वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ५/१ पृ. ३०-३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मिळती जुळती माहिती
  • तुमचा विश्‍वास तुम्ही बायबलमधून पडताळून पाहाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • ख्रिस्ती आत्म्याने व सत्याने उपासना करतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे?
    यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे?
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ५/१ पृ. ३०-३१

वाचकांचे प्रश्‍न

◼ यहोवाच्या साक्षीदारांनी काहींना धर्मत्यागाच्या कारणामुळे का बहिष्कृत केले (बहिष्कार टाकला), ज्यांचा अद्याप देव, पवित्र शास्त्र व येशू ख्रिस्तावर विश्‍वास आहे?

अशा आक्षेपाचा सूर असणाऱ्‍यांना हे दाखवावयाचे आहे की ख्रिस्ती असण्याचा दावा असणाऱ्‍या संस्थांमध्ये मतभेदीय दृष्टीकोणास वाव दिला जातो. काही धार्मिक पुढारी त्यांच्या चर्चच्या मुलभूत शिक्षणासोबत सहमत नाही तरीही ते उत्तम स्थितीत राहिलेले आहेत. ख्रिस्ती धर्मराज्यातील बहुतेक सर्व पंथांमध्ये असे आधुनिकतावादी आणि मुलगामी लोक आढळतात ज्यांचा शास्त्रवचनांच्या प्रेरणेसंबंधाने नेहमीच वाद असतो.

तथापि, अशी ही उदाहरणे आम्हीही असेच अनुकरण केले पाहिजे याचा आधार देत नाही. का बरे? पुष्कळ पंथांमध्ये, पवित्र शास्त्रीय सत्याची निश्‍चिती नसल्यामुळे पाळक गट व सर्वसाधारण सदस्यांचा गट यात भिन्‍न दृष्टिकोणास वाव दिला जातो. हे लोक येशूच्या काळातील शास्त्री परूश्‍यांसारखे आहेत ज्यांना, येशूने शिकविले त्याप्रमाणे अधिकारवाणीने शिक्षण देता येत नाही. (मत्तय ७:२९) तसेच या धर्मवाद्यांची संमिश्र विश्‍वासाला काही प्रमाणात संमति असल्यामुळे भिन्‍न विश्‍वासाच्या बाबतीत अधिक गंभीर दृष्टिकोण धरू नये असे त्यांच्यावर बंधन आहे.

परंतु अशा दृष्टिकोणाला पवित्र शास्त्राचा आधार नाही. येशूने यहुदी धर्माच्या कोणाही संघटनेसोबत सख्य जोडले नाही. हे यहुदी, निर्मितीच्या देवावर, इब्री शास्त्रवचनावर व खासपणे मोशेच्या नियमशास्त्रावर विश्‍वास ठेवून होते. तरीपण येशूने आपल्या शिष्यांना “परूशी व सदुकी ह्‍यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले.” (मत्तय १६:११, १२, २३:१५) याप्रमाणेच प्रेषित पौलानेही याविषयी केवढ्या जोरदारपणे बोलणी केली त्याकडेही लक्ष द्या: “जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली, किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली, तरी तो शापभ्रष्ट असो.”—गलतीकर १:८, ९.

मतभेदीय वा भिन्‍न दृष्टीकोणांचे शिक्षण देणे हे खऱ्‍या ख्रिस्ती धर्मासोबत जुळणारे नाही. हे स्पष्ट करताना पौल १ करिंथकर १:१० मध्ये म्हणतो: “आपला प्रभुयेशू ख्रिस्त ह्‍याच्या नावाने मी तुम्हात विनंति करतो की तुम्ही एकमेकांशी सहमत व्हा म्हणजे तुम्हास फुटी होणार नाहीत आणि तुम्ही मन व विचार या दोहोत पुर्णपणे एक राहाल.” (न्यू इंटरनॅशनल व्हर्शन) इफिसकर ४:३–६ मध्ये त्याने आणखी म्हटले की ख्रिश्‍चनांनी “आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा”वे. त्यांना “झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसेच शरीरही एकच व आत्मा एकच आहे. प्रभु एकच, विश्‍वास एकच, बाप्तिस्मा एकच, . . . सर्वाच्याठायी असलेला देव जो सर्वाचा पिता तोहि एकच आहे.”

ही ऐक्यता प्रत्येकाने स्वतंत्रपणे शास्त्रवचनांचा शोध घेऊन व त्याद्वारे स्वतःचा निर्णय घेऊन व याचेच शिक्षण देऊन प्राप्त करायची होती का? मुळीच नव्हे. येशू ख्रिस्ताद्वारे यहोवाने या उद्देशास्तव “कोणी प्रेषित, . . . कोणी सुवार्तिक, कोणी मेंढपाळ व कोणी शिक्षक असे नेमून दिले. . . . देवाच्या पुत्रावरील विश्‍वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत . . . आपण सर्व येऊन पोहंचू तोपर्यंत दिले.” होय, अशा उपाध्यायांच्या मदतीने मंडळीची ऐक्यता—शिक्षण व कार्य यातील ऐक्यता—साधता व राखता येणे शक्य आहे.—इफिसकर ४:११–१३.

यहोवाच्या साक्षीदारांसोबत मान्यताप्राप्त सदस्यत्वाचा आधार केवळ देवावरील, पवित्र शास्त्रावरील आणि येशू ख्रिस्तावरील विश्‍वासावर आधारित नाही हे उघड आहे. रोमन कॅथोलिकांचे पोप आणि कँन्टरबरीचे अँग्लीकन आर्चबिशप यांचाही वरीलप्रमाणेच विश्‍वास आहे पण त्यांचे चर्च सदस्यत्व मात्र एकमेकांपासून भिन्‍न आहे. त्याचप्रमाणे असा विश्‍वास राखण्याचा नुसता दावा करणे हे कोणाला तो यहोवाच्या साक्षीदारांपैकी असल्याची ओळख देत नाही.

तद्वत, यहोवाच्या साक्षीदारांच्या मान्यताप्राप्त सहवासासाठी पवित्र शास्त्राच्या खऱ्‍या शिक्षणाचा संपूर्ण विस्तार याचा स्विकार जरूरीचा आहे. त्यात अशाही शास्त्रवचनीय विश्‍वासांचा समावेश आहे जे यहोवाच्या साक्षीदारांकरता अद्वितीय असेच आहे. अशा या विश्‍वासात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे?

एक म्हणजे मानवाजातीसमोर असणारा थोर असा वादविषय यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या हक्काविषयीचा आहे व त्यामुळेच त्याने इतक्या दीर्घ काळापर्यंत दुष्टाईला अस्तित्वात राहण्याची मुभा दिली. (यहेज्केल २५: १७) दुसरी म्हणजे येशू ख्रिस्ताला मानवी प्रकृतिपूर्वीचे अस्तित्व होते व तो त्याच्या स्वर्गीय पित्याच्या तुलनेत दुय्यम असा आहे. (योहान १४:२८) तिसरी म्हणजे आज पृथ्वीवर एक “विश्‍वासू व बुद्धीमान दास” आहे व त्याला “येशूच्या पृथ्वीवरील आस्थांची” काळजी वाहण्यात आली आहे व हा दास यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाशी संलग्न आहे. (मत्तय २४:४५–४७) चौथी म्हणजे १९१४ या वर्षाने विदेश्‍यांच्या काळाची समाप्ती आणि देवाच्या राज्याची स्वर्गातील प्रस्थापना तसेच ख्रिस्ताच्या भाकित उपस्थितीची वेळ चिन्हांकित केली. (लूक २१:७–२४; प्रकटीकरण ११:१५–१२:१०) पाचवी म्हणजे केवळ १,४४,००० ख्रिश्‍चनांना स्वर्गीय वतन मिळेल. (प्रकटीकरण १४:१, ३) सहावी म्हणजे, सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईस अनुलक्षून असणारे हर्मगिद्दोन समीप आहे. (प्रकटीकरण १६:१४, १६; १९:११–२१) सातवी म्हणजे, यानंतर ख्रिस्ताची हजार वर्षाची राजवट सुरु होणार व ती पृथ्वीभरात नंदनवनाची पुनर्स्थापना करणार. आठवी म्हणजे, येशूची “दुसरी मेंढरे” यांचा “मोठा लोकसमुदाय” त्या नंदनवनाचा आनंद घेण्यात सर्वप्रथम असणार.—योहान १०:१६; प्रकटीकरण ७:९–१७; २१:३, ४.

अशी ही कडक भूमिका ग्रहण करण्यामध्ये आम्हाला एखादा शास्त्रवचनीय नमुना आहे का? होय आहे. पौलाने त्याच्या काळातील काहींबद्दल असे लिहिले: “त्यांचे शिक्षण काळपुळीसारखे चरेल. त्यांच्यापैकी हुमनाय व फिलेत हे आहेत. ते सत्याविषयी चुकले आहेत, पुनरूत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात आणि कित्येकांच्या विश्‍वासाचा नाश करतात.” (२ तिमथ्यी २:१७, १८; तसेच मत्तय १८:६ सुद्धा पहा.) या लोकांचा देवावर, पवित्रशास्त्रावर आणि येशूच्या यज्ञार्पणावर विश्‍वास नव्हता असे सूचित करू शकणारे काहीही दिसत नाही. तरीपण या एका मुलभूत मुद्यावर म्हणजे पुनरूत्थानाच्या वेळेबद्दल ते जे काही शिकवीत होते त्याच्या आधारावर पौलाने त्यांना धर्मत्यागी असे चक्क म्हटले. अशा धर्मत्याग्यांसोबत विश्‍वासू ख्रिश्‍चनांचे सहभागित्व नसणार.

याचप्रमाणे येशू हा देहाने आला होता असे न मानणाऱ्‍यांना प्रेषित योहानाने ख्रिस्तविरोधी असे म्हटले. यांचा कदाचित देवावर, इब्री शास्त्रवचनांवर आणि येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्‍वास असावा. पण येशू हा खराच देहाने आला होता या मुद्याबद्दल ते सहमत नव्हते व याकरवीच ते “ख्रिस्तविरोधी” आहेत असे संबोधिले गेले. हा वेगळाच दृष्टिकोण राखणाऱ्‍यांविषयी योहान पुढे म्हणतो: “हे शिक्षण न देणारा असा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका; कारण जो त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो.”—२ योहान ७, १०, ११.

अशा या शास्त्रवचनीय नमुन्यास अनुसरून कोणी ख्रिश्‍चन (ज्याचा देवावर, पवित्र शास्त्रावर व येशू ख्रिस्तावर विश्‍वास असल्याचा दावा आहे) खोट्या शिक्षणाला पश्‍चातापविरहीतपणे चालू ठेवतो वा अनुसरतो, तर त्याला मंडळीतून बहिष्कृत करण्याची जरूरी भासेल. (पहा तीत. ३:१०, ११) अर्थातच कोणा व्यक्‍तिला काही संशय आहे वा एखाद्या मुद्याविषयी पूर्ण स्वरूपाची माहिती नाही अशावेळी कोणी प्रशिक्षित उपाध्याय प्रेमळपणे त्याला सहाय्य देईल. हे या सूचनेशी सुसंगत आहे: “जे कित्येक जण संशयात आहेत त्यांच्यावर दया करा. त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा.” (यहुदा २२, २३) यास्तव खऱ्‍या ख्रिस्ती मंडळीला, ती फारच कडक व दुराग्रही आहे असा ठपका लावता येणार नाही कारण ती तर प्रत्यक्षात देवाच्या वचनात सांगितलेल्या ऐक्याविषयीचे उच्च मोल राखून आहे व त्याकरता ती परिश्रमपूर्वक काम करते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा