याचा ग्रंथपट देण्यात येतो. ते उलगडून जे स्थळ तो काढतो त्यामध्ये यहोवाच्या आत्म्याने अभिषेक झालेल्यासंबंधी लिहिले असते. ते आज आपल्या पवित्र शास्त्रात यशयाच्या ६१व्या अध्यायात वाचावयास मिळते.
दीनांस सुवार्ता सांगवायास, अंधळ्यास पुन्हा दृष्टी द्यावयास व यहोवाच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावयास एकजण कसा येईल यासंबंधी वाचल्यानंतर ग्रंथपट गुंडाळून तो सेवकास देतो व खाली बसतो. सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळलेली असते. तो त्यांना खुलासोवार स्पष्टीकरण करतो: “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.”
त्याच्या “कृपा वचनांवरून” लोक आश्चर्य करून एकमेकांस म्हणू लागतात: “हा योसेफाचा पुत्र ना?” त्याच्याकडून अद्भुत कृत्ये पाहावे असे त्यांना वाटते हे ओळखून येशू त्यास म्हणतो: “खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की हे वैद्या तू स्वतःलाच बरे कर. कफर्णहूमांत ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले त्या येथेही आपल्या गावी कर.” स्वेदशातूनच पहिल्यांदा रोग बरे करावयास हवे, व त्यांचा फायदा पहिला त्याच्या लोकांना व्हावयास हवा होता हे त्यांच्या मनात होते हे उघड आहे. यामुळे त्यांना वाटले की येशू आपणास तुच्छ लेखितो.
त्यांचे विचार ओळखून येशू त्यांना लागू होऊ शकेल अशा प्रकारचा इतिहास सांगतो. एलियाच्या काळी इस्राएलांत पुष्कळ विधवा होत्या तरी त्यातील एकीहीकडे एलियाला पाठविले नव्हते तर सीदोन प्रदेशातील सारफथ येथील एका यहुद्देतर विधवेकडे त्याला पाठविले होते, जेथे त्याने जीवन बचावणारा चमत्कार केला. तसेच अलीशाच्या काळी पुष्कळ कुष्ठरोगी तेथे होते पण सूरियाच्या नामानाला मात्र अलीशाने शुद्ध केले.
प्रतिकुल ऐतिहासिक तुलनेत त्यांचा स्वार्थीपणा व अविश्वासूपणा शाबित करून दिल्यामुळे ते संतापाने येशूला सभास्थानातून उठवून गावाबाहेर आणतात. ज्या डोंगरावर नासरेथ वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास ते तेथवर येतात. पण येशू त्यांच्या मधून निघतो व सुरक्षितपणे बाहेर पडतो. लूक ४:१६-३०; १ राजे १७:८-१६; २ राजे ५:८-१४.
◆ नासरेथमध्ये का खळबळ उडाली?
◆ येशूच्या भाषणावरून लोकांना काय वाटते, पण नंतर कोणत्या कारणाने ते संतापतात?
◆ येशूचे काय करण्याचा लोक प्रयत्न करतात?