वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ८/१ पृ. २१-२६
  • सर्वांसाठी उपलब्ध असणारी “जीवनाची भाकर”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्वांसाठी उपलब्ध असणारी “जीवनाची भाकर”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाची प्रेमळ तरतूद
  • “स्वर्गातून येणारी खरी भाकर”
  • “तुम्हामध्ये जीवन”
  • “ख्रिस्ताबरोबरील ऐक्य”
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • “स्वर्गातून येणारी खरी भाकर”
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • येशू, “स्वर्गातून येणारी खरी भाकर”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • तुम्ही सर्वकाळ जगू शकता—ते कसं?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ८/१ पृ. २१-२६

सर्वांसाठी उपलब्ध असणारी “जीवनाची भाकर”

“स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.”—योहान ६:५१.

१. मानवजातीला आज कोणती भीतीदायक स्थिती ग्रासून आहे?

भाकर—मानवजातीचा दीर्घकाळपणे उदरनिर्वाह करणारे खाद्य, पृथ्वीभरात सर्वत्र प्रचलित आहे. भाकर ही जिवाचा आधार आहे हे अगदी सुयुक्‍तपणे म्हटलेले आहे. तरीपण आज भाकरीसाठी अन्‍नान्‍न करावयास लावणारी दशा मोठी गंभीर बनली आहे. उपासमार व दुष्काळ यांनी पृथ्वीच्या चौथ्या हिश्‍यावर आपले साम्राज्य पसरविले आहे. अलिकडेच कॅनडामधील टोरन्टोच्या द ग्लोब ॲण्ड मेल प्रकाशनाने म्हटले: “दुष्काळ युद्धाप्रमाणे सरहद्दी जाणत नाही.” या वृत्तपत्राने आफ्रिकेतील संयुक्‍त राष्ट्र संघाच्या तातडीच्या कार्यप्रणालीच्या अधिकाऱ्‍याला हा इशारा देण्याविषयी म्हटले की, आफ्रिका खंड “आतापर्यंत कधी सापडला नाही त्या सर्वथोर मानवी पेचात, सर्वथोर आव्हानात सापडला आहे.”

२, ३. (अ) अन्‍नटंचाई ही कोणत्या चिन्हाचा भाग आहे (ब) अन्‍न समस्या कशा सोडविल्या जातील? (क) आणखी कशाची गरज आहे व याविषयी यशया २५:८ कोणती आनंदाची खातरी देते?

२ अन्‍नटंचाई ही राज्यातील त्याच्या प्रत्यक्ष उपस्थितीच्या चिन्हाचा एक भाग असेल असे येशूने भाकित केले होते. (मत्तय २४:३, ७, ३२, ३३; २५:३१, ३२; लूक २१:११) त्याचे राज्य आता जवळ येऊन ठेपले आहे याचा आम्हाला किती आनंद वाटावा बरे! लवकरच हा वैभवी राजा, एवढा क्रुर त्रास ज्यामुळे उद्‌भवला त्या सर्व राजकीय व आर्थिक अन्यायांना दूर करून मानवजातीच्या सर्व शत्रूंना नाहीसे करील. तेव्हा सर्व लोकांना रोजची भाकर प्रतिदिवशी मिळत असल्याचा आनंद प्राप्त होईल.—मत्तय ६:१०, ११; २४:२१, २२; दानीएल २:४४; नीतीसूत्रे २९:२.

३ नीतीमान सरकाराच्या वास्तव्याखाली आमची ही भूमि “मुबलक” पिकाचा उपज देईल व तो आजच्या जागतिक लोकसंख्येपेक्षा बहुतपटीच्या लोकांना अन्‍नतृप्त करील. (स्तोत्रसंहिता ७२:१२–१४, १६, १८) यहोवा आपल्या लोकांकरता उत्तम गोष्टींची “मेजवानी” सिद्ध करील. (यशया २५:६) पण या सोबत आणखी कशाची तरी गरज आहे. जसजशी वर्षे निघून जातील तसतसे मानव आजारी पडतील व मरतील का? यशया २५:८ यहोवाचे म्हणणे केवढ्या आनंदाने मांडते ते ऐका: “तो मृत्यु कायमचा नाहीसा करील. प्रभू यहोवा सर्वांच्या मुखावरील अश्रु पुशील.” पण हे सर्व कसे घडून येणार?

यहोवाची प्रेमळ तरतूद

४. यहोवाने मिसरात कोणती प्रेमळ तरतूद पुरविली?

४ योसेफ मिसरात अन्‍नमंत्री असताना धान्य मुबलकपणे उपलब्ध होते. याचे कारण हे की योसेफाची फारोकरवी नियुक्‍ति झाल्यावर त्याने भाकित असलेल्या दुष्काळाच्या सात वर्षांसाठी सूज्ञपणे योजना आखली व यहोवानेही प्रेमळपणे त्यात आपला आशीर्वाद दिला. (उत्पत्ती ४१:४९) सर्वांसाठी भरपूर अन्‍न होते व काही बचावूनही राहिले होते. योसेफाचा बाप याकोब, योसेफाचे भाऊ व त्यांची कुटुंबे मिसरात योसेफाजवळ येऊन राहिली तेव्हा त्यांना या इश्‍वरी मान्यतेचा खूपच लाभ मिळाला. शिवाय मिसरातच ज्याची उत्पत्ती होती त्या खमीरयुक्‍त पिठाच्या गोळयाकरवी तयार केलेल्या भाकरीचा सराव इस्राएलांना येथेच झाला असावा यात काही शंका नाही.

५. (अ) यहोवाने अरण्यात कसे संगोपन केले? (ब) या आशीर्वादात इस्राएलांबरोबर कोणी सहभाग घेतला व का?

५ नंतर यहोवाने आपल्या लोकांसाठी आणखी प्रेमळ तरतूद पुरविली. हे, लाखो इस्राएल लोकांनी मिसर सोडून सिनायच्या अरण्याचा प्रवास आरंभिला तेव्हा घडले. त्या ओसाड व अपरिचित अरण्यात इतक्या मोठ्या जमावाचे संगोपन कसे होणार? लोकांच्या अविश्‍वासाचा यहोवाला राग आला होता तरी त्याने “आकाशद्वारे उघडली. खाण्याकरता त्याने त्यांच्यावर मान्न्याचा वर्षाव केला, आणि त्यांस स्वर्गातले धान्य दिले.” “स्वर्गीय अन्‍नाने त्यांस [४० वर्षे] तृप्त केले.” (स्तोत्रसंहिता ७८:२२–२४; १०५:४०; निर्गम १६:४, ५, ३१, ३५) शिवाय हे विसरू नका की मान्‍ना खाणारे केवळ इस्राएली नव्हते. इस्राएल नसणाऱ्‍या ‘मोठ्या मिश्रसमुदायाने’ यहोवावर आपला विश्‍वास व्यक्‍त केला आणि ते इस्राएलांबरोर मिसरातून बाहेर पडले. देवाने त्यांनाही मान्‍ना दिला.—निर्गम १२:३८.

६. (अ) माणसाची आणखी कोणती गरज आहे व का? (ब) इस्राएलातील यज्ञार्पणांनी कशावर जोर दिला व त्याने कशाची पडछाया दर्शविली?

६ तथापि, खरोखरीच्या “स्वर्गीय अन्‍ना”च्या गरजेपेक्षा अधिक मोठी गरज मानवजातीला सातत्याने राहिली. अद्‌र्भितरित्या पुरविण्यात आलेला मान्‍ना ज्यांनी खाल्ला ते सर्व वृद्ध झाले व वारले, कारण मानवास वारशाने लाभलेल्या पापीष्ठ स्थितीमुळे, त्यांचा आहार जरी कोठला असला तरी मरण हे अटळ होते. (रोमकर ५:१२) इस्राएलातील यज्ञयागांनी देवाबरोबर चांगला नातेसंबंध राखण्याचा आधार दिला. पण त्या यज्ञार्पणांनी राष्ट्राची पापीष्ठता मोठ्या प्रकर्षाने वदविली. ही यज्ञार्पणे “पापे दूर करावयाला कदापि समर्थ” ठरली नाहीत. उलटपक्षी त्या अर्पणांनी, पापे “कायमची” काढून टाकणाऱ्‍या येशूच्या ‘एकच यज्ञा’कडे अंगूली दर्शविली. आता स्वर्गातील आपल्या वैभवी स्थानावरून येशूला त्या यज्ञार्पणाच्या मोलाचा अवलंब लागू करता येतो.—इब्रीयांस १०:१—४; ११–१३.

“स्वर्गातून येणारी खरी भाकर”

७. (अ) येशूचे योहानाच्या ६व्या अध्यायातील शब्द कोणत्या संदर्भात घेण्यास हवेत? (ब) येशूने लोकांना का दटावले?

७ आता आपण योहानाच्या ६व्या अध्यायाकडे वळू. येशूने येथे उद्‌गारिलेले बोल ५व्या अध्यायात लिखित असणाऱ्‍या बोलाचे पुढेच भाष्य नव्हे. येथील संदर्भ वेगळा आहे कारण त्यात वर्षाचे अंतर आहे. हे इ.स. ३२ वे वर्ष आहे. येथील वातावरण यरूशलेमातील स्व–धार्मिक यहुद्यांतील नसून गालीलातील सर्वसाधारण लोकातील आहे. येशूने नुकतेच, पाच जवाच्या भाकरी व दोन लहान मासे याकरवी ५,००० लोकांच्या समूहाला जेवू घालण्याचा चमत्कार सम्पन्‍न केला होता. दुसऱ्‍या दिवशीही जनसमूह येशूच्या मागे चालला, त्यांना वाटले की आताही फुकट अन्‍न खायला मिळेल. यामुळेच येशू त्यांना म्हणतो: “तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करिता. नाशवंत अन्‍नासाठी श्रम करू नका तर . . . सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्‍न . . . त्यासाठी श्रम करा.” अशाप्रकारचे अन्‍न त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या लोकांना द्यावे याकरता पित्याने येशूला त्यांच्यामध्ये पाठवले होते. ही “स्वर्गातून येणारी खरी भाकर” होती व ती खाण्याचा परिणाम, प्राचीन इस्राएलांनी खाल्लेल्या मान्‍नापेक्षा वेगळा व दीर्घकालीन होणार होता.—योहान ६:२६–३२.

८. एखाद्यास सार्वकालिक जीवनाची प्राप्ती कशी होईल?

८ या ‘अन्‍ना’मुळे जे लाभ मिळणार होते त्याचे स्पष्टीकरण येशूने केले. तो म्हणाला: “मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्‍वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. . . . माझ्या पित्याची हीच इच्छा आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन.”—योहान ६:३५–४०.

९, १०. (अ) “जीवनाची भाकर” व मान्‍ना यात कोणते वैधर्म्य आहे? (ब) योहान ६:४२–५१ नुसार येशूने कोणास आपला देह दिला? (क) हे त्याचे ‘मांस कसे खातात?’

९ येशूचे ऐकणारे भौतिकवादी यहुदी त्याच्या या शब्दावर वादंग माजवतात. त्यांना येशू हा योसेफ व मरीयेचा पुत्र यापेक्षा वेगळे काही दिसत नाही. त्यामुळेच येशू ताकीद करतो: “तुम्ही आपसात कुरकुर करू नका. ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही; त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन.” यानंतर तो पुन्हा सांगतो: “स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्‍या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईल ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.”—योहान ६:४२–५१.

१० तद्वत, “जगाच्या जीवनासाठी”—मुक्‍त होऊ शकणाऱ्‍या मानवजातीच्या सबंध जगाखातर येशूने आपला देह दिला. मानवजातीच्या जगातील “जो कोणी” लाक्षणिकपणे “ह्‍या भाकरीतून” खाईल म्हणजे येशूच्या मुक्‍तीदायक यज्ञार्पणावर आपला विश्‍वास प्रकट करील त्याला सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर प्रवेश मिळेल. अरण्यात इस्राएलांबरोबर मान्‍ना खाण्यात ज्या ‘मोठ्या मिश्र समुदायाने’ सहभागिता घेतली होती तो येशूची “दुसरी मेंढरे” याच्या मोठ्या लोकसमुदायाची पडछाया असून तो “देवाचे इस्राएल” याच्या अभिषिक्‍त शेषांसमवेत येशूचे मांस लाक्षणिकरित्या भक्षित आहे. हे ते, त्याच्या यज्ञार्पणावर विश्‍वास प्रकट करून करीत आहेत.—गलतीकर ६:१६; रोमकर १०:९, १०.

११. येशूच्या आणखी कोणत्या बोलण्याने यहुद्यांना मोठा धक्का बसला, आणि का?

११ तथापि, येशूच्या त्या भाष्यामुळे गालीलमधील त्याच्या श्रोत्यांपैकी बऱ्‍याच जणांना धक्का बसला. आपला देह खाण्याच्या प्रकाराबद्दल येशूने आणखी पुढे म्हटले: “मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्‍त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो व माझे रक्‍त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्‍त खरे पेय आहे.” (योहान ६:५३–५५) केवढे धक्कादायक! नरभक्षणाची कल्पना तर यहुद्यांना घृणित होतीच पण शिवाय त्यांना नियमशास्त्राने लेवीय १७:१४ नुसार “कोणत्याही प्रकारचे रक्‍त सेवन कर”ण्यास सक्‍त मनाई केली होती.

१२. (अ) येशू येथे कशावर जोर देत होता? (ब) ही गोष्ट येशूच्या सहवारशांच्यापुरती मर्यादित नाही हे कोणकोणती शास्त्रवचने दाखवतात?

१२ येथे, अर्थातच, येशू ज्या कोणाला सार्वकालिक जीवनाची प्राप्ती करण्याची इच्छा होती त्याने, येशूने नंतर आपले जे परिपूर्ण शरीर यर्ज्ञापणात वाहिले व जीवनी रक्‍त सांडले त्यावर विश्‍वास प्रदर्शित करून ते प्राप्त करण्यास हवे यावर जोर देत होता. (इब्रीयांस १०:५, १०; १ पेत्र १:१८, १९; २:२४) ही तरतूद येशूच्या केवळ सह वारसदारांपुरतीच मर्यादित नाही. यात “मोठ्या संकटातून” बचावणारा “मोठा लोकसमुदाय” याचाहि समावेश असलाच पाहिजे कारण त्यांनी “आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुवून शुभ्र केले आहेत.” देवास “पवित्र सेवा” सादर करण्याकडून येशूच्या यज्ञार्पणावरील विश्‍वास प्रदर्शित केल्यामुळे पृथ्वीवरील सर्वात मोठ्या संकटकाळातून त्यांना बचाव मिळतो. अशाचप्रकाराने रहाब हिलाही नीतीमान घोषित केले गेले होते व त्यामुळे यहोशवाने यरीहो शहराचा नाश केला त्यावेळी त्याच्यातून ती निभावली.—प्रकटीकरण ७:९, १०, १४, १५; यहोशवा ६:१६, १७; याकोब २:२५.

“तुम्हामध्ये जीवन”

१३. (अ) योहान ५:२६ व योहान ६:५३ची तुलना करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे? (ब) सर्वसाधारण अशी कोणती ग्रीक व्याकरणाची रचना योहान ६:५३ विषयीची समजावणूक देण्यात आम्हाला मदत करते? (क) तद्वत, “तुम्हामध्ये जीवन” याचा कार्य अर्थ आहे व तो कोणाला कसा लागू होतो?

१३ योहान ६:५३, ५४ मध्ये येशू “सार्वकालिक जीवन” याचे साम्य “तुम्हामध्ये जीवन” या सोबत दाखवतो. त्यामुळे या संदर्भात, “तुम्हामध्ये जीवन” ही संज्ञा, येशूने योहान ५:२६ मध्ये जी संज्ञा वापरली त्यापेक्षा वेगळी आहे हे कळते. “तुम्हामध्ये जीवन” यासारखी भाषाषैली शास्त्रवचनात इतरत्रही आढळते, जसे की, “तुम्हामध्ये मीठ असू द्या.” (मार्क ९:५०) आणि “योग्य प्रतिफळ आपल्याठायी भोगले.” (रोमकर १:२७).a या शास्त्रवचनात इतरांना मीठ देण्याचे वा प्रतिफळ देण्याचे सामर्थ्य एखाद्यापाशी आहे असे सूचित होत नाही. उलटपक्षी आंतरिक पूर्णता वा संपूर्णता त्याकरवी सूचित होते. त्यामुळेच, योहान ६:५३ मधील “तुम्हामध्ये जीवन” या संज्ञेचा अर्थ, सरतेशेवटी जीवनाच्या परिपूर्णतेत प्रवेश मिळविणे वा ती प्राप्त करणे असा आहे. राज्यवारसदारांचा “लहान कळप” याला या गोष्टीचा अनुभव त्याचे स्वर्गात जाण्यासाठी पुनरुत्थान होते त्यावेळी येते तर “दुसरी मेंढरे” याला याचा अनुभव हजार वर्षानंतर म्हणजे त्यांची परीक्षा झाल्यावर त्यांना नंदनवनमय पृथ्वीवर सार्वकालिक जीवनासाठीं नीतीमान असे घोषित केले जाईल त्यावेळी येईल.—१ योहान ३:२; प्रकटीकरण २०:४, ५.

१४. “स्वर्गातून आलेली भाकर” यापासून आणखी कोणास फायदा मिळेल व कसा?

१४ “स्वर्गातून आलेली भाकर” यापासून इतरांनाही फायदा होऊ शकतो. येशूने, ‘त्याचा देह खालेल्या व रक्‍त प्राशन केलेल्या’ पण नंतर वारलेल्या व्यक्‍तिबद्दलही म्हटले की, “मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन.” मरणप्राय स्थितीत असणारे निद्रावश अभिषिक्‍त ख्रिश्‍चन, येशू ख्रिस्ताचे राज्य वैभवात “प्रगट होणे” होते त्यावेळी वाजणाऱ्‍या ‘शेवटला कर्ण्या’च्यावेळी मृतातून पुनरुत्थित होतात हे आपणाला माहीत आहे. (१ करिंथकर १५:५२; २ तिमथ्यी ४:१, ८) पण जे मरणात निद्रावश होणार त्या भावी ‘दुसरी मेंढरे’ याजबद्दल काय? याबाबतीत, मार्थाने लाजर वारला त्यावेळी जे उद्‌गार काढले ते लक्षात घेणे मोठ्या आस्थेचे आहे, कारण तेव्हा देवभिरु यहुद्यांपाशी पृथ्वीवरील पुनरुत्थानाशिवाय दुसरी अशी कोणतीही आशा नव्हती. मार्थेने आपला विश्‍वास याप्रकारे बोलून दाखविला: “तो [लाजर] शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” (योहान ११:२४) या कारणास्तव, सध्या ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये जगणारे आपण आशा बाळगू शकू की “मोठा लोकसमुदाय” पैकीचे जे विश्‍वासू जन आता मरणात निद्रावश झाले आहेत त्यांचे या पृथ्वीवर आरंभीच पुनरुत्थान होईल की त्याकरवी त्यांना पुन्हा “स्वर्गातून उतरलेली भाकर” खावयास मिळेल आणि आपल्या दृष्टिपथात सार्वकालिक जीवन ठेवता येईल. ही केवढी भव्य आशा आहे! आणि या आशेविषयीचे प्रमाण प्रत्यक्षात येशूला मृतातून पुनरुत्थित करण्याद्वारे देण्यात आले आहे.—१ करिंथकर १५:३–८.

“ख्रिस्ताबरोबरील ऐक्य”

१५. “ख्रिस्ता बरोबरील ऐक्य” याविषयीचे येशूचे शब्द कोणाला लागू होतात व तुम्ही ते का म्हणता?

१५ येशू पुढे म्हणतो: “जो माझा देह खातो व माझे रक्‍त पितो तो मजसोबत ऐक्यात मी त्याच्या बरोबर ऐक्यात राहतो.” (योहान ६:५६) तद्वत, हे येशूच्या यज्ञापर्णावर विश्‍वास धरणारा व ‘स्वत:मध्ये जीवना’ची आशा करणारा “जो कोणी” आहे त्याविषयी खरे ठरते. असा विश्‍वास प्रदर्शित करणारे सर्व येशू “बरोबर ऐक्यात” येतात. पृथ्वीवरील जीवनाची आशा बाळगणारा “मोठा लोकसमुदाय” हा अर्थातच, “ख्रिस्ताच्या ठायी” वा “ख्रिस्ता बरोबरील ऐक्यात” नाही ते या अर्थी की ते त्याचे सहवारीस, ज्यांना येशू प्रमाणेच स्वर्गीय पुनरूत्थान लाभते त्या त्याच्या वधूवर्गाचे सदस्य नाहीत. (रोमकर ८:१, १०; १ करिंथकर १:२; २ करिंथकर ५:१७; ११:२; गलतीकर ३:२८, २९; इफिसकर १:१, ४, ११; फिलिप्पैकर ३:८–११) तरीपण पृथ्वीवरील जीवनाची आशा धरणाऱ्‍या सर्वांनीच, जसे “लहान कळप” याच्या बाबतीत अपेक्षित आहे त्याप्रमाणेच “देवाची परिपूर्ण इच्छा” जाणून व त्याप्रमाणे वागून पिता व पुत्र यांच्या पूर्ण सहमतात असावे व असलेच पाहिजे.—रोमकर १२:२; पडताळा योहान १७:२१.

१६. (अ) ख्रिस्ताच्या यज्ञार्पणावर विश्‍वास ठेवणारे सर्व कोणत्या मार्गी येशू “बरोबरील ऐक्यात” आहेत? (ब) उद्देश व प्रयत्न याबद्दल असणारी त्यांची एकता कशात प्रवर्तित दिसते?

१६ याच्याच अनुषंगाने, आज विश्‍वास राखणाऱ्‍या आणि येशू बरोबरच्या ‘ऐक्यात’ महत्वपूर्ण मार्गी अवलंब करणाऱ्‍या सर्वांना ख्रिस्ताच्या यज्ञार्पित शरीर व रक्‍ताचे मोल प्राप्त होते. सर्वांना यहोवा देवाच्या विश्‍वव्यापी कुटुंबाचे भाग बनायचे आहे. आजच्या कठीण अशा “शेवटल्या काळी” हे सर्व जागतिकपणे विश्‍वास, उद्देश व कार्य यांचे ऐक्य राखून आहेत. येशूवरील विश्‍वासामुळेच यांना, येशूने पृथ्वीवर केली त्यापेक्षा “मोठी कृत्ये” कार्याच्या विस्ताराच्या अनुषंगाने करणे जमते. शिवाय हेही लक्षात घ्या की, या काळी यहोवाचे कार्य करणाऱ्‍या “मोठा लोकसमुदाय” ९९.७ टक्केवारीचा आहे. (योहान १४:१२; रोमकर १०:१८) उद्देश व प्रयत्न यांच्या एकतेचा प्रत्यय, जगव्याप्तपणे प्रचंड प्रमाणात होणाऱ्‍या साक्षीकार्यात तसेच वॉचटॉवर संस्थेच्या इमारती बांधणीच्या प्रकल्पास दिल्या जात असलेल्या स्वेच्छापूर्ण पाठबळात दिसून येतो. (स्तोत्रसंहिता ११०:३) मानवजातीच्या जगातील लोकांपैकी किती लोक विश्‍वास ठेवतील व या मोलवान ऐक्यात विलिन होतील ते अद्याप पहावयाचे आहे. आधुनिक अहवाल कळवितो की सध्या ३०,२४,१३१ क्रियाशील साक्षीदार आहेत.

१७. स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्‍या सर्वांनी कोणकोणत्या मुद्यांसंबंधाने जाणीव ठेवण्यास हवी?

१७ पुढल्या वर्षीच्या स्मारकविधी समारंभाला पुष्कळ आस्थेवाईक लोक येतील व उपस्थितांची प्रचंड संख्या दिसेल अशी आम्ही आशा करतो. “दुसरी मेंढरे” याचे लाखो सदस्य “लहान कळपा”च्या बुजत जाणाऱ्‍या संख्येच्या सभासदांबरोबर उपस्थित राहतील. सर्वजण, यहोवाने ख्रिस्ताकरवी जी प्रेमळ तरतूद केली त्याविषयीची आणि ख्रिस्ताच्या शरीर व रक्‍ताविषयीची गुणग्राहकता जाणतील. तरीपण आपली भूमिका काय ते प्रत्येकाने जाणले पाहिजे. स्मारकविधीच्या बोधचिन्हांची सहभागिता घेण्याने सार्वकालिक जीवन मिळत नाही. ही येशूच्या यज्ञार्पणाची बोधचिन्हे असून त्याचा प्रथम अवलंब “नवीन करारा”सोबत आहे. जे अभिषिक्‍त जण त्या करारात आहेत असेच केवळ त्या बोधचिन्हांची सहभागिता घेऊ शकतात. एखादा एकतर नव्या करारात असतो व नाही तर त्यात नसतो. (१ करिंथकर ११:२०, २३–२६) जे या नव्या करारात नाहीत आणि ज्यांना येशूने राज्याच्या करारात समाविष्ठ केलेले नाही अशांनी स्मारकविधिच्या बोधचिन्हाची सहभागिता घेऊ नये. तरीपण, आपणासंबंधाने येशूचा यज्ञार्पित देह व रक्‍त केवढे मोलवान आहे याची जाणीव ठेवण्यास हवी. (लूक २२:१४–२०, २८–३०) हे यज्ञार्पण असे आहे की ज्याद्वारेच त्यांना पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची प्राप्ती होऊ शकते.

१८. येशूच्या यज्ञार्पणाचा जो अर्थ आहे त्याची स्पष्ट ओळख राखल्याने कोणता आनंद मिळू शकतो?

१८ येशूच्या यज्ञार्पणाचा मानवजातीकरता जो अर्थ होतो ते सर्व स्पष्टपणे ओळखून आपण भावी स्मारकविधिच्या प्रसंगास उपस्थित राहू या. “लहान कळपा”च्या सदस्यांनी त्यांना असणाऱ्‍या पाचारणाबद्दल जागृत रहावे. तसेच “दुसरी मेंढरे” याच्या वाढत्या संख्येने परिपूर्ण पृथ्वीवरील “स्वतःमध्ये जीवन” राखण्याच्या भवितव्याविषयी आनंद करावा व आता पिता, पुत्र व पृथ्वीवर अद्याप उरलेल्या अभिषिक्‍त शेषाच्या मावळत्या लोकांबरोबरच्या ऐक्याचे मोल जाणावे. “जीवनाची भाकर” सर्वांसाठी उपलब्ध आहे याचा आम्हा सर्वांना केवढा आनंद वाटावा बरे!

[तळटीपा]

a  मत्तय ३:९; ९:३; १३:२१; मार्क ५:३०; ६:५१; लूक ७:३९, ४९; १२:१७; १८:४; योहान ५:४२; ११:३८; प्रे. कृत्ये १०:१७; २ करिंथकरांस १:९ हे पण पहा.

उजळणीकरता प्रश्‍न

◻ इ.स. ३२ मध्ये येशूने कोणत्या दोन प्रकारच्या मान्न्याविषयी व ते कोणासाठी आहे याबद्दल बोलणी केली?

◻ येशू ‘आपला देह खाण्याविषयी व रक्‍त पिण्याविषयी’ कोणाला आमंत्रण देतो व हे ते कसे करतात?

◻ “तुम्हामध्ये जीवन” याचा काय अर्थ होतो व हे केव्हा व कसे मिळते?

◻ “जीवनाची भाकर” हिजसंबंधाने सर्वजणांना कोणत्या आनंदात सहभागी होता येईल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा