यहोवाच्या नीतीमान दर्जाद्वारे जीवन व्यतित करण्याचा निर्धार केला
कोणी माणूस व स्त्री कायदेशीर विवाह न करता तसेच संमतीने एकत्र राहतात तर ते व्यभिचार करीत असतात व या दशेत ते देवाच्या राज्यात प्रवेश मिळवू शकणार नाहीत असे पवित्र शास्त्र स्पष्ट रित्या सांगते. (१ करिंथकर ६:९, १०) ब्रिटीश वेस्ट इंडीज येथे राहणाऱ्या एका तरूण स्त्रीला हे सत्य शिकण्यास मिळाले हे पुढील अनुभव दाखवून देतो.
सेन्ट लुसिया येथे दोन यहोवाच्या साक्षीदारांनी एका तरूण स्त्रीची भेट घेतली. तिने पवित्र शास्त्राविषयी आस्था दाखविली व याच्या परिणामात तेथे पवित्र शास्त्र अभ्यास सुरु झाला. तिच्या पवित्र शास्त्रीय समजावणूकीत वाढ झाली तेव्हा आपणाला काही नैतिक सुधारणा केल्या पाहिजेत हे तिला दिसून आले. ती आतापावेतो चार मुलांची आई बनली होती पण तिचा विवाह झाला नव्हता, ती एका पुरुषासोबत संमतीने राहात होती. ती व त्या पुरुषाने मोठ्या कष्टाळूपणे काम करून एक छोटेसे घर तयार केले होते ज्यात ते सहाजण राहात होते.
आपले जीवन हे देवाच्या नीतीमान दर्जाच्या सहमतात नाही हे पाहून तिने बदल करण्याचा निश्चय केला. ज्या माणसासोबत ती रहात होती त्याच्याबरोबर होते तिने कायद्याने विवाहबद्ध व्हावयाचे होते अथवा तिने त्याच्यापासून वेगळे व्हावयाचे होते. तिने त्याच्याबरोबर याबद्दल बोलून पाहिले पण असे दिसले की त्या माणसाची तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा नव्हती. संमतीने एकत्रित राहण्याच्या योजनेमध्ये तो संतुष्ट आहे असे दिसले. मग आता त्या तरूण स्त्रीचा विश्वास तिला काय करायला लावील? यहोवा देवाला संतुष्ट करायचे आहे तर तिला निर्णय हा घ्यावाच लागणार होता. तेव्हा तिने प्रार्थनापूर्वक विचार केल्यावर त्या माणसापासून दूर होण्याचा निश्चय केला. पण आपली चार मुले घेऊन ती कोठे जाणार होती?
त्या माणसाशी संबंधित प्रकरणाविषयीची चर्चा केल्यावर न्याय्य व्यवस्थेचा निर्णय घेतला गेला—प्रत्येकाला अर्धे घर! बांधवाच्या प्रेमळ सहकार्याने, ज्या माणसासोबत ती राहत होती त्याच्यासमक्ष त्या घराचा बटवडा झाला, अर्ध तिच्याकरता व अर्धे त्याच्यासाठी. नेमक्या त्याच दिवशी त्या अर्ध्या घरातील सामानसुमान व इतर गोष्टी पाच मैल (८ कि.मी.) लांब हलविण्यात आल्या. एका सप्ताहात एक छोटे दोन खोल्यांचे घर परत बांधून काढण्यात आले.
अशा पद्धतीने आपले जीवन यहोवाच्या दर्जानुरूप आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलल्यामुळे तिने लागलेच क्षेत्र कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. सोबत तिने आपल्या चारही मुलांना आणले. तिने लवकरच आपले जीवन यहोवास समर्पित केले व बाप्तिस्मा घेतला. याकृतिचे स्मरणार्थ तिने सहाय्यक पायनियर म्हणून आपले नाव दिले. आता तिला आणखी आशीर्वाद असा मिळाला की तिच्या नव्या घरी मंडळीचा पुस्तक अभ्यास चालविला जातो व त्याला १७ लोक उपस्थित असतात. खरेच, यहोवा देवाची शुद्ध उपासक बनावे या तिच्या निर्धाराला यहोवा देवाने आशीर्वादित केले.