वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 १२/१ पृ. १५-२०
  • दियाबलास कसलाही वाव देऊ नका!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दियाबलास कसलाही वाव देऊ नका!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • मिळती जुळती माहिती
  • सैतानाला विरोध करा आणि तो पळून जाईल!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • येशूप्रमाणे तुम्हीही “सैतानाला अडवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • सैतानाला वाव देऊ नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • सार्वकालिक जीवनाचा शत्रू
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 १२/१ पृ. १५-२०

दियाबलास कसलाही वाव देऊ नका!

“तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये; आणि सैतानाला वाव देऊ नका.”—इफिसकर ४:२६, २७.

१. पेत्राने दियाबलाचे कसे वर्णन केले, तरीपण संरक्षणाची कोणती हमी या प्रेषिताने दिली?

एक हिंस्र श्‍वापद सावज पकडण्यासाठी इकडे तिकडे फिरत आहे. त्याचे हे सावज ख्रिश्‍चन असून त्यांना कधी गिळू अशी त्याची इच्छी झाली आहे. या कारणास्तव पेत्र सावधानीचा इशारा देतो: “सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रु सैतान हा गर्जणारा सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो. त्याच्याविरुद्ध विश्‍वासात दृढ असे उभे राहा. . . सर्व कृपेचा देव तुम्ही थोडावेळ दुःख सोसल्यावर, स्वतः तुम्हास पूर्ण, दृढ व सबळ करील.”—१ पेत्र ५:८-१०.

२. (अ) सैतानाच्या हल्ल्यामध्ये कोणती परिस्थिती आम्हाला अधिक हतबल बनवीत असते? (ब) धर्मत्यागाला बळी पडणाऱ्‍याला इतरांना नव्हे तर स्वतःलाच दोष का द्यावा लागेल? (क) कोणत्या अशक्‍तपणामुळे दियाबलाला यहुदा इस्कर्योतच्या अंतःकरणात येशूच्या विश्‍वासघात करण्याची कल्पना उभारण्याचा मार्ग मोकळा करून दिला?

२ दियाबल व त्याचे प्रतिनिधी, दुरात्मे व मानव कोणी काही संशय बाळगून आहे का, कोठे व्यक्‍तिमत्त्वाची गंभीर चूक घडते का आणि विश्‍वासात आध्यात्मिक दृष्ट्या दृढ राहण्यात कोठे हलगर्जीपणा दिसतो का त्याचा शोध घेत आहेत. तरीपण यहोवाचे वचन आम्हाला खात्री देते की आम्ही दियाबलाविरुद्ध दृढ भूमिका ग्रहण केल्यास त्याला आम्हाला गिळता येणार नाही. (याकोब ४:७) याचा अर्थ धर्मत्यागीपणा टाळता येत नाही म्हणून कोणी त्याचे भक्ष्य होऊ शकणार नाही. असे नाही. कोणी आपला विश्‍वास गमावील हे पूर्वनियोजित नसते. यात हृदयातील भावनांचा समावेश असतो. हे खरे की योहानाने म्हटले त्याप्रमाणे काही “आपल्यातूनच . . . निघाले, तरी ते आपले नव्हेत.” (१ योहान २:१९) असे घडण्याचे कारण त्या विशिष्ठांनी धर्मत्याग निवडून घेतला किंवा ते प्रथमतःच यहोवाच्या संस्थेत आले त्यावेळी त्यांचा मनोदय वाईट होता. येशूने बारा प्रेषितांमध्ये एक या अर्थी निवड केली त्यावेळी यहूदा इस्कार्योतचे अंतःकरण चांगले होते तरीपण यहुदाच्या व्यक्‍तिमत्वाचा लोभ हा गुण न्याहाळून दियाबलाने त्याचा फायदा घेतला. येशूचा विश्‍वासघात झाला त्या रात्री आधी “शिमोनाचा मुलगा यहुदा इस्कर्योत ह्‍याच्या अंतःकरणात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता.”—योहान १३:२.

३. कोणी व्यक्‍ती धर्मत्यागीपणाचा बळी ठरण्यासाठी कोणत्या घटना जबाबदार ठरतात?

३ कोणी माणूस वाईट मार्ग का धरतो त्याचे कारण तो स्वतःच्या स्वार्थी विचारधारेला, स्वतःच्या इच्छा आकांक्षांना, त्याने निवडलेला सहवास व वातावरण यांना त्याच्या विचारास वळविण्याचा वाव देतो व मग स्वतःच्याच इच्छेप्रमाणेची दिशा निश्‍चित करतो. ‘ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांना स्वर्गीय दानाची रुचि घेतिली, पण पतित झाले’ असे काही जणांविषयीची पौलाने बोलणी केली. (इब्रीयांस ६:४-६) आम्ही सतत दक्ष राहिलो नाही तर दियाबल आपल्या फसव्या प्रचाराकरवी आमची अंतःकरणे धर्मत्यागी विचारांसंबंधाने मोहित बनवू शकतो. हा दियाबल कोणा व्यक्‍तीला धर्मत्यागाचा बळी कसा बनवितो?

४. कटुत्व, चीड व चुका शोधणे या गोष्टींना बळी पडलो तर काय होऊ शकते?

४ सैतान ज्या सर्वसाधारण प्रवृत्त्यांचा माणसामध्ये शोध घेत असतो त्या आहेत, कटुत्व, चीड आणि चुका शोधणे. या प्रवृत्त्या एखाद्याठायी प्रेम व रसिकता या गुणांना, बहुधा जागाच राहात नाही. कदाचित न सोडविलेल्या काही समस्यांचे कटुत्व कोणाठायी इतकी चीड निर्माण करते की त्याला महत्वपूर्ण अशा ख्रिस्ती सभांना जाण्याचे टाळणे न्याय्य वाटू लागते. अशा या चिडखोर तणावाखाली बराच काळ ठेवल्याने तो ‘दियाबलास वाव देत असतो.’ (इफिसकर ४:२७) त्रस्त बनलेल्या या माणसाला आपल्या भावाच्या अपूर्णतेशिवाय दुसरे काहीही दिसत नाही. तो त्याची “साताच्या सत्तर वेळा” क्षमा करीत नाही. स्वतःवर ओठावलेल्या परीक्षेत आपणाला ख्रिस्ती गुणवत्तेत पूर्ण होण्याची केवढी गरज आहे हे पाहण्यात तो अपयशी ठरतो. (मत्तय १८:२२) अशा या त्राग्यात असताना कोणी त्याच्याकडे आला व त्याने म्हटले की यहोवाची संस्था अशीच जाचक व दाब ठेवणारी आहे आणि काही महत्त्वपूर्ण गोष्टीत ती चुकते. तेव्हा त्या कटू माणसाचे अंतःकरण या निरर्थक दाण्यास प्रतिसाद देऊ लागते. तर मग स्वतःमध्ये कटुत्व व चीड उभारीत राहण्याचे टाळणे हे किती महत्त्वाचे आहे बरे! तुम्ही रागाच्या स्थितीत असताना सूर्य मावळू देऊ नका. उलटपक्षी, प्रेमाला तुमच्या जीवनावर पूर्णपणे आच्छादू द्या.

५. (अ) गर्व तसेच सुधारणा मिळाल्याबद्दल वाटणारी चीड या गोष्टी कशा अडखळण बनू शकतात? (ब) विश्‍वासात दृढ राहण्यात लीनता कोणता भाग पार पाडते?

५ अंतःकरण व मनाच्या आणखी कोणत्या स्थितीचा दियाबल शोध घेत असतो? गर्व, स्व-प्रतिष्ठेची भावना आणि वाटते ते महत्त्व आपणास न मिळाल्यामुळे वाटणारी चीड या त्या गोष्टी होत. हे सर्व दियाबलाकरवी वापरले जाणारे खाचखळगे आहे. (रोमकर १२:३) एखादी चुकीची सवय वा प्रवृत्ती याबद्दल तुम्हाला सूचना देण्यात आली वा वाग्दंड मिळाला तर ही वेळ सुद्धा, आपण खरेच खऱ्‍या संस्थेत आहोत का हे स्वतःला विचारून पाहण्याचे आम्हास प्रलोभन देण्यासाठी सैतान वापरत असतो. तद्वत लीन असा. आपण “क्षुद्र आहोत या पद्धतीने स्वतःला वागविण्यात समाधानी असा. गर्व किंवा स्वतःच्या मोठेपणाची भावना तुम्हाला विश्‍वासात दृढपणे उभे राहण्यापासून डळमळू देण्यात कारणीभूत होऊ देऊ नका.”—लूक ९:४८; १ पेत्र ५:९.

६, ७. (अ) अधीरतेची काही लक्षणे कोणती आहेत ज्याचा दियाबल त्वरेने वापर करून घेतो? (ब) कोणी ज्ञानात उणा असेल तर त्याने काय करावे?

६ अधीरता ही आणखी एक गोष्ट दियाबल शोधीत फिरत असतो. कधी कधी काही बाबतीत बदल व्हावा, लगेच हालचाल व्हावी, लगेच उत्तर मिळावे असे आम्हाला वाटत असते. ‘या समस्येचे निरसन आत्ताच व्हायला हवे, नाहीतर मी निघालो. मला आत्ताच या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले पाहिजे नाहीतर मी पुढे जाणार नाही. तुम्ही म्हणता की हर्मगिद्दोन व नवे व्यवस्थीकरण ‘आलेच बघा’, पण मी तर पार कंटाळलो.’ अधीरतेच्या या क्षेत्रात दियाबल शंकांचे व बंडाचे बीजारोपण करण्यास सदा तयार असतो हे निश्‍चितपणे जाणा. याकरता सहनशीलता व विश्‍वास महत्त्वाचा आहे.—इब्रीयांस १०:३६, ३९.

७ याकोबाने म्हटले: “धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. ह्‍यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे; म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देतो. पण त्याने काही संशय न धरता विश्‍वासाने मागावे. कारण संशय धरणारा वाऱ्‍याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला यहोवापासून काही मिळेल असे त्याने समजू नये.“ (योकोब १:४-८) आपल्या अतिशयोक्‍तिपूर्ण अधीरतेमुळे आणि देवाच्या अभिवचनाबद्दल शंकास्पद बनण्यामुळे दियाबलाला तुम्हाला धर्मत्यागाचा उमेदवार बनवू देऊ नका. सहनशील असा. कृतज्ञ असा. यहोवावर थांबून राहा.—स्तोत्रसंहिता ४२:५.

८. अधिकारपदाविरुद्ध बंड करण्याची प्रवृत्ति दियाबलाला, एखाद्या व्यक्‍तीला शास्त्रवचनीय बंधने झुगारून देण्याकरता उद्युक्‍त करण्यासाठी कसा मार्ग उघडा करते?

८ आम्हास मार्गभ्रष्ट करण्यासाठी दियाबल आणखी कशाचा वापर करतो? त्याने नेहमीच बंडखोरपणा निर्माण केला नाही का, तसेच यहोवाच्या लोकात पुढाकार घेणाऱ्‍यांच्या बाबतीत नेहमीच टीका करण्याची चिथावणी त्याने लोकांना दिली नाही का? “वडीलांना खरे म्हणजे काही समजतच नाही. ते भारी टिकात्मक, अवास्तव मागणी करणारे आहेत” काही कदाचित म्हणतील. एखादा तर आणखी पुढे जाऊन असे म्हणेल की यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ वा इतर जबाबदार बंधुजन विवेकाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत आणि शास्त्रवाचनांचा उलगडा करण्याविषयी एखाद्याचा “हक्क” याबाबतीत लुडबूड करतात. पण योसेफाचे विनयशील शब्द स्मरणात आणि की, “अर्थ सांगणे देवाकडे आहे ना?” (उत्पत्ति ४०:८) शिवाय येशूनेही असे भाकित केले नव्हते का की, शेवटल्या दिवसात “विश्‍वासू व बुद्धीमान दास,” अभिषिक्‍त जणांचे संघटन याला योग्य समयी आध्यात्मिक अन्‍नाची तरतूद करण्याची जबाबदारी सोपविली जाईल? (मत्तय २४:४५-४७) स्वतःची प्रतिकूल मते मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्‍याविषयी जागृत असा. याशिवाय सर्व बंधने झुगारून देण्याची इच्छा धरणाऱ्‍या किंवा यहोवाचे साक्षीदार तर केवळ दास आहेत असे म्हणून स्वतंत्र्याचे अभिवचन देऊ करणाऱ्‍या लोकांविषयी जागृत असा. अशा या खोट्या शिक्षकांबद्दल पेत्र म्हणाला: “ते त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत. कारण मनुष्य ज्याच्या कह्‍यात जातो त्याचा दासहि बनतो.”—२ पेत्र २:१, ११.

९. नेतृत्त्व करणाऱ्‍यांच्या बाबतीत टीकात्मक असणाऱ्‍यांची प्रवृत्ति बहुधा कशी असते?

९ संस्था किंवा जे नेतृत्त्व करतात त्याबद्दल टीका करणाऱ्‍यांची बहुधा प्रवृत्ति कशी असते? शास्त्रवचनांचा थोडासा अवलंब त्यांच्यावर व्यक्‍तिशः परिणाम करणारा ठरतो हेच त्यामागील कारण नसते का? सबळ तत्त्वे व मार्गदर्शन यांच्याशी जुळते घेण्याऐवजी त्यांना संस्थेने स्वतःमध्ये बदल करावा अशी इच्छा असते. हे कसे असते ते आपण काही उदाहरणाद्वारे बघू या.

१०. पेहराव व केशभूषेतील अतिरेकीपणाची ओढ एखाद्याच्या बाबतील ‘दियाबलास वाव देण्यासाठी’ कसा परिणाम करू शकते?

१० कोणी बांधव पेहराव वा केशभूषा यांच्या अतिरेकाची लालसा धरतो. वडीलांना वाटते की तो उत्तम उदाहरण नाही म्हणून ते त्याला काही विशिष्ट हक्कांचा, जसे की व्यासपीठावरून शिक्षण देण्याच्या हक्काचा उपभोग घेऊ देत नाहीत. ह्‍यामुळे हा चिडखोर बनतो व म्हणतो की वडील आपले ख्रिस्ती स्वातंत्र्य हिरावून घेत आहेत. पण अशा या विवादामागे काय असते? ते बहुधा गर्व, स्वतंत्र विचारी वृत्ती किंवा मला ते पाहिजेच अशी बालिश वृत्ती नाही का? ही गोष्ट लहान असली तरी याकरवीच, तसा विवाद करणारा ‘दियाबलास वाव देत असतो.’ प्रेम व विनयशीलता केवळ, आम्हास आमचा पेहराव व केशभूशा मर्यादशील व स्वीकृत मार्गी करण्याची चालना देईल. ज्या सर्व गोष्टी आम्ही करतो त्याकरवी आम्हास संतुष्टपणा लाभावा याकरता नव्हे तर सुवार्तेच्या वृद्धीस कारणीभूत व्हावे यासाठी कराव्या.—रोमकर १५:१, २; १ करिंथकर १०:२३, २४.

११. रक्‍तापासून दूर राहण्याच्या यहोवाच्या आज्ञेविषयी केलेल्या प्रश्‍नामागे काय दडलेले असू शकते?

११ आपण आणखी एक उदाहरण घेऊ या. कधी कधी तुम्ही काहींना असे विचारताना ऐकले असेल की रक्‍त प्राशन करण्याविषयीची जी शास्त्रवचनीय मनाई आहे ती संक्रमणाच्या बाबतीत खरीच लागू होते का? अशा या विवादामागे काय दडलेले असते? ते एखाद्याचे स्वतःचे व प्रियजनांचे सध्याचे जीवन गमावले जाण्याचे भय, हे तर नसेल ना? तर मग पुनरुत्थानाची आशा निस्तेज होत आहे का? विश्‍वासू ख्रिस्ती देवाच्या कायद्याची हात-मिळवणी करीत नाही किंवा त्याला निरर्थक करण्याचे मार्ग शोधीत नाहीत. शरीराच्या पोषणार्थ रक्‍तापासून दूर राहणे हे व्यभिचार व मूर्तिपूजा या सारख्या आवश्‍यक गोष्टीप्रमाणेच आहे. या सर्व गोष्टींविषयीचा निषेध यरूशलेमाचा प्रेषित वर्ग वडील जन यांच्याकरवीच्या आत्म्याने मार्गदर्शित असणाऱ्‍या फर्मानात नमूद आहे.—प्रे. कृत्ये १५:१९, २०, २८, २९.

१२. बहिष्कृत झालेल्यांसोबतचा सामाजिक संपर्क आम्ही टाळावा या शास्त्रवचनीय गरजेचा भंग चुकीच्या निष्ठावंतपणाला का करवू देऊ नये?

१२ ज्यांच्याठायी टीकाप्रद भावना आहे अशापैकी काहींनी हा दावा केला आहे की, बहिष्कृत व्यर्क्‍तिबद्दलचा सामाजिक संपर्क तोडून टाकण्यामध्ये यहोवाची संस्था खूपच कडक आहे. (२ योहान १०, ११) पण या टीकाकारांना असे का वाटते? त्यांचे कौटुंबिक संबंध घनिष्ट आहेत का किंवा कोणा मित्राबाबत ते चुकीचा निष्ठावंतपणा बाळगून आहेत का की जो यहोवा देव, त्याचे दर्जे आणि गरजा यांस दाखविल्या जाणाऱ्‍या निष्ठेच्या पुढे जातो? याचा विचार करा की बहिष्कृत व्यक्‍तीस, मग तो स्वतःचा जवळचा नातेबाईक का असेना, त्याजविषयी सामाजिक सहवास देण्याचे चालू ठेवल्यामुळे चूक करणाऱ्‍याला असे वाटू देण्यास प्रवृत्त करील की त्याचे मार्गाक्रमण एवढे गंभीर नाही व हे त्यास आणखी इजात्मक ठरते. तथापि, हा संपर्क टाळल्यामुळे त्याने जे काही गमाविले त्याच्या प्राप्तीची इच्छा जगेल व हे त्याला योग्य दिशेने पावले उचलण्यात साहाय्यक ठरेल. अशाप्रकारे यहोवाचा मार्ग नेहमीच उत्तम असतो व तो आमच्या रक्षणार्थ असतो.—नीतीसूत्रे ३:५.

१३. घरोघरच्या जाहीर प्रचारकार्याच्या बाबतीत आमची मनोवृत्ति कशी असावी?

१३ शिवाय आणखी काही हा चुकीचा दावा मांडतील की घरोघरचा जाहीर प्रचार करावा असा आधार शास्त्रवचने देत नाहीत. तर मग असे तर नसेल की हे कार्य त्यांच्या नावडीचे आहे आणि म्हणून त्यापासून दूर राहण्यासाठी काही सबब त्यांना हवी आहे? देव आणि शेजाऱ्‍यावरील प्रेमाने आम्हाला प्रभावित करून या जीवन वाचविणाऱ्‍या कामाच्या तातडीची किती गरज आहे ते पाहावयास लावले पाहिजे. येथे पुन्हा धीर हा हवा आहे. प्रेषित पौलाने घरोघरी व जाहीररीत्या प्रचार केला तेव्हा शिक्षण देण्यात आणि ‘यहुदी व ग्रीक लोकांना कसून साक्ष देण्यात’ स्वतःचा जो धीर दाखवला त्याबद्दल म्हटले. (प्रे. कृत्ये २०:१८-२१) तर मग तक्रारीऐवजी आपणही त्याच्या या सुंदर उदाहरणाचे निष्ठेने अनुकरण करू नये का? यहोवाने घरोघरच्या कार्यास आशीर्वादीत केल्यामुळे हजारोंना आज “एक कळप” यात एकत्रित करण्यात आले आहे त्यांच्याकडे जरा पहा! (योहान १०:१६) याशिवाय तालीम घेण्यात, शिस्त लावण्यात आमच्या विश्‍वासास मजबूत करण्यात, लोकांकडे सुवार्ता नेता यावी म्हणून घरोघरच्या कार्यात सहभागी होण्यात जे फायदे आम्हास प्राप्त होतात ते विसरू नका.—पडताळा प्रे. कृत्ये ५:४२; १ तिमथ्यी ४:१६.

१४. यहोवाचे साक्षीदार खोटे संदेष्टे आहेत असा टीकाकारांचा आरोप आहे तर त्याला आपण कोणती प्रतिक्रिया व्यक्‍त करावी असे तुम्हाला वाटते?

१४ शेवटी, संस्थेने मागे कालगणने संबंधाने जे प्रसिद्ध केले त्याचाही विचार करावासा वाटेल. काही विरोधकांचा दावा आहे की यहोवाचे साक्षीदार खोटे संदेष्टे आहेत. हे विरोधक म्हणतात की तारखा ठरविल्या गेल्या पण घडले तर काहीच नाही. परत आम्ही विचारतो: या टीकाकारांचा हेतु कोणता आहे? याकरवी ते देवाच्या लोकांद्वारे जागृतता राखली जावी या दृष्टीकोनाला उत्तेजन देत आहेत की स्वतःच अक्रियाक दशेच्या निद्रावस्थेत त्यांनी स्वतःला लोटले होते याबद्दल समर्थ मांडत आहेत? (१ थेस्सलनीकाकर ५:४-९) अधिक महत्त्वाचे ते हे की तुम्हीच स्वतः प्रत्यक्षात अशी टीका ऐकली तर काय करणार? कोणी माणूस, आम्ही या सद्य व्यवस्थेच्या “शेवटल्या दिवसात” आहोत का असा प्रश्‍न विचारीत असेल किंवा कदाचित या कल्पनेचाही प्रसार करीत असेल की देव खूप दयाळू आहे त्यामुळे तो “मोठ्या संकटात” एवढ्या लाखो लोकांचा मृत्यु निश्‍चितपणे घडवून आणणार नाही, तर अशा या माणसानी आपले अंतःकरण त्या टीकांचा स्विकार करण्यासाठी आधीच सिद्ध केलेले असते.—२ तिमथ्यी ३:१; मत्तय २४:२१.

१५. यहोवाचे साक्षीदार खोटे संदेष्टे असण्यापेक्षा काय हे सिद्ध करते की त्यांचा देवाचे वचन व त्याच्या निश्‍चित अभिवचनांवर विश्‍वास आहे?

१५ होय, यहोवाच्या लोकांना त्यांनी अपेक्षिलेल्या अपेक्षा वेळोवेळी सुधाराव्या लागल्या. आमच्या उत्सुकतेमुळे आम्ही यहोवाच्या वेळापत्रकाच्या आधी नवीन व्यवस्थीकरण येण्याची अपेक्षा धरली होती. तरीपण आम्ही देवाचे वचन व त्यातील अभिवचनांवरील आमचा विश्‍वास त्याचा संदेश इतरांना घोषित करण्याद्वारे व्यक्‍त करतो. शिवाय आमच्या समजावणूकीला सुधारण्याची जी गरज भासली ती आम्हास खोटे संदेष्ट बनवीत नाही आणि आम्ही “शेवटल्या दिवसात” आहोत व लवकरच “मोठ्या संकटाचा” अनुभव घेणार आहोत जे पृथ्वीवरील जीवनासाठी मार्ग मोकळा या सत्यतेला डावलून लावत नाही. धरलेल्या अपेक्षांच्या बाबतीत काही सुधारणा कराव्या लागल्या ही गोष्ट एकंदरीत सत्याला प्रश्‍नार्थक बनवते हा दृष्टिकोण धरणे केवढ्या मूर्खपणाचे आहे! स्पष्ट पुरावा हा आहे की यहोवा त्याच्या एकमेव संस्थेचा वापर करीत होता व करीत आहे आणि यात “विश्‍वासू व बुद्धीमान दास” पुढाकार घेत आहेत. तद्वत आम्हाला पेत्रासारखेच वाटते, ज्याने म्हटले होते की, “प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.”—योहान ६:६८.

१६, १७. (अ) मत्तय ७:१५-२० मधील येशूच्या शब्दांचा अबलंब, यहोवाचे आशीर्वाद प्राप्त करणाऱ्‍या संस्थेची ओळख करून देण्यात कशी मदत देतो? (ब) यहोवाच्या खऱ्‍या सेवकांच्या जीवनात निर्मिल्या जाणाऱ्‍या उत्तम फलप्रप्तीतील काही कोणती आहे?

१६ यहोवाच्या साक्षीदारांमधील आध्यात्मिक नंदनवनातच केवळ, येशूच्या खऱ्‍या शिष्यांची ओळख दाखविणाऱ्‍या स्वार्थत्यागी प्रेमाचे दर्शन आम्हाला घडू शकेल. (योहान १३:३४, ३५) खोटे संदेष्टे कसे आहेत ते त्यांच्या वाईट फळांवरून प्रदर्शित होत असते. पण येशूने सूचित केले की चांगले वृक्ष त्यांच्या उत्तम फळांवरून ओळखण्यात येथील. (मत्तय ७:१५-२०) आम्हाला आध्यात्मिक नंदनवनात किती उत्तम फलप्राप्ती दिसते! बहुधा प्रत्येक राष्ट्रात आश्‍चर्यकारक वाढ दृष्टोत्त्पतीस येत आहे. सबंध गोलार्धभर ३०,००,००० पेक्षा अधिक असणारा देवाच्या राज्याचा आनंदी प्रजाजन हा जिवंत पुरावा आहे की यहोवाला पृथ्वीवर स्वतःचे लोक आहेत.

१७ यांना देवाकरवी शिक्षण मिळत असल्यामुळे यहोवाचे साक्षीदार आपल्या जीवनात ख्रिश्‍चनात्वाची फळे निर्मित आहेत. (यशया ५४:१३) बाबेलोनी अंधश्रद्धेपासून केवळ यहोवाच्या लोकांनीच स्वतःला पुर्णपणे मुक्‍त केले आहे. देवाचे वचन लैंगिक अनैतिकता, गर्भपात, मद्यपी, चोरी, मूर्तिपूजा, वंशाभिमान आणि इतर जागतिक ध्येय व प्रथा यांच्या अनुषंगाने जे काही म्हणते त्याचे तंतोतंत पालन करणारी संस्था केवळ त्यांचीच आहे. याशिवाय यहोवा देवाच्या राज्याचे शुभवर्तमान प्रचार करण्याची आज्ञा केवळ तेच पाळीत आहेत. (मत्तय २४:१४) एक संघटीत लोक या अर्थी देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेणारे केवळ यहोवाचे साक्षीदार आहेत असा विनासंशयी निर्देश देवाचे स्वतःचे वचन त्यांच्याकडे करीत आहे!

१८. धर्मत्यागी शिक्षणाचा सामना झाल्यास यहोवाच्या सेवकांची भूमिका काय असली पाहिजे?

१८ होय, ख्रिश्‍चन मार्गक्रमणात विश्‍वासूपणे व निष्ठावंतपणे टिकून राहणाऱ्‍या सर्वांच्या बाबतीत आम्हाला खात्री आहे की यहोवाचे सत्य त्यांना पहिल्यांदा ऐकायला मिळाले तेव्हापासून आता अधिक सुंदर व तृप्तीदायक बनले आहे. यासाठीच आपल्या अंतःकरणात हा निर्धार ठेवा की तुम्ही जे विषप्राशन करावे अशी धर्मत्याग्यांची इच्छा आहे त्याला कधीही शिवणार नाही. फसवणाऱ्‍या, चुकीचे मार्गदर्शन देणाऱ्‍या आणि मरणाच्या मार्गात लोटणाऱ्‍या व्यर्क्‍तिना पुर्णपणे टाळावे या यहोवाच्या सूज्ञ पण दृढ आज्ञांचे पालन करा. यहोवावर पूर्ण अंतःकरण, जीव, मनाची आमची प्रीती आहे आणि आम्ही आपणाप्रमाणेच आपल्या शजाऱ्‍यांवर सुद्धा प्रेम व्यक्‍त करीत आहोत तर मग धर्मत्याग्यांचे विचार काय आहेत ते पाहण्याचा एक कटाक्ष सुद्धा आम्ही टाकणार नाही. (मत्तय २२: ३७-३९) आम्ही ‘सैतानाला वाव देणार नाही’ आणि इतरत्र बघण्याची इच्छा धरणार नाही. कोणा फसव्या शिक्षणाद्वारे आम्ही ‘दचकून आपले चित्तस्थैर्य सोडणार नाही.’—२ थेस्सलनीकाकर २:१, २.

१९. कोणते मार्गाक्रमण आपल्याला सार्वकालिक जीवनाचे बक्षीस ‘कोणा माणसाकरवी मुकविले जाणार नाही’ याची खात्री देत राहील?

१९ यहोवाच्या आध्यात्मिक नंदनवनात आहोत या आमच्या हक्काचे आम्ही नेहमी रसग्रहन करीत राहू. येथेच आम्हाला मुबलक आशीर्वाद अनुभवण्यास मिळत आहेत. सार्वकालिक जीवनाची वचने कोण दृढपणे व विश्‍वासूपणे धरून आहोत ते आपल्याला माहीत आहे. याकारणास्तव आपण त्यांच्यासोबत आपला निकट सहवास राखू या. कारण हेच विश्‍वातील आमचे खरे व निष्ठावंत भाऊ बहिणी आहेत. आम्हाला पहिल्यांदा सत्य शिकायला मिळाले त्यावेळेस जो आनंद व जी तृप्ती लाभली तीच सातत्याने राखू या. सोबत यहोवाच्या नव्या व्यवस्थीकरणातील सार्वकालिक जीवनाच्या उदात्त बक्षीसाची हमी देखील राखू या. पौलाने म्हटले त्या प्रामणे “कोणा माणसाला तुम्हाला फसवून तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका.”—कलस्सैकर २:१८.

तुम्ही उत्तर देऊ शकाल का?

▫ कोणी आपला विश्‍वास त्यागील हे पूर्वनियोजीत नसते हे कसे खरे आहे?

▫ चीड, गर्व आणि अधीरता या गोष्टी दियाबलाला एखाद्याच्या अंतःकरणांत वाव देण्यासाठी कशा जागा करून देतात?

▫ नेतृत्व करणाऱ्‍यांकरवी दिलेल्या सूचनांची टीका करण्याऱ्‍यांच्या मागे बहुधा काय असते?

▫ यहोवाच्या साक्षीदारांद्वारे निर्मिली जाणारी कोणती फलप्राप्ती ते यहोवा देवाकरवी वापरण्यात येणारे एकमेव संघटन आहे हे सिद्ध करते?

[१६ पानांवरील चित्र]

सूचना नाकारण्याद्वारे आम्ही ‘दियाबलास वाव देत असतो’

[१७ पानांवरील चित्र]

गर्व एखाद्याचे असे पतन घडवून आणते की ज्यापासून त्याला बरे होता येत नाही

[१९ पानांवरील चित्र]

कार्यमग्न व आनंदी असणारे यहोवाचे सेवक दियाबल किंवा धर्मत्यागी कल्पनांना वाव देत नाहीत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा